नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, September 27, 2011

अतिथी देवो भव !


                                     अतिथी देवो भव !
संस्कृती आमची म्हणते
टॅक्सीचे मिटर मात्र
भलतेच जोरात पळते !

Sunday, September 25, 2011

वेलकम


अमेरिकन डॉलरने
पन्नाशी पार केली
माधुरीनेही मग
मुंबईची वाट धरली

रस्त्यातील खड्ड्यात
वेलकमचे बोर्ड लागले
नेनेंचे ही ' दिल ' मग
धक धक करु लागले

Friday, September 23, 2011

षटकार



सकाळीच मिडियाने
तो षटकार दाखवला !
अन शोएबच्या बोलीचा
फुगा फटकन फुटला !!

Friday, September 16, 2011

टॉप टेन


टॉप टेन ची लागण 
 मंत्र्यानाही झाली
विमान वेगाने तेंव्हा
लक्ष्मी बाहेर आली

आकड्यांचा हा तर
भुलभुलैया आहे
पटले नाही तरी
हेच  वास्तव आहे

Wednesday, September 14, 2011

ओव्हरटेक


सुज्ञ नेते नेहमीच
सत्तेचे मर्म अचूक जाणतात !
मुले मात्र त्यांची
ओव्हरटेक वरुन भांडतात !!

कुठले इंजिन पुढे जाईल
हे जनताच ठरवेल !
मराठीचा ' झेंडा' मात्र
दिमाखात फडकेल !!

अमोल केळकर

Monday, September 12, 2011

भाऊबंधकी


अति तेथे माती होते
निसर्ग देतो संकेत
भाऊबंधकी आणूया
लोकपालच्या कक्षेत

Thursday, September 8, 2011

एकीचे बळ


' नाना' प्रकारे समजावले
  तरी नाही उमगले !
    'राज' कारणामुळे ! 
' एकीचे बळ ' विसरले !

Related Posts Plugin for WordPress, Blogger...