नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, January 31, 2012

गोंधळात गोंधळ




  तू मला मार !
  मी गोंधळ घालतो !!
  मग बघ  !
 आपला सिनेमा !
 कसा जोरात चालतो !!

Friday, January 27, 2012

प्रगती


प्रगती झाली संघाची !
पाचव्या दिवशी खेळणार आहे !
बाराच्या भावात जाता जाता !
लाज थोडिशी वाचणार आहे !!

Friday, January 20, 2012

पॊवर गेम’


पॊवर गेम’च्या खेळात
काकानेही बाण सोडला
खास-दाराने आनंदचा
मासा गळास लागला.

Thursday, January 19, 2012

मैदानी ( राज ) कारण -


मैदान मारणा-यांना आता
 मलिदा दिसू लागली !
म्हणूनच मैदान राखायला
कोर्टाची पायरी चढली !!


Wednesday, January 18, 2012

स्वेटर आणि वज्रलेप




                          विठोबाला वज्रलेप !
                           गणपतीला स्वेटर !
                          बत्तीसकोटी देवांत !
                          आता कुणाचा नंबर ??



प्राईम टाईम - मालिका



प्राईम टाईम साडेआठचा !
रंगलाय 'लग्नाच्या गोष्टीत' !
सासू सुना घराघरातल्या !
पहात बसल्यात ऐटीत !!

Monday, January 16, 2012

चपला आणि शाई


 पुर्वी होत्या चपला !
आता आली काळी शाई !
रोज घडे नवा  तमाशा !
करु नका बिल्कुल घाई !!



Saturday, January 14, 2012

तात्काळ सेवा


' तात्काळ सेवेचा' लाभ आता !
मंदिरातही घेता येतो !
शंभराच्या  पावतीत !
हवा तसा प्रवेश मिळतो !!

Monday, January 9, 2012

हती आणि माया




   जनतेला हताशी धरून
माया साठवायची
अन
निवडणुक लागली की
तिलाच झाकायची


सध्या तरी  आता
पुतळा झाकायला हवा
हत्ती एवढ्या मायेला
संहीतेचा आधार हवा
Related Posts Plugin for WordPress, Blogger...