नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, March 16, 2012

लग्नाच्या २ गोष्टी -




टिआरपी वाढवण्यास
 झीटीवी लागली
 तयारीला !
म्हणुनच आज बोहल्यावर
चढवणार आहेत
राधा आणि यमीला !!




Thursday, March 15, 2012

नवनिर्मीती


नवनिर्मीती
होत असताना
झेलावे लागतात
आघात !
तेंव्हाच पुढे जाउन होते
बछड्याचे रुपांतर
वाघात !!

मनसेच्या पहिल्या महापौरपदी निवड झाल्याबद्दल श्री. वाघांचे अभिनंदन !

Wednesday, March 14, 2012

स्त्रीह्ट्ट


जनतेच्या प्रेमापोटी !
दुर्गामाता अवतरली !
त्रिवेदींची रेल्वेगाडी
रुळावरून  घसरली !!

माजघर ते राजगृह !

एकच अंतीम सत्य आहे !
बालहट्ट ही ममता तर !
स्त्रीह्ट्ट हा वणवा आहे !!

अमोल केळकर

१५/०३/२०१२

झोपेतली गोडी




कोणा कशी कळावी झोपेत काय गोडी
जांभई सुरु होता गाठावी वरची माडी

कासवछाप लावावे
जरी तोच डास चावे
घेऊनी निजलो फरशीवर गोधडी

करिता अजाण चाळे
हसती चतुर बाळे
माझ्याच घोरण्याची करतील गं चहाडी

झोपले कुणी झोपू दे
उठले कुणी उठू दे
राही तशीच आता गादी-उशीची जोडी

Friday, March 9, 2012

जोडी तुझी माझी




स्वतःला तिथे पाहताच !
कळी तिची खुलली !!
मेणाची माधुरीही !!
तिला पाहून लाजली !




Tuesday, March 6, 2012

मराठी पाऊल पडते पुढे -


मनोवृती खेकड्याची !
नाही कुणी म्हणणार !
ठाण्याबरोबर नाशकातही !
मराठी पाऊल उमटणार !

जय महाराष्ट्र !

Monday, March 5, 2012

मुलायम हाताची माया




                     ' पुतळा' झाकला तरी
                               पितळ उघडे पडले !!
                                'मुलायम' 'हाताने 'मग
                               मायेला दूर लोटले 


Friday, March 2, 2012

खेळ संपला.......


चार दिवसाचा पाहूणचार
थोडक्यात आटोपला !
असा कसा अविचार
तुमच्या कडून घडला !

सा-या भारताचे लक्ष
आजच्या खेळाकडे होते !
तुमच्या विजयावरच
खेळाडूंचे शॊपींग ठरणार होते !!



Related Posts Plugin for WordPress, Blogger...