नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, September 28, 2012

सही रे सही


सही झाली रे सही
निर्णय झाला एकदाचा
वाट पहा सगळे आता
पुढचा मंत्री कुणाचा ?

हाय कमांडचे दुर्लक्ष
किड लागली खात्यांना
 
डिमांड येऊ लागली मग
बिनखात्याच्या मंत्र्याना

अमोल केळकर
सटेंबर २९, २०१२




Thursday, September 27, 2012

शुभेच्छा फलक .....


सगळेच जण देत होते
शुभेच्छा मला फलकावर
एकानेही सावरले नाही
निवडणुकीत मी पडल्यावर

अमोल केळकर
२८, सप्टेंबर २०१२


Tuesday, September 25, 2012

घडतंय - बिघंडतयं !


कुणाचे हात बनलेत काळे
कुणाचे खातंच ठिबकतयं
घडतयं सर्वही  अचंबीत
नेत्यांच काय बिघडतयं ???

कुणाचे तंत्र दबावाचे
कोण करतो करणी
जमले ज्याला हे सर्व
त्याचीच मंत्रीपदावर  वर्णी

अमोल केळकर
२६ सप्टेंबर , २०१२




ठिबक - सिंचन



ब-याच चिंतना नंतर
मिळाले सिंचन खाते
काय ठिबकले आतून 
काय मिळाले आयते ?

अमोल केळकर
सप्टेंबर २५, २०१२

Wednesday, September 19, 2012

महा - ( घा ) ई !


काही  तासांची  पुर्वसूचना
मानली नाही सरकारने
परिस्थीती लक्षात घेऊन
मग '
हात' सोडला    घाईने !

ममते बरोबर करुणा जाते
कोण जबाबदार या स्थितीला
महागाई तर करतीय रेकॉर्ड
महिन्याच्या प्रत्येक तिथीला !!!

अमोल केळकर
२० सप्टेंबर , २०१२ 


Monday, September 17, 2012

बर्फ आणि बर्फी



बर्फ म्हणाला बर्फीला
पाहूया सिनेमा 'बर्फी '
तयार आहे द्यायला
तुझी असेल ती फी

बर्फी म्हणाली बर्फाला
तयार आहे मी यायला
पण काय करु मी  जर
लाग
लास तू वितळायला


अमोल केळकर
सप्टेंबर १८,२०१२


Sunday, September 16, 2012

न्यू जर्सी Vs ओल्ड जर्सी


धोनी आणि खेळाडूंनी
जुनीच जर्सी केली फिक्स
बघू या आता प्रत्येक ओव्हरला
किती मारतात फोर अन् सिक्स

' जूनं ते सोनं ' या विचाराने
 नवीन जर्सीचा केला घात
आपणही घालू जुने कपडे
सामना सुरु व्हायच्या आत.

अमोल केळकर
सप्टेंबर १७, २०१२


आदर्श विसरभोळेपणा



बोफोर्स आणि कोळसाही विसरु
खात्रीच आहे  नेत्यांना
यानेच तर खत-पाणी मिळते
आदर्श  घोटाळ्यांना

'हाताला' हाताशी धरुन
हीत यांचे साधले जाते
हताशपणे जनता मात्र
स्वतःचे हाल बघत बसते.

अमोल केळकर
सप्टेंबर १७, २०१२


Saturday, September 15, 2012

वॉल - द - मार्ट !


द्या सवय सोडून आता
घ्यायचे सामान उधारीने
तयारी करा चला आता
बिल भरायची रांगेने

बॉयकॉट करायचे की आत्मसात
निर्णय  घ्या एकदम स्मार्ट
विचार करत बसलात तर
जोरात आदळेल वॉल मार्ट

अमोल केळकर
१५ सप्टेंबर , २०१२


Thursday, September 13, 2012

मानसीचा ( व्यंग ) चित्रकार तो !



व्यवस्थेचे  व्यंगचित्र
व्यवस्थित रेखाटले
त्यानेच तर सरकारचे
धाबे दणाणले


लोकशाहीचा 
चवथा स्तंभ
गोष्ट दाखवितो मार्मिक
सरकारच्या नजरेत मात्र
 
येतं सगळंच धार्मिक

अमोल केळकर
१४ सप्टेंबर २०१२







Tuesday, September 11, 2012

हिरॉईन



' डर्टी  ' पिक्चरच्या जमान्यात
 गाणीही झालीत ' हलकट '
प्रत्येक सिनेमात नेहमीचीच
'मधुर ' हिरॉईनची ' वटवट

अमोल केळकर
सप्टेंबर १२, २०१२




Monday, September 10, 2012

* साहित्य संमेलन *


जातीचे विषारी फूल
निवडणुकीत फुलणार
साहित्य संमेलनही
 
मागे कसे  राहणार ?

कामगिरी फत्ते झाली की
दिलगिरी येते पाठोपाठ
कुणाचे हीत कुणाचे मिलन
सर्वांना आहे  तोंडपाठ

अमोल केळकर
११ सप्टेंबर २०१२



Sunday, September 9, 2012

श्रध्दा आणि सबुरी


प्रसादाच्या लाडवांवरही !
घोटाळ्याची चढली बुरशी !
मलिदा खाणा-यांना मात्र  !
याची चिंता नाही फारशी  !!

अविश्वा
साच्या तुपावरती !
लाखो लाडू  वळते केले  !
श्रद्वा आणि सबुरीचे  !
 
मर्म इथे  राहून गेले !

अमोल केळकर
सप्टेंबर १०, २०१२



 

Friday, September 7, 2012

उपोषण ते प्रमोशन


संसदेच्या आखाड्यात
खासदार कुस्तीत रंगले
उपोषण ते प्रमोशन
निर्णय धुसर बनले


अमोल केळकर
सप्टेंबर ८, २०१२


सासू देता का सासू



चांदरातझाली तरी
मिळेना हिला सासू !

वेळ यांची एकदम प्राईम
तुम्ही मात्र नका फसू !!

Sunday, September 2, 2012

दिग्गज


'  दिग्गज ' नेते भांडले !
  शोधले ' राज ' कुळाचे!
  देशाच्या मूळ  प्रश्नाकडे  !
  लक्षच  नाही कुणाचे    !!



 अमोल केळकर
 सप्टेंबर ३, २०१२
Related Posts Plugin for WordPress, Blogger...