नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, December 21, 2012

हॅट्रीक




क्रिकेट प्रमाणे महत्त्वाची 
राजकारणातील हॅट्रीक
येत नाही सगळ्यांना
कशी करायची ती ट्रीक

अमोल केळकर
२२/१२/२०१२

Thursday, December 20, 2012

नमो - गुज रात



गुजर गई रात
फुलले कमळ नवे
विकासासाठी जनतेला
आणखी काय हवे ??





Friday, December 14, 2012

अफ्रिकन - सफारी


जनतेच्या शिकारीला कंटाळून
फौज गेली अफ्रिकेला
प्राणीही करणार नाहीत माफ
त्यांच्या या कृतीला

शिकारीच्या  खेळातही
वेळ महत्त्वाची फार
नाहीतर मिळेल विमानात
राजिनाम्याची तार !!!


अमोल केळकर
डिसेंबर १५, २०१२

Friday, December 7, 2012

वेलकम - वॉलमार्ट


' मायेने '  हात हलवत
  वॉलमार्टचे
केले वेलकम....
 ' मुलायम' वेष्टनातील पदार्थ घ्यायला
  कशाला करायचा गम ????


 अमोल केळकर
डिसेंबर ८, २०१२

Saturday, December 1, 2012

पार्क आणि मिल


 कुणासाठी पार्क,  कुणासाठी मिल
 देशातल्या सर्वच जमिनी
 कराव्यात का सिल ?
Related Posts Plugin for WordPress, Blogger...