नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, January 31, 2014

मोनो रेल


मोनो रेल

Thursday, January 30, 2014

बारा सिलेंडर


बाराच्या भावात जाताना, दिले सिलेंडर बारा
मुरब्बी नेत्यांच्या,  खेळ आहे सारा !

त्यांचा होतो खेळ,    आपला जातो जीव
सामान्यमाणसांची  कुणाला नाही कीव  !!

अमोल केळकर
३१ जानेवारी २०१४

Monday, January 27, 2014

टोल


काही समजत नाही बुवा
काय आहे झोल
सर्वच पक्षांना आता
बंद करायचाय टोल

विकासाची स्वप्ने घेऊन
नको ढळू दे तोल
नाहीतर ' आप'ल्या बद्दलही
अपेक्षा होतील फोल

अमोल केळ्कार
जानेवारे २७, २०१४

Saturday, January 25, 2014

पद्म पुरस्कार



श्रध्देने देतायत का माहित नाही

पण  केला जातोय एक सोपस्कार
दाभोळकर सरांना  दिला जातोय
मरणोत्तर पद्म पुरस्कार



विरोधाला विरोध कराताना
निर्णय होतात अन्य
जिवंतपणी लोकांची  मग 
किंमत ठरते शून्य


अमोल केळकर

२६ जानेवारी १४

Thursday, January 23, 2014

टोल



निवडणूकीची तयारी
सुरु झाली अस्ते
होतील ही आता
टोलमुक्त रस्ते !!!


अमोल केळकर
जानेवारी २४, २०१४




Tuesday, January 21, 2014

पुतळा आणि उंची


विकासाच्या नावाखाली
महत्व दिले उंचीला
राजे, सरदारांचे विचार
टांगून ठेवले खूंटीला

सरदारांपेक्षा थोडे जास्त
उंच होणार महाराज
निवडणूकी आधी जनतेला
कशाला करावे नाराज ?

अमोल केळकर
जानेवारी २२, २०१४



Saturday, January 18, 2014

मॅरेथॉन


मॅरेथॉन म्हणून नव्हे  तर
दर दिवशी अशीच मुंबई पळते

राहून बघा इथे महिनाभर
ज्याचे जळते त्यालाच कळते

Thursday, January 16, 2014

पंढरीचा विठूराया


पंढरीचा विठूराया
मुक्त झाला जोखडातून
आनंदले वारकरी
आपल्या मनातून



Wednesday, January 15, 2014

नेते आणि पतंग


राजकारणात असते
नेहमी वातावरण तंग
मग नेतेही उडवतात
अभिनेत्यासह पतंग

अमोल केळकर
१५ जानेवारी २०१४


Monday, January 13, 2014

गोड बोला


चार ओळींनी ही ठरवले
बोलायचे आज गोड
झालं गेलं गंगेला मिळालं
वाईट सारे सोड

अमोल केळकर
१४ जानेवारी २०१४

Friday, January 10, 2014

बाप Vs आई



कुणाला वाटते आपण ' बाप '
कुणाला वाटते आपण ' आई '
जनता मात्र  वाट बघतीय
केंव्हा यांची सत्ता जाई

पहले ' आप ' पहले ' आप '
म्हणण्याची ही नाही वेळ
मतदान नाही केले तर
लोकशाहीचा होईल खेळ

अमोल केळकर
जानेवारी ११, २०१४

अलोकनाथ


संस्कारानी ठरवलं
दुसरी शोधू साथ

कारण भाव खाऊन जातो
एकटाच ' अलोकनाथ '


अमोल केळकर
११/१/१४

Thursday, January 9, 2014

हीत


रस्त्याला नाव देऊन
जर जपले गेले  हीत
तर होणारच ना निवडणूकीत
चारी मुंड्या चीत

अमोल केळकर
९ जानेवारी १४


Related Posts Plugin for WordPress, Blogger...