नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, March 31, 2014

' टाळी - गिरी '



टाळी देण्यासाठी केला हात
पण फोन करायचे टाळले
ना'राजी'चे कारण हे
त्यामुळेच कळले..


अमोल केळकर
१ एप्रील २०१४
-----------------------

च्यायला, च्यामारी ( घाटी शब्द )
लहानपणी तुम्ही मित्राला कधी टाळी दिली नाहीत का?
आम्ही तर टाळीवरुन एक खेळ ही खेळायचो
' दे टाळी ' म्हणले
' घे टाळी ' मग पुढे
घे पोळी मग दुसरा म्हणायचा ' घे , गोळी'
दे विडा  आणि शेवटी खा . ' किडा '

असे म्हणायचे आणि खो खो हसायचे, गंमतीचे दिवस होते ( आमच्यात किडेगिरी करायची बी ही अशी लहानपणीच रुजली होती , असो )

मुंबईतली मुले असा खेळ खेळायची नाहीत का? बहुतेक नाहीच
नाही तर एका समवयस्क भावाने ' घे टाळी ' म्हणले असताना दुसरा भाऊ , फोन नाही आला म्हणून रागावून बसला नसता.  आमच्या सारखे असतो तर तडक ' शिवाजी पार्क ला जाऊन घे टाळी, दे टाळी खेळायला सुरवात केली असती
तसे झाले असते तर आज टोळ्या बनवून  इतरांची टाळकी फोडायची वेळ आली नसती. आणि संपुर्ण महारष्ट्रात एक वेगळेच चित्र दिसले असते.

Thursday, March 27, 2014

हर हर महादेव


'हर हर महादेव' ऐवजी
ऐकवला जातोय दुसरा नारा
तिसरा डोळा उघडून विश्वेश्वरा
खल्लास कर खेळ सारा..

भ्रष्ट नेते, भ्रष्ट्राचार
करुन टाक खाक
एकविसाव्या शतकातही
राहू दे तुझा धाक

अमोल केळकर
२८ मार्च १४

Wednesday, March 26, 2014

’ आप ’


गंगेच्या डोहात डूबकी मारुन
धुऊन टाकले पाप.
बघूया आता वाराणसीत
काय करते ’ आप ’

आप ला
अमोल  केळकर
मार्च २७,२०१४

Monday, March 24, 2014

बोटावरची शाई


साता-या बरोबर नव्या मुंबईतही
मतदानाची करा घाई
भले पुसावी लागली जरी
बोटावरची शाई

अमोल केळकर
मार्च २४, २०१४

Tuesday, March 18, 2014

बंधन




इथे नेत्यांपासून कार्यकर्त्यांपर्यंत
कुणालाच नको बंधन
प्रत्येकाच्या मनात फक्त
सत्ता, खुर्ची आणि धन

अमोल केळकर
मार्च १९,२०१४

Sunday, March 16, 2014

होळी / रंगपंचमीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा


भगव्याने  हिरव्याला लावला रंग
हिरव्यानेही मग त्याला रंगवले
हसत खेळत  या खेळात
अनेक रंग सामावले.

राजकारण्यांच्या दुपट्टीपणाने
रंग ही गेले विभागून
निळ्या रंगाचा ही मग
गळा आला दाटून

सगळ्यांचे झाले एकमत
एकीने घडवूया इंद्रधनुष्य
बेजबाबदार पणे भांडायला
आपण का आहोत मनुष्य ?

होळी / रंगपंचमीच्या सर्वांना हार्दीक शुभेच्छा


अमोल केळकर
१७.३.१४

Friday, March 14, 2014

विरार लोकल


अंधेरी लोकल ठिक आहे
पकडून दाखवा विरार लोकल..
मगच लक्षात येईल साहेब
आम आदमीचा असली कल

मुंबईत येऊन म्हणे तुम्ही
वापरली तीन आसनी रिक्षा
नेहमी पेक्षा कणभर अधीक
सामन्य जनतेला झाली शिक्षा..

अमोल केळकर
१४/३/१४

Sunday, March 9, 2014

'राज'निती


कमळाला पाठिंबा देऊन
निशाण्यावर बाण
मराठी माणसाची 'राज'निती
आता तरी जाण .

अमोल केळकर
१०/३/१४

Friday, March 7, 2014

असे कसे ?


लोकसभेच्या मैदानात
उतरणार अस्सल हीरा
अन आता लढाईचा
रंग होईल अधीक गहिरा...

निशाणा साधून दुस-यांवर
मतदान होईल मनसे
एकमेकांना पाडून मग
आपणच म्हणू असे कसे ? असे कसे ?

अमोल केळकर
८/३/१४

मोजदाद


विकासाची मोजदाद करायला
सोळा प्रश्णांची प्रश्णावली.
येणारी निवडणूकच सांगेल
कुणी कुणाची वाट लावली.

दिल्लीहून खास गुरुजी
पेपर तपासायला आले
गुजरातच्या विद्यार्थांना
वाटले नाहीत ते 'आप'ले

अमोल केळकर
७/३/१४


Thursday, March 6, 2014

इकडे - तिकडे


आधी बोलवत होतो तेंव्हा
केलीत तुम्ही  ना ना

तिकडे तिकीट न मिळता
इकडे लगेच आलात ना....

अमोल केळकर
www.poetrymazi.blogspot.in


गुलाबी गँग



आता काय म्हणे
गँग ही झालीय गुलाबी


समजले नाही काही तर
गाडून टाकीन तुलाबी


अमोल केळकर
७/३/१४

Wednesday, March 5, 2014

तारखा 2014


लोकसभेच्या निवडणूकीच्या
जाहीर झाल्या तारखा

काही दिवस तरी कमी होईल
नेत्यांची खा.खा.....

अमोल केळकर
५ मार्च २०१४

Related Posts Plugin for WordPress, Blogger...