नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, April 30, 2014

हापूस आंबा


आज खास तुम्हाला
सांगतो एक निरोप
म्हणे हापूस आंब्यास
बंद झाला आहे यूरोप

आयात निर्यातीच्या भानगडीत
आपण नको जाऊ
इथेच राहून आपण आता
आंबे भरपूर खाऊ


अमोल केळकर
३० एप्रील २०१४



Thursday, April 24, 2014

बोटावरची शाई


आता कशाल पुसा
बोटावरची शाई

पुढील निवडणूकीपर्यंत
अजीबात नाही घाई

अमोल केळकर
१४ एप्रील २०१४

Monday, April 21, 2014

निवडणुकीचा एक दिवस ...




लढु द्या मला मतांसाठी...
तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या प्रभागातले बुथ लुटण्यासाठी
तो दिवस राखून ठेवलाय मी
माझ्या विरोधकांवर कुरघोडीकरण्यासाठी
मी नसेन आता एकटा
काही पाचेक वर्षांसाठी
दुसरे कोणीही असले सोबत
'ते' मंत्रीपद उपभोगण्यासाठी
इच्छा नाही मला त्या नंतर
समाजसेवा करण्याची इतरांसाठी
इच्छा नाही मला share करण्याची
ते टेंडर कोणाही सोबत
जे मी lock केले असतील बिल्डरांसाठी
पण
आता थोडीच वाट पहायची मला
त्या दिवसाची
आता प्रत्येक अपक्ष मिळवायचा आहे मला
फ़क्त अणि फ़क्त सत्तेसाठी

अमोल केळकर
एप्रील २३, २०१४

Thursday, April 17, 2014

भिलवडीची - वांगी


भिलवडीची - वांगी
पुण्यात जाऊन लटकली
पुणेकरांची नावे मग
मतदार यादीतून निसटली

अमोल केळकर
एप्रील १८,२०१४

Wednesday, April 2, 2014

सूप


तेंव्हा नाही का काकांना
दिले होते मी सूप
मग आता कशाला
बसायचे मी चूप ?

अमोल केळकर
एप्रील ३, २०१४
Related Posts Plugin for WordPress, Blogger...