नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, May 31, 2014

तुम्ही यायलाच पाहिजे, मला तुमची हजेरी घ्यायची आहे


....इथे  लिहिण्यात आलेल्या  या लेखाद्वारे कुठल्याही व्यक्ती, पक्ष, नेते , जात , धर्म, पंथ , राष्ट्र , संस्था , आदरस्थान    यांची कुचेष्टा करण्याचे  किंवा   कुणाच्याही भावना दुखवण्याचे  कुठलेही प्रयोजन नाही.  हा लेख विरंगुळा या सदरात मोडतो  आणि केवळ मनोरंजन  व थोडीशी खुशखुशीत टीका - टिप्पणी हा  उद्देश आहे. रसिकांना हे आवडेल  अशी आशा व्यक्त करतो.--  अमोल केळकर 
--------------------------------------------------------------------------------------------------
" तुम्ही यायलाच पाहिजे,  मला तुमची हजेरी   घ्यायची आहे "

पहाटे, पहाटे ' काकस्पर्श संघटना ९१ ' च्या कार्यकर्त्यांना इमेल बोक्स मध्ये वरील निरोप मिळाला आणि सगळ्यानी एकच ' काव काव '  करायला सुरवात केली . लोकसभेतील पराभव आणि आगामी होणा-या निवडणुकीसाठी चिंतन बैठक  हा विषय कार्यक्रम पत्रिकेवर मुख्यत्वे करून असणार  हे सांगायला कुण्या जोतीषाची  गरज नव्हती . ज्यांची हजेरी होणार होती  त्यांनी ताबडतोब  या झाडावरून त्या झाडावर  जात जून्या जेष्ठ  काकांकडे धाव घेऊन , 
' काका मला वाचवा '  अशी आरोळी ठोकली 
    संघटनेचे अध्यक्ष  श्री डोम कावळे  पुण्याहून आपले स्वीय सल्लागार श्री घुबडशास्त्री यांना घेऊन फास्टर मधून एकदम फास्ट निघाले आहेत असा मेसेज मिळताच स्थानिक कार्यकर्ते तातडीने  पिंपळाच्या पारावर जमले.  बैठक कुठे घ्यायची यावर कुणाचेच एकमत होईना. कुणी म्हणत होते आपण आपल्या जून्या ऑफिसच्या प्रांगणात म्हणजे अमरधाम स्मशान भूमीत जमू तर कुणी  विष्णू घाटाचा  घाट घालत होते  , याचवेळी एकाने सांगितले की विष्णू घाट मेनेंजमेंटने  घाटावरील वडाचे झाड  यापुढे कुठल्याही संघटनेला मिळणार नाही असा ठराव नुकताच पास करून घेतला आहे आणि हा त्यांचा अंतिम निर्णय आहे. शेवटी एका सदस्याने सुचवले की, कृष्णा नदीच्या मोकळ्या काठावर एका चिंचेचे मोठे झाड आहे , बागेतल्या गणपती देवळा मागे बरोबर पाचवे झाड  तिथे जमू . जरा लवकरच बैठक ठेवू . म्हणजे रात्रीच्या  डोहाळजेवणाच्या कार्यक्रमाच्या  पुरण पोळीवर ताव मारता येईल . 

ठरल्या प्रमाणे बैठक सुरु  झाली . विभागावर विश्लेषण केले असता दिसून आले की  सरासरी १० पिंडांमागे फक्त २ पिंडावर या संघटनेच्या कावळ्यांनॆ चोची ची   मोहोर उठवली होती. हे प्रमाण खूपच कमी होते. हे प्रमाण वाढण्यासाठी खालील काही उपाय सुचवलेले गेले 
१)  जात - पात  न मानता सर्व जातीच्या पिंडाना यापुढे चोच मारायची ( शिवायची ) परमिशन द्यावी 
२)  सर्व तालुक्याचे गटप्रमुख  विभागवार १० व्या ची यादी तयार करतील आणि दोन दिवस आधी  ती प्रकाशित केली जाईल 
३) शेवटची चोच कुणी मारायची याचा निर्णय हाय कमांड घेईल 
४) विरोधकांना काबूत ठेवण्यासाठी , घुबड शास्त्री एक अ‍ॅप तयार करतील जे लवकरच गुगल प्लेवर डाऊन्लोड करण्यासाठी उप्लब्धद असेल
५) संघटनेच्या सिट्स वाढण्यासाठी महिला कार्यकर्त्यांनाही पिंडाला शिवण्यास परवानगी द्यावी अशी एक मागणी पुढे आलॆ. अर्थात अंतीम निर्णय दिल्लीहून सुषमा कावळे घेतील असे ठरले
यापुढे एकत्र काम करत  १० पिंडामागे ५ तरी मोहोर ' काकास्पर्ष संघटनेच्या असतील असा ठाम विश्वास व्यक्त करत सभा पार पडली 

( संक्ल्पना : अमोल (काव) कर  )

Friday, May 30, 2014

मुख्यमंत्री


कुणाला माहित विदर्भात 
केळी पिकतात का संत्री 
आलेल्या लाटेवर स्वार होऊन 
आम्हाला व्हायचेय  मुख्यमंत्री 

थोडे  दिवस तुमचे 
थोडे दिवस  आमचे 
बघा कसे कामाला लागले 
ह्यांचे आणि त्यांचे चमचे 

( राजकीय  विश्लेषक )  अमोल केळकर 
३० मे २०१४

Saturday, May 24, 2014

नमो नम: !


सकाळी साहेबांच्या केबीन मधे मह्त्वाची मिटींग चालू होती, सवईने मोबाईल साइलेन्ट मोड वर होता,बाहेर आल्यावर पाहिले तर ४ मिस कॊल !

आलेल्या फोनच्या नंबरावरुन हे सगळे फोन अहमदाबाद मधून आले होते. आता अहमदाबादहून मला कोणी, कशासाठी फोन केला असेल , असा विचार करत असतानाच  परत एकदा त्याच नंबरवरुन फोन आला ,
अरे अमोल, ’ किती , फोन करायचा रे !
अरे जोशी काकू , तुम्ही ? कशा आहात , आणि तिकडे गुजराथ मधे काय करताय? अहो , काकू जरा मिटिंग मधे होतो त्यामुळे फोन घेता नाही आला. मी एका दमात बोललो.

बरं, बरं ते जाऊ दे , अरे तुला सांगायचे म्हणजे , आरतीला १६ मेला मुलगा झाला. आणि त्यासाठीच मी इकडे आली आहे

हो का ? अरे वा , अभिनंदन , आरती कशी आहे
दोघेही छान. सिझरिंग झाले रे ! , मी न विचारताच त्यांनी मला सांगीतले

दुपारी १२. ४० , वेळ लिहून घे हा नीट, इती जोशी काकू
ओके काकू, पत्रिका काढायची आहे का ?

हो , रे ती काढायचीच आहे पण आधी जरा सांगशील का रे राशीवरुन ’ न ’ नाव येते का?

अहो काकू, ’ नरेंद्र ’ नाव जूने झाले आता, मी उत्स्फुर्त पणे बोलून गेलो.
.... काकूंनी बोलणे मधेच तोडले, म्हणाल्या अमोल मला माहित आहे तू आत्ता ऒफीस मधे आहेस, पण आज घरी गेल्यावर नक्की सांग, का मी फोन करू?
त्यांनी माझे बोलणे गमतीने घेतले नव्हते हे त्यांच्या आवाजावरून लक्षात आले, मी ही जरा नमते घेत म्हणले,नको नको, काकू मी उशीरा का होईना तुम्हाला फोन करतो..
चला फोन ठेवतो , थांब थांब , अरे तुला वेळ सांगितली ना ?
हो सांगितली की
आणि हो तुला माहिती आहे ना , आरतीची डिलेव्हरी अहमदाबादला झाली आहे, सासरी
हो काकू, म्हणजे जन्मगाव - अहमदाबाद बाळाचे बरोबर ?
बहुतेक त्यांना परत परत डिटेल्स बरोबर आहेत ना याची खात्री करुन घ्यायची होती, काही चूक नको,
चला ठेवतो फोन
एकच काम आधी कर, पत्रिका काढल्यावर बाळाला अमेरीकेला जायचा योग आहे का बघ बाबा
जावई एक - दोन वर्षात जायचे म्हणत आहेत
ह्म्म काकूंची अर्जेन्सी आत्ता कळली होती, बाळाला भारतात जन्म घेऊन २४ तास ही लोटले नव्हते, काकूंना आपला नातू ’ अमेरिकेला ’ जाणार का याची चिंता होती
संध्याकाळी घरी आलो पत्रिका काढली
वृश्चीक रास , जेष्ठा नक्षत्र , चरण २
राशी अक्षर - न , य
म्हणलं चला काकूंची एक इच्छा तरी पुर्ण होणार
परदेश योग आहे का हे पाहू लागलो , आणि कुण्डली परदेश जाण्यास अनुकूल स्थाने देत आहेत हे दिसून आले
काकूंना फोन लावला
अरे, अमोल केलास का अभ्यास? त्या जणू आतूर झाल्या होत्या ऐकायला
काकू सिध्दीविनायक तुमच्या दोन्ही इच्छा पुर्ण करणार
आता काय तुम्ही नातवाला अमेरिकेला पाठवणार. मग माझी फी डॊलर मधे देणार का रुपयात?
काकू हसायला लागल्या, अरे मुंबईत आले की भेटेनच की तुला
मी म्हणलं ठिक आहे काकू , अहमदाबादला जाऊन आलात की सिध्दीविनायकाला लगेच जाऊन या
आणि येताना भरुच्चे शेंगदाणे आणायला विसरु नका हा !
पण काकू , नातवाला अमेरिकेला पाठवत आहात, "अच्छे दीन इधर भी आने वाले है !"
या पुढ्चे वाक्य काकूंनी ऐकले की नाही माहित नाही
नमो नम: !

Friday, May 23, 2014

मला काही काळ शांती भेटली होती ……!


आणि अचानक मला शांती भेटली ….
रोहिणी हॉटेलच्या समोरून ती शांत पणे एकटीच चालली होती .
तिला पाहून मी एकदम चमकलो !
शांती, आमची शाळेतील मैत्रिण ! नावाप्रमाणे शांत , शाळेत असताना सरळ मार्गी जाणारी, ना कुणाच्या अध्यात ना कुणाच्या मध्यात , आपण बरे आणि आपला अभ्यास बरा. पण आज दिसलेली शांती एकदम वेगळीच वाटत होती

शांते ए शांते , मी बिन्धास भर रस्त्यात तिला हाक मारली

तिने मला पाहिले , अरे अमोल कसा आहेस ? तिच्या बोलण्यात वेगळाच उत्साह दिसत होता.

शांते , चल कॉफी पिऊ , मी म्हणले आणि आम्ही दोघे रोहिणी होटेल मध्ये शिरलो.
पाण्याचे पेले टेबलावर आदळून वेटर नेहमीच्या ठसक्यात म्हणाला , बोला ! काय पाहिजे ?
शांते, काही खाणार आहेस ? नको , कॉफीच घेऊ
मी काही ऑर्डर द्यायच्या आत वेटर पुन्हा खासकाला, फिल्टर का नेस ?
शांती कांही बोलायच्या आत, मीच बोललो, दोन फिल्टर कोफी
मग संभाषणाला शांती नेच सुरवात केली , काय अमोल आज काल भेटत नाहीस?

मी नुसताच ह्म्म्म !
नाही आजकाल बायको माहेरी जात नाही का ? नाही निदान पूर्वी बायको माहेरी गेली की तरी भेटायचास - शांती खुदकन हासली , आज शांतीला माझी फिरकी घ्यायची लहर आली होती ।
बरं बाकी तुमचे खास मित्र , मैत्रीण काय म्हणतात ? तुम्ही काय म्हणे भलतेच स्मार्ट झाला आहात असं कल्पना म्हणाली , काय तो Whats app ग्रुप आहे म्हणे तुमचा …
हो ना अग, ' आम्ही विसरभोळे ९१ ' असे नाव ठेवले आहे. माझी कल्पना हां ! मी टिमकी मिरवली !
अरे पण असं नाव? थांब सांगतो, तिचे वाक्य पुर्ण व्हायच्या आताच मी बोललो ,
अगं आपली बॅच ९१ ची आणी इतके दिवस आपण कुणीच एकमेकांच्या संपर्कात नव्हतो, जणू विसारलो आपण एकमेकांना म्हणून विसरभोळे : ' आम्ही विसरभोळे ९१ '
ती नुसतीच हसली ,
तूला माहित आहे आपली ' इर्षा ' , ती ग्रुपची अ‍ॅडमीन आहे , खूप अ‍ॅक्टीव असते, तसेच अभिमान , शिखर , शेफाली , जिद्द हे ही भरपूर दंगा करत असतात..
हो पण, मी, कल्पना, भावना हर्ष, आनंद , स्वानंद , विकास , वत्सला त्यांचे काय ? शांतीने शांतपणे विचारले
हे पण तुमचे मित्रच आहेत ना? फेसबुक, Whats app वर ते भलेही नसतील , भलेही त्यांच्या कडे तुमच्या सारखा स्मार्ट फोन नसेल पण अधून मधून त्यांनाही भेटा, त्यांनाही काही वेळ द्या की , त्यांच्याशी गप्पा करायला नाही का आवडणार ?
मी निरुत्तर , बरोबर आहे शांती तुझे . काही तरी बोलायचे म्हणून बोललो
आम्ही स्मार्ट नसलेल्यांनी ही एक ग्रुप नुकताच तयार केला आहे - शांती
काय सांगतेस ? मी उडालोच
होय , शांती सांगू लागली , आमचा ग्रुप दर महिन्यात एकदा भेटतो , आम्ही गप्प्पा मारतो, एकमेकांचे सुख , दु:ख जाणून घेतो, थोडावेळ थांबतो आणि निघतो . जणू आमची भिशीच म्हण की..
आवडेल तुम्हाला तुमच्या बिझी शेड्यूल मध्ये ' शांती, भावना, हर्ष, आनंद, स्वानंद, कल्पना यांना भेटायला?

माझा चेहरा पडला , कपातील कॉफी कशीबशी संपवली आणि शांतीला म्हणलं , शांती मला महत्वाची मिटिंग आहे, निघायला पाहिजे, परत केंव्हा तुम्ही भेटणार असाल तेंव्हा मला कळवा, मी नक्की येईन

फटाफट बिलं दिलं आणि तडक सर्विस सेंटर गाठले, दुरुस्तीला टाकलेला मोबाईल केंव्हा एकदा परत मिळतो असे झाले होते . मोबाईल हाहात येताच पहिले स्टेटस फेसबुक, Whats app वर टाकायचे होते


' मला काही काळ शांती भेटली होती ……! '


आता इथून पुढे काही दिवस तरी माझा आणि शांतीचा संबंध सुटणार होता...



( कल्पक ) अमोल केळकर
' आम्ही विसरभोळे ९१ ' Whats app ग्रुप
( टिप : इथे टाकलेली नावे कल्पित आहेत, साधर्म्य अढळल्यास निव्वळ योगायोग समजावा )

Saturday, May 17, 2014

इलेक्शन इफेक्ट


बरबटलेल्या ’ हाता’ वरचा
साफ केला मळ
तेंव्हाच सगळी कडे
फुलले गेले "कमळ"

जिथे तिथे सगळीकडे
कमळाचा आला पूर
मनसेच्या मग  ’इंजीना’ने
यार्डातच सोडला धूर

’धनुष्य बाण’ म्हणाले कमळाला
जोडी तुझी माझी हीट
विरोधकांबरोबर, गद्दारांनाही
बघ कशी आली फीट

युती म्हणाली घड्याळाला
टिक टिक तुझी थांबूदे
धरणातला गाळ निघेपर्यंत
पुढ्ची इलेक्शन लांबूदे

अमोल केळकर

मे १७,२०१४

Friday, May 16, 2014

लोकसभा सिलेक्शन


लोकसभा सिलेक्शन नंतर महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांनी खालील गाणी आपल्या पक्षाचे मुख्य  गाणे असेल असे जाहीर केले आहे 



कॊग्रेस : मला जाऊ द्याना घरी आता वाजले की बारा

शिवसेना :  मी कात टाकली, मी लाज राखली

मनसे : उष:काल होता होता, काल रात्री झाली

राष्ट्रवादी: येऊ कशी कशी मी नांदायला हो

भाजप : फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश


संकल्पना : अमोल केळकर

Thursday, May 15, 2014

१६ मे




कुणी काय करायचे हे
आधीच आहे पक्के
सामान्य माणसा तू
सहन कर  धक्के

सत्येच्या मेव्या भोवती
घोंगावतील राजकीय माश्या
अरे माणसा उगाच कशाला 
बाळगायची खोटी आशा

होतील उद्यापासून सगळे
राजकीय नेते  गोळा
अहो का ? म्हणून काय विचारता
आहे ना मे ची तारीख  सोळा

सर्वच पक्ष, नेते , कार्यकर्ते यांना  मेग्या रिझल्ट साठी शुभेच्छा

भारतीय लोकशाही चिरायू होवो

( सामान्य )  अमोल 


Wednesday, May 14, 2014

निकाल


बारामती पासून बीड पर्यंत
निकाल होतील स्पष्ट
आशा करुया सामान्यांचे
आता कमी होतील कष्ट

एक दिवस  अजून
काढावी लागेल कळ
मग पहा कसे मिळते
भ्रष्टाचाराचे वाईट फळ

अमोल केळकर
१५ मे १४

Tuesday, May 13, 2014

हजाराची नोट


थेटरात जाऊन थेट पहा
एक हजाराची नोट

झाला तरी चालेल खिसा मोकळा
 पण निर्मात्याचे भरले पाहिजे पोट

अमोल केळकर
१३ मे १४

Related Posts Plugin for WordPress, Blogger...