नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, October 24, 2016

एका बागेत होते अनेक पक्षी सुरेख


एका बागेत होते अनेक पक्षी सुरेख 
आला होता पक्षी, कोरियाहून ही  एक 

सदा पडून राही शीत-गृहाच्या संगे
बालहट्ट संमजुनी ते वेगळे तरंगे
दावुनी बोट त्याला मनसे हसती लोक
आला होता पक्षी, कोरियाहून ही  एक

पक्षास दु:ख  भारी,झोपू पाही तळाशी
 कोणीच ना विचारी, राहिले ते उपाशी
जे.जे  पाहून बाजूस वाटे उगाच धाक
आला होता पक्षी, कोरियाहून ही  एक 

एके दिनी परंतु पक्षास त्या कळाले
भय वेड पार त्याचे बागेमधे पळाले
भावंड भांडताना पाहुनी क्षणैक
त्याचेच त्या कळाले तो पेगविन एक










अमोल
२५/१०/१६




Friday, October 21, 2016

अन् एकमुखान बोला ...


दर शनिवारी सांगली  आकाशवाणीवर  हमखास लागणारे गाणे असायचे 
" अंजनीच्या सुता तुला रामाचं  वरदान , एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान "
सध्द्याच्या या व्हाट्सअप युगात आम्ही हेच गाणे असे गुणगुणतो 

हे व्हाटसपच्या दुता, तुला गृपचं वरदान
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन  !!
दाही दिशा तुझे भक्त, करुनी मुक्काम
नुकताची पार केला आकडा शंभर
हादरली वेब दुनिया, बिथरले मान्यवान!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन  !!
विडंबन, विनोद,  काव्य आणी चर्चा
साद -प्रतिसादांचारे जोरदार दणका
विचार मांडू सारे, घेऊनी 'गमभन' !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन  !!
आले कुणी,गेले कुणी तुला नाही पर्वा
तुझ्यापरी नावाचा रे राहील दरारा
पाहुणेही येती, गाती तुझे गुणगान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन  !!
धन्य तुझे सारे धागे , धन्य तुझी सेवा
तुझे भक्त आम्ही सारे, तुच आमचा ठेवा
घे उंचावुनी आता, या आपुल्या ग्रुपची  शान !!
अन् एकमुखान बोला बोला जयजय ऍड$मीन  !!
 लिंबु , मिरची अन्  काकडी  जय बोला ऍड$मीन राव  की !!
 लिंबु , मिरची अन्  काकडी  जय बोला ऍड$मीन राव  की !!

Wednesday, October 19, 2016

दिवाळी


चकली म्हणाली चिवड्याला
कसा आहे दिवाळीचा कल
डाळीने गाठलीय शंभरी
याचीच वाटतीय सल

चिवडा म्हणाला उदासपणे
आमच्यासाठी ये दिन अच्छे नही बुरे
चल व्हाट्सप वर मेसेज आलाय
आपले बोलणे पुरे.

करंजी म्हणाली लाडूला
यंदा तरी होणार का भेट
लाडू म्हणाला वेट
ट्राफीक जाम असेल तर
होईल थोडा लेट

किल्ला म्हणाला मावळ्यांना
अंगणात यांच्या आता चार चाकी
तुम्हाला एकटेपणा वाटला
तर सरळ शिवनेरी वर या की

दुकानतल्या कोप-यामधे
सुरु होती घालमेल
मिठाई, कपडे , फटाके
सगळ्यांना करायचा होता इमेल

पण ती हो हो पणती
तीला होता पूर्ण विश्वास
तेवत राहिल परंपरेची ज्योत
जो वर राहिल श्वास

माझा आरोळी - संग्रह






माझा आरोळी - संग्रह 

Thursday, October 13, 2016

माझे विडंबन...


माझे विडंबन पुढे ढकल भावा 
आप्तांना मित्रांना मैत्रीणीना 

आहे आज मज  फेसबुक सोयरा 
न करी  अव्हेरा कायअप्पा 

न करिता लाईक कारे तू पळाला 
तीन चार वेळा  वाच आता 

अम्या म्हणे  जीव होतो कासावीस 
होऊ दे प्रसिद्ध आता तरी 


अमोल
१४/१०/१६

मूळ गाणे
माझे मनोरथ पूर्ण करि देवा ।
केशवा माधवा नारायणा ॥१॥

नाहीं नाहीं मज आणिक सोयरा ।
न करीं अव्हेरा पांडुरंगा ॥२॥

अनाथांच्या नाथा होशी तूं दयाळा ।
किती वेळोवेळां प्रार्थूं आतां ॥३॥

नामा ह्मणे जीव होतो कासावीस ।
केली तुझी आस आतां बरी ॥४॥


Saturday, October 8, 2016

अनुवादाची दोन दशके


अनुवादाची दोन दशके  - उज्ज्वला केळकर

( ठाणे वैभव - ५ ऑकटोबर  २०१६)


Related Posts Plugin for WordPress, Blogger...