नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, November 30, 2016

काय अप्पा वरच्या या स्माईली


काय अप्पा वरच्या या स्माईली/ प्रतिके  बघताच आम्हाला  ही काही हिंदी/ मराठी  गाणी आठवतात 📝



😉 आँख मारे ये लडका..
😎 गोरे गोरे मुखडे पे काला काला चष्मा
😍  देखा है पहिली बार
🤔 क्या करे या ना  करे ये  कैसी मुश्किल ...
😜 टांग टींग टिंगाक टांग टिंग टिंगांक ( मोरुची मावशी)
💃 आज कल पाव जमी पर नही पडते मेरे...
🙄 डोळे कशासाठी, कशासाठी ....
😆 हसा मुलांनो हसा
🙏🏻 हम को मन की शक्ती देना
😷 काही बोलायाचे आहे पण बोलणार नाही
😏 रुसुबाई रुसु कोप-यात बसू
🛣  ही वाट दूर जाते
⛺ त्या तिथे, पलीकडे  माझी या प्रियेचे झोपडे
🌧 घन घन धारा नभी दाटल्या
🌲 हे चिंचेचे झाड दिसे मज चिनारवृक्षापरि
🌅 फिटे अंधाराचे जाळे
🚂  पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊ या
💥 आली माझ्या घरी ही दिवाळी
🐝 भवरा बडा नादान है
🐹 कोणास ठाऊक कसा पण शाळेत गेला ससा
🌠 तारे जमीनपर.।
🚩 शुर आम्ही सरदार आम्हाला
🖼 मानसीचा चित्रकार तो तुझे निरंतर चित्र काढतो
😛 तुजको मिरची लगी तो में क्या करु

क्रिऎटीविटी रोज एक,
जरी असेल टुकार अन फेक. 📝

Monday, November 28, 2016

सर्वपक्षीय शुभेच्छा


नोटा बंद , भारत बंद तरी
सगळ्यांनाच मिळाल्या पालिका

आम जनता ही झाली मोकळी
पहायला आवडत्या मालिका


सर्वपक्षीय  शुभेच्छा 

Thursday, November 24, 2016

टोलवाटोलवी, अशीही टोलवाटोलवी




जे  टोल मजला लागले, कायमचे बंद होतील का
माझ्या मनीची ही कथा,  राजे तुम्हा कळेल का?

मी पाहतो रस्त्या तुला, मी पाहतो जागाखुली
जे मी स्वप्नात पाहतो, प्रत्यक्ष ते होईल का?

हा वेळ घटकेचा असा, पायात ब्रेक मारलो
जे झोपले होते मागे, जागे तरी होतील का?

माझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज हे
इलेक्शन चे मत दिले, तुजला कधी समजेल का?


संकल्पना : अमोल 📝

Tuesday, November 22, 2016

सांग कधी मिळणार तुला


मेश आणी सिमा देव यांचे काल रात्री एक  गाणं ऐकलं आणी मग त्या गाण्यात अशी  हवा भरायचा मोह आवरता आला नाही👉🏻

---------------------------------------------
सांग कधी मिळणार तुला, पैसा तुला खात्यातला
रंग नाही जाणार आता खोट्याखोट्या नोटेतला

मंदीत आजच रांगेमधुनी दूर लोटीते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला दुखणा-या पायातला

काळसर मांजर फासावरती   लटकावया सगळे उठती
देव कसा कळणार तुला फसलेल्या कर्मातला

सुटता कोडे एका वेळी सर्व माणसे झुकली खाली
वेळ कधी संपणार तुझा आज आणी उद्यातला

संकल्पना : अमोल📝

====================
मुळ गाणे:
सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला !
रंग कधी दिसणार तुला लाजणार्‍या फुलातला ?
गंधित नाजुक पानांमधुनी सूर छेडिते अलगद कोणी
अर्थ कधी कळणार तुला धुंदणार्‍या सूरातला ?
निळसर चंचल पाण्यावरती लयीत एका तरंग उठती
छंद कधी कळणार तुला नाचणार्‍या जलातला
जुळता डोळे एका वेळी धीट पापणी झुकली खाली
खेळ कधी कळणार तुला दोन वेड्या जीवातला

Tuesday, November 15, 2016

ही रांग हळुहळु


ही चाल तुरुतुरु  टाकणारे  जेव्हा
'ही रांग हळुहळु 'म्हणू लागतात  तेव्हा  काहीसे असे  चित्र दिसू लागते  


ही रांग हळुहळु, माणसे जमणे झाले सुरु
मागे गल्ली पर्यत जाऊन पोचली
आज सकाळच्या उन्हात, रांगेतल्या हातात
नोट ही हळहळली 

इथं सगळेच आहेत ना
हातातला फॉर्म दाखव ना
तू जरा माझ्याशी बोल ना
माझे पैसे भरतोस का सांग ना ?
रांग थोडी पुढे जाता,अशी नामी संधी मिळता
काळी मनी पुढे झेपावली
आज सकाळच्या उन्हात, रांगेतल्या हातात
नोट ही हळहळली 

उगाच बूद्धी ताणून
घराचा कप्पा आठवून
बंडल चाचपून हातानं
पिन जरा काढिशी दातानं
हा रोग जीवघेणा, काळ्या पैशाचा बहाणा
आता माणुसकीची खूण  कळली
आज सकाळच्या उन्हात, रांगेतल्या हातात
नोट ही हळहळली 

संकल्पना : अमोल 📝

Monday, November 14, 2016

मी काल शोधली, मी आज शोधली


घराघरात अजुनही शोध मोहीम चालू आहे...📝.🕵
========================
मी काल शोधली, मी आज शोधली
मी पाचशे हजाराची बाई नोट शोधली

सगळ्या घरात, सगळ्या खोलीत
शोध मोहिमही चालती
भर उन्हामधे नार
रांगेत उभी राहती

अंगात माझीया शिरलीय अस्मिता
मी भिंग  हाती घेऊन, शोधतच राहिली
मी काल शोधली, मी आज शोधली

ह्या कार्डांना मी, खुप सांभाळती
मी पिन टाकूनी गो, घेते पैसे हाती
ती हजाराची नोट पाहून वाट लागली...

मी काल शोधली, मी आज शोधली
मी पाचशे हजाराची बाई नोट शोधली

Thursday, November 10, 2016

ट्रम्प, ट्रम्प, ट्रम्प..


शाळेत असताना छडीने हात 🏻 फोडणा-या सर्व मास्तरांना समर्पित🏻

( चाल: ज्यानी मार खाल्लाय ते विचारणार नाहीत )
====================
ट्रम्प, ट्रम्प, ट्रम्प.. ट्रम्प ट्रम्प ट्रम्प
जिंकून आले ट्रम्प ट्रम्प, नाराज झाले काहीजण
ट्रम्प ट्रम्प ट्रम्प.. ट्रम्प ट्रम्प ट्रम्प

कुणा नव्हती आशा, पण जिंकून आले काल
हिलरींचा पत्ता, केला गेला गहाळ
हिरव्या हिरव्या देशांना हा वाटे दुसरा यम
ट्रम्प, ट्रम्प, ट्रम्प.. ट्रम्प ट्रम्प ट्रम्प

व्हाईट हाऊसच्या भिंती, रंगतील सुंदर छान
शपथविधी मधे दिसेल, देशाची शान
Hey!, yuu,! braho आता शब्द नाही कम
ट्रम्प, ट्रम्प, ट्रम्प.. ट्रम्प ट्रम्प ट्रम्प

हल्ले करा, डाँलर वाढवा, बसू नका कोणी
याला नडा, त्याला नडा, नांदू नका कोणी
म्हणा सारे एकदम ॐ "नमो ट्रम्पम"

ट्रम्प, ट्रम्प, ट्रम्प.. ट्रम्प ट्रम्प ट्रम्प




==================
मुळ गाणे:-
छम्‌ छम्‌ छम्‌.. छम्‌ छम्‌ छम्‌
छडी लागे छमछम, विद्या येई घमघम
छम्‌ छम्‌ छम्‌.. छम्‌ छम्‌ छम्‌

मोठ्या मोठ्या मिश्या, डोळे एवढे एवढे लाल
दंतोजींचा पत्ता नाही, खप्पड दोन्ही गाल
शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम
छम्‌ छम्‌ छम्‌

तंबाखूच्या पिचकार्‍यांनी भिंती झाल्या घाण
पचापचा शिव्या देई खाता खाता पान
"मोर्‍या मूर्खा !", "गोप्या गद्ध्या !", देती सर्वा दम
छम्‌ छम्‌ छम्‌

तोंडे फिरवा, पुसती गिरवा, बघु नका कोणी
हसू नका, रडू नका, बोलू नका कोणी
म्हणा सारे एकदम, ओ नमा सिद्धम्‌
छम्‌ छम्‌ छम्‌

Wednesday, November 9, 2016

रांग संपता संपेना .........














मुबईकरांना रांग  काही नावीन नाही. पण आजची ही रांग  जरा वेगळीच वाटली 
आणि उभ्या उभ्याच  हे सुचलं 

( चाल : वाट संपता संपेना  कुणी वाटेत भेटेना ) 
--------------------------------------------------------
रांग संपता संपेना, कुणी पुढेच जाईना 
नव्या नोटा कशा घेऊ कुणी काहीच सांगेना 
रांग  संपता संपेना ......... 

लांब लांब खुप रांग ,झाली  मधेच वाकडी 
दूरदूर कोप-यात होती मोकळी बाकडी 
माणसे येती मधे जाती, कुणी काहीच ऐकेना 

जरा वेळाने अंधूक, दिसे नोटांचे बंडल 
तीन चार  तासा मधे वाटे  गांठींन मंझील 
उभा राहून पाय दुखे , तरी  काहीच होईना 
रांग  संपता संपेना ......... 

Wish you all happy exchange 

==========================
मूळ गाणे 

वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना

लांब लांब उंच घाट, वाट वाकडी-तोकडी

दूरदूर अंधारात एक दिसते झोपडी
सूर येती, अंधारती, कुणी गीतही म्हणेना

दिसे प्रकाश अंधूक, नभी तार्‍यांचा कंदील

अंतर दोन मैलांचे आता गाठीन मंझील
आकाशात रात्र फुले, चंद्र काहीच ऐकेना

Tuesday, November 8, 2016

हवे होते ते निघून गेले


रोम जळत असताना निरो  बंसी बजा रहा था
याच धर्तीवर
*लोक नोटा मोजत💵 असताना आम्ही विडंबन करत होतो*📝

( चाल: सोपी आहे कळेल)

हवे होते ते निघून गेले
नकाच विसरू नोटा शंभर
आता विसंबू या बँकांवर

कसे कुठूनी काढतो आपण
सहज  दिसता मशीन लांबून
उगाच काढतो लगेच खर्चतो
क्षणात साहेब क्षणात नोकर

कोरी नोट ती कशी नटली
सुरेख घडी करुन ठेवली
रांग लावुनिया बघती सारे
केंव्हा लागेल आपला नंबर

खेळ नवा हा  ए.टी.एम.चा
रोज पासवर्ड बदलायाचा
नोटा मिळता शंभराच्या
नकोच कवी नकोच शायर
📝 अमोल
===================
मुळ गाणे:
भले बुरे जे घडून गेले
विसरून जाऊ सारे क्षणभर
जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर

कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर -
============================================
*तुझ्यावाचून करमेना*

Friday, November 4, 2016

तव्यावर केलेली मी बुर्जी बहाल


दिवाळीची सुट्टी संपायच्या ( म्हणजे बायको माहेरून  परत यायच्या ) आधीची 
आमची  नवीन रेसिपी   .... 

( चाल : तुम्हावर केली मी मर्जी बहाल  , नका सोडून जाऊ  रंगमहाल ) 

तव्यावर केली मी बुर्जी बहाल,  
बघा आलाय लाल रंगजहाल 

कांद्याच्या पाती सोलून जागेवरती 
मी  चिरून घेतली लाल मिरची हाती 
मीठ घ्यावं, मोजून घालावं, अंड्याना फोडाव खुशाल 
तव्यावर केली मी बुर्जी बहाल, बघा आलाय लाल रंगजहाल 

चुरचुर करीत तेल  तव्यावर सोड 
त्या तवंग्यावर जिरंही घाल थोड  
वास तो सुटता  शेजारीही  होई हलाल 
तव्यावर केली मी बुर्जी बहाल, बघा आलाय लाल रंगजहाल 

भर भर  सगळी बुर्जी खायची घाई 
ठसका लागता लगेच आठवे आई 
अशीच व्हावी सुट्टी साजरी, नको तो आता फराळ 
तव्यावर केली मी बुर्जी बहाल, बघा आलाय लाल रंगजहाल 

संकल्पना : अमोल 

मूळ गाणे :



तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल

पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल

हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल

लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्‍हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ

Related Posts Plugin for WordPress, Blogger...