नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, December 28, 2016

३१ डिसेंबर




काल एक मला अनोखी धमकी  मिळाली 📝




धमकी दिली  ओळींनी
चारोळी करू खराब
एकतीसला जर दिली नाहीस
प्यायला  थोडी शराब

म्हणलं ठीक आहे, ३६४ दिवस मी आठवण काढली की तुम्ही येता , एक दिवस तुमच्या मनासारखे होउ दे .  बोला, कुणा कुणाला काय काय पाहिजे 

शब्दाने केलेली सुरवात म्हणाला
मी घेईन बिअर खास
बायकोमधेच मग मला
प्रेयसीचा होईल भास 

वेलांटी लगेच म्हणाली
मला चालेल जींन
पण तू शेजारी बसलास
तरच मी थोडी पीन 

यमक म्हणाले  माझ्यासाठी
रेड किंवा व्हाईट वाईन
रजनीकांत ही म्हणेल मग
कविता आहे बडी साईन 

वृत्त म्हणाले पिताना
कॉकटेल घ्यायचे  माझे सूत्र
येताना मी  बांधून ठेवलय
गल्लीतलं ते काळं कुत्र 

अनुस्वारला बोलतानाच
लागत होता मोठा दम
म्हणलं थाब ! माहीत आहे मला
तुला पाहिजे नेहमीची रम 

गण म्हणाले ' डायट कोक'
फारच सुटलय  माझं पोट
कालच मला मिळाली आहे
एटीम मधून पाचशेची नोट 

सगळ्याच ऐकून म्हणणे
मी म्हणालो ,

प्या एक दिवस सगळे
पण जरा जपून
पोलिस दिसलाच समोर
तर कवितेतच राहा लपून 
(  टुकार ई -चार  अनुदिनी तर्फे  (www.poetrymazi.blogspot.in) येणा-या सर्व नवीन दिवसाच्या साहित्यिक शुभेच्छा  ) 

Wednesday, December 21, 2016

भले भले ते पिऊन गेले


मागील काही दिवस आम्ही नोटबंदी सप्ताह पाळला , आता ३१ डिसेंबर सप्ताह करायचा ठरवलाय. या सदरातला  हा दुसरा अध्याय 

भले भले ते पिऊन गेले 
विसळून घेऊ पेले भरभर 
जरा विसावू या धाब्यावर 

असे कुठूनही येतो आपण 
काही न कळता देतो ऑर्डर 
असेच बसतो उगाच हसतो 
क्षणात वेटर करतो सादर 


कधी रम ही आम्ही चाखली 
तरी  चाललो सरळ पावली 
बर्फ  टाकुनिया घेती सारे 
चकणा घेउनी ये रे लवकर 




खेळ जुना हा पिण्यापिण्याचा 
रोज पिऊनी  बरगळण्याचा 
पेग चढता जाताजाता 
येते आपले स्टेशन नाहूर 


अमोल संकल्पना 

मूळ गाणे : - 
भले बुरे जे घडून गेले

विसरून जाऊ सारे क्षणभर

जरा विसावू या वळणावर

कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो उगाच रुसतो
क्षणात आतुर क्षणात कातर


कधी ऊन तर कधी सावली

कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतिची झालर

खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा
डाव रंगता मनासारखा
कुठली हुरहुर कसले काहूर

Monday, December 19, 2016

करुण भासे संघ अजुनी , साहेबा हरलास का रे ?


करूण  नायरने क्रिकेटमध्ये  तीनशेचा टप्पा पार केला आणि  क्रिकेटच्या या साहेबासाठी  आम्हाला हे काही शब्द सुचले ....
( चाल : तरुण आहे रात्र अजूनही  ) 

करुण भासे संघ अजुनी , साहेबा हरलास   का रे ?
तीनशेच्या त्या  खेळीवर तू सुद्धा भाळलास का रे ?

अजुनही दिसतील सदनी चौकाराच्या सर्वमाळा
अजुन तो दमला कुठे रे ? हाय ! तू  दमलास का रे ? 

सांग ह्या चेन्नईच्या मैदानाला काय सांगू ?
उमलले रोमांच सारे , .. पण तू   झुकलास का रे ?

बघ तुला दिसत होता षटकातला चेंडू सारा 
चेंडूफळीच्या खेळाचा गंध तू मुकलास का रे 

उसळती विराट अशा प्रेक्षकांच्या  धूंद लाटा 
तू क्षेत्र-रक्षूनी  सारे कोरडा ठरलाय का रे ? 

Friday, December 16, 2016

सोळावं वर्ष हे धोक्याचं , तर सत्राला असेल खतरा


२०१६ -----> २०१७ 
सोळावं वर्ष हे  धोक्याचं , तर सत्राला असेल खतरा 


नवीन वर्षाच्या सुरवातीलाच 🌞
वेळेवर जागा हो मीतरा 🕔
सोळावं वर्ष हे धोक्याचं 
तर सत्राला असेल खतरा 

मंगल पहाटे मंदिरातून 🔔
ऐकूया  सुरेख अंतरा 🎶
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा 

नोटबंदी  केशलेस व्यवहार 🏧
थोडावेळ  तरी  विसरा 
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा 

ग्रह ता-यांना कामाला लावून 🔆
जोतिषी देऊ दे मंतरा 👳
सोळावं वर्ष धोक्याचं 
तर सत्राला असेल खतरा 

वेस्टर्नच्या मुलींचा सेंट्रलवाला 👰
सहन करतोय  नखरा 
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा


टुकार कवी अमल्याने केलीय 
चार ओळीची स्पेशल जतरा 📃
सोळावं वर्ष हे धोक्याचं
तर सत्राला असेल खतरा....

 मजा आली असेल वाचून 
तर चेहरा करा   हसरा 😂
सोळावं वर्ष धोक्याचं 
तर सत्राला असेल खतरा


टुकार कवी - अमोल 

Tuesday, December 13, 2016

खेळ कुणाला नोटांचा कळला ?


खेळ कुणाला दैवाचा कळला असं पूर्वी लोक म्हणायची , आता असं म्हणायची वेळ आलीय 


खेळ कुणाला नोटांचा कळला ?
मी असो, तू असो, हा असो, कुणी असो
केशलेस  ना आता  कुणा टळला !

जवळ असुनही कसा दुरावा ?
ठाव  मोदिंचा कुणा कळावा ?
खेळ कुणाला नोटांचा कळला ?

धाड  कुणाची ? जीत कुणाची ?
झुंज चालली दोन रंगांची 
खेळ कुणाला नोटांचा कळला ?

 एटीमेचा  मिळे सहारा
जागा मिळेल तिथे  उभारा
खेळ कुणाला नोटांचा कळला 

संकल्पना : अमोल 

Thursday, December 1, 2016

अखेरचा हा तुला दंडवत


प्रिय,   ५००, १००० 💸 🙏🏻

अखेरचा हा तुला दंडवत,
 किती खाल्लास भाव
घराघरातून मावळतीला,
 होणार ' चले जाव '

तुझ्या मुळे जे जगले हसले
नकोनको ते दुखणे आले
आता त्यांचे सारे संपले,
 उरली फक्त हाव

नोट सोडूनी जाते आता, 
देव-धर्माच्या होतील वार्ता
नमो तो ठरला भारी आता,
काबूत आले राव

संकल्पना : अमोल 📝

====================
मुळ गाणे:-
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून जाते गाव
दरीदरींशतून मावळ देवा देऊळ सोडून धाव

तुझ्या शिवारी जगले, हसले, कडीकपारी अमृत प्याले
आता हे परि सारे सरले, उरलं मागं नाव

हाय सोडूनी जाते आता, ओढून नेली जैसी सीता
कुणी न उरला वाली आता, धरती दे ग ठाव
Related Posts Plugin for WordPress, Blogger...