नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, January 29, 2017

गेला युतीचा महिमा....


निवडणुकीच्या पहिल्याच भाषणात केवढी मोठी धाप लागली ती 😇
आज दादा (कोंणके) असते तर नक्की म्हणले असते

गेला युतीचा महिमा, पटपट जागाही पटवा
त्याला  लागलाय खोकला , त्याला  लागलाय खोकला
मताचं बोट कुणी दाखवा 

सा-या मुबंईत इनलय
परी - वर्तनाचं जाळं
काय कमळा बाई तू
करतीया भलतंच चाळं
झोप लागेना  बाई ग
भावाला निरोप पाठवा 

त्याला  लागलाय खोकला , त्याला  लागलाय खोकला
मताचं बोट कुणी दाखवा
👆🏻 😁
🏹🌷🏹🌷🚩🏹🌷🏹
📝३०/१/१७

Friday, January 27, 2017

सांगा ढेकुण कुणी हा पाहिला


परि - वर्तनाच्या चळवळीला नुकतीच मुबंईत सुरवात झाली आणि एका पक्षाने आपल्या दु-या मित्र  पक्षास ढेकूण  असे संबोधले 
आता या परिस्थितीत आमचे वर्तन थोडीच बदलू शकणार ?

सांगा ढेकुण कुणी हा पाहिला
सांगा ढेकुण कुणी हा पाहिला
झोपुनिया असता खाटवरी हो,
तसे होतो आम्ही गहनविचारी
डंखुनी गेला तो विषधारी
कुठे लपुन बाई हा राहिला
सांगा ढेकुण कुणी हा पाहिला
रात्री जागविती, हे ढेकुणजन हे
सुयोग आम्हालागी तुझा ना साहे
बळेबळे ओढता चादर हो
मालवुनि बघा दिवा खोल्यांचा
डंख पदी झाला मेल्याचा
म्हणे अमल्याजी, देह हा फोडिला
सांगा ढेकुण कुणी हा पाहिला
--------------------------------------------
मुळ गाणे -
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
रासक्रीडा करिता वनमाळी हो,
सखे होतो आम्ही विषयविचारी
टाकुनि गेला तो गिरिधारी
कुठे गुंतून बाई हा राहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला
गोपी आळविती, हे ब्रजभूषणा हे
वियोग आम्हालागी तुझा ना साहे
भावबळे वनिता व्रजाच्या हो
बोलावुनि सुज्ञाप्रती नंदाजीच्या
प्रेमपदी यदुकुळ टिळकाच्या
म्हणे होनाजी, देह हा वाहिला
सांगा मुकुंद कुणि हा पाहिला

Wednesday, January 25, 2017

आता पुन्हा साडेसाती येणार


२६ जानेवारी २०१७ ला तुला राशीची साडेसाती संपेल आणि मकर राशीची साडेसाती सुरु  होईल .
वृश्चिक ची शेवटची अडीच आणि धनु ची ५ एक वर्ष  शिल्लक राहतील .कुठलाही ग्रह बदल  ( विशेषतः शनी बदल ) ही जोतिषासाठी विशेष  पर्वणी. या कालावधीत  साडेसाती संबधी  सगळ्यात जास्त विचारणा होते / उपाय विचारले जातात . अशा या पर्वणीच्या कालावधीत संदीप खरेंच  ' आता पुन्हा पाऊस येणार ' हे  गाणं आठवत पण ते दुस-या रूपात 
=====================
आता पुन्हा  साडेसाती येणार 
आता  मकर वाले  घाबरणार 
परत  जोतिषांना कंठ  फुटणार 
सगळ्यांनाच  तुझी आठवण येणार 
काय रे  शनी  देवा .... 



मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग तो  ती लपवणार,
मग लपवुनही ती कुणाला तरी कळावसं वाटणार,
मग ते कोणीतरी ओळखणार,
मग मित्र असतील तर ओरडणार,
नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार...
काय रे शनी देवा...



मग त्याच वेळी तिथे टीव्ही चालू असणार,
त्यात एखादा जोतिषी  उपाय सांगत असणार 
ज्याना साडेसाती नाही ते तावातावाने भाडंत असणार 
निवेदिका  प्रष्णांवर प्रश्न विचारणार 


मकर वाले ते उपाय लिहीत असणार 

धनु वाल्याना सर्व उपाय  पाठ झाले असणार 

वृश्चिक वाले तर आता थोडेच राहिले म्हणणार 

बाकीच्यांना  ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लावणार...
काय रे शनी देवा...



साडेसाती येणार 
मग हवा टाईट होणार 
झालेल्या गर्वाची जाणीव होणार 
मनातल्या मनात झालेल्या चुकांची उजळणी होणार 
मग शनी महाराज आठवणार 
पाय जमिनीला लागणार 
अधिक नुकसान टाळण्यासाठी तेलाभिषेक होणार 
मग  शनी महात्म्याचे नित्य वाचन करावेसे वाटणार 
कर्माचा हिशोब आलेल्या साडेसातीत अचूक लागणार 
काय रे शनी देवा...



साडेसाती आधीही होती 
साडेसाती आत्ताही आहे 
साडेसाती नंतर  ही असेल ..
नमो शनी  देवा...🙏🏻



संकल्पना : अमोल 📝

Tuesday, January 17, 2017


फांदी तुटली.. 
आर्ची पडली.   ...
परशाच राहिला वर.     
.
ब्रेकींग न्यूजचा आलाय ज्वर
ब्रेकींग न्यूजचा आलाय ज्वर
😁 😷
📝 १८/१/१७

( क्रिएटिवीटी रोज एक, जरी असेल टुकार अन फेक)

Monday, January 16, 2017

ओ बाबा , मला सायकल घेऊ दे


न्यायालयाने जरी  त्यांना ' सायकल ' दिली असली तरी, ती  देण्यामागे  त्यांनी  आपल्या  वडिलांना उद्देशून लिहिलेली  ही आर्त  कविताच कारणीभूत आहे असा  गुप्त अवहाल  आमच्या हाती लागला आहे 

ओ  बाबा , मला सायकल घेऊ  दे 
एकदाच हो फिरुनी मला प्रदेश हा पाहू दे 

काका कसे बघा गडबड करिती 
रोज उठुनिया मला चिडविती 
त्यांच्यासंगे समाजात मज नको आता राहू दे 

कमळांचा बघा थवा दिसतो 
राहुलदादा  हात  मारतो 
साकयकलवरुनी त्यांचा  मजला पाठलाग करू दे 

इलेक्शनला उभा राहुनी 
मते देतील सारी शहाणी 
दंगा, खंडणी, मस्ती , लूट वाट्टेल ते करू दे 

ओ  बाबा , मला सायकल घेऊ  दे 
एकदाच हो फिरुनी मला प्रदेश हा पाहू दे 

संकल्पना : अमोल 
--------------------------------------
मूळ गाणे :-
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउ दे

मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे

बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे

धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल्‌ ते होऊ दे

साय - कल


रागावले वडील की मुलांचा
माय कडे  जातो कल

मग न्यायलय ही रोखत नाही
घेण्यासाठी त्यांना सायकल😁

📝 १७/१/१७
🚲   🚲  🚲  🚲  🚲


अखिल ऎश ' माईची कृपा'
सायकल संघटना,  बेलापूर 
😊

Friday, January 13, 2017

गोड बोला


महागले असतील तीळ- गुळ
तरी मुळीच नको दुरावा

(यु) ती  सध्या काय करते
मिळाला का काही पुरावा?

🏹   🌷     🙏🏻   ⌚


🕴🕴🕴🕴🕴🕴🕴
📝१४/१/१६
गोड बोला 🌞

Wednesday, January 11, 2017

टींगल टींगल झाली फार


For a change  म्हणून पहिल्यादांच  आम्ही एका इंग्रजी  बालकवितेचे मराठी विडंबन  केले आहे . मूळ गाणे न ओळखणा-यास परत बालवाडीत घालण्यात येईल 

टींगल टींगल  झाली फार 
सध्या ' ती ' काय करते यार ?

हाय करायला  भितोय काय ?
चल लवकर तिची आली माय 

Inline image 1११/१/१६ 

Monday, January 9, 2017

' ती ' सध्या काय करत आहे?


' ती ' सध्या काय करत आहे?
.
.
दुर्दैवाने  सगळीकडे धुमाकूळ घालत आहे 
.
.
.
.
.
होय तीच  ती
.
.
 
.
.
जात 😐
📝१०/१/१७
Related Posts Plugin for WordPress, Blogger...