विसंगती सदा मिळो , टुकार विडंबन कानी पडो !!!! *****
-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
---------------निवेदन ---------------------------------------------------------
.....इथे सादर करण्यात आलेल लेखन/ कविता / विडम्बने / विचार प्रासंगिक असून याद्वारे कुठल्याही व्यक्ती, पक्ष, नेते , जात , धर्म, पंथ , राष्ट्र , संस्था , आदरस्थान यांची कुचेष्टा करण्याचे किंवा कुणाच्याही भावना दुखवण्याचे कुठलेही प्रयोजन नाही. या सर्व आरोळ्या या विरंगुळा या सदरात मोडतात, आणि केवळ मनोरंजन व थोडीशी खुशखुशीत टीका - टिप्पणी हा उद्देश आहे. रसिकांना इथल्या कलाकृती आवडतील अशी आशा व्यक्त करतो.--------------------------------------------------------------------------------------

......... आपला /
अमोल केळकर /
a.kelkar9@gmail.com

Thursday, May 16, 2019

तात्या अभ्यंकर..।


तात्या गेले?  खरंच वाटत नाही आहे अजून. सकाळी आॅफीस मधे नेहमी प्रमाणे  महाराष्ट्र टाइम्स संकेतस्थळ सुरु केले आणि म.टा लाइव्ह मधे एक बातमी दिसली. ठाण्यात कोपरी येथे शेखर अभ्यंकर यांचा घरात मृतदेह मिळाला. पोलिस अधिक तपास करत आहेत. त्यावेळी लक्षात नाही आले पण थोड्याच वेळात ' मिसळ पाव' ग्रुपवर तात्या गेला असा मेसेज वाचला आणि धक्का बसला. शेखर म्हणजेच चंद्रशेखर अभ्यंकर म्हणजेच आपले  विसोबा खेचर (तात्या )हे लक्षात आले आणि खूप वाईट वाटले.

"व्हाट्स अप" , "फेसबुक" ची क्रेज निर्माण होण्यापूर्वी  आणि "ब्लॉगींग" हा प्रकार तसा नवीन असताना  नवोदित / प्रचलित  लेखकांना  लिखाणासाठी सोशल व्यासपीठ  तात्यांनी 
 ' मिसळ पाव '  या मराठी संकेतस्थळाच्या  रूपाने उपलब्ध करून दिले.  
' मनोगत ' 'मायबोली'  वगैरे इतरही यापूर्वी  अशी संकेतस्थळे होती  पण
 ' मिसळ पाव' (www.misalpav.com)हे अल्पावधीतच लोकप्रिय झाले .  माझ्यासकट अनेक जणांनी इथे आपले पहिले साहित्य प्रकाशित केले असेल.

 नवोदितांना आवर्जून प्रतिक्रिया देऊन त्यांचा उत्साह वाढवण्यात तात्या अागाढीवर होते. तात्या स्वतः एक उत्कृष्ठ सिद्धहस्त लेखक , व्यासंगी  होते. 'व्यक्तिचित्रण' करण्यात तात्यांचा कुणीच हात धरू शकणार नाही असे माझे मत .( इथे त्यांच्या अनुदिनीचा  पत्ता दिला आहे . त्यातील लेख वाचून याची अवश्य प्रचिती येईल . )
शास्त्रीय संगीत , गाणे हा ही  तात्यांचा आवडता विषय होता. 

कालांतराने काही आर्थिक  अडचणी असतील म्हणा  मिसळ पाव तात्यांनी सोडले असे कळले.
 अनुदिनीतील त्यांचे लेख व्हाटसप वर  फिरत यायला  लागले एवढेच.

आणि आज अचानक ही दुःखद बातमी कळली 
एकदा भेटू या , ते टॅरो कार्ड्स ची माहिती समजून घ्यायची आहे तुझाकडून  ही त्यांची  इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही.  सविस्तर कळले नाही पण खुर्चीत बसले असताना त्यांना मृत्यूने गाठले आणि  एकेकाळी 'मिसळ पाव' संकेतस्थळ हे लेखनाचे जे हक्काचे व्यासपीठ होते त्या तमाम साहित्यिकांच्या मनात   आणि त्यांच्या ८४ वर्षाच्या म्हातारीच्या आयुष्यात पोकळी निर्माण करून आज तात्या गेले . असो. 

त्यांच्या एका चाहत्या "टुकार" लेखकाकडून 'विसोबा खेचर' अर्थात 'तात्या अभ्यंकर' यांना विनम्र श्रद्धांजली 🙏🏻
 📝१५/५/१९

http://tatya7.blogspot.com/😳 
Please Share it! :)

No comments:

Follow by Email

Related Posts Plugin for WordPress, Blogger...