नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, December 29, 2020

पिणा-याने पीत जावे


 'शास्त्र' असतं हे वर्षाअखेरीस ( विडंबन) जमवणे


विं दां ची माफी मागून 🙏


ओतणा-याने ओतत जावे

पिणा-याने पीत जावे


हिरव्या पिवळ्या बाटलीमधून 🍾

हवीतेवढी 'मिली' घ्यावी

नेहमीच्या वेटरकडे

'चकण्यासाठी' आँर्डर द्यावी


वेड्या'पिश्या'(😝) मित्राकडून

वेडे पिसे वचन घ्यावे

एका घोटात संपण्यासाठी

त्यांच्याकडून होकार घ्यावे


उघडलेल्या बाटलीमधून 

उसळलेली  बियर घ्यावी 🍺

जमवलेल्या पार्टीमधे

'टुकाराची' ओळ गावी 📝


ओतणा-याने ओतत जावे

पिणा-याने पीत जावे

पिता पिता वेळेवरती

आपल्याच घरी चालते व्हावे 😷


( उरलो फक्त शास्त्रापूरता) ☺️

३०/१२/२०२०


#११_च्या_आत_घरात

Monday, December 28, 2020

माझिया येडीचे ( ईडीचे) झोपडे.


 मदन बाणाचे (🏹) कमलाबेन (🌷) साठीचे नवे गाणे:-

( मूळ गाणे: - माझिया प्रियेचे झोपडे) 


 अर्थातच मनोरंजन हा हेतू 😌


त्या तिथे, पलीकडे,  तिकडे

माझिया येडीचे ( ईडीचे) झोपडे


नोटीसीने घब - राट

पक्ष प्रवेश हीच वाट

वळणावर गाजराचे

फुटे कोंब - वाकडे


माझिया येडीचे ( ईडीचे) झोपडे.


एकनिष्ठ तुळशीपत्र

वा-यावर हळू उडेल

राजी-नामा देताच

स्वागत ते केवढे


माझिया येडीचे ( ईडीचे) झोपडे.


तिथेच वृत्ती रंगल्या

फाईल बंद जाहल्या

प्रत्यक्षात साटे-लोटे

तिथे 'मनसे' होतसे


माझिया येडीचे ( ईडीचे) झोपडे.


📝२९/१२/२०२०

श्री दत्तजयंती

poetrymazi.blogspot.com

Tuesday, December 22, 2020

ये रे गव्या.


 तो पुन्हा आला, तो पुन्हा आला, तो पुन्हा आलाय ( म्हणे )🐃


मग गाणं पण येणारच की 😷


येरे गव्या, येरे गव्या

चर्चे मधे, पुणे पुन्हा

येरे गव्या ये s s रे गव्या


पुणे माझे

कनवाळू

वारा झोंबे

नाक गळूं 🤧


येरे येरे म्हणताना

येरे येरे म्हणताना

गवा गेला

बाव-धना


येरे गव्या..येरे गव्या


स्वगत:

(काही करुन टुकार

लिहिणार लिहिणार

नको नको म्हणताना

खाई मग रोज शिव्या )


ये रे गव्या, ये रे गव्या 


📝२३/१२/२०

poetrymazi.blogspot.com

Wednesday, December 16, 2020

लूक पाहता लोचनी


 आज सकाळी 'उघडा डोळे, बघा नीट पाहिले '  आणि हे सुचले 

( चाल: रुप पाहता लोचनी) *


"लूक"  पाहता लोचनी

न्यूज आली हो ब्रेकूनी

तो हा 'कट्टा ' भरवा

तो ची 'बट्टा ' मिटवा


बहुत प्रसन्न खोडी

म्हणून चर्चा (न)आवडी

सर्व प्रश्णांचे उत्तर

बाप माणूस खांडेकर 


काय सांगशील ज्ञानेश??


📝 शुभेच्छूक अमोल 💐💐

१६/१२/२०

a.kelkar9@gmail.com


#वटारा_डोळे_वाचा_नीट🙄


( मनोरंजन हा हेतू)  *

Thursday, December 10, 2020

गेले ते केस गेले


 नुकताच अस्मादिकांचा सोशल मिडीयावर एक फोटो पाहून मित्र उवाच, अरे कपाळ मोठ्ठं व्हायलाय,👴🏻


त्यास आमचे उत्तर ( गेले ते दिन गेले)


वेगवेगळे भांग पाडले, फिरवूनी ते कंगवे

कसे अचानक गायबले

गेले ते , 'केस'  गेले 👴🏻


कानावरती दोन बाजूला उंच दोन दिसले

इतर ठिकाणचे कसे निसटले

गेले ते , 'केस'  गेले 👴🏻


थंडथंडकुलोरी तेलबुटीवरी,शीतरसही प्याले

अन्यायाने ते ही मुकले

गेले ते , 'केस'  गेले 👴🏻


निर्मळभावे आता पहावे, भरुनी दोन्ही डोळे

आरसा घेऊनी रोज पाहिले


गेले ते , 'केस'  गेले 👴🏻


📝अमोल

११/१२/२०

#गाॅन_केस_म्हणलं_तरी_चालेल 😏

Wednesday, December 9, 2020

हातातील अँप


 लहानपणी बालभारती मधे असलेली कविता

 // घाटातली वाट; काय तिचा थाट, मुरकते गिरकते, लवते पाठोपाठ //


याचे नविन व्हर्जन 


हातातील अँप 📱

काय त्याचा थाट

सात दिवसात डिलिटतो 7️⃣

मजकूर आपोआप


काळी काळी टिचकी ✔️

वाचून झाली निळी 

लगेच पुढे ढकला ▶️

दुसरीकडे आधी


खोल आत सेटींग

शोधून  जरा ठेवा

बदल करुन मिळवा

सदस्यांची वा वा ✌🏻


भिऊ नका कुणी

वाचा टुकार गाणी 📝

सोबतीला 'स्टार' करुन *

कायम ठेवा ध्यानी  😷


हातातील अँप 📱

काय त्याचा थाट 7️⃣

सात दिवसात डिलिटतो

मजकूर आपोआप


अमोल

०९/१२/२०२०

Tuesday, December 8, 2020

पुण्या " गावात आलं 'गवा-रु'


 ( डायरेक्ट चंपारण्यातून आपलं कोथरुडमधून रिपोर्ट  )

😝


अरं,

"पुण्या " गावात आलं 'गवा-रु'🐃

फिरंतय तो-यात

अन छुपकन लपतय, घरात


कसं लबाड, हळूहळू रुळतय

वृंदावनी रमतय

हं आपल्याच पुण्यात, गं बाई बाई

आपल्याच पुण्यात


मान करुन जराशी तिरकी

भान हरपून घेतंय गिरकी

किती इशारा केला तरी बी

आपुल्याच तालात न्

खुदूखुदू हसतयं गालात


कशी सुबक 'महात्मा' बांधणी

कोथ -रुड जणु देखणी

कसा चुकून आला जानी

चंपारण्यात , ग बाई बाई

अपुल्याच पुण्यात


एक वाजताच कोडं सुटं

झोपी जायाला, जनता फुटं

ही आरामाची नशा जाईना

अन् सापडलं जाळ्यात


अरं,

"पुण्या " गावात आलं 'गवा-रु'🐃

फिरंतय तो-यात

अन छुपकन लपतय, घरात


📝०९/१२/२०

अमोल

poetrymazi.blogspot.com

Sunday, December 6, 2020

माझी रेसीपी मलाच फाॅर्वर्ड झालीय.


 रविवारची 'टवाळखोरी' 📝


माझी रेसीपी मलाच फाॅर्वर्ड झालीय..

मंडळी नमस्कार 🙏


तुमच्या पैकी अनेकांनी वरचे वाक्य असलेली जहिरात पाहिली असेल. 

आपण  लिहून पाठवलेली एक रेसिपी व्हायरल होऊन परत आपल्याला कडे येते, हे जिला सर्वप्रथम ही रेसिपी पाठवली तिला सांगताना काकूंना होणारा आनंद अगदी त्यांच्या चेहऱ्यावर दिसून येतोय.


असा अनुभव आज अगदी कुणालाही येऊ शकतो. सध्याच्या 'सोशल युगात' तत्पर फिडबॅक मिळण्याचा एक नवीन प्रकार आहे हा असं मला वाटते. 


आज एखादी नवीन माहिती,  नविन विचार, विनोद, मिम्स,राजकीय विश्लेषण, संदर्भ, कला, लेख, एखादे गाणे  सोशल मिडीयावर शेअर केले जाते. त्यातील आवडलेली माहिती/ पोस्ट  पुढे ढकलली जाते ( कधी मुळ कर्त्याचे नाव ठेऊन/ काढून/बदलून).  आणि अशाप्रकारे आपण त्या पोस्ट कर्त्याचे एक प्रकारे कौतुकच करतो. 


पूर्वी लेखन हे प्रामुख्याने पुस्तक/ कादंबरी रुपात वाचायला मिळायचे. वाचनालय ही हक्काची ठिकाणे असायची. दिवाळी अंक/ पाक्षिक / मासिक यातून ही अनेक लेखक भेटायचे. त्यानंतर अनेकजण  रविवारच्या वृत्तपत्र  पुरवण्यातून भेटावयास येऊ लागले. इंटरनेट माध्यमातून मात्र लेखक/ वाचक यांच्यातील अंतर कमी झाले. प्रत्यक्ष भेटून अभिप्राय देता नाही आला तरी विविध संकेतस्थळे, त्यांचे ब्लाॅग, यूट्यूब चँनेल्स आणि आता व्हाटसप/फेसबुक पेज इ माध्यमातून हे सगळे कलाकार प्रत्येकाच्या अगदी खूप जवळ आलेत. त्यांना प्रतिक्रिया देणे ही सोपे झाले आहे.


याच माध्यमामुळे अनेक वेगवेगळे लेखक/ कलाकारांची माहिती झाली. छापील माध्यमातून पेक्षा  आँनलाईन लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली, अनेकजण प्रसिद्ध झाले.  आणि जेंव्हा अशी त्यांची निर्मिती / रेसिपी  जेंव्हा त्यांची त्यांनाच परत फॅार्वर्ड होऊन परत येऊ लागली ती त्यांच्या त्या लेखनाची यशाची पावतीच म्हणावी लागेल.


माणूस जसं प्रारब्ध घेऊन येतो तसे काही लेख/ कथा / विनोद/ मीम्स / कलाकृती या ही प्रारब्ध घेऊन येतात. कुणाच्या नशिबात केंव्हा 'व्हायरल' व्हायचा योग येईल हे त्या कर्त्याला ही सांगता येणार नाही. 


माझ्या सुदैवाने गेल्या १०-१२ वर्षात काही लेख याबाबतीत सुदैवी ठरले मग तो 'भाईं' वरचा लेख असेल किंवा संकष्टीच्या आधी ' साबुदाणा भिजवण्याचा ' निरोप असेल किंवा मग ' शेपटीवाल्या प्राण्यांचे ' विडंबन गीत असेल. 

अगदी त्या काकूंना झालेला आनंद प्रत्यक्ष अनुभवलाय. मीच नाही तर अगदी अनेकांनी.


तेंव्हा 'रेसिपी' बनवत रहा.


मंडळी थोडंसं तत्वज्ञान सांगून माझी टवाळखोरी थांबवतोय.


" माझी रेसीपी म्हणजे माझे कर्म ( नेहमी)  मलाच फाॅर्वर्ड होत असते " 


समझनेवालों को....


अमोल केळकर

०६/१२/२०२०

poetrymazi.blogspot.com

Sunday, November 22, 2020

हे मास्क तोंडाला लाव असे


 गावोगावी सृजनांनी घातलेले मास्क बघून म्हणावेसे वाटतय


हे मास्क तोंडाला लाव असे 😷

👹👺🤡👻💀

( मुळ गाणे: हा छंद जिवाला लावि पिसें)


तुझे रुप सखे खुलणार कसे?

काहूर मनी उठले भलते

दिनरात "कोविडची लाट" दिसे

हे मास्क तोंडाला लाव असे 😷


तो मास्क तुझ्या तोंडाखाली 

फोटोत दिसते रंगेल खळी 

ओठात रसेली पाणीपुरी

रिपोर्ट निगेटिव्ह येई कसे?  


हे मास्क तोंडाला लाव असे 😷


शिंकेत तुझ्या ग विषाणू  फिरी

ती 'खोक' खराबी दर्दभरी

हा 'शौक' तुझा बर्बाद करी

तापाने चढला जीव कसे?


हे मास्क तोंडाला लाव असे 😷


📝 अमोल

२२/११/२०२०

दुसरी लाट नको, नीट घाला मास्क

काही दिवसांसाठी, हीच समजा टास्क

Sunday, November 1, 2020

रिटर्नस् आँफ शेपटीवाले प्राणी


 ( रिटर्नस् आँफ शेपटीवाले प्राणी ) 

      वि.टि:-मनोरंजन हा हेतू 📝


शेपटी वाल्या प्राण्यांची परत भरली सभा,  

"पोपट" होता सभापती मधोमध उभा.


( पोपट सांगू लागला, माझी राजाच्या उद्यानात आता बदली झाली आहे. मी तिथे गेल्यावर तुम्हाला एकेकाला बोलवेनच, मोर जाऊन आलाच आहे तर तुम्ही तिथे काय कराल ? )


पोपट म्हणाला, मित्रों ( मित्रांनो)

राजोद्यानात सूट, नका कुणी ऐनवेळी घाला शेपूट..

तर तुमची काय मागणी आहे ?


गाय म्हणाली, सर्वच राज्यात गोबंदीची मी ठेवीन आशा..


घोडा म्हणाला, या ला धरीन, त्याला धरीन, मी ही 'इडी कार्यालयात' काम करीन


कुत्रा म्हणाला, भाषण असेल तेंव्हा शेपूट हलवत राहीन


मांजरी म्हणाली, नाही ग बाई कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही , ऐटीत मी "आयटी सेल ' पाळीन.


खार म्हणाली, माझ्याच बेकारीची मलाच बंडी


माकड म्हणाले, कधी ट्विट कधी रिट्विट, इकडून तिकडे मेसेज धाडीन.


मासा म्हणाला, मला ही घ्या 'संघात' पोहत राहीन प्रवाहात


कांँग्रारु म्हणाले माझे काय?

तुझे काय? ? हा हा हा

तू उद्यानातील गवत हाय


मोर म्हणाला , फीच, फीच हिशोब ठेवीन,

 परत परत नाच मी करीन


पोपट म्हणाला छान छान

उद्यानाचा ठेवा मान

आपल्या भक्तीचा उपयोग करा

नाहीतर काय होईल ?

आपल्याला राष्ट्रदोही म्हणून सगळे म्हणायला लागतील

🌳🐟🐕🙊🐴🦘🦚🦜🐿️🌳

📝१/११/२०२०

अमोल

Friday, October 30, 2020

कोजागिरी- मैफिल


 मैफिल - अशी ही


लवकर ओवाळ ग चंद्राला


हो हो, पण प्रसादाचे दूध आणि थोडे पोहे तरी खाऊन जा. एवढा काही उशीर होत नाही आहे. 


नको 'मैफिल ' सुरु होईल, मी आल्यावर रात्री घेईन असे म्हणे पर्यत तो पळालाच


कोजागिरी च्या आजच्या मैफिलीत आज आपण ऐकणार आहोत गीतकार/  संगीतकार ' यशवंत देव ' यांची गाणी.

संपूर्ण कार्यक्रम 'देवाचा' असला तरी सुरवात 'देवांच्या' स्मरणाने, निवेदिका म्हणाली आणी

कोटी कोटी रूपे तुझी, कोटी सूर्य चंद्र तारे

कुठे कुठे शोधू तुला, तुझे अनंत देव्हारे


कधी दाह ग्रीष्माचा तू, कधी मेघ ओला

जनी- निर्जनीही तुझा पाय रोवलेला

तुझी खूण नाही ऐसा गाव तरी कोण ता रे?


या गाण्याने कार्यक्रमाला भक्तीमय वातावरणात सुरवात झाली. . सोसायटीच्या आवारात सगळेजण खुर्च्या मागे पुढे करून कार्यक्रम व्यवस्थित दिसेल याची काळजी घेत होते पण त्याचवेळी नभांगणातले प्रेक्षक मधेमधे लुडबूड करणा-या ढगांना ही बाजूला करत होते. हळूहळू भक्तीगीताचा मार्ग सोडून कार्यक्रम भावगीतांकडे सरकत होता आणि एकंदरच 'उल्हासाचे रंग भरले' जात होते

'नवकिरणांचे दूत निघाले,पूर्व दिशेहून नाचत नाचत

नवीन गाणी ओठावरती किलबिलते पक्ष्यांची पंगत 

सोनेरी स्वप्नांची झालर पहाटवा-यावरती विहरत

नवीन चेतना भरून घ्यावी,ज्याने त्याने  हृदयागारी

*उल्हासाचे रंग भरले , नभांतरी दशदिशांतरी*'


आता चंद्र ही अगदी लख्ख दिसू लागला होता. आजच्या कार्यक्रमाचा अध्यक्ष. मगं त्याची स्तुती तर होणारच..

'चंद्राविना ठरावी जशी पोर्णीमा निरर्थ

आयुष्यही तसे ग , प्रेमाशिवाय व्यर्थ' ।


रंगत चाललेल्या कार्यक्रमात कार्यकर्ते मसाला दुधाचे वाटप सुरु करतानाच एक नवोदित कलाकार गाणं म्हणायला लागतो,


नाथाघरचे भोजन सारा, गाव पंगतीला

दुधभात सर्वांमुखी आग्रहाने भरविला

थोर संतांच्या या कथा,आम्हा सा-यांच्या मुखात

अरे देवा तुझी मुले अशी का रे भांडतात?


"जीवनातली ही घडी अशीच राहू दे" ऐकता ऐकता  एकंदर कार्यक्रमाची घडी ही व्यवस्थित बसलेली असते जणू,


चांदण्याची लुकलुक झुले गगनी

बासरीने भारावून गेली रजनी

रासरंग उधळला कोनाकोनात


"त्याची धून झंकारली रोमारोमात"


या उत्सवातच पुढच्या उत्सवाची तयारी सुरु करायची ही जाणीव हे गाणे ऐकून आली


' दिवाळी येणार, अंगण सजणार, आनंद फुलणार, घरोघरी

आमच्या घरी, अन तुमच्याघरी


कार्यक्रम अंतीम टप्प्यावर असतानाच नेहमीचा 'बिप' आवाज मोबाईल वर ऐकला.

३० आँक्टोबर फेसबुक मेमरी

२ years back. आणि लिहिले होते

//

'यम' आले दुरुनी, उरल्या सगळ्या त्या आठवणी

मुळ गाणे असो किंवा मुळ गाण्याचे विडंबन गीत असो.

यातील सामायिक दुवा म्हणजे त्या गाण्याचे  गीत/संगीत/ चाल

हा दुवा आज निखळला.

' देव माणसाला' श्रध्दांजली 🙏🏻

//


आणि तिकडे गाणे लागले होते

" स्वर आले दुरनी ...." 🎼


पोर्णीमेच्या त्या 🌝 चंद्राच्या पलीकडून एक 'देव' माणूसही डोकावतो आहे असा भास झाला.


यशवंत देव,  द्वितीय पुण्यस्मरण 🙏💐


📝अमोल

३०/१०/२०२०

#कोजागिरी_पोर्णीमा

Tuesday, October 27, 2020

उ.ठा फाॅरवर्ड वीर हो


 समस्त 'फाॅर्वर्ड वीरांना' समर्पित


उ.ठा. 'फाॅर्वर्ड'वीर हो..


सुसज्ज व्हा उठा चला, सचित्र व्हा उठा चला

उ.ठा. 'फाॅर्वर्ड'वीर हो..


'पाॅली टिक्स' इथले, 'मिम्स' धाडले पुढे

मिळूनी सर्व हसुनी, पाठवू पुढे पुढे

एकसर्व होऊनी धाडू चला, धाडू चला

उ.ठा . चला 


अफवा पसरवूनी, कुणा आधीच पोचवा

होऊनी गणिती तज्ञ, इंचात ' आकडे बसवा 

'आय टी' सेल काढू या, समर्थ होऊ या चला


उ.ठा . चला ...


लाव रे व्हिडिओ तो, यू ट्यूब वर साठवू

योग्य वेळ आली की, जनाजनास दाखवू 

दिव्य ही परंपरा,अखंड फाॅर्वडू चला


उ.ठा. 'फाॅर्वर्ड'वीर हो..


( स्क्रीन शाॅट, फाॅर वर्ड प्रेमी)  अमोल 📝

२७/१०/२०२०

Thursday, October 8, 2020

खेळून हरणे अन न खेळता जिंकणे


 IPL सामन्यांना समर्पित 🏏

खेळून हरणे अन न खेळता जिंकणे

मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे


षटकात धावगतीचा का सांग भार व्हावा?

षटकार मारताना, तो झेल ही ठरावा

हे प्रश्ण जीवघेणे हरती इथे 'शहाणे' 💵


'मनी फिक्सिंग' ज्याच्या त्यालाच हे कळावे

टप्प्यात चेंडू येता, आनंदुनीच जावे

तिरपा फटका भोळा, आम्ही इथे दिवाणे


निघता परतुनी तू, उगवे तसाच तारा

चेंडू फळी खेळाचा, उडला बोजवारा 

रात्रीस खेळ बघता, सुचले टुकार गाणे


मी ओळखून आहे सारे तुझे बहाणे


📝०९/१०/२०

(अमोल)

#दिसतं_तसं_नसतं

#ओढून_ताणून_टवाळखोरी

Tuesday, October 6, 2020

हाॅटेलिंग ssss पुन्हा, हो ना.


 हाॅटेल चालू झाली. त्यातही अस्सल खवय्या पुणेकरांच्या आनंदाला उधाण आले हे काही बातम्यातून दिसून आले. त्यांनाच ही 

' गंमत जंमत' समर्पित 

( मुळ गाणे : अश्विनी ये ना, येना...)

हाॅटेलिंग ssss पुन्हा, हो ना.

पुणे sssss गिळू कसा तुझ्याविना मी काही गं.

होतीच जिंदगीत आणीबाणी गं

आता खाणे, जिथे तिथे जाणे

मी तर रांगेत उभा वेटींगला

तू लाव जरासा वशिला


डोश्श्या, sssssssss

 उगाच काॅरनटाईन झाले रे

तुला खायचे असे राहून गेले रे

आण चटण्या, तू घाल चटण्या

विसर झाले गेले सख्या रे

सांबार आण आता जरा रे

डोश्श्या, sssssssss


नळ स्टाॅप, कोथ-रुडची हवा

सॅनीटाइझर हाही रोजचा नवा

मास्क हा काढून बाजूस ठेवा

मेनू आज फिश-करी ठsरवा

तुझी माझी बिलं आता देईल का कुणी

खाण्यातूनी पळतील जुनी ती दुखणी

तू ये ना तू येना


हाॅटेलिंग ssss पुन्हा,

पुन्हा 


📝अमोल केळकर

०६/१०/२०

#हाॅटेलिंग@पुणा

#पुणे_तिथे_काय _उणे😋

#🧆🥙🥪🍕🌯🥗🥘

Sunday, September 27, 2020

भेट यांची त्यांची घडते...


 नुकत्याच झालेल्या "ग्रेट भेटीला" समर्पित 


भेट यांची त्यांची घडते, कालच्या दिसाची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची

भेट यांची त्यांची घडते...


क्षुद्र 'पाॅलिटि्कसची' खोटी झुगारून नीती

बिहारला सोडून आली अशी तुझी प्रिती

कुणा मुळी जाणीव नव्हती,अशा सामन्याची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची


भेट यांची त्यांची घडते..


निवडणूका आधीच्या शपथा, अर्धा अर्धा श्वास

स्वप्नावत 'खुर्ची ' दिसावी, असे सर्व भास

जनतेला तर भोवळ आली,मधूर मिलनाची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची..


भेट यांची त्यांची घडते.


प्रश्ण तसे ठरले होते, उत्तरे मिळाली

हयातीत गुप्तपणे बैठक अशी झाली

आपुल्याच माथी वर्णी, त्या मुलाखतीची

वाट ब्रेकिंगला मिळते,न्यूज भूकंपाची..


भेट यांची त्यांची घडते.🏹🌷


📝२७/९/२०२०

poetrymazi.blogspot.in

Thursday, September 17, 2020

खोडी माझी काढाल तर.


 * काल्पनिक, मनोरंजन हा हेतू 


( चाल : खोडी माझी  काढाल तर :- ) 🙅🏼‍♀️


खोडी माझी काढाल तर , अशी देईन फाईट 

घटके मध्ये जिरुन जाईल, "बाॅलीवूडची" ऐट 


खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


'घरावरती' याल तर असा मारीन ठोसा 

'हातामध्ये' 'कंगन' घालून रडत बसा 

 

खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


'  भक्त सारे ' माझे भाऊ , प्रसंग मोठा बाका 

पार्टीमध्ये कोण कोण होते,  विचारुच नका 


खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


"ट्विट" माझे  पहा कसे ढोल बड-विते

"डायलाॅग" मधे ताकत आहे मी कुणाला भिते


खोडी माझी काढाल तर. . . . .🙅🏼‍♀️ 


📝१८/९/२०२०

(अमोल)

Friday, September 11, 2020

जग हे 'नाॅटी' बाळा


 टवाळखोरी 📝

( मुळ गाणे: जग हे बंदिशाला)

जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा

कुणी न इथे भला चांगला

जो तो 'शब्द' चुकलेला.


ज्याची त्याला प्यारी झोपडी

चाहते अन सखे सवंगडी

अधिकृत, अनधिकृत बेडी

प्रिय हो ज्याची त्याला


जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा


जो तो आपुल्या 'पक्षी' जखडे

नजर न जाई 'सत्ते'पलिकडे

मिडीयातले 'गुप्त' सरडे

लपूनी करिती लिला


जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा


कुणा न माहित 'शब्द-छल' ते

कुठून स्फुरले नच स्मरते

'टवाळखोरी'स जन घाबरते

जो वाचे तो खपला.


जग हे 'नाॅटी' बाळा, जग हे 'नाॅटी' बाळा


📝अमोल

( टवाळखोरी)

Thursday, September 10, 2020

राजकारणावर बोलू काही


 संदीप खरेंची माफी मागून 


जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही


उगाच दाखले 'अस्मितेचे'  देत रहा तू

फिरेल जेंव्हा 'बुलडोझर' तर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


'सामना' पाहून पारावर कुजबुजला पो-या

'वाट लागू दे' त्याची नंतर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


हवे हवेसे 'अच्छे दिन' जर हवेच आहे

नको नकोसे ' बुरे टोमणे' टाळू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


निवडणूकीची किती काळजी बघ पक्षातून

जेंव्हा येईल तेंव्हाच नंतर बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


'मिडीया' असुदे हातामध्ये काठी म्हणुनी

'न्यूज' आंधळी 'ब्रेकींग' गडबड  बोलू काही

चला दोस्त हो 'राजकारणावर' बोलू काही…


📝अमोल 

१०/०९/२०

******

Saturday, August 29, 2020

असावा सुंदर पत्यांचा बंगला


 छोटे बिल्डर 'प्रणव केळकर' अर्थात आमचे चिरंजीव यांच्या कलाकृतीला  समर्पित 



( मुळ गाणे : असावा सुंदर चाॅकलेटचा बंगला)


असावा सुंदर पत्यांचा बंगला

राजवाडा जणू शोभतोय चांगला


पत्याच्या बंगल्याला भिंतीचा आधार

बांधकाम करताना जपावे लागते फार


तिरप्याशा पानांचा बनवला कोन

हॅलो , ओ तिकडून जाऊ नका कोण


आडवी पाने टाकून स्लॅब छानदार

लवकरच बंगला हा आमचा पहाल


 पानाच्या भिंती मधे गुलाम दिसतो

समोरच्या सत्तीशी 'गुलामचोर' खेळतो


उंच उंच पत्यांचा बंगला बनला

ताईने पंखा लगेच लावला


धपकन कोसळला पत्यांचा बंगला

उद्या परत बनवू यापेक्षा चांगला


📝अमोल केळकर

poetrymazi.blogspot.com

२९/०८/२०२०

Sunday, August 16, 2020

माझे रोग बरे झाले


 "गुरुदेव" मला तुम्ही माफ करताच 🙏🏻


माझे रोग बरे झाले

आज मी

'कंपाँन्डर' पाहिले


दवाखान्यात दिसता वल्ली

मुख्य रोगांची बाधा पळाली

सर्व सुखाचे औषध मिळता

धन्य जीवन झाले


आज मी

'कंपाँन्डर' पाहिले 


रोग्यांचा हा वैद्य दयाळू

'भक्तांसाठी' होत कृपाळू

'केस पेपर' काढ सत्वरे

घेऊनी औषध आले 


आज मी

'कंपाँन्डर' पाहिले 


माझे रोग बरे झाले

आज मी

'कंपाँन्डर' पाहिले


( तरीपण डाॅक्टरांकडूनच औषध घेणारा) 

निरोगी अमोल ☺️📝

१६/०८/२०२०

Friday, August 7, 2020

चला मुलांनो मजा घेऊया


 आॅन लाईन शाळेचा डोलारा सांभाळणाऱ्या सर्वांना समर्पित

( चाल: चला मुलांनो आज पाहूया, शाळा चांदोबा गुरुजींची)


इंटरनेटच्या डेटा मधुनी सहल करुया वर्गाची

चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


आज परिक्षा जमले सारे मोबाईलच्या वर्गात

वर्ग-शिक्षिका दिसती मात्र, कुठल्या मोठ्या चिंतेत

मित्र- मैत्रिणी करिती दंगा, फिरवूनी पट्टी स्क्रिनची


चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


दुस-या तासापासून येती, मुले उशीरा वर्गात

आॅन- आॅफची बटणे दाबून सगळे लपती घरात

कधी मोबाईलची बॅटरी संपते ओढ लागूनी चार्जरची


चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


कुणी आॅडिओ आॅन ठेऊनी, घरामध्ये बोलतसे

कळता नंतर रागावूनी तो, गोरामोरा होत असे

ऐकूनी सारे हसता हसता, चंगळ उडते वर्गाची


चला मुलांनो मजा घेऊया,आता आॅनलाईन शाळेची


कधी वेळेवर केंव्हा उशीरा, हजर राहण्या अशी मजा

राग जरी आला गुरूजींना ,कधी कुणाला देती न सजा 😷

अशी नकोच आता शाळा,करु प्रार्थना देवाची 🙏🏻🙏🏻


चला मुलांनो ....


📝अमोल केळकर

०८/०८/२०२०

Thursday, August 6, 2020

Eपास नका मागू माझ्या गाडीला


टिप: निव्वळ मनोरंजन हा या विडंबनाचा हेतू. सरकारी नियम समजून घेऊन आपापल्या जबाबदारीवर प्रवास करावा


सेंट्रलच्या वाघांनी, अध्यादेश काढुनी

अनलाॅक जिल्हा आमचा करिला

Eपास नका मागू माझ्या गाडीला 🚗


नवी कोरी गाडी लाखमोलाची

खरेदी झाली मार्च महिन्याची

गुंतवूनी पार्कींगला, लाॅकडाऊन जोडीला

Eपास नका मागू आता गाडीला 🚗


जात होती गाडी आज कोकणात

अवचित आला 'मामा' पुढ्यात

तुम्ही माझ्या डोस्क्याचा ताप जरी पाहिला

Eपास नका मागू आता गाडीला 🚗


गाडी नका अडवू आल्यागेल्याची

शरम ठेवा थोडी घेतल्या 'लाचेची'💵

काय म्हणू आता, असल्या तुमच्या खोडीला

Eपास नका मागू आता गाडीला 🚗


सेंट्रलच्या वाघांनी, अध्यादेश काढुनी

अनलाॅक जिल्हा आमचा करिला

Eपास नका मागू माझ्या गाडीला 🚗


📝 ( संपूर्ण लाॅक)  🚗


मोरया 🙏🏻🌺

संकष्टी चतुर्थी

०७/०८/२०२०

Saturday, July 25, 2020

दहा दिवस, दहा विडंबने


रविवारची टुकारगिरी 📝

( फेसबुकवर विविध काव्य साखळीत सहभागी माझ्या तमाम काव्यरसिकांना समर्पित 😀. कृ ह.घे. हे वे.सां न)

आठवणीतील विडंबने

दहा दिवस दहा विडंबने

काव्य रसिकहो या कार्यक्रमात मला  कुणीही  सहभागी करून घेतलेले नाही . मी माझाच सहभागी झालोय.त्याबद्दल मी माझाच आभारी आहे

आज मी  भटांच्या  " xxx या गाण्यावरचे विडंबन ईथे सादर करणार आहे.

मला हे गाणे खूपच भावते .

तसे या गाण्याचे विडंबन ही तुम्हालाही नक्कीच आवडेल अशी खात्री वाटते.

हा उपक्रम पुढे नेण्यासाठी मी  कुणालाही आमंत्रित करणार नाही मी एकटाच समर्थ आहे 😁.  फक्त यासाठी गदिमा, संदिप खरे, शांता शेळके यांच्या गाण्याचा कच्चा माल अणि त्यांचे आशिर्वाद पुरेसे आहेत 😀

चला सुरवात करतो.

अरे,  कुठे पळताय?  थांबा , ऐका तर

( अमोल)  📝

धुंदीत करोना, बंदी सर्वांना


( मुळ गाणे: धुंदी कळ्यांना)

धुंदी(त) करोना,बंदी सर्वांना
लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

तुझ्या सेक्टरी, बांबूनी वाट अडली
क्वारंटाईन ही ,होण्याची वेळ आली
बसे आज उरी, जगाचा पाहुणा
लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

तुझ्या मुखासी, मास्क हा कापडाचा
कुणा स्पर्श सी, फेस घे साबणाचा
वाफ घेण्यासाठी,  नको तो बहाणा
लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

पराभूत कधी, कथा विषाणूंची ?
संख्या वाढते, रोज या रुगणांची
लसींचे मिळावे,अमृत क्षणांना

लाॅकडाऊन आले, गावा गाsवांना

अमोल 📝
२५/०७/२०२०

Friday, July 24, 2020

नागपंचमी आणि सुधीर फडके जन्मदिवस


नागपंचमी  🐍आणि सुधीर फडके यांचा जन्मदिन याचे औचित्य साधून त्यांनी संगीतबध्द केलेली काही  गाणी आठवली

सावळा ग रंग तुझा
चंदनाच्या बनापरी
आणि नजरेत तुझ्या
नाग खेळती विखारी 🐍
--------
नाग म्हणले की आठवते विष म्हणजेच हलाहल ,याचा उल्लेख या गाण्यात मिळतो

यंत्र तंत्र शस्त्र अस्त्र आग ओकते
हलाsहलाs ! त्रिनेत्र तो 🐍
मी तुम्हासी तैसाची,गिळुनि जिरवितो !!

अनादि मी अनंत मी, आवध्य मी भला
मारिल रिपु जगतिं असा,कवण जन्मला !!
---------------------
नागपंचमी म्हणले की महिलांची गाणी आलीच. 'जिवाचा सखा' सिनेमातले हे गीत असेच

बारा घरच्या बाराजणी, बाराजणी,बाराजणी
रुपवंती कुंवारिणी,कुंवारिणी,कुंवारिणी
नागोबाची पुजू फणी,कुंकवाचा मागू धनी
राजपद मागू त्याला, मागू त्याला,नागोबाला 🐍

चल गं सखे, वारुळाला, वारुळाला, वारुळाला
--------------------
सुधीर फडके आणि गीतरामायण यांचे नाते अलौकीक म्हणावे लागेल. लेखनाचा शेवट यातील एका गिताने

त्यात ही आज शनिवार,  बोला बजरंग बली की जय 🙏🏻

तरुन जो जाईल सिंधू महान
असा हा एकची हनुमान

'भुजंग' धरुनी दोन्ही चरणी 🐍
झेपेसरशी समुद्र लंघुनि
गरुड उभारी पखां गगनी
गरुडाहुन बलवान

असा हा एकची हनुमान 🌺🙏🏻

📝 #नागपंचमी
       #सुधीर_फडके_जन्मदिन
२५/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com

Wednesday, July 22, 2020

६६ वी कला


६६ वी कला  🗣️

मंडळी नमस्कार 🙏🏻

मध्यतंरी एका लेख ६५ व्या कलेवर म्हणजेच 'जहिरात' कलेवर लिहिला होता. त्यात ६६ व्या कलेबद्दल ओझरता उल्लेख केलेला. तर आज या लेखात या ६६ व्या कलेबद्दल विचार....

मंडळी, एखादा अभिनेता एखादी विशिष्ठ भूमिका करत असताना त्या भूमिकेचा खूप अभ्यास करतो असे आपण ब-याचदा ऐकतो. म्हणजे बघा एखादा अभिनेता/ अभिनेत्री  अंध व्यक्तीची भूमिका करतीय तर आपली भूमिका अधिक कसदार होण्यासाठी तो नट ( नटी) अंध व्यक्तीला / त्या संबधीत संस्थेला वेळोवेळी भेट देतो. जेणेकरून त्याचा अभिनय वास्तव होईल . तर हा लेख लिहिण्यासाठी आम्हीही अशी विशेष  तयारी गेले काही महिने ( का वर्ष ???? )  करत होतो. अरे, लेखकाला ही  जर वाटले आपण अधूनमधून भूमिकेत शिरून बघू , बिघडले कुठे ?

 तर ज्या ६६ व्या कलेची गेले काही महिने आम्ही उपासना केली , वेगवेगळ्या ठिकाणी त्याचा प्रयोग करून बघितला त्या कलेचे नाव आहे
" भांडण कला " 🗣️🗣️🗣️

तर,अरे हा असा का वागतोय ?  का मागच्या घटना मुद्दाम उरकून काढतोय ? का शब्दाला शब्द वाढवतोय ? का अशा प्रतिक्रिया देतोय ? अरे यांच्याशी पण वाद घालतोय , त्याच्याशी / तिच्याशी वाद घालतोय ? काय झालय काय याला ?

आत्ता पर्यत माझ्या बाबतीत ज्यांना हे सगळे प्रश्न पडले होते त्यांना माझे हेच उत्तर की जरा
 ' भूमिकेत '  जाऊन प्रत्यक्ष अनुभव घ्यायचा होता 🙈

मंडळी मस्त अनुभव आला . म्हणजे एवढा की त्या '६६ सदाशिव पेठ '  सिनेमात मोहन जोशी जसे भाडणं करायचे क्लास घेतात तसे आता अगदी त्यांचा एवढा प्रोफेशनल नाही पण नक्कीच अगदी झूम , मीट  वगैरे  वर क्लास घेऊ शकतो 😁 .

 भांडणाचे पण थर आहेत बर का , मोबाईल गेम मध्ये जसे लेव्हल असतात तसे. तुमच्यातील चार्जिंग नुसार एकेक लेव्हल पुढे जात राहायचे

भाडणं ही एक नैसर्गीक प्रक्रिया आहे. लग्नी मंगळ पत्रिकेत असेल ( हो ६५ वी कला, मी पत्रिका बघतो 😷 )  आणि त्यात ही मेष , सिंह राशीत असेल तर त्या व्यक्ती भांडणात नमते घेत नाहीत  असा साधारण अनुभव . या भांडणा बाबत एके ठिकाणी खूप छान वाचलंय  ' दोन व्यक्ती जेव्हा जेव्हा भांडतात , तेव्हा तेव्हा मोठ्याने बोलतात  कारण ते दोघे एकमेकांपासून मनाने ( हृदयाने ) दूर गेलेले असतात आणि दूर गेलेल्या व्यक्ती पर्यत पोहोचण्यासाठी  मोठ्याने बोलावे लागते '.

घरगुती भाडणं, लहान मुलांची भाडणं , सोसायटी मिटींग मधील भाडणं , बस/ ट्रेन मध्ये सीट / धक्का लागण्यावरून  होणारी भाडणं ,  कामगार/मॅनेजमेंट भांडणं,  गाव - देश - राज्य पातळीवरील भाडणं , सीमावाद , पाणीवाद , जातीय वाद , जागतिक पातळीवरील भाडणं  असे अनेक प्रकार आपण पहातो.  आता ही भाडणं सोशल मीडियावरून अगदी आपल्या हातात आली आहेत ती म्हणजे राजकीय भाडणं.

कुठला तो पक्ष / राजकीय नेता, तुम्ही त्याच्या खिजणीत  ही नसताना , तावातावाने त्याच्यासाठी भांडणारी  जमात ' भांडणाला ' वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवते हे नक्की 😀

एक गोष्ट मात्र नक्की मंडळी , वैचारिक मतभेद असावेत, ते व्यक्त ही करावेत  पण त्या भांडणाचे पर्यावसन कुणा  व्यक्तीचा कायमचा द्वेष करणे  / सूड भावने पर्यत न जाऊ देणे हे महत्वाचे. हे ज्याला जमले तो या ६६ व्या कलेचा खरा उपासक  म्हणता येईल 😊

म्हणून आज ही अगदी व्हाट्सअप ग्रुप वर तावातावाने एकाद्या मुद्यावर भांडून  अगदी दुस-या मिनिटाला त्याच मित्राशी / व्यक्तीशी  व्ययक्तिक फोन करून सहज चौकशी किंवा इतर महत्वाच्या कामाबद्दल बोलण्यात आम्हाला काहीही कमीपणा वाटत नाही . आणि या लेवल  ला जो पोचला  तो खरा
  ' भाडणं ' योगी ☺️

चला ( जरासच ) भांडू या  🤗

( लग्नी मंगळ नसला तरी६६ व्या कलेचा भोक्ता ) अंमोल📝

( विशेष टीप :  लाॅकडाऊन मध्ये जर आपणा कडे भांडी घासायचे काम असेल तर हा लेख वाचून भांड्यावर राग काढू नये. मनाला पोचा आला तर आम्ही जबाबदार, भांड्याला आला तर आम्ही जबाबदार नाही 😉 )

लाॅकडाऊन मधला श्रावण


नेहमीचा श्रावण:-

सुख वेचिन म्हणण्या आधी
घन दुःखाचा गहिवरतो
अन दुःख सावरु जाता
कवडसा सुखाचा येतो
या ऊन सावली संगे
रमण्यात ही मौज म्हणुनी
मी हसून हल्ली माझ्या
जगण्याला श्रावण म्हणतो....
                            गुरू ठाकूर

सध्याचा श्रावण:-

बाहेर जाईन म्हणण्याआधी
'मास्क' नेहमीचा आठवतो
अन मास्क घालून जाता
भरवसा मनाला येतो
या 'लाॅकडाऊन' संगे
'रम'ण्यात ही मौज म्हणूनी
मी बसून हल्ली माझ्या
जगण्याला 'डरो-ना' म्हणतो
                      📝 सुरु टाकूर

२२/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com

Saturday, July 18, 2020

भोलानाथ, भोलानाथ


' आॅन लाईन ' शाळेला कंटाळलेल्या आमच्या 'चिंटू' ने भोलानाथाला घातलेली साद

सांग सांग भोलानाथ,कोरोना जाईल काय?
घरामधली सक्ती संपून, शाळा दिसेल काय?

सांग सांग भोलानाथ

भोलानाथ दुपारी,व्हॅन येईल काय?
दंगा ,भांडण केल्यावर काका रागवेल काय?

भोलानाथ,  भोलानाथ

भोलानाथ भोलानाथ खरं सांग एकदा
रोज शाळेत जायला, मिळेल का रे यंदा?

भोलानाथ,  भोलानाथ

भोलानाथ उद्या आहे, झूम वरती लेक्चर
'पाटी पुस्तक डबा' घेऊन, मिळेल केंव्हा दप्तर ??

भोलानाथ, भोलानाथ

सांग सांग भोलानाथ,कोरोना जाईल काय?
घरामधली सक्ती संपून, शाळा दिसेल काय?

( चिंटू सह वैतागलेला त्याचा बाबा 😬)

©️ अमोल केळकर
poetrymazi.blogspot.com



सेलिब्रेटींचा ( सोशल ) डिस्टन्स पँटर्न


सेलिब्रेटींचा  ( सोशल ) डिस्टन्स पँटर्न

मंडळी नमस्कार 🙏🏻

थोडा नाजूक विषय मांडतोय  पण खूप दिवसापासून हे मनात होत. सेलिब्रेटी अर्थातच प्रसिद्ध व्यक्तींचा सोशल मीडियावर वावर  हे आता फारसे नाविन्यपूर्ण नाही . अनेकांची ट्विटर / फेसबुक खाती आहेत , अनेक सामान्य चाहते या सेलिब्रिटींचे फॉलॉवर आहेत . मुद्दा हा नाही  तर मुद्दा असा आहे की या सेलिब्रीटींना कधी त्यांच्या चाहत्यांशी गप्पा मारताना , त्यांच्याशी बोललेले किंवा त्यांच्या फ्रेंड लिस्ट मध्ये असलेल्या एखाद्याच्या पोस्टला लाईक केले आहे असे कधी तुम्ही बघितले आहे का हो ?  हा त्यांच्या स्वतःच्या वर्तुळातील बरोबरीच्या कलाकारां बरोबर / किंवा त्यांच्या इतक्याच प्रसिद्ध व्यक्तींना ते रिप्लाय देत ही असतील पण एखादा त्यांचा सर्वसामान्य चाहता आहे  त्याने समजा काही वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या, अभिनंदन केले , एखाद्या भूमिकेचे कौतुक केले तर  त्याला प्रतिक्रिया दिली तर एक चाहता म्हणून त्या सामान्य व्यक्तीला किती बरे वाटेल ना ?

आम्ही लहान असताना प्रसिद्ध व्यक्ती म्हणजे नट , नट्या , मोजके खेळाडू , काही गायक यापलीकडे  फारशी कुणाची गणना प्रसिद्ध व्यक्तींच्यात ( सेलिब्रेटी) व्हायची नाही. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन होणे हे तर त्याहून दुर्मिळ असायचे . मला आठवतंय ते सांगलीत झालेल्या नाट्य संमेलनात  काही कलाकारांच्या सह्यांसाठी आम्ही मित्रांनी  झुंबड उडवलेली.  एखाद्या दुकानाच्या आजच्या भाषेत शो रूम च्या  उद्घाटनाला , शाळेत  विविध गुणदर्शन कार्यक्रम किंवा बक्षीस समारंभाला उपस्थिती  किंवा कदाचित शुटींगसाठी आपल्या गावात आलेल्या नट -नट्या यांना केवळ बघायला मिळणे इतपतच  सेलिब्रिटी लोकांशी प्रत्यक्ष संबंध यायचा . आपल्या भोवती जमणारी  ' भीड ' या लोकांना ही हवीहवीशी वाटायची.

कालांतराने सेलिब्रेटी कन्सेप्ट थोडा बदलला . केवळ नट-नट्या या प्रसिद्ध व्यक्ती  न राहता लेखक- लेखिका / कवी / कवयित्री , दिग्दर्शक,  राजकारणी , पत्रकार ,किंवा  एखाद्या विशिष्ठ क्षेत्रात कर्तृत्वाने पुढे आलेले दिग्गज, टीव्ही कलाकार  हे ही सेलिब्रेटी होऊ लागले. सोशल मीडियावर यांचा ही वावर होऊ लागला.  अरे यार तुला माहीत आहे का  अमुक - तमुक प्रसिद्ध व्यक्ती माझ्या फ्रेंड लिस्ट मध्ये आहेत. मी त्यांना रिक्वेस्ट पाठवलेली  त्यांनी अॅक्सेप्ट केली . मी त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्यात अशी चर्चा रंगू लागली.  पण नंतर  असं लक्षात यायला लागलं की हा सगळा संवाद  एकाच बाजूने झालाय . दुसरीकडून काहीही प्रतिसाद नाही . आणि मग या तमामा मोठ्या मोठ्यांच्या या सोशल - डिस्टंसींगचे आश्चर्य वाटू लागले .

अगदी मान्य की  सगळ्यांनाच रिप्लाय देणे आणि प्रत्येक वेळी देणे शक्य होईलच असे नाही , यात काही  अपप्रवृती , गैरफायदा घेणारे ही असू शकतात अगदी मान्य . आमच्यासारका उठसुठ प्रत्येक  पोस्ट ला लाईक / प्रासाद द्या असे म्हणणे अजिबात नाही 😬 मात्र  थोडासा संवाद तुमच्याकडून ही अपेक्षित. तुम्ही आम्हाला आवडता म्हणूनच आम्ही तुमच्या पेज ला लाईक केलय , तुम्हाला ऍड केलय आमच्या लिस्ट मध्ये .

पूर्वी एखाद्या कलाकाराचा अभिनय आवडला  की त्याचे अभिनंदन , कौतुक कुठे करायचे हा प्रश्न पडायचा? कदाचित त्याचे चाहते पत्र वगैरे पाठवत असतील .  आज तशी परिस्थिती नाही ईमेल / ब्लॉग / फेसबुक पेज / ट्विटर कुठेही तुम्ही अभिप्राय देऊ शकता इतके हे सेलिब्रिटी आपल्या जवळ ( हातात ) आलेत. पण या सगळ्यांनी  सोशली  - डिस्टन्स  ठेवण्यातच धन्यता मानली असेल तर आपण तरी  जास्त सोस  का करावा ? 😐

लेख संपवता संपवता एक नमूद करू इच्छितो . आमचा एक सांगलीचा मित्र आहे ' आनंद कुलकर्णी '. आजकाल सोशल मीडियावर
येणा-या उत्तम कलाकृती मग ते लेख असतील , संभाषण असेल किंवा काहीही त्या कलाकाराला  केवळ सोशल मीडियात प्रतिसाद न देता  ( कारण दिलेला प्रतिसाद एखाद्या व्हाटसप ग्रुप वरच राहतो ) शक्य असेल  त्या व्यक्तीशी फोन वर बोलून कौतुक करतो.  आज त्याचा  हा कित्ता आम्ही पण जाणीवपूर्वक अनेकवेळा गिरवत आहोत. तुमचा तो  लेख, कथा, चित्र, सामाजिक कार्य आवडले किंवा तुम्ही छान गाणे म्हणले हे सांगीतल्यावर त्या कलाकारांच्या/ व्यक्तीच्या बोलण्यातून त्याला झालेला ' आनंद ' आपल्याला  सहज जाणवतो.

तेव्हा माझा तमाम सेलिब्रीटी मंडळीनो तयार रहा. तुमच्या चाहत्यांपासून जास्त डिस्टन्स ठेऊ नका ( सध्या चालेल   ) .
आज  उद्या तुम्हाला आनंद किंवा अमोलचा ( किंवा हा लेख वाचून इतर अनेकांचा ) अभिनंदनाचा फोन केव्हाही येऊ शकतो बर का

एक मिनीट. लेख आवरता घेतोय मंडळी,  एक फोन येतोय 😉

( कला/ कलाकार प्रेमी)  अमोल
१८/०७/२०२०
poetrymazi.blogspot.com

Friday, July 10, 2020

हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला


सुनील गावसकर यांची माफी मागून ( 🙏🏻)  त्यांना आज वाढदिवसाच्या शुभेच्छा 😬💐

या दुनियेमध्ये लाॅकडाऊन व्हायला वेळ कोणाला
*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

गर्दीच्या या रस्त्यावरती, येशी वेळोवेळी
बस तुझी येताच चढशी जपुन अपुली झोळी
काळ करी बघ गोलंदाजी, विषाणू चेंडू फेकी
भवताली तूला अॅडमीट कराया जो तो फासे टाकी
मागे टपला कोणीभक्षक तुझा उधळण्या डाव
या सा-यांना चकवशील तर मिळेल तुजला पाव
चतुर आणि सावध जो जो तोच इथे जगला

*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

( रस्त्यावरुन जाताना सभोवार पहावे तो दिसतात कंटॅन्मेंट झोनचे अजब बंगले, उभे आडवे, लोखंडी, वाकडे सरळ लावलेले रस्तोरस्ती बांबू
यशाच्या झुंबराखाली डोलणारी, नाचणारी, कोविड१९ च्या एका फटक्यात त्यांचे गर्व 'होम काॅरंटाईन' होतात
अभिमान, उन्मादातली हवाच सारी निघून जाते
सदान कदा पाठिंबा देणारे, क्षणात आपल्या गावाकडे थोडी जागाही देत नाहीत...)

असा येथल्या जगामधील न्याय आता बनला
*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

तू ऐकत असता रुग्णसंख्येचे नारे
या सगळ्या बातम्यांना नकोच तू पहा रे
फटकार अचूक तू चेंडू विषाणूचा
आयुष्य असे रे डोंगर जणू श्वासांचा

निरंतर राहील तुझी, आठवण इथल्या कणाकणाला
*हे जीवन म्हणजे 'कोरोना' आता, झुकला तो संपला*

अमोल केळकर 📝
१०/०७/२०२०

Wednesday, July 8, 2020

पुनश्च हरी ॐ




आई येतो गं

निट जा रे, बाळा. घेतलंस ना सगळं बरोबर

हो आई

आई, खरं सांगू.  यंदा खूप दिवसांनी असं वाटतय की यंदा खरा गणेशोत्सव बघायला मिळणार आहे.

धांगड धुडगूस घालत केलेली मिरवणूक नाही, काही ठिकाणी मंडळ ही नाहीत, मोठमोठी उंची नाही, कर्णकर्कश गाणी नाहीत,  भक्तीचा बाजार नाही, नवसाची रांग नाही. वेळेत प्राणप्रतिष्ठापना, उरका उरकी नाही, आणि हो आई यंदा पहिल्यांदाच मी अनंत चतुर्दशीला अगदी संध्याकाळ पर्यत गणेशलोकी येईन बर का?

हं, उत्तम

आई, यंदा काही गणेशोत्सव मंडळ १० दिवस 'आरोग्य महोत्सव'  साजरा करणार आहेत. समाजाल एकत्र आणून समाजोपयोगी काम करण्यासाठी टिळकांची गणेशोत्सव संकल्पना, अलीकडच्या काळात ब-याच दिवसांनी मोठ्या प्रमाणात प्रत्यक्षात बघायला मिळणार आहे

पण यासाठी तुझ्या 'नियती' मावशीला मोठ्ठ संकट धाडाव लागलं
आता इथून पुढे सगळे 'भक्त' यातून बोध घेतील, निसर्गाशी प्रामाणिक राहतील अशी 'सुबुध्दी' देऊन ये सगळ्यांना येताना

हो  आई

आणि गेल्या गेल्या तुझ्या मित्राला 🐀जिथे जिथे पोहोचाल तिथे तिथे ११ दिवस सक्तीचे विलगीकरण म्हणून बजाव हां
फार फिरत असतो इकडे तिकडे

हो गं आई, चल बाय

#पुनश्च_हरी_ॐ

📝०९/०७/२०२०
poetrymazi.blogspot.in

आषाढात घन-काळा बरसला


आषाढ काहीसा उदास होऊनच माझ्याकडे आला. श्रावणावर किती गाणी/ कविता. माझे फक्त 'आषाढस्य प्रथम दिवसे' इतकच कौतुक.
म्हणलं बस जरा, हा घे गरम चहा. श्रावणावर कुठलं गाणं ऐकलसं?
म्हणाला,
"श्रावणात घन निळा बरसला"

चहा संपेपर्यत त्याच्या हातात गाणे, गडी खुश एकदम 😉

आषाढात घन-काळा बरसला,जोरदार पाऊस धारा
दिसूलागला रस्त्यातून अवचित, खड्ड्यांचा गोल पसारा

आषाढात घन-काळा बरसला

थांबून ज्याने वाट अडविली, ते दुख आले दारी
जिथे तिथे रस्त्याला, भेटे खड्डा उरारी
माझ्याही अंगात आला,नवा पांढरा सदरा

आषाढात घन-काळा बरसला

टेंडरच्या कामात गवसले हे स्वप्नांचे पक्षी
नव्या उड्डाण पुलावरती, खड्ड्यांची नाजुक नक्षी
गतजन्मीची ओळख सांगत,आला चिखल सारा

आषाढात घन-काळा बरसला,जोरदार पाऊस धारा
दिसूलागला रस्त्यातून अवचित, खड्ड्यांचा गोल पसारा

📝अमोल
८/०७/२०२०

Sunday, July 5, 2020

गुरु पोर्णीमा २०२०


आधी (BC बिफोर करोना)

"गुगल" माझा गुरु
"इन्स्टा" कल्पतरु
"फेसबुक" सौख्याचा सागरु
"ट्विटर" माझा

आता ( AC अफ्टर करोना)

"झुम" माझा गुरु
"टिम" कल्पतरु
"मिट" सौख्याचा सागरु
'जिओ" माझा

पुर्वी घराजवळ आपले गुरुजी दिसले की आपण त्यांच्या मागे लागायचो, इथेच राहतो गुरुजी चला ना घरी. गुरुजी पण घरी यायचे

आजच्या परिस्थितीत मात्र रोज दिलेल्या वेळापत्रकानुसार

झुम, टिम, मिट, जिओ साधनां द्वारे गुरुजी आपल्या घरी 'दत्त ' म्हणून हजर असतात

वर्क फ्राॅम होम, आॅन लाईन टिचिंग,  आॅन लाईन खरेदी या सगळ्या सुविधा उपलब्ध करुन देणारे

IT प्रोजेक्ट मॅनेजर, IT कामगार यांनाही 'गुरुपोर्णिमेनिमित्य वंदन '
🙏🏻🌺

(अमोल)
#लाव_रे_ती_मिटींग

Tuesday, June 30, 2020

मौज हीच वाटे भारी


मौज हीच वाटे भारी

खरं आहे. ऋतू बदलला की आमचे शरीर ठेपाळतेच. एक -दोन दिवस आराम केल्याशिवाय शरीराला उभारी येतच नाही

"पडू आजारी, मौज हीच वाटे भारी "  हे गाणं आमच्या सारख्या 'कन्सीस्टंटली' आजारी पडणाऱ्या  आणि आजार एन्जॉय करणाऱ्या रोग्यांना डोळ्यासमोर ठेऊन 'श्री भानूदासांनी'  लिहिले असं मला कायम वाटत राहिलं आहे

पत्रिकेत आमचा लग्नेष ग्रह षष्ठात म्हणजे मुळातच रोग प्रतिकारक शक्ती कमी आमची. भूतलावर अवतरल्या अवतरल्या काही दिवस आमची रवानगी सरळ काचेच्या पेटीत झालेली असं आई सांगते. त्यानंतर दवाखान्यात अॅडमीट व्हायचे प्रसंग म्हणजे शहा डाॅक्टरांच्या दवाखान्यात एकदम ८-१० दुधाचे दात काढले त्यावेळी आणि नंतर डायरेक्ट मोठेपणी नवी मुंबईचे नागरिकत्व मिळण्यासाठी चे प्रमाणपत्र म्हणून एकदा मलेरिया आणि नंतर डेंग्यू झाला त्यावेळी . बाकी गोवर, कांजिण्या वगैरे रोग घरगुती निभावले गेले

पण वरील काही गोष्टी सोडल्या तर आधी उल्लेख केला त्याप्रमाणे  ऋतुबदल झाला की आजारी पडणे आम्ही मजेत घेतले 😉

आता या गाण्यातील कुठले ही कडवे घ्या

नकोच जाणे मग शाळेला
काम कुणी सांगेल न मजला
मउ मउ गादी निजावयाला
चैनच सारी
मौज हीच वाटे भारी

या गाण्याची पुढची तिन्ही कडवी अगदी असेच वर्णन करणारी

आता लेख संपवता संपवता शेवटचे कडवे बघू

असले आजारीपण गोड
असून कण्हती का जन मूढ?
हे मजला उकलेना गूढ

म्हणून मी आज माझ मलाच विचारलं, का एवढं आपण मौज केली?

कारण एकच आजतागायत आम्हाला भेटलेले  प्रेमळ डाॅक्टर मग ते सांगलीचे डाॅ. शिरगावकर असतील, डाॅ. विजयकुमार शहा असतील,  माधवनगरचे आमचे फॅमिली डाॅक्टर कुलकर्णी असतील आणि बेलापूरचे आमचे डाॅ.पडवळ असतील.

प्रत्येक ऋतुतील येणारे  आजार आम्ही मौजेने घेतले कारण हे सगळे प्रत्येक वेळी आमच्या पाठीशी होते जणू 'माऊली' बनून

आज " डाॅक्टर्स डे"  निमित्य त्यांच्याप्रती कृतज्ञता 🙏🏻🙏🏻

इतर सर्व डाॅक्टर मंडळीना शुभेच्छा 💐

अमोल
०१/०७/२०२०

#पडू_आजारी_मौज_हीच_वाटे_भारी

Monday, June 29, 2020

६५ वी कला


आगामी आकर्षण/ लवकरच/ coming soon

पहिल्या भागाला मिळालेल्या उदंड प्रतिसादा नंतर

' नियती प्राॅडक्शन '
    घेऊन येत आहे
तुमच्या आमच्या जिवाळ्याचे 
     '६' अंकी रहस्यमय नाटक

        " उत्तरार्ध २०२० " 📝

शुभारंभ १ जुलै ' आषाढी एकादशीच्या '  शुभमुहूर्तावर
पहायला / अनुभवायला विसरु नका ' उत्तरार्ध २०२०
जवळच्या नाट्यगृहात ? नाहीनाही घरोघरी.

😀 मंडळी कशी वाटली जहिरात.  अरे जहिरातीचं युग आहे. बिचारी नियती तिला कुठे जहिरात करता येते. म्हणलं आपणच करु ' उत्तरार्ध २०२०' ची जहिरात

मंडळी, आत्तापर्यत आपण सगळेच समजायचो की ६४ कला आहेत. तर ही आपली समजूत आता चुकीची आहे बरं का.
नुकताच एक मराठी सिनेमा येऊन गेलाय.  ६६ सदाशिव. बघा मस्त आहे सिनेमा. यात आलेला उल्लेख असा आहे की
६५ वी कला म्हणजे- जहिरात
आणि
६६ वी. - हं याबद्दल परत कधीतरी.  कारण हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे. आणि जो आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा आहे.

तर लेखनाचा मथळा,  आगामी आकर्षण/ लवकरच/ coming soon

म्हणजेच अगामी गोष्टींची जहिरात. लहानपणी सिनेमाचे पोस्टर किंवा सर्कसीचे पोस्टर आणि त्यावर लवकरच, coming soon वगैरे पाहून छान वाटायचे.

आपण थेटरात सिनेमा बघायला गेल्यावर सुरवातीला किंवा मध्यंतरात एखाद्या नवीन
येणा-या सिनेमाचा ट्रेलर बघायला फार भारी वाटायचे
Coming soon...

आजकाल मात्र नवीन सिनेमा, नवीन मालिका यांच्या पोस्टर पेक्षा त्यांची टीव्हीवरच जहिरात बघायला मिळेल. .

आजकाल सोशल मिडियाने 'अगामी आकर्षणाची' भिंत
ब-यापैकी व्यापलीय हे नक्की.

जहिरात हाच अनेक चॅनेलचा श्वास असतो हे तर तुम्हांला माहितच आहे

 मात्र काही काही गोष्टींची coming soon म्हणत नुसती हवा होते . खरं ना ?
नाही कळलं?
पाऊस आहे का तुमच्याकडे 😁

तर मंडळी वरचे सगळे शब्द घेऊन येणारी 'जहिरात' ही नक्कीच एक कला आहे आणि यात अनेक कलाकार आहेत जे आपल्याला 'आनंद' देतात.

न बोलणा-याची 'अमुक किमती' गोष्ट पण विकली जात नाही तर बोलणा-याची 'तमुक कमी किंमतीची ' गोष्टही विकली जाते असे आपण नेहमी म्हणतो
( टिप: ही 'म्हण' मला माहीत आहे, लेखाची लांबी वाढण्यासाठी अस लिहिलय 😌)

तेंव्हा
"कुछ ना कहो, कुछ भी ना कहो"
हे गाणे ६५ व्या कलेसाठी वर्ज्य समजावे.
त्यासाठी
"ढमढम ढोल बाजे, ढोल बाजे ढोल' 🥁 हेच योग्य गाणे

मंडळी, उद्यापासून च्या इंग्रजी कालनिर्णयाचा :उत्तरार्ध २०२० माऊली कृपेने निरोगी जावो या शुभेच्छा 🌺🙏🏻

६५ व्या कलेचा चाहता, ६६ व्या कलेचा उपासक

( कायम ढोल पिटणारा) अमोल
३०/०६/२०२०

Sunday, June 28, 2020

जागतिक वेध अनुभवाचा







अमोल केळकर

Friday, June 26, 2020

सुखाचे हे सुख...


सुखाचे हे सुख .......

एव्हांन दोन्ही पालख्या पुण्यात आलेल्या असतात. आषाढ सरीं पेक्षाही, विठू माऊलीच्या गजरात  अवघी पुण्य नगरी जास्त चिंब होते . सदाशिव पेठ असू दे , कोथरूड असू दे किंवा बिबवेवाडी, काही ठिकाणी अशा चर्चा रंगतात

बाबा , उद्या  शनिवार तुम्हाला मला हडपसरला सोडायचे आहे
का ?
उद्या पालखी  'दिवे घाटातून' जाणार आहे , आणि आम्ही मैत्रिणीनी जायचे ठरवले आहे .

अगं पण तुला जमणार आहे का ?

का , नाही ? आणि नंतर रविवार तर आहे आराम करायला . तुम्ही हडपसरला सोडायचे आणि सासवड च्या जरा आधी फोन करू , मग घ्यायला यायचे

आईला विचारलं ?

हो, ती  ' हो ' म्हणलीय.

मग काय,  चला ...

"ग्यानबा, तुकाराम, ग्यानबा तुकाराम "

काही राहील नाही ना गं? पाण्याच्या बाटल्या , खायचं ?
 छत्री जवळ ठेव , उगाच भिजू नको लगेच सर्दी होते तुला .

होय बाबा , काळजी नका करू

ए हाय ! केंव्हा आलात ?

झाली १० मिनिटे .

अग पण आपली प्रोजेक्ट मॅनेजर कुठाय ' ज्ञानदा ' ?

नेहमी उशीर होतो हिला

 ए ती बघ आली !

ए चला हा आता भरभर , उशीर झालाय आपल्याला.
त्या बघ आजीबाई आपल्या पेक्षा किती भरभर चालतायत ते पण तुळशी कट्टा डोक्यावर घेऊन

 सेल्फी काढायचा त्याच्यांबरोबर ? का सरळ फेसबुक लाईव्ह करू या
?

नाही हा , फेसबुक लाईव्ह घाटात करू . आत्ता एक सेल्फी काढू फारतर.

अक्षता,  त्या आजीबाईंना थांबव ना जरा

' स्माईल प्लिज '  क्लिक

ए ज्ञानदा, उद्या  ग्रुपवर छान लेख टाक हं हा फोटो लावून

चला ग किती गप्पा मारताय , खूप लांब जायचंय अजून

ए आपण अभंगांची अंताक्षरी खेळायची ?

हा चालेल

तुलसी, कर चालू

खेळ मांडीयेला वाळवंटी घाई
नाचती वैष्णव भाई रे
क्रोध अभिमान गेला पावतनी
एका एका लागतील पायी रे
------------------------------------------------

राम कृष्ण गोविद , नारायण हरी
केशवा मुरारी पांडुरंगा

लक्ष्मीनिवास पाहे दीनबंधु
तुझा लागो छंदू सदा मज
--------------------------------------------

ज्याचा सखा हरी
त्यावरी विश्व् कृपा करी

---------------------------------
राजस सुकुमार मदनाचा पुतळा
रविशशिकला लोपलिया

कस्तुरीमळवट चंदनाची उटी
रुळे माळ कंठी वैजयंती
--------------------------------------------
तारू लागले बंदरी
चंद्रभागेचिये तीरी

लुटा लुटा संतजन
अमूप हे रासी धन
-----------------------------------
नामाचा गजर  गर्जे भीमातीर
महिमा सजे थोर तुज एका
------------------------------------------
ए  फेसबुक लाईव्ह कर लवकर
ए काय झालं ?
अग बघ ना ? माऊलींची मूर्ती , किती छान ना ?

 हो , हो आपल्याला इथेच थाबायचं आहे. पालखी पुढे गेली की मस्त हवेतेवढे फोटो, सेल्फी काढू . बाबा इथेच येतो म्हणालाय घ्यायला आपल्याला

- * -

काय झालं देवा असं गालातल्या गालात हसायला , उठा लवकर .

अग रुख्मिणी , छान स्वप्न पडलेलं , काय मस्त अंताक्षरी खेळत होत्या या मुली वारीत

पांडुरंगा , पांडुरंगा,   किती समजवायचं रे तुला , रोज आपली पालखीची स्वप्ने. यंदा लाॅकडाऊन मुळे वारी नाही . चला आवरा भरभर आज आपल्याला ' दिवे घाट'  पार करून जायचं आहे .

यंदा परंपरा पाळायला भक्त समर्थ नाही तर भक्तांची परंपरा आपण चालू ठेवायची
*ठरलय  ना आपलं ?*🚩🚩

भेटी लागी  जीवा .......

अमोल केळकर  📝
२६/०६/२०२०

Friday, June 19, 2020

ग्रह (अ)न - आपण


🌞 ग्रह(अ)न - आपण 🪐🌝✨

सृष्टीत ज्या दैनंदिन गोष्टी नित्य नेमाने सुरु आहेत त्यात उद्या घडणारी एक गोष्ट म्हणजे
"सूर्य ग्रहण" . ग्रहणात ही सूर्य आणि चंद्र यांना इतर ग्रहांच्या मानाने जास्त वलय प्राप्त झाले आहे. मंगळ , बुध , गुरु आणि इतर ग्रह ही आपल्या नियमित भ्रमण मार्गात 
' ग्रहणांकित '🪐 होत असतातच पण अनेक गाण्यातून कवितेतून वगैरे चंद्राला जरा जास्त वलयांकित केलेले असते, अभिशाप वगैरे तो भोगतो असा उल्लेख केलेला आढळतो. कदाचित ही दोन ग्रहणे आपण सहजासहजी पाहू शकत असल्याने याचीच चर्चा जास्त होत असावी . म्हणूनच की काय पूर्वीपासूनच सूर्य , चंद्र  ग्रहणांना इतर ग्रहणापेक्षा धार्मिक दृष्टीकोनातूनही जास्त महत्व दिले गेले आहे.

ग्रहण म्हणजे ? वैज्ञानिक दृष्टीकोनातून अनेक शास्त्रीय लेख तुम्हाला इतरत्र वाचायला मिळतील. पण ' टुकार ' दृष्टीकोनातून फक्त इथेच वाचू शकाल

एखादी गोष्ट व्यवस्थित आहे आणि अचानक त्यात अडचणी यायला लागल्या की  त्या गोष्टीला "ग्रहण" लागले असे आपण म्हणतो. सन २०१९ च्या ३१ डिसेंबरला नवीन २०२० चे स्वागत करताना हा विचार ही आपल्या मनात आला नसेल की सगळं व्यवस्थित चालू असणा-या आपल्या नियमित गोष्टींना/ रुटीन कामाला सन २०२० मध्ये मोठे ग्रहण लागणार आहे. आज या २०२० च्या मध्यात आपण आहोत आणि संपूर्ण हे वर्ष आता असेच जाणार हे सांगायला कुणा वैज्ञानिक, शास्त्रज्ञ , डॉक्टर , जोतिषाची गरज नाही.

 या शब्दाचा आता दुसरा अर्थ बघू
'ग्रहण - ग्रहण करणे - स्वीकारणे ?????????

सूर्य , चंद्र ( आणि इतर ग्रह ) यांच्या ग्रहणात  सूर्य , चंद्र  हे राहू-केतू  बरोबर युतीत येतात . राहू केतू हे प्रत्यक्षात ग्रह नाहीत  तर छेद बिंदू ( nodes ) आहेत. आता आपल्या १२ राशीतून भ्रमण करत असताना  राहू , केतू ( पापग्रह ) ज्या राशीत आहेत  तिथे सूर्य चंद्र त्यांच्याबरोबर आले की ग्रहण स्थितीत येतात.

काय शिकवतात हे ?  जीवनात अधेमधे वाईट गोष्टी/ परिस्थिती  तुमच्या वाट्याला येईल ही  , पण  थोड्या कालावधीसाठी. त्या कालावधीचा स्वीकार करायचा ( ग्रहण), तेवढ्यापुरते 'सबुरी' ने घ्यायचे आणि पुढे जात रहायचे जे सध्या पण सगळेच करत आहोत.

मोठ मोठ्या ग्रहांना हे अनिश्चिततेचे ग्रहण सुटलेले नाही मग आपण कोण एवढे मोठे लागून गेलो आहोत ?  चंद्रा सारख्या असंख्य अमावस्यां - पोर्णीमा अनुभवून पुढे जात रहायचे.

चला टुकार लेखनाचा शेवट वसंत बापट यांच्या एका "स्फूर्ती गीताने"

सदा तुझ्यापुढे उभी असे निशा
सदैव काजळी दिसायच्या दिशा
मधून मेघ हे नभास ग्रासती
 मधेच या विजा भयाण हासती
दहा दिशातुनि तुफान व्हायचे
सदैव सैनिका  पुढेच जायचं

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

उद्याच्या योगदिन आणि ग्रहणदिनाच्या शुभेच्छा
🌞🧎🏻

" *योग दिनं ग्रहणाम्यहं* "

( ग्रहांकीत) अमोल ✨💫
poetrymazi.blogspot.com
२०/०६/२०२०

Wednesday, June 17, 2020

जिंकू या, हरु या पण


आमच्या चेतना वैद्य मॅडमनी हा निरोप पाठवला 👆🏻, त्यांनी खरं म्हणजे 'आव्हान' ( चॅलेंज)  न देता 'आवाहन' केलेलं. निरोप बघितल्या बघितल्या त्यांना कळवलं हे व्हिडिओ वगैरे बनवणं काय जमणार नाही मला.

पण मनात हा विषय सुरु झाला. लाॅकडाऊन मधे काय केल आपण ? आणि इतरांना काय सांगशील ? तर त्यांना रोज किमान ' बदाम सात चे' २-४ डाव न चुकता रात्री खेळायला सांगेन

तर मंडळी दिवसभर work from home वगैरे झाल्यावर रात्री आम्ही ५ जण न चुकता थोडावेळ 'बदाम ७' खेळायचो. मी, आई, बायको आणि मुलं

हा खेळ जिवनातील अडचणींशी कसा सामना करायचा हे फार छान सांगतो. ( डिप्रेशन वगैरे कमी होईल का वगैरे फार टेक्निकली मला सांगता येणार नाही)

बघायच कस? खाली आमचे मुलांबरोबरचे संवाद पण लिहिलेत

चला वाटा पत्ते. ५ जण म्हणजे पिसणा-याच्या पुढील दोघांना १-१ पत्ता जास्त.

 जीवनात अडचणी  सगळ्यांना सारख्या नसतात.कुणाला जास्त कुणाला कमी - १ ली गोष्ट शिकलो.

अरे उचला पानं, वाटलीत बघा. कुणाकडे आलीय बदाम सत्ती ? -

संधी  कुणाला आधी मिळते कुणाला नंतर.

चलं खेळ, ताईने सत्ती टाकलीय,  तू खेळ. अरे आता मोठ्ठा झालायस, पानं निट लाव बर इस्पिक एकत्र, चौकट एकत्र त्यातही राजा ते एक्का क्रम.
खेळ आधी मग पान लावत बस

- वेगवेगळ्या आव्हानांच वर्गीकरण,  त्याक्षणी जे खेळू शकतो ते खेळणे, परिस्थिती चा स्विकार करणे.

बापरे, नुसती चित्रच आलीत माझ्याकडे मी नक्कीच हरणार
- अरे हा डाव हरशील पुढचा जिंकशील त्यात काय? कुठला राजा आहे तुझ्याकडे 'किल्वर' बघ त्याचीच सत्ती पण आहे . दुस-याची अडवणूक करताना तुझेही पान अडकणार, ती आधी खेळून मग इतर पत्ते खेळ

-  योग्य नियोजन?

आई- राणी टाक ना माझा राजा सुटेल. अरे हो मला दुसरं खेळायला पानच नाही आहे.
येsssस,  सुटला माझा राजा

- जवळच्या माणसांशी चर्चा

माझे टू पेज शुअर मी खेळलो  आता वन पेज शुअर, अरे यार तुम्ही सुटलात?  काय हे , फक्त एक्का राहिला,  माझे १ गुण

- डावाच्या सुरवातीला राजांमुळे ( मोठ्या अडचणी)  हरु शकतो असं  वाटत असताना त्या किरकोळ एक्क्या मुळे ही हरु शकतो.  किरकोळ गोष्टी ही महत्वाच्या असतात
किंवा अगदी लहान सहान गोष्टीत हरलो तर एवढं दु:ख नाही वाटून घ्यायचे. कधीकधी नशीब
दुस-याला आपल्यापेक्षा जास्त देते. बस

 चला आता  पुढचा डाव कोण वाटणार? - आशावाद?

मंडळी, गेले दोन - अडीच महिने हे नित्य आमच्येकडे. बघा खेळून. तुम्ही पण आज 😊

थोडं विषयांतर. आमच्या टुकार लेखनाचे कायम कौतुक करणारी आमची प्रतिभा मावशी. हिने परवा संजय आवटे यांचा 'जगू या,  जिंकू या ' हा लेख पाठवला आणि या विषयावर लिही म्हणाली.
म्हणलं मावशी, मी विडंबनकार. सिरिअस विषय, आणि एवढ छान मला नाही जमणार. तर मावशी ह्या लेखाशीवाय जास्त काही नाही लिहू शकणार.

लेखनाचा मथळा फक्त असा लिहू शकतो 😁

'जगू या, खेळू या
जिंकू या, हरु या पण !

हरण्यात ही कधीकधी मजा  असते.

माझ्या लेखनावर माझ्यापेक्षा जास्त विश्वास ठेवल्याबद्दल या दोघींचे आभार 🙏🏻🙏🏻😊

( खेळाडू)  अमोल 📝
१७/०६/२०२०
poetrymazi.blogspot.in

Sunday, June 14, 2020

पाठव रे ती लिंक


#पाठव_रे_ती_लिंक 👍🏻

कुणी मत देणार का मत 🙏🏻

नाही नाही वेळ आहे हो निवडणुकीला अजून.तिकडचा तर प्रश्णच नाही अजून ५ वर्षे चिंता नाही. इकडं पडलं तर बाकीचे तुटून पडतीलच.

 मग?  महानगरपालिका ?

हा ती आहे निवडणूक,  पण तुम्हाला परिस्थितीची काही जाणीव? अहो एवढं संकट आहे गावागावातून, तुम्हाला इलेक्शन पाहिजे?

काय ही 'टुकारगिरी' तुमची ?
'मत देता का मत म्हणे'? 🤨

अहो,  अहो काय हे?  आं?
कुठं नेऊन ठेवलं "आव्हान" आमचं?
निवडणूकीसाठी 'मत' नव्हे.

मग कशासाठी ?

आमच्या चार ओळींपासून, चार पानी व्याख्यानांपर्यत आम्ही जी कला सादर केली त्याला

मत, देणार का मत?

अरे देवा! असं हाय तर..... 🤦🏼‍♂️
ते दर ५ वर्षांनी उगवणारी बुजगावणी  बरी म्हणायची की तुमच्या पेक्षा. एकदा निवडून दिलं की परत तोंड दाखवत नाहीत
अन तुम्ही?  आताशा रोजच यायलाय की हो.🤷🏼‍♂

नाही नाही. ते काल ती काव्यशृंखला होती. त्याआधी  'अभिवाचन' होते आणि आता ही 'कोरोना हटाव चारोळी स्पर्धा'

द्यालना मत? ☺️

नाही, म्हणजे  समजा आमचे एक मत तुम्हाला कमी पडले तर चालणार नाही का? का तुमचा कलेचा 'विकास' होणार नाही.

तसं नाही हो. ऐका तर एकदा ट्यूब वर. तुम्हाला नक्की आवडेल. आणि तुम्ही द्यालच. नाही तुमची तशी तयारी होईलच.

ओ, थांबा!  हे फेसबुक लाईव्ह नाही.
मला एक सांगा, तुम्ही शाळेत कधी कुठल्याही स्पर्धेत भाग घेतलेला?

हो,  ना! बघा ५ वीत मला वक्तृत्व स्पर्धेत...

बास, बास समजलं. त्यावेळी स्पर्धेच परिक्षण कोण करायचे?

काही प्रसिद्ध लेखक, मान्यवर.  तुम्हाला सांगू मी पण गणेशोत्सवात एकेठिकाणी परिक्षक म्हणून.

कळलं. मग आत्ताच्या आयोजकाना काय धाड भरलीय स्वतः निकाल लावायला.

अहो असं कसं म्हणता?  त्यांच्या काही योजना असतील,  एवढ्या व्यक्तीनी त्या संकेतस्थळाला भेट द्यावी, जहिराती बघाव्यात, अनेक गोष्टी असतात. आणि काय हो त्या टीव्ही वरचा वेगवेगळ्या स्पर्धत SMS करत होता ना? पैसे जायचे त्याचे, हे फुकट आहे, फुकट
तुम्हाला द्यायचे 'मत ' तर द्या मी परत येणार नाही तुमच्याकडे 😠

अहो, असं रागावू नका. आत्तापर्यंत तुमच्या सगळ्या कलाकृतीना मी 'मत' दिलय हो.
आता तुम्ही ऐकाल १ मिनीट?

हं , बोला 😏

हे जे वर लिहिलेले संभाषण आहे ना आपल्यातील,  ते एका कथाकथन स्पर्धेत मी सादर केलंय

ही त्याची लिंक 😊
www.poetrymazi.blogspot.in

द्याल ना नक्की मत मला 😷

#पाठव_रे_ती_लिंक

( स्पर्धेला कंटाळलेला )अमोल केळकर📝
१४/०६/२०२०

तळटीप :
१)नेहमी प्रमाणे सर्व स्पर्धक खेळीमेळीने घेतीलच. 😬
२) खरंच स्पर्धे योग्य जमलीय का कथा, तुम्हाला जास्त अनुभव आहे 😉

Saturday, June 13, 2020

इकडचे - तिकडचे " ज्ञानविस्तार "


इकडचे - तिकडचे " ज्ञानविस्तार "

'जगी सर्व ज्ञानी असा कोण आहे
विचारे इकडे, तिकडे शोधुनी पाहे'

खरं म्हणजे  मंडळी हा विषय तसा काही नवीन नाही . पण जरा वेगळ्या पध्द्तीने मांडतोय एवढंच.

आता तुम्हाला हे माहीतच आहे की पारंपारिक शिक्षण आपले हे  शिशु ( सुसु )वर्गापासून सुरु होऊन पुढे  लौकिकार्थाने पदवीपर्यंत पूर्ण होते. ज्याला आपण पाठयपुस्तकी शिक्षण म्हणू. जे आपण बाल मंदिर, शाळा , महाविद्यालये इथून पूर्ण करतो. या सगळ्या संस्थेचे ध्येय एकच असते

चिरा चिरा हा घडवावा , कळस कीर्तीचा चढवावा
अज्ञानी तो पढवावा, थेंब आम्ही तर सागर हे
सत्य शिवाहुन सुंदर हे

वेगवेगळ्या टप्प्यात आपण हे शिक्षण घेत असताना आपले मार्गही बदलतात जसे मराठी मिडीयम , इंग्रजी मिडीयम  हिंदी -संस्कृत  किंवा पुढे कला -विज्ञान- वाणिज्य , मग त्याहीपुढे इंजिनिअरींग, वैद्यकीय, व्यवस्थापन  किंवा अशा अनेक वाटा .

एक मार्ग स्वीकारल्यावर शेवटचे ठरलेले स्टेशन आले की  प्रवास संपला पाहिजे पण असे होत नाही . बघा ना , रेल्वे बजेट मध्ये गेली काही वर्ष  अमुक गाडयांचा मार्ग विस्तारीत केला आहे असे आपण वाचतो. म्हणजे एखादी गाडी मिरजेपर्यतच जाते  पण आता ती बेळगाव पर्यत जाईल  हा झाला  त्या गाडीचा विस्तार . ज्ञान घेण्याबाबतीत तसा  विस्तार आपण ही करतो मग तो आपल्या आपल्या नोकरी /  व्यवसायास  / प्रोफेशनला पूरक म्हणून असेल   किंवा निव्वळ  आवड छंद म्हणून असेल

 ' अपारंपारिक शिक्षण किंवा ' ज्ञान - विस्ताराची ' सुरुवात तशी लहानपणापासून नकळत झालेलीच  असते. आई - बाबा हे आपले पहिले गुरु . नियमित अभ्यासक्रमात नसलेल्या अनेक गोष्टी ( संस्कार / आचरण इ इ ) शिकवायला त्यांनी सुरवात केलेली असते . नंतर येतात ते आपले शाळेतील , आजूबाजूचे सवंगडी
मग हळूहळू आपली ओळख होते  पेपर , रेडिओ , दूरदर्शन ( टीव्ही ) या माध्यमांची . ज्ञान विस्ताराच्या या मार्गात  वयाच्या एका टप्प्यावर आपला संबंध वाचनालयाशी येतो .  इथेही अनेक गोष्टी कळतात, आपल्या ज्ञानाचे क्षेत्र विस्तारते. पुढे संगणक शिक्षण झाल्यावर वेगवेगळी संकेतस्थळे   आपले ज्ञान विस्ताराचे मार्ग बनतात आणि आज काल तर सोशल - मीडिया ( त्यातही फेसबुक , व्हाटसप )  हा तर ज्ञान विस्ताराचा जणू एक्स्प्रेस हायवेच झालाय. आता यात येणा-या किती गोष्टी ख-या असतात , अफवा असतात  किंवा दिलेले संदर्भ किती बरोबर - चूक असतात  हे ओळखणे ही एक ' कलाच ' आहे.  यात उतरलेल्यांना कले, कले ने ते समजत जातेही पण  सध्यातरी ज्ञान - विस्ताराचा हा ' राज ' मार्ग ठरला आहे यात शंका नाही

यात ही दोन प्रकार आहेत बरं  का. जस शाळेत आपण मुलांचे वर्गीकरण मिळणा-या गुणांनुसार  प्रामुख्याने दोन प्रकारे करतो १) हुशार २ ) मध्यम ( इथे ' ढ ' वगैरे प्रकार मला मान्य नाही )  तर  व्हायचं काय की  मुख्यतः दहावी बोर्डाच्या परीक्षेत वगैरे   एका ' मध्यम' मुलाकडे  एखाद्या विषयाचे  दुसरे पुस्तक असायचे , किंवा काही तरी त्याला पुण्या-मुंबई कडच्या नातेवाईकांकडून  काही नोट्स वगैरे मिळायचे. ही बातमी  हळूहळू सगळीकडे जायची. ज्याच्याकडे त्या नोट्स किंवा काही वेगळे पुस्तक असायचे त्याबद्दल त्याला काही फार वाटायचे नाही . पण जी हुशार मुले असायची त्यांची मात्र  प्रचंड घालमेल व्हायची. अरे आपल्याकडे कसं नाही, काय असेल त्यात ? कसेही करून ते आपल्याला पाहिजे  इ इ मग ते पुस्तक / नोट्स त्या 'मध्यम' मुलाकडून मिळवल्या जायच्या. तो ही सहज द्यायचा , त्याला काही वाटायचे नाही. त्याच्यासाठी सामान्य अभ्यासक्रमच खूप असल्याने हे अतिरिक्त पुस्तक वाचले काय नाही वाचले काय फारसा फरक पडायचा नाही. तो आपलं सगळ्यांना देत रहायचा

आज हीच ' मध्यम '  मुले सोशल मीडियावर आपल्याकडे आलेले ज्ञान पुढे ढकलतात आणि हुश्शार मुले त्यावर अभ्यासाचा ' किस ' पाडतात 😉

माफ करा थोडं विषयांतर झालं . पण मंडळी लहाणपणापासून  सुरु असलेली  ' ज्ञान - विस्ताराची  '  माणसाची उर्मी कायम राहील यात शंका नाही. पण यातही   पारंपारिक शिक्षणाबरोबरच अपारंपारिक शिक्षण असलेले
' व्यवहार ज्ञान'  घेणे हे ही महत्वाचे नाही का ?

एखादवेळी गणितात थोडे कच्चे असले तरी चालेल पण माणसाने शब्दाला पक्के पाहिजे. हे
 ' व्यवहार ज्ञान' एकदा आत्मसात झाले की भले अक्षांश - रेखांशांच्या परिणामात गडबड झाली तरी  तुमचा जगण्याचा आलेख ( ग्राफ ) हा वर जाणाराच असेल यात शंका नाही  📈
 
चला मंडळी आवरत घेतो.

इधर चला में , उधर चला , जाने कहाॅ में किधर चला

वेळ झाली आहे आता जरा दुसरी कडे जाऊन तिथे आलेले
 ' ज्ञानरूपी मोती'   ओजळीत गोळा करून इतरत्र देण्याची.

मज पामरासी काय थोरपण
पायींची वाहणं पायी बरी |
ज्ञानियांचा राजा गुरु महाराव
म्हणती ज्ञानदेव तुम्हा ऐसें ||
🙏🏻🌺

( अ-ज्ञानी ) अमोल 📝
१३/०६/२०२०
poetrymazi.blogspot.in

Tuesday, June 9, 2020

तुझी कला पाहण्यासाठी


गेले काही दिवस आमच्या असंख्य 'कलाकार' मित्र -मंडळीं कडून त्यांची कला पाहून यू-ट्यूब वर लाईक करण्याच्या प्रेमळ विनंत्या येत होत्या. अर्थात आम्ही कुणालाच निराश केले नाही.

या सर्व मित्र -मंडळींना हे विडंबन समर्पित,  सगळेच जण हलके घेतील यात शंका नाही ☺️

( मूळ गाणे: तुझे गीत गाण्यासाठी,  सूर लागू दे रे)

तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे
तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे

'ग्रुप वरी' दिसुन आल्या, यू ट्यूबच्या वाटा
नोंदणी ही करण्यासाठी घातलाच घाटा
त्या एका 'लाईक' साठी 👌🏻
मला जाऊ दे  रे

तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे

एक एक कलेचा तो, नाद पाहताना 🎤🎧
आणि किती मिनिटे राहिली, हे जाणताना ⏱️
कौतुकाची 'थाप' मला तुला वाहू दे रे 😷

तुझी कला पाहण्यासाठी,  खूळ लागू दे रे

( कला प्रेमी)  अमोल 😬
poetrymazi.blogspot.in
०९/०६/२०२०

Sunday, June 7, 2020

आइस बकेट चॅलेंज


( ALS) *आइस बकेट चॅलेंज* 🥶

गेले दोन महिने पेक्षा जास्त काळ सुरु असलेल्या लाॅकडाऊन मधे सोशल मिडीयावर खूप जणांनी सक्रिय सहभाग नोंदवला. अनेकांनी आपल्या कलाकृती सादर केल्या मग ते गाणे म्हणणे असेल, एखादं वाद्य वाजवणे असेल, स्वयंपाक करणे असेल, चित्रकला, हस्तव्यवसाय अशा काही गोष्टी असतील. किंवा लेखन, काव्य, गप्पा गोष्टी अशा अनेक गोष्टी सोशल मिडीयावर पहायला मिळाल्या. अबालवृध्दांनी सर्वच स्तरावर यात सहभाग नोंदवला. 

*अनेक जणांनी तर या अडचणीच्या काळात  प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून गरजूंना  समाजसेवा/ मदत करुन वेगळ्या प्रकारे आपल्यातील कला सादर केली*  कामाच्या गडबडीत इतर वेळेला न जमणाऱ्या अशा काही समाज उपयोगी गोष्टी अनेकांनी केल्या.

आज सोशल मीडीया मुळे ही सगळी माहिती सहज समजू शकते. आपण इतरांच कौतुक करुन त्यातुन स्फूर्ती घेऊ शकतो

सोशल मिडीयावर एक थोडा वेगळा प्रकार ही दिसून आला तो म्हणजे आपली कला सादर करुन त्याप्रकाराची कला ( गाणे, कविता, डान्स, पोशाख वगैरे वगैरे)  सादर करण्यासाठी दुसरा/ दुसरी किंवा एका पेक्षा अधीक व्यक्तींना आव्हान / चॅलेंज/ नाॅमीनेट करणे. या प्रकारात ही अनेकजण खुप उत्साहात सामील झाले.

थोडंस साखळी विक्री ( चेन मार्केटिंग)  सारखा हा प्रकार पण प्रत्यक्षात आर्थिक उलाढाल नाही. तसा 'चेन मार्केटिंग हा लेखनाचा स्वतंत्र विषय आहे, पण तो परत कधीतरी.

मुळ मुद्याकडे परत येऊ. वरील चेन मार्केटिंग मधे काही प्रमाणात आर्थिक गोष्टी आणून आणि सोशल मिडीयाचे 'आव्हान' या गोष्टी एकत्र करुन अमेरिकेत पहिल्यांदा 

" आईस बकेट चॅलेच " सुरु झाले

 साधारण २०१४ ( किंवा २०१५ असेल ) जुलै / आॅगस्टचा कालावधी असेल

संकल्पना अगदी सरळ होती. एका कर्करोगा संबंधित संस्थेत मदत करायची यादृष्टीने हे कँपेन होते. त्याचे कदाचित नंतर अनेक वेगवेगळ्या समाजोपयोगी गोष्टीत रूपांतर झाले ही असेल

तर एका व्यक्तीने बर्फाच्या तुकड्यांनी भरलेली बादली एका झटक्यात आपल्या डोक्यावर ओतायची ( डोकं शांत ठेवायचा तो अमेरिकी प्रकार असावा)  आणि त्या संस्थेला $ १०/- इतकी मदत करायची. हे आव्हान तो स्विकारु शकला नाही तर त्या संस्थेला त्याने $१००/- इतके द्यायचे. त्यानंतर त्याने इतर काही जणांना 'आव्हान ' द्यायचे आणि ही चेन / साखळी पुढे चालू

मस्त कल्पना ना?

म्हणजे खेळ/ थरार/ मजा हे सगळं करता करता 'सामाजिक मदत' हे व्यापक स्वरुप याला दिले गेले. काही कालावधीतच हा प्रकार खूप लोकप्रिय झाला.

आज हे सोशल मिडीयावरील 'आव्हाने' बघून  हे सहज आठवले.

बाकी आपल्याकडे लगेच असे करावे असं मला यातून अजिबात सुचवायचे नाहीकारण एकंदर भारतीयांना सामाजिक जाणीव असतेच आणि वेळोवेळी तो तशी आर्थिक मदत करतच असतो.

आणि म्हणूनच गदिमांनी लिहून ठेवलयं

होते तितुके देइ याहुन हट्ट नसे गा माझा,
सौख्य देइ वा दुःख ईश्वरा रंक करि वा राजा
अपुरेपण हि ना लगे,.... ना लागे पस्तावाचि पाळि

*देणाऱ्याचे हात हजारो दुबळी माझी झोळी*. ||

( सोशल)  अमोल 📝
०७/०६/२०२०

Saturday, June 6, 2020

जीवनगाणे गातच रहावे


*जीवनगाणे गातच रहावे*

आज ६ जून,  कवयित्री शांताबाई शेळके यांची पुण्यतिथी.  यानिमित्ताने त्यांच्या काही गाण्यांच्या आठवणी 📝

साधारण जून महिन्याच्या  याच सुमारास मृग नक्षत्र लागते आणि नवनिर्मितीची चाहूल चराचराला होते.  एकंदर पुढचा वर्षा ऋतू चा कार्यकाल हा
" *अजब सोहळा!  अजब सोहळा*"
असा असतो मग अचानक केंव्हाही हा पाऊस येतो, तो मातीचा हवाहवासा वाटणारा गंध घेऊनच

 " *आला पाऊस मातीच्या वासात ग*
*मोती गुंफीत मोकळ्या केसात ग* "

मग दरवर्षी सारखे ते WA वर अत्तरांचे भाव कमी होतात पण या गंधाची अनुभूती घेतलेला नकळतपणे गुणगुणतो

*गगना गंध आला*
*मधुमास धुंद झाला*
*फुलते पलाश राणी*
*जळत्या ज्वाला*

सभोवतालचा परिसर हिरवागार होऊ लागतो. मनुष्यप्राणी तर आनंदतोच पण रानपाखरं ही गाणी गावू लागतात.

*सोनसकाळी सर्जा सजला,हसलं हिरवं रान*
*राघुमैना रानपाखरं गाउ लागली गान!*

याचबरोबर

*किलबिल किलबिल पक्षी* *बोलती, झुळझुळ झुळझुळ झरे वाहती* !
*पानोपानी फुले बहरती*, *फुलपाखरे वर भिरभिरती !*


आषाढ सरींचा जोर संपून श्रावणाची चाहूल लागते श्रावणसरींची, उन-पावसाच्या लपंडावाची

'कशी मनातुन मने गुंतती, भाव दाटती उरी
*उन्हात न्हाऊन सुंदर होऊन येती श्रावणसरी* '

'जलथेंबानी कशी चमकते सृष्टी ही साजरी
*कधी हास-या, कधी लाज-या, आल्या श्रावणसरी'*

निसर्गाचे मग एक लोभस रुप सगळीकडे बघायला मिळते मग

'नभी उमटे इंद्रधनू, मदनाचे चाप जणू
गगनाशी धरणीचा जुळवितसे सहज दुवा

*ऋतु हिरवा, ऋतु बरवा ||'*

नारळी पोर्णीमा झाली की मग परत समुद्रात जाणाऱ्यांना मायेने सांगितले जाते

आज पुनवा सुटलय दमानं
दरियाच्या पान्याला आयलंय उदान
पिऊन तुफानवारा
*माझ्या सारंगा, राजा सारंगा*

तरीही वेळप्रसंगी
सजनान होडीला पान्यात लोटलं
.. अन्

वादळंवार सुटलं गो
वा-यानं तुफान उठलं गो
भिरभिर वा-यात
पावसाच्या मा-यात
सजनान होडीला पान्यात लोटलं
*वादळंवार सुटलं गो !*

निसर्ग आणि मनुष्यप्राणी यांच्यातील रेशीम बंध असेच राहू देत

हे बंध रेशमाचे, ठेवी जपून जीवा
धागा अतूट हाच, प्राणात गुंतवावा
बळ हेच दुर्बलांना , देतील पराक्रमाचे
*तुटतील ना कधी ही,  हे बंध रेशमाचे*

शांताबाईंनी असंख्य गाणी लिहिली आहेत, कुणीही यावे आणी ओंजळीभरुन घेऊन जावीत आणि आपापल्या पध्दतीने

*"जीवनगाणे गातच रहावे "*

यानिमित्ताने शांताबाईंचे स्मरण 🙏🏻

मंडळी, लेख आवरता घेण्यापुर्वी.

६ जून म्हणजेच हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन ( तिथी जेष्ठ शुक्ल त्रयोदशी)  🚩

शांताबाईंच्या या गाण्याने या लेखाची सांगता करतोय

शुभघडीला  शुभमुहुर्ती
सनई सांगे शकुनवंती
जय भवानी जय भवानी
दशदिशांना घुमत वाणी

जयजयकारे दुमदुमवू हे
सह्याद्रीचे कडे  !!

स्वराज्यतोरण चढे गर्जती
तोफांचे चौघडे
*मराठी पाऊल पडते पुढे!* 🚩

स्वये शस्त्र देशार्थ हाती धरावे
पिटावे रिपूला रणी वा मरावे
तुझ्या रक्षणा तूच रे सिध्द होई
तदा संकटी देव धाऊन येई

🚩 *जय जय रघुवीर समर्थ*🚩🙏🏻

अमोल केळकर 📝

Monday, June 1, 2020

एस टी बसचा वाढदिवस


कुठे ही जायचे म्हणले की
आम्हाला वाटते बरी
अहो तीच सगळ्यांची
लाडकी  ' *लाल परी* '

गणपतीपुळ्याचा गणपती
सभोवती निसर्गाचा ठेवा
खुप आवडायची आम्हाला
मिरज- पुळे ' *प्रतिष्ठित सेवा*

मामाच्या गावाला जाताना
गप्पा - गोष्टी - गाणी
आईच्या ममतेने न्यायची
सांगली- पुणे " *हिरकणी*

खिडकीची जागा मिळाली
म्हणजे वाटायचे मिळाले घबाड
मग दिवस-रात्र असो वा उन-पाऊस
आरामशीर प्रवास म्हणजे *एशीयाड*

थंडा थंडा कूल कुल
तासा तासाला खेपा जारी
पुणे - मुंबई - पुणे प्रवासात
' *शिवनेरीची* मजाच न्यारी

हायवे वरचे विमान जणू
अचूक वेग अन वेध
खरचं नशिबवान तुम्हीजर
मिळाला तुम्हाला ' *अश्वमेध*

वेगवेळ्या रुपातील या सा-यांना  १ जूनच्या एसटी च्या वाढदिवसानिमित्त खुप खुप शुभेच्छा 
💐💐

अमोल 📝
०१/०६/२०२०

Sunday, May 31, 2020

कोरोना आहे आज अजुनी


उद्यापासून सुरु होणा-या लाॅकडाऊन ५.० चे स्वागत आमच्या पध्दतीने 💐
( गाणे: तरुण आहे रात्र अजुनी)

'कोरोना' आहे आज अजुनी
लाॅक-डाऊन वाढलाच ना रे
एवढ्यातच त्या  गल्लीतून
तू असा वळलास का रे?

कोरोना' आहे आज अजुनी

अजुनही दिसल्या न सदनी
बालकांच्या स्कूलगाड्या
अजून मी दिसले कुठे रे?
पण तू दिसलास का रे?

कोरोना' आहे आज अजुनी

बघ तूला दिसतोच आहे
'चायनाचा' विषाणू सारा
'क्वारंटाईनच्या'  कृतीचा
गंध तूला पाहिजेल का रे?

कोरोना' आहे आज अजुनी
लाॅक-डाऊन वाढलाच ना रे
एवढ्यातच त्या  गल्लीतून
तू असा वळलास का रे?

#विडंबन_एकवेळ_सहन_कराल_
पण_विलगीकरण_नको
#घरात_रहा_सुरक्षित_रहा ✌🏻

( मनाने नेहमीच तरुण) अमोल 📝
३१/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

Saturday, May 30, 2020

चायनीज प्रणाली


सध्या सगळ्या शाळा/क्लासेस झुम वर आहेत.

पण झूम तर चायनीज आहे  😏

शेठजी, आरोग्य सेतू सारख द्या काहीतरी?

नाव सुचवू?

खडू(स) फळा?

नाही आवडलं ?

प्रकाशाच्या स्मृती?

हे पण नाही आवडलं?

मग त्यांनाच विचारा 😷

शेवटच एकच शेठजी

'आत्मनिर्भर कळा' आपलं फळा

हो देतो मोबाईल माहित आहे २ ला तुझा क्लास आहे झुम वर

 शेठजी, जरा लवकर 🙏🏻

( जरा गंमत)  📝😊

Sunday, May 24, 2020

बायपास रोड


बायपास रोड

आजकाल कुठल्याही शहराला एक गोष्ट निर्विवाद पणे चिकटलीय ती म्हणजे त्या शहराच्या बाजूने जाणारा 'बायपास रोड'. ज्यांना या गावात काम नाही,पुढे जायचे आहे, शहरातील वाहतूक चक्रात न अडकता, वेळेशी सांगड घालत, पुढे जायचा एक उत्तम पर्याय. 'ज्या गावी मला जायचं नाही, त्याचा विचार का करायचा? ' या म्हणीला साथ देणारा  कुठलाही 'बायपास किंवा रिंग रोड' आज आपण सगळीकडे बघतो. उपयुक्तता, गरज यात काहीच प्रश्ण नाही
पण खरं सांगू या 'बायपास रोडने' प्रवासाची मजा गेलीय. अस्स्ल  प्रवासी माझ्या या मताशी ठाम असेल. प्रवास ही काय गडबडीत/ भरभर करायची गोष्ट आहे का? स्वतः ची गाडी घेऊन जाणारे समजू शकतो पण आजकाल आमच्या 'लाल प-या' पण बायपास करत जातात. अर्थात त्यांना ही स्पर्धेच्या युगात टिकाव धरायचा असल्याने हे सगळं करण गरजेचे आहे म्हणा.

पण जिथे ११-१२ तास प्रवासास लागायचे तिथे ६ तासात प्रवास संपवायचा?  😕

चला यानिमित्याने  मुंबई-  सांगली ( खाडी पूल मार्गे ) कुठलाही बायपास न घेता आज फिरुन येऊ.
सकाळी ७. ठिकाण: मुंबई सेंट्रल
चला बसले का सगळे, टिंग टिंग

एक , सांगली द्या,  किती पर्यत पोचेल काका. 
सात पर्यत पोहोचेल, तिकीट निट ठेवा. पुण्यात चेक होते बर का!

दादर,सायन,चेंबूर करत वाशी खाडी पूल आला की मुंबईतील
 वा-याची झुळुक ( पहिल्यांदाच) अनुभवून खिडकीला डोके टेकवून जी मस्त झोप लागायची ती 'पनवेल' स्थानकावर ' पाच मिनिटे बस थांबेल' जाऊन यायचं त्यानी जाऊन या, या मास्तरांच्या आवाजानेच जाग यायची. ( कळंबोलीहून जाणारा पनवेल बायपास - एकस्प्रेस वे चुकवला बरं का आपण) 
उतरुन एक- दोन पेपर आणि नंतर वाचायला चित्रलेखा, साप्ताहिक सकाळ यापैकी एक मासिक घेऊन पुढचा प्रवास सुरु.

पनवेल ते खोपोली बस ब-यापैकी भरलेली. साधारण तासात उजव्या बाजूला दिसणाऱ्या  महड च्या बाप्पांना नमस्कार करुन खोपोली.

 १०-१५ मिनिटे नाष्ट्यासाठी खोपोलीत थांबायचे का लोणावळा हा सर्वस्वी चालक-वाहक काकांचा निर्णय असायचा. पण नाष्ट्यासाठी बस कुठेही थांबली तरी गरम- गरम वडा पाव वर आम्ही कधीच अन्याय होऊ दिला नाही 😃

बोर घाट , घाटांचा राजा. खोपोली कडून घाट चढण्याचा थरार काही वेगळाच. या सगळ्याचा आनंद घेत लोणावळा स्थानक. मग पुढे बस पुण्याकडे रवाना.

इथे और एक डुलकी तो मंगता है न बाबा! पुण्याबद्दलचे प्रेम/ आपुलकी का माहित नाही ओण देहू रोड / निगडी आलं की आपोआप जाग यायची ( कात्रज बायपास केंव्हाच बायपास केला आपण) . मग चिंचवड- पिंपरी- खडकी- शिवाजीनगर- डेक्कन- लकडी पूल- टिळक रोड - ते स्वारगेट. तासभर मस्त जायचा.

स्वारगेट ला मात्र 'लाल परी ' बराच वेळ थांबायची. याचे कारण चालक- वाहक इथे बदलायचे, बस सांगली फलाटावर लावण्यापूर्वी स्वारगेट आगारातून डिझेल भरुन यायची. सकाळी कंटक्टरने जे सांगीतलेले असायचे की तिकीट जपून ठेवा, पुण्यात चेक होईल हे इतके डोक्यात असायचे की नवीन कंडक्टर येऊन नवीन पॅसेंजरचे तिकीट काढून परत त्यांच्या ठिकाणी बसले तरी लक्ष सारे खिशातील तिकीटाकडे आणि कंडक्टर आपल्याला तिकीट दाखवा असे केंव्हा विचारतात याचकडे लागलेले असायचे.

दुपारी १:३० च्या सुमारास बस स्वारगेट हून सांगलीकडे निघते.
( काय हे एवढ्या वेळात बेलापूर हून निघून बायपास घेतले असते तर एव्हान सांगलीला पोचला असता की राव 😐)

सारसबागेतील गणपतीला उजवीकडे बघून एक नमस्कार आणि शंकर महाराजांच्या मठाकडे डावीकडे बघून नमस्कार करुन बस कात्रज घाटाकडे निघते. कात्रज बोगद्याच्या आधीच्या वळणावर दिसणा-या पुण्य नगरीचे शेवटचे दर्शन घेऊन बस कात्रजच्या बोगद्यात शिरते. 

पनवेलला घेतलेला पेपर शेजारचा प्रवासी वाचायला मागतो तेंव्हा लक्षात येते अरे आपण प्रवासात वाचायला पण घेतलयं मग शिरवळ स्थानकात उसाचा रस पिऊन हातातले मासिक वाचत, खंबाटगी घाटातील रुक्ष डोंगर बघत चहा प्यायला सातारा स्थानकात उतरायचं ( अरे, सातारा बायपास सोडला का आपण?  )

संपूर्ण मुंबई - सांगली प्रवासात कुठल्या टप्पात बसमधे जास्त गर्दी असेल तर ती सातारा- कराड. एकदम फूल्ल बस, उभा रहायला जागा नाही. कराड जवळ कोयनेचा पूल ओलांडला की मग सांगली जवळ आली असं वाटायचं.  मग पहिल्यांदाच हायवे पासून बस कराडला स्थानकात जाते आणि परत त्याचमार्गे परत येते हे आणि अर्धातास त्यात वाया जातो हे नको वाटायच. कारण एकच सांगलीची ओढ. 

पुढे मुख्य हायवे सोडून पेठ नाक्याला बस वळली की तोपर्यंत मन मात्र ४० किमी पुढे पोहोचलेले असायचे. इस्लामपूर, आष्टा हे थांबे मात्र घरी जाण्यापूर्वी वाटेत शेजा-यांकडे आधी डोकावल्यासारखे वाटायचे. त्यात एखादे अजोबा बस मधून उतरले असतील आणि त्यांच्या परत येण्यासाठी अख्खी बस खोळंबली असली तरी काही वाटायचे नाही.

१०- ११ तास प्रवास झाल्यावर शेवटच्या तासातला प्रवास मात्र संपता संपायचा नाही. मात्र तो क्षण हुरहुर लावायचा जेंव्हा पश्चिमेच्या मावळत्या सुर्याच्या साक्षीने  आयर्विन पुलावरुन, कृष्णा माईला वंदन करुन, डावीकडे श्री गणपतीचे दर्शन , तर उजवीकडचा विष्णू घाट डोळ्यात साठवून हरभट रोड, नगरपालिका, तरुण भारत करत लालपरी बरोबर सातच्या सुमारास सांगली स्थानकात स्थानापन्न व्हायची. मग न्यायला आलेल्या बाबांबरोबर पुढचा घरापर्यतचा प्रवास 🤗

मंडळी, आवडला का हा बायपास न घेता केलेला प्रवास

पण खरं सांगू, जीवनाच्या प्रवासात काही काही गोष्टी 'बायपास' केलेल्याच चांगल्या ना?

( प्रवासी)  अमोल 📝
२५/०५/२०२०

माझे अंगण


माझे आंगण...

काही दिवसापूर्वी एका राजकीय पक्षाने ' माझे आंगण, माझे, xxxx असा काहीतरी सोहळा केला.

अहं ! लेखनाचा हा विषय नाही. तुम्हाला माहितच आहे राजकीय गोष्टी, मुद्दे, प्रतिक्रिया यापांसून मी किती लांब असतो ते. परत परत मला सांगायला लावू नका☺.

आपण फक्त चांगल घ्यायचं

तर 'माझं अंगण ' हे  शब्द मला लेखनासाठी विषय सुचवून गेले. ज्योतिषा ने 'भविष्यकाळात' रमावे, लेखकाने मात्र वारंवार 'भूतकाळाच्या' अंगणात डोकावून 'वर्तमानातील' रसिकांना छान छान गोष्टींची आठवण करुन द्यावी या मताचा मी आहे त्यामुळे भूतकाळातील अंगणात माझ्या जरा जास्तच फे-या होतात. असो.
तर 'माझे अंगण' ऐकून

'अंगणी माझ्या मनाचे,मोर नाचू लागले' असं म्हणलं तर वावग ठरणार नाही.

साधारणपणे गावाकडे कुठले ही घर म्हणले की 'अंगण' हा त्याचा अविभाज्य घटक असतोच. अर्थात पुणे-मुंबई किंवा इतर महानगरात ही ज्यांचे स्वतंत्र बंगले आहेत त्यांच्याकडे 'अंगण' असतेच म्हणा. पण अपार्टमेंट मधे राहणाऱ्या आमच्यासारख्यांना सोसायटी समोरच्या ( असलीच तर )ओपन स्पेसला 'अंगण ' म्हणणे माझ्यातरी जिवावर येतं

म्हणून गावाकडचे घर , सभोवतालचे 'आंगण' हे मला विशेष वाटते. आता आंगण म्हणले की तिथे खेळलेले खेळ वगैरे ओघाने आलेच.

माहेरवाशीणींच्या अनेक गाण्यातून 'अंगण' दिसून येते
उदाहरण बघा ना
' ऐलमा पैलमा गणेश देवा' या हदग्याच्या  गाण्यातील अनेक कडव्यात 'अंगणात रंगली ग माहेरची गाणी' असा उल्लेख येतो.

तुळशीचे लग्न, घरातील मंगल कार्यानिमित्य घातलेला मांडव याने वेगळे वाटणारे आंगण अशी अंगणाची विविध रुपे आपण बघतो तरी दिवाळीत ते जरा जास्त खुलते ना? मुलांनी बनवलेले किल्ले, रांगोळ्या, रात्री लावलेल्या पणत्या आणि नातेवाईंकाच्या गप्पागोष्टीत रंगलेले अंगण

दिवाळी येणार,अंगण सजणार
आनंद फुलणार घरोघरी
आमच्या घरी अन तुमच्याघरी

हे ही एक गाणे

निळेसावळे ओले अंगण
तुझ्या नी माझ्या मनात श्रावण
रानोरानी, पानोपानी
भिरभिरती भिजलेली गाणी

अनेक कवितांधूनही 'अंगण' डोकावते:-

माझ्या ग अंगणात, थवे फुलपाखरांचे
गोल गोल रिंगणात,गाणे फिरते रंगाचे

फुलपाखरावरुन आठवलं मंडळी, अंगण म्हणले की त्याचा अविभाज्य भाग म्हणजे सभोवतालची बाग. त्या बागेत हौसेने लावलेली वृक्षवल्ली आणि त्यावर बागणारी छान छान फुलपाखरे.

'व्यक्ती तितक्या प्रकृती' असतार त्याचप्रमाणे प्रत्येक घराची एक खास बाग असते. इतर अनेक कलांसारखीच 'बागकाम' ही पण एक कला आहे आणि ती सहजासहजी कुणाला जमणारी नाही. त्याची ही आवड पाहिजे. पत्रिकेत चतुर्थ स्थानावरुन 'घराचा' योग पाहतात पण त्या चतुर्थ स्थानात शुक्र, चंद्र वगैरे असले की त्याच्या घरा भोवतीची बाग ही अतिशय सुरेख असणारच.

आता अपार्टमेंट मधे राहणारे आणि बागकामाची आवड असणारे नाइलाजाने आपल्या गॅलरीत, बाल्कनीत झाडे लावून आपली हौस भागवतात. मग तळ मजल्यावर राहणाऱ्या आमच्या सारख्याना वरुन टपक टपक गळणाऱ्या पाण्याने सकाळ /संध्याकाळ अभिषक होतो ही गोष्ट वेगळी 😃

आमच्या साखर कारखान्याच्या घरच्या अंगणात आम्ही बागकाम केले. आपुलकीने जी झाडे तरली ती तरली. हेच पलिकडे आमच्या निलेश च्या ( डोर्ले ग्रुप, अरिहंत फार्मा) घरची बाग मात्र अतीशय दृष्ट लागावी एवढी सुंदर. घराचे नाव पण किती समर्पक 'सावली' 🏡

अशी अनेक घरे ( यात तुमचे सध्याचे/ पुर्वीचे/ किंवा तुम्ही बागकाम केलेली)  तुम्हाला हा लेख वाचून आठवतील आणि तुमच्या अंगणात पडणा-या तुमच्या बागेतील अनेक टपो-या फुलांप्रमाणे तुमचे मन या आठवणीत परत तरतरीत व्हावे ही माफक इच्छा

आमच्या 'गायत्री ' बंगल्यावर
 दरवर्षी मे महिन्यात न चुकता फुलणारा ' मे फ्लाॅवर,

घराच्या गच्चीवर हौसे खातर बेळगाव जवळील खानापूर हून आणलेल्या ४०-५० वेगवेळ्या गुलाबाच्या ठेवलेल्या कुंड्या

गणपती च्या आधी 'गौरीच्या फुलांनी' सजणारी बाग

सदा फुलणारा 'मदनबाण'

आणि  साखर कारखाना चालू झाला की अंगण-घर- गॅल-या- गच्चीत पसरणारी 'काळी राख'

या आठवणी कायमच्या

लेखनाचा शेवट आवडत्या गाण्यातील या ओळीने

"हे विश्वाचे अंगण
आम्हा दिले आहे आंदण"

( अंगणातच जास्त रमणारा) अमोल 📝
२४/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

ता.क :- ब-याच ठिकाणी अंगण/ आंगण असे  दोन्ही उल्लेख आलेत. योग्य शब्द तुम्हीच समजून घ्या. भावना त्याच आहेत ☺

Saturday, May 23, 2020

लिहिण्यास कारण की.


(पत्र) लिहिण्यास कारण की...📝

महोदय,

आपणा सर्वांस अमोल केळकरचा नमस्कार 🙏🏻
खुपदिवसांनी पत्रासारखे काहीतरी लिहायचा प्रयत्न करतोय. यापूर्वी शेवटचे पत्र बहुतेक दहावीला मराठीच्या पेपरातच लिहिले होते. त्याआधी प्रत्यक्ष पत्र पोस्टकार्डावर किंवा अंतर्देशीय पत्रावर केंव्हा लिहिलेले हे आता आठवतही नाही.

नोकरी लागण्यासाठी अर्ज करण्यासाठी 'इमेल' ने आपले साम्राज्य पसरवून सोय केली होती. त्यानंतर मात्र 'बाॅर्डर' सिनेमातील 'संदेशे आते है' या गाण्याने पत्र आठवली

अगदी अलिकडे 'चला हवा येऊ द्या' मधून सागर कारंडे पत्र सादर करायचा ते आवडायला लागले.

मंडळी या लेखनाचा उद्देश मात्र अगदी वेगळा आहे बरं का. पत्र लेखनातील शेवटची ओळ साधारण कशी असते तर

कळावे लोभ असावा ही विनंती
आपला विश्वासू किंवा आपला  स्नेही अशी सर्वसाधारण पणे लिहायची पध्दत.  अगदी इंग्रजीत लिहिलेला अर्ज असेल किंवा आजकाल वेगाने होणारे संदेश प्रक्रियेतील इमेल असतील तर
Thanks & Regards
 किंवा
Your's Faithfully किंवा Your's Truly या वाक्यांनी आपण लिखाणाचा शेवट करुन आणि खाली आपले नाव / सही  करतो. माझ्यामते हे ब-यापैकी सगळ्यांना मान्य होईल.

मात्र आपले नाव लिहिण्याआधी एक विशेषण लिहायचा एक ट्रेंन्ड/ प्रकार गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य जगतात बघायला मिळतोय. याविषयी काही माहिती:-

गेले १०-१२ वर्ष सोशल मिडिया, वेगवेगळी मराठी संकेतस्थळे स्वतःचा ब्लाॅग/ अनुदिनी याद्वारे अनेकांनी विविध विषयावर उत्तमोत्तम साहित्य लिहिले

यात मला दोन व्यक्तींबद्दल लिहायचे आहे ज्यांनी आपल्या लेखनाचा शेवट 'आपला' किंवा 'आपला विश्वासू ' एवढाच न ठेवता ते लिहून खाली आपले नाव लिहिण्यापूर्वी कंसात एक विशेषण जे त्यांनी त्या लेखात लिहिलय त्याला सुयोग्य असेल असे लिहून पुढे आपले नाव ,अशी पध्दत सुरु केली.

ही पध्दत इतकी आवडली की अनेकांनी ( माझ्यासकट) त्या गोष्टीचे अनुकरण करण्यास सुरवात केली. माझ्या मते मराठी साहित्यातला हा एक वेगळा प्रकार यानिमित्ताने पुढे आला आहे.

त्या दोन व्यक्तींची नावे सांगतो
१) तात्या अभ्यंकर ( मिसळपाव या संकेतस्थळाचे मालक, एका अनुदिनीचे लेखक. दुर्दैवाने ते आज आपल्यात नाहीत)

२) धोंडोपंत आपटे  ( जेष्ठ ज्योतिषी अभ्यासक, अनेक संकेतस्थळांवर लेखन, "धोंडोपंत उवाच" या अनुदिनीत ज्योतिष विषयक लेखन)

मंडळी या दोघांपुर्वी कुणी अशा पद्धतीने लिहिले असेल तर मला कल्पना नाही. मी पहिल्यांदा असे लेखन या दोघांच्या लेखनातूनच पाहिले.

 तात्यांनी 'मिसळपाव' संकेतस्थळावर अनेक लेखांना प्रतिक्रिया देताना याचा खुबीने उपयोग केला आहे.

( मुळ लेखापेक्षा काही काही जणांच्या त्या लेखावर आलेल्या प्रतिक्रिया या अभ्यासपूर्ण किंवा छान असतात हे सोशल मिडीयावर फेर फटका मारताना दिसून येते. अगदी आजच्या व्हाटसप, फेसबुक जमान्यात ही केवळ यांची प्रतिक्रिया वाचायला मिळावी असे वाटायला लावणारे काहीजण आहेत. यात तात्या अभ्यंकर होतेच पण नव्याने ओळख झालेले 'मैफल' समुहातील 'ऋतुराज पत्की', कोल्हापूर यांचा ही मी समावेश करीन, याचबरोबर आमचे काही खास मित्र ही आहेतच.

आपल्या खास शैलीत प्रतिक्रिया  लिहिणा-यांबद्दल परत केंव्हातरी)

पंतांच्या लेखनाच्या शेवटी तुम्हाला मी वर लिहलय त्या पध्दतीची  अनेक उदाहरणे दिसतील. काही मोजकी इथे देतो

पंतांचा लेखातून संग्रहित :-

( साईभक्त) धोंडोपंत
( पामर)  धोंडोपंत
(स्वामीमय) धोंडोपंत
( सूक्षमदर्शी)  धोंडोपंत
( दु:खविलासी) धोंडोपंत
( साक्षीदार) धोंडोपंत
( मार्गदर्शक ) धोंडोपंत
( व-हाडी) धोंडोपंत
( शास्त्रीबुवा)  धोंडोपंत
( अानंदित) धोंडोपंत
( ज्योतिर्विद) धोंडोपंत

ही काही मोजकी उदाहरणे ☝🏼. प्रत्येक उदाहरण त्या त्या लेखाशी संबंधित.  तात्या अभ्यंकर होते, पंत असतील, आज अनेक जण आपल्या लेखनाचा शेवट आपल्या नावाआधी एक विशेषण लावून करत आहे.  अर्थात मी ही याला अपवाद कसा ठरेन?

क.लो.अ.ही.वि.

आपलाच
( अती टुकार)  अमोल 📝
२३/०५/२०२०
poetrymazi.blogspot.in

Wednesday, May 20, 2020

सेकंड इनिंग


सेकंड इनिंग 📝

तब्बल २ महिन्यानी आज आॅफीसला गेलो. अनामिक भीती सगळीकडेच जाणवत होती. पुढे काय याचा ताण स्पष्ट दिसत होता. अनिश्चितता जाणवत होती. पण कुठून तरी सुरवात ही होणे आवश्यक वाटत होते. अजून काही दिवस एक दिवसाआड जाणे होईल, कदाचित पुढील महिन्यापासून रोज जावे लागेल. पण पुढे येणारा काळ सर्वांची कसोटी घेणारा असणार यात शंका नाही.

कसोटी वरुन आठवले, कसोटी सामन्यात दोन डाव असतात. पहिल्या डावात शतकावर शतके काढणारा दुस-या डावात यशस्वी होतोच असं नाही. हे  साधारण पाहण्यातल सांगतोय.

पण काही काही खेळाडू / कलाकार केवळ
 दुस-या डावा मुळे प्रसिद्ध झालेत.
उदा. व्हि.व्हि एस लक्ष्मण. त्याच्या अनेक खेळीत दुसरा डाव जास्त रोहमर्षक ठरलाय.
रवी शास्त्री - प्रत्यक्ष क्रिकेट मधे मर्यादित यश मिळाले असताना समालोचक म्हणून दुसरी इनिंग जास्त यशस्वी ठरली.

अमिताभ बच्चन / सुनील गावसकर सारखी वय्यक्तिमत्व ही कुठल्याही इनिंग मधे यशस्वी ठरली असे म्हणता येईल.

मला तरी सध्या एवढेच आठवले. तुम्ही यात तुमच्या पहाण्यातील व्यक्तींची भर घालू शकता

बस ! या काही लोकांचा आदर्श पुढे ठेऊन आपलीही सेकंड इनिंग सुरु करायची आहे. मनाला सध्या जे अदृश्य कुलुप लागलय ( लाॅक) ते उघडायचे आणि पुढे जात रहायचं. या टप्प्यावर ( सेकंड इनिंग) थोडा वेगळा मार्ग / वेगळी आव्हाने स्विकारावे लागणार आहेत याची मानसिक तयारी ही करायचीच   आणि मनाला सारख सांगायचय,

रुक जाना नही , तू कही हारके... ✌🏻

अमोल

Tuesday, May 19, 2020

स्वप्ने


( गोड)  स्वप्ने

मंडळी सवयीने आपण 'गुड नाईट' अॅन्ड 'स्वीट ड्रीम्स' असे अनेकदा म्हणून त्यादिवसापुरता सोशल विराम घेतो. काल अचानक एका मित्राने याला पर्यायी शब्द   ' गोड स्वप्नात तुमची रात्र शुभ जावो ' असे म्हणावयास सुचवले.  खरंच किती छान पर्यायी मराठी शब्द ना हा? नक्कीच वापरण्यासारखा

खरं म्हणजे आजकाल स्वप्न ही रेड,आॅरेज, ग्रीन झोन ची पडत आहेत. अचानक मला मुंबईहून सांगलीला जायला परवानगी मिळालीय आणि मी सहकुटुंब पुण्यात बावधनला मित्राकडे जेवणासाठी थांबा घेऊन परत सांगली कडे मार्गस्थ झालो आहे, कुठेही वाटेत अडवणूक नाही, सांगलीत ही बायपास रोडने सरळ कारखान्यावर सुखरुप पोहोचलो असे ( गोड/ ग्रीन)  स्वप्न मला आजकाल वारंवार पडत आहे. अरे, का घाबरत अाहेस? तुझ्या गाडीचा नंबर ही MH 10 ने  सुरवात होणारा आहे, उठ, नीघ, आणि वेळेवर पोच, कुणी नाही अडवणार तूला असा दृष्टांत होऊन भल्या पहाटे जाग येत आहे . पहाटे पडलेली स्वप्ने खरी होतात या आशेवर सध्या आहे.

तसा ज्योतिष मार्गदर्शन करत असल्याने ब-याच वेळा आम्हाला काल अमुक एक स्वप्न पडलेले, ते चांगले का वाईट?  अशी विचारणा वारंवार होते. परवा कोल्हापूरातून एकाचा फोन आला.  ती व्यक्ती म्हणाली काल स्वप्नात भयंकर वीज चमकलेली ⚡बघीतली. घाबरलो मी. यंदा पण परत पूर येणार का? स्वप्नाचा काय अर्थ लावायचा? असे त्यांनी विचारले.

म्हणलं काका सध्या कुठला महिना चालू आहे?  मे महिना ना?  कोल्हापूरात मे महिन्यात गडगडाट / कडकडाटासह वळवाचा पाऊस पडतो ना. उघड्यावर असलेला शेतमाल सुरक्षित ठेवा. हेच तुमच्याही मनात आह जे तुम्हाला स्वप्नात दिसले. या स्पष्टीकरणावर त्यांचे समाधान झाले. 

ही एक गोष्ट जी या स्वप्नांबाबत म्हणली जाते की " मनी वसे ते स्वप्नी दिसे " ते पटते.
 ब-याचजणांना असा अनुभव ही आहे. शात्रीय माहीती सध्या विचारात घ्यायला नको कारण लेखनाचे हे प्रयोजन नाही ( ता.क: स्वप्न पडत असतील आणि त्याचा अर्थ काय हे जाणून घेण्यासाठी लेखनाच्या शेवटी दिलेल्या इमेलवर संपर्क करु शकता)

तर विषय भलताच दुसरी कडे गेला. मुळ विषय 'गोड स्वप्नांकडे ' परत येऊ. आणखी थोडा बदल करतोय गोड स्वप्नां एवजी 'स्वप्नांचा गोडवा' काय असतो आणि मराठी गाण्यात / कवितेत ही स्वप्ने मी कुठे पाहिली हे शोधण्याचा हा एक प्रयत्न

"स्वप्न" या विषयावर गाणे सांगा असे म्हणल्यावर अनेकजणांना गाणे आठवेल ते म्हणजे

गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा*
या गाण्याचे शेवटचे कडवे मला जास्त आवडते

नैराश्य कृष्णमेघी आशा कधी बुडावी
विरहात चिंब भिजूनी, प्रीती फुलोनी यावी
काट्याविना न हाती केंव्हा गुलाब यावा
*स्वप्नातल्या कळ्यांनो उमलू नकाच केंव्हा*
गोडी अपूर्णतेची लावील वेड जीवा

चला स्वप्नाच्या वाटेवर थोडा अजून फेरफटका मारु या
'स्वप्न' कशी असावीत याचे छान वर्णन या गाण्यात आहे बघा

कट्यार चिमणी कटिला साजे, जिरेटोप तो सान विराजे
लुटुलुटु येता हे *शिवराजे*, शिवनेरी वर वत्सलतेचे
निशाण भगवे फडफडते!  🚩

चित्तोडगडचा शूर इमानी, प्रताप राणा बाल होऊनी
मिठी मारता दोन्ही करांनी,अभिमानाचे पंख लावुनी
काळीज माझे नभी उडते!
*स्वप्न उद्याचे आज पडते*
*चित्र चिमणे* *गोजीरवाणे,नयनापुढती दुडदुडते*

एका आईने स्वप्नात आपल्या बाळाला असे पाहिले ☝🏼

पुढचचे गाणे हे स्वप्नातल्या राजकुमारासाठी असले तरी तो राजकुमार प्रत्यक्ष श्रावण महिना असावा असं मला राहून राहून वाटत, बघा

सुंदर आता झाली धरती, सुंदर नभ हे वरती
वैराणावर उधळीत आला,श्रावण सुंदर मोती
मनात माझ्या मोरपीसांचा फुलला रंग पिसारा
*स्वप्ननगरच्या सुंदर माझ्या,राजस राजकुमारा*

हे ही एक छान गाणे  स्वप्नावरच

स्वप्नात पाहिले जे ते रुप हेच होते
हे स्वप्न मी म्हणावे की स्वप्न तेच होते

तो रंग केवड्याचा,ते ओठ अमृताचे
त्या यौवनात होते प्रतिबिंब चांदण्याचे
तारे नभात होते,नयनात दीप होते
*स्वप्नात पाहिले जे ते रुप हेच होते*

खरंच एकदा निद्रादेवीच्या अधीन झाल्यावर ही स्वप्ने तुम्हाला कधी भेटायला येतील हे सांगता येत नाही. पण काहीजणांना स्वप्ने बघायचा ही छंद लागतो मग त्यांची अवस्था या गाण्यासारखी होते:-

'स्वप्नात रंगले मी,चित्रात दंगले मी
सत्यातल्या जगी या झोपेत जागले मी'

मंडळी कंटाळलात ना वाचून? हं
काही इतर गाण्याचा फक्त उल्लेख करतो
१)
स्वप्ने मनातली का वा-यावरी विरावी
का प्रितीच्याच दैवी ताटातुटी असावी
२) स्वप्नावरी स्वप्न पडे
३) स्वप्नांजरी ते भेटून गेले

जगदीश खेबुडकरांच्या या गाण्याने 'स्वप्न पुराण' आवरते घेतो.

मी जीवन गाणे गावे, तू स्वरात चींब भिजावे
दोघांनी हरवून जावे, ही किमया नकळत करशील का? ....

पुढच्या ओळी. ...🤔

बघा आज रात्री  स्वप्नात येतात का त्या?  आल्या तर या लेखाचे सार्थक झाले असे म्हणेन 😊

आणि हो आज रात्री सगळ्यांना

' गोड स्वप्नात तुमची रात्र शुभ जावो '  अशा शुभेच्छा द्यायला विसरू नका ☺


📝अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
१९/०५/२०२०

Monday, May 18, 2020

आमचे 'बुद्धी चे बळ'


शालेज जीवनातील 'मे' महिन्याची सुट्टी फार महत्वाची असते. अनेकजण सहमत होतील. पाठ्यपुस्तका बाहेरील शिक्षण / अवांतर शिक्षण घेण्याची, एखादा छंद/ कला, एखादी नवीन गोष्ट शिकण्याची ती नामी संधी असायची.  आमच्या लहानपणी 'व्यक्तीमत्व विकास शिबीरे' काही ठिकाणी सुरु झाली होती. काहीजण स्वतंत्रपणे पोहणे, निवासी शिबीर, अनिवासी शिबीर ( इथे अनेकांना 'स्वामी' सर आठवत असतील ) , गाण्याचा क्लास, क्रिकेट कोचिंग,  तबला/ पेटी क्लास,  मल्लखांब, योगासन वर्ग इत्यादी अनेक गोष्टी करत. यातील ब-यापैकी गोष्टी मी ही केल्यात. साधारण महिन्याभरातील सुट्टीत १५ दिवस पुणे-मुंबई फिरणे आणि १५ दिवस हे सगळे असे अंदाजे गणीत असायचे.
याचसुमारास काही स्पर्धा सांगली परिसरात व्हायच्या. यात लक्षात राहण्यासारखी स्पर्धा होती ती 'नूतन बुध्दीबळ' संस्थे तर्फे घेतली जाणारी स्पर्धा. ३-४ वर्षे या स्पर्धेत अगदी उत्साहाने भाग घेतला ( त्या आधी फक्त शाळेतल्या बुध्दीबळ स्पर्धेतील विजयाचा अनुभव होता .वासरात लंगडी गाय शहाणी असेच जणू).

स्पर्धेचा खरा कस इथे लागला. संपूर्ण देशातून आलेले खेळाडू,  अनेक अनुभवी स्पर्धक , बाजूला घड्याळ ठेवून ,डाव कागदावर लिहिण्याचे कसब, टच टू मूव्ह चा नियम, धांदरटपणाने आपली खेळी करुन झाल्यावर घड्याळाचे बटण न दाबता आधी बटण दाबून मग खेळी केल्यावर पडसलगीकर सरांच्या खालेल्या शिव्या. मजा तेंव्हा यायची जेंव्हा दोन-चार फे-यात अमुक खेळाडू आघाडीवर असं लोकल पेपरात कुठेतरी अगदी लहान नाव यायच तेंव्हा. आज रविवारच्या पुरवणीत मोठाले लेख नावासकट आले तरी त्यावेळी पेपरात नाव आलेल्याचे मोल हे केवळ अमोल होते. ती मजा आता नाही.

पेपरात नाव यायला सुरवात झाली की तिकडे स्पर्धेत हळूहळू आमची घसरगुंडी व्हायला एकच गाठ पडायची कारण चार -पाच फे-या नंतर जे खरोखरच उत्तम खेळाडू होते त्यांच्याशी खेळावे लागायचे आणि तिथे काही डाळ शिजायची नाही.

नूतन बुध्दीबळ स्पर्धेत विजयी कधीच झालो नाही पण काही उत्तम खेळाडूञ बरोबर खेळायला मिळाले. एक दोन लढती प्रतिष्ठित खेळाडूंबरोबर बरोबरीने सोडवल्या. एक लढत तर स्वतः पडसलगीकर सरांनी तिथे थांबून पाहिली आणि बरोबरीत सोडवल्यावर नाराज झाले. कारण ती लढत मी सहज जिंकू शकलो असतो असं त्यांनी नंतर परत डाव मांडून दाखवले.

बुध्दीबळाचे पितामह पडसलगीकर सरांचे हे आयुष्यभरासाठी मिळालेले  आशीर्वाद आहेत असे मी समजतो. कारण त्यांच्याकडे शिकायला वगैरे कधी जात नव्हतो. बुध्दिबळ हा फक्त छंद म्हणून पहायचो तेंव्हा.
पडसलगीकरां सारखेच बुध्दीबळातले एक चाणक्य म्हणजे 'म्हैसकर' सर होते. मला एकदा आठवतय आमच्या शाळेत ते एकदा एकावेळी १५-२० जणांबरोबर खेळले होते. त्यावेळी सगळ्यात शेवटी मी उरलो होतो. आणि त्यांच्याशी खेळलेला डाव बरोबरीत सोडवला होता. बुध्दीबळाचा हा छंद पुढे अगदी काॅलेजला ( ११-१२ वी)  असताना ही विजयी करुन गेला.

आता या लेखाचा शेवट या खेळातील एका छोट्याशा तत्वज्ञानाने. अनेक जणांनी हा खेळ खेळला असेल, खेळत असतील. अनेक सोंगट्या,  त्यांचा मार्ग, चेक, कॅसलीन, डाव सुरु करण्याच्या पध्दतीही अवगत असतील. केवळ पटावरच नव्हे तर प्रत्यक्ष जीवनातही आपण अनेक खेळी  दुस-याला पेचात पकडण्यासाठी करत असतो. समोरुन आलेल्या चालींवर आपली खेळी करतो ( राजकारणी तर यात भलतेच हुषार. पण सध्या तो मुद्दा नको)

अगदी पटाप्रमाणे घमासान युध्द करतो, अनेक मोहरे ( मुद्दे?) धारातीर्थी पडतात. स्वत:च्या राजाला वाचवण्यासाठी सगळ्यात महत्वाचा मोहरा 'वझीर' ही कामी येतो. कधी दोघांना एकमेकांचे वझीर मारावे लागतात अशावेळी

पटावर उरलेले, जे फक्त सुरवातीलाच  दोन घर ओलाडता येणारे आणि नंतर फक्त एक एक घर पुढे जाणारे  खेळातील सगळ्यात हलके समजले जाणारे 'प्यादं' हे जर प्रतिस्पर्धीच्या बाजूच्या शेवटच्या घरापर्यंत पोहोचले तर परत 'वझीर ' बनू शकते. ही किमया फक्त 'प्यादं ' करु शकते बाकी कुणी नाही

संतांनी ही सांगून ठेवलयं

महापूरे झाडे जाती, तिथं लव्हाळी वाचती 🌿🙏🏻

📝अमोल
१८/०५/२०२०

Sunday, May 17, 2020

माझा पहिला राजधानी प्रवास


आज १७ मे. मुंबई - दिल्ली राजधानीचा वाढदिवस. आज ती ४८ वर्षाची झाली. या संबंधित एक छान लेख आमचे जेष्ठ मित्र रामभाऊ यांनी फेसबुकवर लिहिलाय त्याची ही लिंक 👇🏻
इच्छूकानी अवश्य वाचावा

https://www.facebook.com/625832933/posts/10157432594367934/

यानिमित्याने आमचा पहिला राजधानीचा प्रवास आठवला. खरं म्हणजे सांगलीत राहणाऱ्या आमच्यासाठी 'महालक्ष्मी एक्सप्रेस' हीच राजधानी असायची. पण मुंबईत सुट्टीला गेलो की प्रत्यक्षातली राजधानी अधूनमधून दिसायची. मालाडला माझी आत्या होती त्यामुळे तिच्याकडे ब-याचदा रहायला जायचो. प्रत्येक सिझनला एकदा तरी ही दर्शन द्यायचीच. सर्व डबे वातानुकूलित,  इंजीनाची रंगसंगती ही डब्यासारखीच आणी इतर गाड्यांपेक्षा-( जणू खळ खट्याक) वेगाने जाणारी म्हणून हीचे कौतुक वाटायचे. आपल्या नशिबात या गाडीत बसणे आहे की नाही असे मनात येऊन जायचे.
सुदैवाने मुंबईतच नोकरीला लागल्यावर ही संधी मिळाली. साधारण २००३ साली. मात्र हा प्रवास संपूर्ण नव्हता म्हणजे मुंबई -दिल्ली किंवा दिल्ली - मुंबई ही नव्हता. तर 'कोटा' ते मुंबई असा उलटा प्रवास केला. कोट्याला दिल्लीहून निघालेली राजधानी रात्री ९:३० च्या सुमारास यायची नंतर फक्त पहाटे बडोदा स्टाॅप आणि नंतर थेट ८-८:३० पर्यत मुंबई सेंट्रल. आता सध्या राजधानीला अनेक थांबे दिलेत मात्र त्यावेळी फक्त एवढेच असायचे.
तर कोटा शहरापासून ५-६ तास लांब असणाऱ्या श्री  गंगानगर जिल्ह्यातील एका पाॅवर प्लॅनट्चे टेंडर सबमीट करण्यासाठी सकाळी लवकर हाॅटेल सोडले. आज आयुष्यातील पहिला राजधानीचा प्रवास करायला मिळणार त्यासाठी वेळेवर परत यायचे हेच डोक्यात होते. कोटा हे मधले स्टेशन होते आणि राजधानी साठी आरक्षण  'कोटा' ही फक्त ३-४ माणसांचा होता. त्यात माझे तिकीट वेटींग १ का २ होते.  तिकीट कन्फर्म होणार की नाही याची धाकधूक होतीच. आधी येऊन गेलेल्या मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह ने दिलेल्या सल्ल्यानुसार तिकीट + काही पैसे हाॅटेल मालकाला दिले. त्याने तिकीट 'कन्फर्म हो गा, चिंता मत करो ' असे शाश्वत केले.

ठरल्याप्रमाणे प्रवास, मिटींग, कामे , आणि टेंडर सब्मीशन करुन परतीच्या प्रवासास लागलो. तिकीट कन्फर्म झाले की नाही हे हाॅटेल मधे पोहोचल्यावरच कळणार होते. मोबाईल नसण्याचे रम्य दिवस होते ते. परतीची बस पॅसेंजर बसच होती. मजल दलमजल करत अंतर कापत होती.  रात्री साधारण ८ च्या सुमारास ' कोटा ' पासून ३०-४० किमी अंतरावर एका घाटात बसला अचानक अपघात झाला. सुदैवाने ड्रायव्हर ने बस घाटातील डोंगरावर धडकवली ( म्हणून आज तुम्ही हा लेख वाचत तरी आहात). समोरच्या सिटवर दण्णदिशी आदळलो.हनवटीला लागलेलं कळलं. बसमधले लाईट गेले .पुढेच असल्याने बसमधून उतरणाऱ्या पहिल्या चार पाच प्रवाश्यांच्यात मी होतो.

दैव बलवत्तर म्हणायला पाहिजे की अपघात फार मोठा नव्हता. ड्रायव्हरचा दिवसभर उपवास झाल्याने त्याला चक्कर वगैरे आली म्हणून अपघात झाला असे ऐकले. सुदैवाने मागून आलेल्या एका कारवाल्याने माझ्यासकट आणखी एक दोघांना कोटा शहरापर्यंत लिफ्ट दिली.

हाॅटेल मालकाने तिकीट कन्फर्म झाल्याचे सांगितले , कोच बर्थ फलाटावर जाऊन तिथे आरक्षण चार्टवर बघायला सांगितले आणि आमचा राजधानीच्या पहिल्या प्रवासाचा मार्ग सुकर झाला.

फलाटावर गेल्यावर कोच, सिट नंबर कळला. साईड अप्पर माझ्यासाठी पुरेसा होता. १५-२० मिनिटे गाडी उशीरा आली. जागेवर म्हणजे साईड अप्पर वर जाऊन बसलो  कारण खालची व्यक्ती झोपल्याने थोडावेळ बसून प्रवासाची मजा घ्यायची इच्छा काही पूर्ण होऊ शकली नाही.
कोच असिस्टंट ने जेवण, फ्रुटी का काय दिले. याक्षणी भूकेची जाणीव झाली. मस्त पॅकिंग असलेले ते जेवण ब-यापैकी धांदरटपणा करुन उघडले. पहिला घास घ्यायला तोंड उघणार तोच...

तोच काय. आत्ता कुठं ध्यानात आलं ,जबडा त्या अपघाताने सुजला होता आणि 'आ' करायचे नाव घेत नव्हता. परोठा चावून खायचा असल्याने ते शक्य झाले नाही. भाताची  चार शिते कशीबशी डाळीत भिजवून खाल्ली. स्टाॅचा जबड्याशी संबंध न आणता फ्रुटी पिऊन निद्रादेवीच्या आधीन झालो.

मात्र यानंतरच्या अनेक राजधानी चे प्रवास प्रत्येकवेळी या पहिल्या प्रवासाची आठवण काढत अगदी मस्तच संपन्न् झाले.

( 🚊प्रेमी ) अमोल
१७/०५/२०२०

Wednesday, May 13, 2020

या भवनातील गीत .


*१३/५/२०२०*
(या भवनातील गीत ....🏡 )


मंडळी, प्रत्येक वर्षी येणा-या काही तारखा या आपल्यासाठी विशेष असतातच जसे आपला वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस, मुलांचे वाढदिवस आणि अशाच काही  इतर तारखा . यंदाच्या २०२० वर्षातील  १३ मे या तारखेची मात्र मी अगदी आतुरतेने वाट पाहत होतो जी अर्थातच आज आहे.

नाही नाही ' दिन विशेष ' वगैरे पाहू नका त्यात काही मिळणार नाही
पण १३/५/२०२० शी आमचे ( केळकर परिवार , माधवनगर ) इतके ऋणानुबंध होते की ही आमच्या सर्वाचीच ' मर्मबंधातील ठेव आहे'

साधारण १९३०/१९४० - ते १९९०  अशी किमान ५० - ६०  वर्ष आमच्या केळकर कुटूबियांचा पत्ता असा होता

*१३५ गुरुवार पेठ , माधवनगर ( जिल्हा सांगली ),फोन नंबर २०२०* सांगली जिल्ह्याची जी काही फोन डिरेक्टरी निघायची त्यात काकांच्या नावासमोर असे लिहिलेले असायचे ☎

माधवनगर कॉटन मिलचे मॅनेजर श्री गंगाधर नारायण केळकर म्हणजे माझे सख्खे काका अर्थात आम्ही सगळे त्यांना दादा म्हणायचो.



त्यांना  काॅटन मिल मध्ये लागल्यावर  रहायला मिळालेली जागा म्हणजे १३५ गुरुवार पेठ .
आजच्या भाषेत कंपनी काॅर्टर्स.

या घराबद्दल तर जेवढं लिहावं तेवढं थोडंच आहे.  ही जागा  म्हणजे प्रशस्त कौलारू बंगला प्रशस्त खोल्या, मुंबईतील साधारण १का मोठ्या खोलीएवढे फक्त देवघर, प्रशस्त माडी. अंगण, माजघर,पडवी, मागच्या बाजूला विहीर, पुढच्या बाजूला हौद, तुळशी कट्टा, पेरु, सिताफळ यांची भोवताली झाडी, घराच्या वरती लिहिलेले ॐ आणि प्रवेशद्वारा जवळ असलेले
पांढ-या चाफ्याचे झाड.🌱

असे हे घर माझ्यासाठी 'नंदनवन' ठरले नसते तर नवल. ' घर असावे घरा सारखे नकोत नुसत्या भिंती' हे काव्य इथे अनुभवले. केळकरांचा मोठ्ठा परिवार, एकत्र कुटुंब, वेगवेगळ्या कामानिमित्त सतत येणारे नातेवाईक - परिचीत, यामुळे  अर्थातच केळकर परिवारासाठी हे गोकुळच होते.  सर्वांचे आदरातिथ्य करणारी काकू,काका आणि वयाने मोठे असणारे माझे चुलत बहिण भाऊ
यांच्यासह 'बालपणीचा काळ सुखाचा' हे शब्दश: अनुभवलं कारण घरातील शेंडेफळ मीच होतो.
संध्याकाळी दिवे लागणीला काका सर्व स्तोत्रे म्हणून घ्यायचे. स्वतः ते अनेक वर्ष आसनं करायचे. आम्हाला करायला लावायचे. दर महिन्याला पोर्णीमेच्या आदल्या दिवशी पंपंम गाडीतून 🚗 न चुकता नरसोबावाडीला जायला मिळायचे. वयाच्या १-२ वर्षापासून ते काका निवृत्त होईपर्यंत / मी सांगलीत असे पर्यत न चुकता वाडीला गेलो आहे.
 त्यावेळी गाडीतून जायची जी मजा होती ती आता स्वतः ची गाडी असताना ही नाही. त्यावेळी फिरायला जाणे एवढच ध्येय होते तरी धार्मिक तेचे बीज माझ्यात नकळत काका- काकूं मुळे रुजले गेले यात शंकाच नाही.
उन्हाळ्याच्या सुट्टीत पोहणे, दिवाळीत किल्ला बनवायला मोठ्या भावाने शिकवले. संघ शाखेचा जो काही अनुभव मिळाला तो ही याच घरा जवळ असणाऱ्या आरोग्य केंद्रातून.

थोडक्यात अनेक संस्कारांचे 'बाळकडू' या वास्तूत मिळाले. देव दिवाळी ( देवांचे विमान यायची वाट बघणे हा मजेशीर कार्यक्रम) , ललिता पंचमी, बोडण, सत्यनारायण, हदगा, मंगळागौर, हळदी-कुंकू, डोहाळजेवण, बारसं, केळवणं, लग्न- कार्यानिमित्यचे ग्रहमक, पूजा असे सर्व सोहळे एन्जॉय केले. लहानपणी हे बायकांचे कार्यक्रम हे पुरुषांचे असा भेदभाव कधीच मानला नाही.

आमचा चुलत भाऊ ( माधव भाऊ) याच्या लग्नाला पुण्याला जाण्यासाठी केलेली 'प्रासंगिक करार' लालपरी जेंव्हा १३५ गुरुवार पेठ माधवनगर समोर उभी राहिली होती तेंव्हा काय आनंद झालेला सांगू
अमर्याद आठवणी आहेत. थोडक्यात लिहायचा प्रयत्न केलाय.

  १३५ बद्दल झालं आता थोडं २०२० बद्दल

 काका कंपनीचे मॅनेजर असल्याने त्यावेळची सहजासहजी न आढळणारी गोष्ट म्हणजे  लँडलाईन फोन घरी होता.जुन्या  लँडलाईन ची मजा / अनुभव अनेकानी  घेतला असेलच यात शंका नाही . ७/८/९/० नंबर फोन लावताना आले तर लागणारा वेळ, फोनची टिपिकल रिंग, शेजा-यांना फोन आला तर बोलवायला जाणे, ट्रंक काॅल बुक करणे, फोन डेड झाल्यावर करावे लागणारे उपद्व्याप अनेक गोष्टी आहेत.

या वास्तूत घडलेल्या अनेक चांगल्या गोष्टी/ नियतीने समोर ठेवलेल्या ब-या वाईट घटनांना हा फोन साक्षी होता.

अशी ही १३/५/२०२० ची छोटी गोष्ट

केळकर परिवारासाठी अभिमानास्पद. या देव घरातील 'देव' माणूस म्हणजे आमचे काका आॅक्टो १९ मधे वार्धक्याने 'देवा'घरी गेले ते आम्हाला समृद्ध करुन

हा लेख त्यांना समर्पित 🙏🏻

त्यांचे संस्कार,आठवणी आणि नातू शेठनी दिलेली आणि अनेक वर्ष या घरात विराजमान असलेली श्री गुरुदेव दत्ताची मूर्ती कायम सोबत राहील.

अमोल केळकर 📝

#मर्म_बंधातली_ठेव_ही
#१३५ गुरुवार पेठ माधवनगर
#फोन नं २०२०
Related Posts Plugin for WordPress, Blogger...