नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, August 31, 2012

सूरक्षेत्र की कुरुक्षेत्र ?




अतिथी देवो भवः चा नारा    !
भिनलाय आमच्या रक्तात     !
म्हणूनच' कसाब ' खातोय     !
मटण - बिर्याणी आरामात     !

होऊन जाऊ दे कुरुक्षेत्र      !

सूरक्षेत्राचा उडू दे  फडशा      !
हे ' करून दाखवण्यासाठी'    !
तुम्हीच फक्त आमची ' आशा '  !!

अमोल केळकर
१ सप्टेंबर.२०१२


Thursday, August 30, 2012

कोळसा




घडला  नवीन घोटाळा तर
काय फरक पडतो फारसा ?
नेत्यांच्या नितिमत्तेचाच
पुरता झालाय कोळसा !

कोसळू नका तुम्ही असे

घ्या  एकच नवा वसा
तू बरा तुझे काम बरे
सुखाने जग माणसा !!



अमोल केळकर
ऑगस्ट ३०, २०१२

Thursday, August 23, 2012

लग्नाची गोष्ट




गोष्ट संपली लग्नाची
नांदा आता सौख्य भरे.
सासू सून मालिकेला
दिवस येतील परत बरे

Friday, August 17, 2012

पैशाचा पाऊस




कृत्रीम पावसाच्या थेंबाने
दरवळेल का  तोच सुवास
याच विचारात अडलाय
मोसमी ढगांचा प्रवास

खरा असो वा असो खोटा
पैशाचाच पडतोय पाऊस
पंधरा दिवस तरी अजून
छत्रीशिवाय नको जाऊस

अमोल केळकर
१८ ऑगस्ट २०१२

Saturday, August 11, 2012

वाद


  नियमांच्या बंधनातून
  मोकळे कर शब्दांना
  मग  येईल मजा
  वादही थोडा करताना

अमोल केळकर
११ ऑगस्ट २०१२

Thursday, August 9, 2012

जया अंगी मोठेपण ! तया यातना कठीण !


जया अंगी मोठेपण ! तया यातना कठीण !

' जया ' अंगी दिलगिरी'
तोच संसदेचा
' अधिकारी ' !

.
.
.
.
जया अंगी नाना कळा
तया पासून दूर पळा !
 
 

Wednesday, August 8, 2012

मोबाईल - जिणे




अवघड आहे सगळंच
शिवाय मोबाईल वापरणे
काही काळाने परत
तीच रिंगटोण वाजवणे

शब्द - वेडा




एकदा तो शब्दच
मुद्दाम बसला अडून
तरीही आला सावरायला
चार ओळीं बनवून

Monday, August 6, 2012

मंगळ - सूत्र



' क्युरॅसिटी '  ने  घेतली झेप
' मंगळही '  झाले ठेंगंणे
तरीही आमचे चालू
त्याला  सुत्रामधे बांधणे  !!

अमोल केळकर
७ ऑगस्ट २०१२




Wednesday, August 1, 2012

वाघ्या




पुतळा हटला दादोजींचा
एक्झीट  झाली ' वाघ्याची '
हेच  वाचू  परत जर
घेतली भुमिका बघ्याची  !


राजकारणातील कुत्र्यांनीच
वाघ्याला  हटवले
नासलेल्या इमानदारीचे
दर्शन जगास घडवले

अमोल केळकर
२ ऑगस्ट २०१२


Related Posts Plugin for WordPress, Blogger...