नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, April 4, 2024

राजकीय_टवाळखोरी


 बहिणीने बांधली राखी

तरी भावाला नाही दया...

'भावनेची' ओवाळणी 'गेली'

आता रडत बसलीय बया.


#राजकीय_टवाळखोरी 📝

#पापमोचनी एकादशी 

५/४/२४


( कुठे फेडाल ही पापे)

Tuesday, April 2, 2024

तिढा कळेना, तिढा मिटेना


 सध्याच्या एकंदर  महाराष्ट्रातील राजकीय परिस्थितीला समर्पित:-


* मनोरंजन हा हेतू 


( मुळ गाणे येईल लक्षात)


तिढा कळेना, तिढा मिटेना

तिढा खंत करी काही केल्या सुटेना !


गेले 'वर्षाच्या' बनी

चालली नेत्यांची वाणी

"जिंकू पायात पाय अडकवून रे"

गेले 'सागर' किनारी

गंध पोचला राजधानी

शत्रूसंग गळाला आली 'सिट' रे !


चल ये रे, ये रे गड्या

नाचु उडू घालू फुगड्या

खेळू 'इडी' 'झिम्मा झिम्' हीच आपली थीम्

 आ sssss आ ass आ 🎼


तिढा कळेना, तिढा मिटेना

तिढा खंत करी काही केल्या सुटेना !


महा-राष्ट्राचे आंगण

आम्ही करु भांडण

जुने उकरु  आपण सारे 'वाद'रे

'जन' दुर्लक्षित 'किडे'

यांची धाव व्हाटस्पकडे

आपण करु 'शुध्द' लूट-मार रे !


'तिढा' गाठी आला सुटून

नाव आले, यादीत छापून

कोण मी?  - पक्ष?  'आया' की 'गया' राम रे ? ?


#राजकीय_टवाळखोरी 📝

अमोल केळकर,बेलापूर 

०३/०४/२४

फाल्गुन.कृष्ण नवमी,

Friday, March 22, 2024

#माझी_टवाळखोरी 📝


 


Thursday, February 22, 2024

एक तुतारी द्या मज आणुनि


 कवी केशवसुत यांची मनोमन माफी मागून 🙏

( * मनोरंजन हा हेतू )


एक तुतारी द्या मज आणुनि

भिजवेन ती ही  स्वबळाने

भेदुनि टाकिन सगळी गगनें

दीर्ध जिच्या त्या किंकाळीने

( *काका मला वाचवा !* )

अशी तुतारी द्या मजलागुनी


निवडणुकीच्या गणितातले

सूत्र प्रमेय जे आजवरी

होतील ते वाचाल सत्वरी

फुंक मारीता जिला जबरी

कोण तुतारी ती मज देईल?


युती, महायुती यांची भेसूर

संताने राक्षसी तुम्हाला

फाडूनी खाती ही हतवेला

जल्शाची का? पुसा मनाला!

तुतारीने ह्या सावध व्हा तर!


चमत्कार! ते ई.डी पाठवूनी

सुंदर, सोज्वळ गोड मोठे

अलिकडले ते सगळे खोटे

म्हणती धरुनी ढेरी पोटे

धिक्कार अशा मूर्खांलागुनी


जुने जाऊ द्या मरणालागुनी

जाळुनी किंवा पुरुनी टाका

"सडत जाऊ दे घडीचा काटा"

सावध!ऐका पुढल्या हाका

फायद्यास चला फायदा भिडवूनी


"लोकसभा" हा विशाल भूधर

'विधान' सभा ही तयात शोधा

निजनामे त्यावरती नोंदा

बसुनी का वाढविता मेदा?

विक्रम काही करा, चला तर!


" एक तुतारी द्या मज आणुनि "


#माझी_टवाळखोरी 📝 *

२३/०२/२४

Sunday, January 21, 2024

ड्रीम रन


 #हर_🧡_मुंबई 

#पळतीय_मुंबई 🏃🏻‍♂️



वर्षातले किमान ३०० दिवस तरी सामान्य मुंबईकर सकाळ - संध्याकाळ पळतच असतो. 

*On Your Mark*

 ( घरातून निघताना)

*Get Set* 

( जवळच्या स्थानकापर्यंतचा प्रवास)

*Go*

( फलाटावर येणारी नेहमीची लोकल पकडून कामाच्या ठिकाणी वेळेत पोहोचणे)


प्रत्येक जण या प्रोसेस मधूनच जातो. फक्त कुणाची Get,set, go ची  वेळ ६:१७ कुणाची ७:२८, तर कुणाची ८:०३ इतकाच काय तो फरक


परतीचा प्रवास ही असाच ठरलेला, वेगवेगळ्या वेळेत घडणारा


आणि हे सगळं कशासाठी ? 

" अनंत स्वप्नपुर्तीसाठी "

मुंबई पळते, धावते,  अडखळते, धडपडते पण अगदी अपवादानेच बंद राहते, ती ही अगदी क्षणभरच.


समाजा बद्दल कृतज्ञता म्हणून तसेच रोजच्या 'रन' मधून विरंगुळा आणि मुंबई बद्दलचा जिव्हाळा, तमाम मुंबई-नवी मुंबई- कल्याण- ठाणे, पनवेल- वसई-विरारपर्यतच्या ( महामुंबई) सर्वांना आज वर्षातून एकदा एकत्र आणतो ते या


"ड्रीम रन "साठी 🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️

अर्थात मुंबई मॅरेथाॅनच्या निमित्याने 


एकदम साजेसे नाव. कोण म्हणतं नावात काय आहे?


५९,००० नोंदणी

 त्यातील किमान ५०-५५ हजारजण तरी नक्कीच पळतायत. 

रोज वेगवेगळ्या लोकलमधून येणारे आँफीस सहकारी आज एकत्र गप्पा- गोष्टी, हास्य- विनोद,अन् नेहमीच्या ठिकाणी गाॅसिपींग न करता मरीन ड्राईव्हर समु्द्राला साक्षी ठेऊन गाॅसिपींग करत चाललेत ( sorry पळतायत 😬)

हक्काची सुट्टी असून ही आज १ दिवस सर्वजण जमलेत ते मुंबईवरील प्रेमाखातर. हे ही एक #मुंबई _स्पिरीट


आणि हो मुंबईकरांसाठी डिजिटचे महत्व किती असते हे वेगळं सांगायला नको. लोकलच्या वेळापत्रका प्रमाणेच ही ड्रिम रन पण ५.९ किमी बरं का!  ( ६ किमी नाही) 


मरीन ड्राईव्ह तर नुसती जत्रा. एरवी याच रोडवर चारचाकी गाड्यांच्या पुढे जाण्यासाठी जी कसरत करावी लागायची तीच आज एकमेकांना ओलांडून पुढे जाताना माणसांना करावी लागत होती.


या मॅरेथाॅनचे खास निमंत्रित मात्र अगदी अगदी थोडावेळ का होईना हजेरी लावून गेले.  तशीही त्यांना मुंबई फारशी आवडतच नाही म्हणा!


कोण काय विचारताय? थंडी/ गारवा ओ 😁


असो, यानिमित्याने तमाम मुंबईकरांना एक प्रेमळ सल्ला:-


*पळणे इथल्या जगण्याचे,तत्व मनी तू जाण!*

 *ही एकची गोष्ट मनी वसो, जोवरी देही प्राण!*


आणखी एक टिप: ज्यांना पुढल्या वेळेला पहिल्यांदाच ड्रीम रन मधे भाग घ्यायचा आहे त्यांनी यंदाच्या वर्षी लालबागच्या राजाच्या दर्शन रांगेत उभे राहून सराव करावा. Starting point येईपर्यंत रांगेतच खुप वेळ जातो.


🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️🏃🏻‍♂️

          🏃🏼‍♀️🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️  

                          🏃🏻‍♂️🏃🏼‍♀️


अमोल केळकर ( नवी मुंबई)

२१/०१/२०२४ 📝


#मुंबई_मॅरेथाॅन #Mumbai_Marathon 

#ड्रीम_रन #Dream_Run 

#टीम_मुकंद #Team_Mukand

Wednesday, January 10, 2024

#माझी_टवाळखोरी 📝


 


Related Posts Plugin for WordPress, Blogger...