नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Sunday, December 24, 2017

हायवेवर गाड्यांच्या अजुनी रांग बों(ब)ला




संयमाचा अंत होणे म्हणजे काय असते हे टुकार कविता वाचून नाही तर सलग सुट्टीच्या दिवशी  हायवेवर प्रवास करुनच कळते
मुंबई - पुणे मेगा हायवे एकंदर परिस्थिती

( चाल: तळव्यावर मेंदीचा अजूनी रंग ओला)

हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बों(ब)ला
माझी गाडी लेन घेते जिथे घोटाळा

दाबिलेस पायाने एक ब्रेक क्षणे
 बट हळवी रांगेतील वाजविती कर्णे
नकळत हळू हळू टोल नाका आला 
( हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)

घाटातुनी शितलता दाटुनी आली
दोन गाड्यांची प्रेमभरे टक्कर झाली
आसमंत प्रदुषणे धुंद धुंद झाला
( हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)

हा टुकार अडकला घाट खंडाळ्यात
मिटुनी काच लावून एसी शब्द सुचतात 
मागचा सहप्रवासी वाचून धन्य झाला

(हायवेवर गाड्यांच्या अजूनी रांगा बोला)

📝त्रासलेला टुकार प्रवासी
२४/१२/१७


मुळ गाणे:-
तळव्यावर मेंदीचा अजून रंग ओला
माझ्या मनी प्रीत तुझी घेते हिंदोळा

गायिलेस डोळ्यांनी एक निळे गाणे
बट हळवी वाऱ्यातील वेचिते तराणे
नकळत तव हात प्रिये हाती मम आला

पवनातुनी शीतलता दाटुनिया आली
दोन मने प्रीतीच्या गंगेतच न्हाली
आसमंत आनंदे धुंद धुंद झाला

ही दुपार भिजलेली, प्रीत चांदण्यात
मिटुनी पंख खग निवांत शांत तरुलतांत
आज तुझ्या सहवासी जीव धन्य झाला


Thursday, December 14, 2017

आमचा ' एक्सिट पोल'


आमचा ' एक्सिट पोल' 📝


मंडळी सुप्रभात 🙏🏻

काल पासून आपण निवडणूक निकालाबाबत अनेक पोल वाचत आहोत. नाही नाही मी ही तुम्हाला माझा अंदाज वगैरे सांगणार नाही आहे. पण हा ' एक्सिट पोल' मला भूतकाळात घेऊन गेला आणी या एक्सिट पोलचे बीज आम्हाला आमच्या शाळेच्या प्रत्येक परीक्षेत दिसून येऊ लागले

येतय का लक्षात?

साधारण कुठल्याही इयत्तेची सहामाही, वार्षिक परिक्षा हा एक्सिट पोल साठी सुगीचा काळ
मराठी, इंग्रजी, गणित हे आमच्यासाठी कायमचे राखीव मतदार संघ. इथला पोल घ्यायच्या भानगडीत आम्ही कधीच पडलो नाही

इतिहास, भूगोल, शास्त्र हे आमचे पारंपारिक मतदारसंघ
रिकाम्या जागा भरा, जोड्या जुळवा याची परिक्षा संपल्यानंतर ठराविक मित्र पँनेल कडून मिळणाऱ्या उत्तरावर आमचे मार्कांच्या अंदाजांचे पोल ठरले जायचे.

एखाद्या अवघड प्रश्णांच्या उत्तरासाठी कधी कधी एकदम हुशार तज्ञ मित्राशी विचारविनिमय ( expert panel)  केला जायचा. अर्थात माझ्यासाठी तसा प्रसंग क्वचित यायचा. नाही नाही मी हुषार म्हणून नव्हे तर असा प्रश्ण कायम आपला option लाच असायचा.

तर घरी जाऊन पुढच्या पेपराच्या अभ्यासा आधी ४-ते ५ वेळा तरी वेगवेगळ्या permutation, आणी combination ने या पेपरात आपल्याला किती मार्क मिळणार आहेत याचा अंदाज बांधणे हा आमच्यासाठी एक आनंददायी exit pol च होता
आणी ही सगळी तयारी असायची घरच्या, 'आई-बाबा चणाक्ष नातेवाईक' सर्वेला सामोरा जायच्या  आधीची. या सर्वेक्षण नुसार आम्ही कधीच विजयी उमेदवार ठरत नसायचो.

एक मात्र नक्की कितीही सर्वे आले गेले,   या सगळ्यात निवडणूक आयोगाने ( प्रती शाळेने) आमचे कधीच डिपाँझीट जप्त होऊ दिले नाही 😊

सर्व परीक्षा प्रेमी आणी त्यानंतरच्या होणाऱ्या ' एक्सिट पोलला' समर्पित 🙏🏻
📝 अमोल
१५/१२/१७

थंडी ही कुडकुडली


मुबंईत आज डिसेंबर मधील सगळ्यात कमी तापमानाची नोंद झाली त्यात  बिचारी थंडी चुकून  माझ्या घरी आली .. आणि मग 

( चाल : ही चाल  तुरुतुरु , उडती केस भुरुभुरु )

ही आली हळूहळू , दात खिळी बसली जणू 
उघड्या फटीतून आत शिरली 
कशी पहाटेच्या वा-यात  डिसेंबरच्या महिन्यात 
थंडी ही  कुडकुडली 

इथं धुकं आसपास ना 
चादर पांघरून झोप ना ?
तू जरा मफलर घाल ना 
डोक्यावरचा पंखा बंद ना 
मी आफीसला निघता माग वळून पाहता 
थंडी पावलात अडखळली 
( कशी पहाटेच्या वा-यात   डिसेंबरच्या महिन्यात 
थंडी ही  कुडकुडली ) 

उगाच स्वेटर घालून  
चहाचा रतीब पाडून  
रुमाल घेऊन हातानं 
खोकला काढीशी बेतानं 
हा ढंग जीवघेणा उगा शेकोटीचा बहाणा
मग थंडीला ही  उब घावली 

( कशी पहाटेच्या वा-यात   डिसेंबरच्या महिन्यात 
थंडी ही  कुडकुडली ) 





Wednesday, December 6, 2017

उघडला पाऊस ' ओखी ' चा


काल सकाळी सूर्यनारायणाची प्रार्थना काय केली आणि लगेच ...... 🌤🙏🏻
(मूळ गाणे : उगवला चंद्र पुनवेचा )

उघडला पाऊस ' ओखी ' चा
'लाट' जाऊनी थाबंवला मारा पाण्याचा ....
( उघडला पाऊस ' ओखी ' चा ) 

होड्या नावा  कशा फसल्या
सगळीकडे किना-यात पोचल्या
आठवणी स्तुनामीच्या जाहल्या
अवकाळी मोहोर आंब्याचा निसटला स्वर्गीचा.

उपटला पाऊस ओखीचा

📝 माझे टुकार ईचार

७/१२/१७

मुळ गाणे:-
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा
*विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो*

Monday, November 27, 2017

केंव्हा तरी पहाटे


'केंव्हा तरी पहाटे' - अमोल केळकर 📝
(परिक्षेच्या दिवशी लवकर उठून अभ्यास करायला कधीच जमले नाही)

केव्हा तरी पहाटे
उठवून  माय गेली
मिटले तरी मी डोळे
हलवून   माय गेली 

कळले मला न  तेव्हा
वाटली न भीती जराशी
कळले मला मग जेव्हा
निसटून वर्षे गेली... 

पाहू  तरी  कसे मी
सोपे उत्तर प्रश्णांचे
घेऊन गाईड माझे
फसवून शांती गेली

ऐकतो  कानात  आता
आवाज थपडेचे
डस्टर मास्तरांनी
फेकून बात केली .. 

समरल्या मलाच तेव्हा
माझ्या टुकार पंक्ती
मग शाल अंगावरची
उडवून माय गेली.

-------------------------------------
*मूळ गाणे* : - 
केव्हातरी पहाटे
उलटून रात गेली
मिटले चुकून डोळे
हरवून रात गेली

कळले मला न केव्हा
सुटली मिठी जराशी
कळले मला न केव्हा
निसटून रात गेली

सांगू तरी कसे मी
वय कोवळे उन्हाचे
उसवून श्वास माझा
फसवून रात गेली

उरले उरात काही
आवाज चांदण्याचे
आकाश तारकांचे
उचलून रात गेली

स्मरल्या मला न तेव्हा
माझ्याच गीतपंक्ती
मग ओळ शेवटाची
सुचवून रात गेली

Wednesday, November 1, 2017

एका लग्नाची गोष्ट ( गाणे )


एका लग्नाची गोष्ट  ( गाणे ) 🌱🌿🎋
( चाल : बाहुलीचं लगीन झोकात लागलं , नवरोबांन भाडणं काढलं  )

तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं  
तुळशीबाई नटून अंगणात थाबंली
सेक्रेटरी येताच बोलणं हे  वाढलं

तिला नाही स्पेस  म्हणे पुढे येऊन सासरा
आम्ही तुमच्या तुळशीला देऊ कसा आसरा
दोनशे रुपये मेन्टेन्सचा  देऊ का हो  दाखला
असं म्हणून मंडपात सगळ्यांना तो चावला 

तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं  

फराळाचे पदार्थ त्याच्या तोंडामध्ये कोंबले
कच-याचे मुद्दे  त्याला का हो झोंबले
तरा तरा तो-या मध्ये अध्यक्ष ही  धावला
कानामध्ये सेक्रेटरीच्या काहींतरी बोलला  

तुळशीचं लगीन झोकात लागलं
सेक्रेटरीने भाडणं काढलं  

थोडासा फसवा , सेक्रेटरीचा रुसवा
मंडळी हसू लागली
बाळ कृष्ण आणून , अक्षता घेऊन
लग्न लावू लागली
पोरं आली, माळ लावली
सोसायटी आनंदली 

तुळशीचं लगीन झोकात लागलं
व-हाड सुखावलं
📝विसंगती सदा मिळो , टुकार विडंबन कानी पडो
२/११/१७


Friday, October 27, 2017


दिवाळी झाल्यानंतर फराळ संपल्याने जो अश्रूंचा महापूर आला ते पाहून आमचे ही डोळे पाणावले


का जोल उगा रडी तसे
( चाल: हा छंद जिवाला लावी पिसे)📝


तुझे रुप सखे उदास दिसे
काहूर मनी उठले भलते
दिनरात चिवडा चकली दिसे
का जोल उगा रडी तसे

ती डिश तुझ्या नजरेमधली
तिथे नसते शंकर पाळी
पोटात राहुनी भुकगिरी
हाती उरे बेसन लाडू कसे

का जोल उगा रडी तसे

चिरोटा तुझा ग स्वादभरी
चिवड्यात संपला काजू जरी
हा शोक तुझा घायाळ करी
डब्यात न उरले अनरसे

का जोल उगा रडी तसे
📝 २७/१०/१७
विसंगती सदा मिळो, टुकार विडंबन कानी पडो

Sunday, October 15, 2017

पदार्थ माया


खास दिवाळी साठी सादर करीत आहोत

शीर्षक गीत -


"  पदार्थ माया "
जडतो जो जीव

लागते ती भूक
दिसतो तो लाडू
मिळे तो सुवास
कळे तोच अर्थ
झालो मीच दंग
ओघ ळले अश्रू
लागतो तो छंद
दिसते ती शेव 
पोटी होते काव
ज्याला नाही ठाव
तो असे फराळ
अन रसा तोही
पोट भर घ्या या


फराळमाया , फराळमाया
माझे टुकार ईचार अनुदिनी तर्फे सर्वांना दिवाळीच्या फर फरून शुभेच्छा 📝 🎉🛍🌀💠🌐

Thursday, October 12, 2017

दिवाळी फराळ


दिवाळी फराळ 🌀💠




चिवडा म्हणाला चकलीला
का ग तू अशी का रूसली?
नसेल तर चालेल की
एखाद्यावर्षी  फटाक्याची टिकली

चकली म्हणाली चिवड्याला
दु:ख आहे विनाकारण फसण्याचे
जी.एस.टी च्या टक्क्यापायी
फाफड्याशी लग्न मोडण्याचे.

बेदाण्याला सांभाळतच
आला तेंव्हा बेसन लाडू
म्हणाला आता चिंता नको
आपणही एखादा मोर्चा काढू

करंजी म्हणाली कडबोळ्याला
मोर्चाला पोचायला होणार लेट
किती छान झालं असतं
जर दर दोन तासाला असती बुलेट

पाकातल्या चिरोट्याला
आँक्टोबर मधे आली फिट
आवडली नसली जरी टुकार कविता
सगळीकडे  फिरणार हिट
😉
📝🔆🎊 १३/१०/१७

Wednesday, October 11, 2017

दिवाळी फटाके


दिवाळी फटाके ( माझे टुकार ईचार) 🔆💥🚀
(चाल: प्रथम तुज पाहता )


प्रदूषण ते पाहता, बाण वेडावला
विझवुनी ठेवले नीट, आज मी त्याला

वर जातो जेंव्हा,  विसरतो भान मी
धुर श्वासातुनी घेतला आत मी
खोकुनी का गळाही बसुनी तू घेतला

वात सोडवूनी, लवंगी ती मिळवा
जवळुनी तिजसी ला काडीने पेटवा
वाजता फुस का जरी का उगा धावला


प्रदूषण ते पाहता .।।


📝💥🔆🚀
१२/१०/१७

Wednesday, September 13, 2017

खोटी खोटी रूपे तुझी


देशातील चौदा भोंदू  रत्नांची नावे जाहिर झाली आणी मग आम्हाला ही त्यांची आरती करायचा मोह आवरला नाही

खोटी खोटी रूपे तुझी
खोटे डेरे,  मठ सारे
कुठे कुठे ठोकू तुला
तुझे अघोरी कृत्य सारे

नीच गोष्ट ज्या ज्या काही
तिथे तुझा वास
तुझा आशिर्वाद देतो,
गुंडांना निवास
चराचरा गंडविशी,
संग तुझा कशा ला रे?

खरे रुप भोंदू बाबा
कोण ते कळेना
नको जामिनावरी तूच,
तुरूंगात रहाना
तुला अडकवाया घ्यावा, पिनल कोड कोणता रे? 

📋
खोटी खोटी रूपे तुझी..
📝 ११/९/१७

हिरव्या हिरव्या रंगाची


हिरव्या हिरव्या रंगाची
झाडी घनदाट
मालगाडी घसरून
लागली की हो वाट....

हिरव्या हिरव्या झाडीत
हिरवी हिरवी पानं
झुक झुक गाडीनं
आता नको जाणं
पुना-बाँम्बे ओसरली
आपुलकीची लाट


खंडाळ्याच्या घाटात
हवा थंडगार
रुळावरून घसरी डबे
का हो बार बार
महिन्याभरच्या अपघातांची, यादी तोंड पाठ

बोगद्यातून गाडी जाता
होई अंधार
अंघारात प्रीत घेता प्रितीचो आधार
इंजीनाच्या मागे पडती डबे आपोआप


हिरव्या हिरव्या ..
📝  ८/९/१७
🚂🚂

मोजीन किती रस्त्यात खड्डे बाई



मोजीन मोजीन मोजीन  किती रस्त्यात खड्डे बाई
हायवेवर ट्रँफीकचा अंत दिसत नाही

ब्रेकुनी पाय जोरात, खड्डा चुकविती
रखडत रखडत फसवुनी,क्लचबंध तोडिती

रस्त्याचा सुंदरसा  पँच गुंफिती
डांबर डांबर ओतुनी परि  तुटत तुटत जाई

कठिण कठिण कठिण किती

कावळा .....


मध्यतंरी  कावळ्यांनी खत व्यक्त केली की तुम्ही चिमण्यावर  गाणं लिहिलंत  आमच्यावर का नाही ? आता पितृ पंधरवड्यात  या  कावळ्यांना  खुश ठेवायलाच पाहिजे ना  .... 
( चाल गारवा : ) 
कावळा ..... 

घाटावर  भिर भिर भिर तो  रोज नवा 
जिथे.... ..   तिथे ही  हा कावळा  रोज  नवा 

पितृ च पक्षी  नाव तयांचे 
पिंड  लावले दही - भाताचे 
झाडावरून सर सर तो  कावळा रोज नवा 


आकाश सारे सोडून पहा रे 
आता पितर आलेत सारे 
पितरांना भर भर भर खुशवा 

जिथे.... ..   तिथे ही  हा कावळा  रोज  नवा..

अमोल

13/9/17

Sunday, September 3, 2017

रविवारची टुकारगिरी


रविवारची टुकारगिरी 📝
ठिकाण: लोणावळा
🚎🚌🚎🚌🚎🚌

अरे अजून कशी आली नाही ही  *स्वारगेट ' हिरकणी*' एव्हान यायला पाहिजे होती. माझी तर आता  निघायची वेळ झाली असे विचार *बोरिवली*
*शिवनेरीच्या* मनात येत असतानाच लोणावळा एक्सीट मधून अर्ध गोलाकार वळण घेत धापा टाकत. *ठाणे - स्वारगेट* *हिरकणी* अवतरली.
अग हो, हो,  जरा हळू,
उशीर झाला म्हणून एवढं जोरात यायचं, लागलं असतं की तुलाच.. शिवनेरी जरा काळजीच्या भावनेने म्हणाली..
ए शिवनेरी Sorry हं,  जरा उशीरच झाला मला, आता नेहमी सारख्या गप्पा नाही जमणार गडबड होईल इती - हिरकणी
' अगं असू दे ' गप्पा काय संध्याकाळी परत येताना करु,  तू आधी ३० रुपयाचा नाष्टा करुन ये. *उपमा* घे आज. मस्त आहे गरम
नको ग आज शिवनेरी
का ग?
काय सांगू , गणपती सुट्टीच्या  कोकणातील अतिरिक्त फे-यांनी मला जाम त्रास झालाय, पोट बिघडलंय माझं, मळमळतय नुसतं आणी आत्ताच घाट पण चढून आलीय ना.
' हो ना गं ' किती ते मोठे घाट असतात ना कोकणात . म्हणून मी फारशी त्या मार्गावर जातच नाही
आपला हा *पुणे-मुंबई* बोर घाटच बरा.
' हं ' मला तर बाई या आपल्या कोकणातल्या मैत्रिणींच नवल वाटत. कशा एकदम फीट ना . ती *अशोक लेल्यांची* सून माहित आहे ना.
हो ना, नाहीतर आपण. *अमृतांजन पाँईंट ला केंव्हा टाटा* करतो असं होऊन जातं आपल्याला.
 हिरकणी , तो बघ ' *अश्वमेध* ' येतोय, *दादर - पुणे स्टेशन*  , बोलायचं का त्याच्याशी 
" काही नको ग " , तो कुठं आपल्याशी  बोलतो *ग्रुप वर*. तो फक्त  पुणे - दादर - पुणे  शिवनेरींशींच  बोलतो. *आपला ग्रुप त्यानेच बनवून दिला* अन   एकंदरीत  पुणे - दादर -  पुणे ची मक्तेदारी   आपण सगळ्या  ग्रुप मध्ये आल्यामुळे  मोडली गेलीय ना , त्याचे  त्यांना  दुःख आहे ग , लक्ष देऊ नकोस तू . 
बरं बरं, ए आपली
' परळ -  सातारा 'ती नाही ग दिसली ब-याच दिवसात नेहमीच्या वेळेला इथे
अग  ७ दिवसाचा गणपती असतो ना तिच्याकडे  साता -याला. मला म्हणलेली  एक दिवस  पुणे - *सांगली* रूट  करून ये *दर्शनाला* . पण नाही ग जमलं . उद्या परत जॉईन होतीय ती  परळ डेपोत.
 तिने गणपती विसर्जनाचे फोटो पाठवलेले की . नाही पाहिलेस  ग्रुपवर ?
नाही ग , राहून गेलं . पण ही *परळ*खूप *सरळ* हो . किती दमते  बिचारी.   आपण पुण्यापर्यतच जातो ग बिचारीला साता-या पर्यत जाऊन रात्री उशीरा पर्यत परत परळला  यावे लागते. खूपच *हेक्टिक* काम आहे तिचे.
हो ना . कुणाला कधी नाही म्हणत नाही. ग्रुप मध्ये सगळ्यात जास्त *टोल पार्टी* देणारी म्हणून तिचे सगळेच कौतुक करतात . आता उद्या मुद्दाम जरा  जास्त थाबते लोणावळ्याला अन  कंदी पेढ्याचा प्रसाद. तिच्याकडून घेऊनच निघेन म्हणते 
शिवनेरी,  ती बघ ' *यशवंती* ' .हाक मारतीय आपल्याला 
यशवंती , ये  चहा घेऊन जा ..
अग नको  अजून चार चकरा मारायच्या आहेत  लोणावळा ते कार्ला आणि चहा प्यायला  आमचा ऑफीशल थांबा जुना बस स्टॉप , ये ते ग .. भेटू परत केंव्हातरी
कमाल आहे ना या मुलीची.  *केव्हा ही बघा ही आँन लाईन* असतेच. *जवळच्यांची खूप काळजी घेते*, मैत्रीण असावी तर हीच्या सारखी
खरंय ग
ए शिवनेरी , तो बघ तुझा *राजा हिंदुस्तानी* आला '
" *आले का सगळे का कोण राहिलय*"
या आवाजाने मला जाग आली तेंव्हा *ही शिवनेरी आणी समोरची हिरकणी माझ्याकडे बघून गालातल्या गालात हसतायत असा भास मला झाला*
तरीही त्यांचा संवाद संपत नव्हता:-
हो हो , चल आज खूप वेळ झाला, आता बोरिवलीला केव्हा पोचणार देव जाणे 
नीट जा ग , सायन पासून पुढे बांद्रया पर्यत प्रत्येक  ९ मिटरवर खोल खडडे आहेत. कंबरडं मोडून जाईल 
हो हो  काळजी घेईन, थॅक्स हं
मोरया  🙏🏼
मोरया 🌺
-------------------------
आँन लाईन प्रतिक्रिया  इथे रिझर्व करा
a.kelkar9@gmail.com
एसटीचे महा *पर्व*  🚎🚌🚎🚌
लोणावळ्याला जमू *सर्व*

Related Posts Plugin for WordPress, Blogger...