नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, April 25, 2017

जाऊ आहारी । व्हाट्स अप वाटे भारी


कोण म्हणते सोशल मिडीया म्हणजे एक प्रकारचा आजारच आहे ? आमचे तर असे मत  आहे 


जाऊ आहारी । व्हाट्स अप वाटे भारी

नकोच भेटणे  मग कोणाला,
काम कुणी सांगेल न मजला,
मोबाईल हाती  निजावयाला,
चैनच सारी । व्हाट्स अप वाटे भारी


मिळेल धागा, जरी तो  साधा ,
खरी  राष्ट्रभक्ती त्यातच आणा ,
फौर्वर्ड मेसेज आमचा राणा ;
चालतय की । व्हाट्स अप वाटे भारी

भवतीं मिंत्राचा  मेळा,
दंगा थोडा जरि कुणिं केला
ऍडमिन कावुनि सांगेन तयाला,
'जा बाहेरी.' । व्हाट्स अप वाटे भारी


असलें सोशल ना ही गोड
म्हणुनी  कण्हती कां जन मूढ ?
हें मजला उकलेना गूढ-
झालो विचारीं । मौज हीच वाटे ना भारी

अमोल संकल्पना : 
२६/४/१७

आयपीएलच्या खेळामध्ये...


IPL चा खेळ रंगात आला असताना, आमच्या अंगात  हे गाण येऊ लागले 🏏
----------------------------------------
आयपीएलच्या खेळामध्ये झाली आणी बाणी
अर्ध्यावरती डाव रंगला, विराट ही कहाणी

राणा वदला, मलाच लागली, चौकाराची आशा
प्रत्येक फुल्टाँसवे दिसती , मला बाँन्डीच्या रेषा
का धोनीने  मिळेल तेंव्हा पिऊनी घेतले पाणी?

जेंव्हा विचारी निता का हे डिल असे  सोडावे?
का दुस-याने घेण्याआधी जिओ  कसे जोडावे?
या प्रश्णाला उत्तर नव्हते,  प्रीती केविलवाणी

त्या मुलीने मिटले डोळे गेलदूर जाताना
क क किंगचा श्वास कोंडला गंभीर आऊट होताना
पन्नाशीत मिटून गेली एक विराट कहाणी

अर्ध्यावरती डाव रंगला .।
🏏🏏🏏🏏🏏
📝 अमोल २४/४/१७

Tuesday, April 18, 2017

हे तुझे सांजवेळी ...


'खुलता  कळी खुलेना ' यात सुरेश भटांची ही गझल काय ऐकली आणी  हे सुचलं
( भटांची माफी मागून 🙏🏼)


हे तुझे सांजवेळी पियणे बरे नाही.
आणि गाडी हायवेला लावणे बरे नाही

जे मागे दिले होते तेच पेय दे मला
मागचे जुने बिल टाळणे बरे नाही

ऐक तू जरा माझे.. सोड मोह पिण्याचा
आजकाल एवढे पियणे बरे नाही

पाहिली न कोणि आपुली जोडगोळी?
आपलीच बाटली फोडणे बरे नाही

कालचा तुझा माझा ब्रँन्ड वेगळा होता
हे आज ग्लासातूनी सांडणे बरे नाही


विडंबनाने या माझ्या शुध्द  आज का आली ?
हाय हे टुकारलेखन वाचणे बरे नाही

📝 १८/४/१७
अमोल

Tuesday, April 11, 2017

मृगजळाकाठी कविता संग्रहाचे प्रकाशन


मृगजळाकाठी   कविता संग्रहाचे  प्रकाशन 

दिनांक  ९  एप्रिल २०१७ ला सौ  उज्ज्वला केळकर यांच्या मृगजळाकाठी   या कविता संग्रहाचे  प्रकाशन  सांगलीत  जेष्ठ कवी  श्रीरंग जोशी यांच्या हस्ते झाले 

याप्रसंगी   डॉ तारा भवाळकर , डॉ अनिल मडके , वैजनाथ महाजन आणि इतर  मान्यवर उपस्थित होते 








Tuesday, April 4, 2017

हापुसची पेटी मिळे अजूनी हजारात


वाशीच्या एपीमेसी मार्केट मधे फळांच्या राजाची आवक वाढली ही बातमी वाचनात आली आणी.. हे सुचले
-----------------------------------------
( चाल: बगळ्यांची माळ फुले)
हापुसची पेटी मिळे अजूनी हजारात
भेटशी आमरसा कधी, सांग तू  पानात

थांबविती रस्त्यात उभे ,भय्ये उत्तरेचे
खोलूनी दाविती तिथे सोने देवगडचे
भावडझनाचा घुमतो मग खुप डोसक्यात..।

हापुसची पेटी मिळे अजूनी हजारात

हातासह रंगले मन रस काढताना
कोय आणी सालही पिळून 
ठेवताना

अशक्यपरी येतील दिवस अजूनही सत्यात..

हापुसची पेटी मिळे अजूनी हजारात
भेटशी आमरसा कधी, सांग तू  पानात

🍋  🤗
© अमोल
Related Posts Plugin for WordPress, Blogger...