नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, August 18, 2017

मोदक


खरा खवय्या तोच 
ज्याची नजर असते शोधक 
मन त्याचे तृप्त होते 
खाऊन उकडीचे मोदक 

खवा माव्याचे मोदक 
उत्सवात आणतात रंग 
बाप्पाच्या स्वागताला 
सगळेच होतात दंग 

चॉकलेटच्या मोदकाने म्हणे 
मूषकालाही लावलाय लळा 
गणपती बुक करायला 
लवकर तुम्ही पळा 


वाटली डाळ सोबत 
तळलेल्या  मोदकाची शिदोरी 
बाप्पा यायची वेळ झाली 
झाली का तुमची तयारी 

वाट बघतोय ...  . . लवकर या 

सर्व खवय्या  रसिकांना  अर्पण 

Wednesday, August 16, 2017

मंगळागौर



वि. सु  :  सदर  लेखन  परंपरेवर  विश्वास असणा-या साठी आहे .
वि. सु २ -  मंगळागौरी बद्दल आहे म्हणजे पुरुषांनी नाके मुरडायला पाहिजेत असे काही नाही .  दिदी  तेरा देवर दिवाना गाण्यात  सलमान खान  चोरी चोरी चुपके चुपके  दाखवलेला चालतो तर मंगळागौरीत मराठी पुरुषाने रुची  दाखवली तर काय बिघडले . यांना विरोध म्हणजे मराठीला विरोध ठरेल 🚂
वि. सु ३ - अशा काही विशेष सूचना असल्या की टुकार लेखनाला वजन प्राप्त होते असा उगाच लेखकाचा *गॉड* समज आहे
असो
तर
*मंगळागौर*- श्रावण महिन्यातील हा एक खास स्त्रीयांचा सण. स्त्रीयांना आपल्या भावना, संवेदना, आकांक्षा व्यक्त करण्यासाठी हिंदू धर्मात काही सणांचे आयोजन करण्यात आले आहे त्यातीलच एक महत्वाचा सण म्हणजे मंगळागौर.
मंगळागौर ही एक सौभाग्यदेवता आहे. आपल्या पतीच्या रक्षणासाठी, भल्यासाठी श्रावणातील मंगळवारी हे व्रत नित्यनियमाने ठेवतात. त्यापैकी पहिला व शेवटचा मंगळवार अधिक महत्वाचे मानले जातात. या वारी पूजा केली म्हणजे जन्माचे सार्थक झाले असा समज आहे. ह्या पूजेसाठी लग्न होऊन पाचपेक्षा अधिक वर्षे झाली नाहीत अशाच सौभाग्यवतीना बोलावण्यात येते. यांना वपोरी-वसोळी म्हणतात. मंगळागौरीच्या व्रतात शंकर, गणपती व गौरीची पूजा करतात.
मंगळागौरीची पूजा म्हणजे उमा-शंकराची पूजा. पतीपत्नीमधील आत्यंतिक प्रेम व निष्ठेचा आदर्श म्हणून या दांपत्याकडे पाहिले जाते. त्यांची कृपादृष्टी संपादन करण्यासाठी किंवा आदर्शाचे स्मरण करण्याच्या हेतूने ही पूजा करतात. लग्न झाल्यावर पहिली पाच वर्षे श्रावण महिन्यातील प्रत्येक मंगळवारी स्त्रिया मंगळागौरीची पूजा करतात
( माहिती संग्रहित - )

*मंगळागौर खेळाची गाणी* - हा  सर्व वयोगटातील स्त्रियांसाठीचा   जिव्हाळ्याचा भाग  यातील  गाणी म्हणता म्हणता  खेळ खेळताना  त्यावेळच्या सामाजिक / घरगुती  ( सासू - सून / नणंद - भावजय  इ इ ) विसंवादावर प्रकाश टाकण्याचे / चर्चेला आणायचे  काम  सहज रित्या घडून यायचे
( आता हेच आम्ही टूकारगिरी सदरात सादर केलं तर लगेच सगळे नाव ठेवतात 😑  . असो )
तर  मंगळागौरीची  पुर्वीची गाणी आधुनिक स्त्रिया नव्या पध्दतीने कशी म्हणतील याची ही  झलक :
१)
*वाच ग पुन्हा , कशी मी वाचू*
 या  ग्रुपचा त्या ग्रुपचा
 मेसेज नाही आला, *जीओ*  नाही मला
 कशी मी वाचू
 वाच ग पुन्हा , कशी मी वाचू  ?
२)
मिळू  दे कँडी कँश  मिळू दे खेळात जीव ह्यो रमु दे
सखीही   लेवल  करतीया, माझ्या पुढं  जातीया
खेळून बोट  माझी दमू दे, खेळात जीव ह्यो रमू दे
खेळू  दे  कँडी क्रँ श खेळू  दे !
३)
कीक बाई कीक ऑक्टिवा ची कीक ,
गाडीची किक बाई वाटते जड
ब्रेक वरचा हात तू हळूच सोड 
४ )
*कच्चा लिंबू* पाहू बाई .
 ५)
*खड्यातून मिरवीत जाशील कैशी*
 आई बोलवते उबेर  करिते
बाबा बोलावतात उबेर बुक  करितात            सासू *ओला* -विते  तरी  मी  *उबेरच* करिते                सासरा बोलवितो  उबेर  करितो                      मैत्रीण  बोलविते ………. ( पटकन जाते तेंवा पतीचे नाव घेते)
६ )
चला चला गं चला सया
चला गं ८. ५ ची लोकल  धरू चला
फलाटावर घोळका करू  चला
आत  शिरू चला सीट पकडू  चला
डोबिवली फास्टच्या मागे लागूया चला
*परंपरेचा खेळ जागवणा-या तमाम  भगिनींना दंडवत* 🙏🏼
प्रतिक्रिया अवश्य पाठवा 📝
a.Kelkar9@gmail.com





Sunday, August 13, 2017

बाप्पा मोरया


 

मूषकाला  घेऊन 

कैलासावरून 

निघाले  एकदाचे 

बाप्पा  .. .. 

सुरु झाल्या  दोघांच्या 

आरामात  गप्पा 

मग  काय बाप्पा  यंदा 

कुठे वळवायचा  आपला 

मोर्चा ?

उत्सवाचे  जनक कोण ?

रंगारी का  टिळक ?

यावर सुरु आहे  सगळीकडे 

जोरदार चर्चा 


अरे मूषका ,

माणसेच ती 

सगळेच आपले भक्त 

एकत्र येतील सगळे 

एवढेच पहायचे 

फक्त .... 

Saturday, August 12, 2017

जत्रा


रविवारची टूकारगिरी 📝



नमस्कार मंडळी  🙏🏼
ओढ लागली अशी जीवाला ,गावाकडची माती
साद घालती  पुन्हा नव्याने  ही रक्ताची नाती
आग बाई अरेच्चा  सिनेमातले हे  गाणे . ... . हे गाणे पाहिले / ऐकले की नकळत आपण मनाने आपल्या  गावात पोहोचतो. काय सुंदर चित्रित केलय हे गाणे.वाई जवळच्या बावधन जवळील पारंपारिक जत्रा आणि परंपरेचे  अप्रतिम चित्रण.
काळाला अनुसरून जत्रेच वर्णन असं  करता येईल

जत्रा  म्हणजेकाय चाललंय अप्पा ?
( Whatsapp) ची मोठी आवृत्ती. ग्रामदेवता हीच ग्रुप अँडमीन, कुणीही केंव्हाही आपणहून add व्हायच.अमुकच इतक्या संख्येचे बंधन नाही. एकदा यात आलं की अनुभवायचा फक्त आनंद. अगदी मनसोक्तपणे. आणी हा आनंद घेऊनच गावातून left व्हायचे ते ही फुल चार्ज होऊनच.

मंडळी, गावोगावच्या जत्रा हा आपल्या संस्कृतीचा  अनमोल ठेवा. गावातील  एखादे मंदिर  आणि त्या देवतेच्या अनुषंगाने  होणारा उत्सव. या जत्रेच्या  निमित्याने  बाहेर गावी  स्थाईक  झालेले परत आपल्या मायभूमीत येतात, भेटी होतात,  यानिमित्याने सांस्कृतिक देवाण घेवाण होते
म्हणूनच आजकाल अनेकजण   ग्रामदेवता, कुलदेवतेच्या जत्रेला जातात.
भराडीदेवीची जत्रा  , एकविरा देवीची जत्रा , मार्लेश्वर जत्रा , जुन्नरची जत्रा , चतुःश्रुंगीची जत्रा, श्रीरापूर -  रामनवमीची जत्रा, मिरजेत अंबाबाईची जत्रा( नवरात्रात) आणि मीरासाबच्या दर्ग्याचा उरुस या दोन मोठ्या जत्रा, केळशी - महालक्ष्मी जत्रा , मुरुडला ग्रामदैवत कोटेश्वरीची जत्रा, वाईचा कृष्णामाई उत्सव  ही काही प्रमुख उदाहरणे . अशी असंख्य  उदाहरणे महाराष्ट्राच्या पंचक्रोशीत आढळतील. 
हाच धागा पकडून आज तुम्हाला मी  आमच्या ' सांगली ' जवळच्या  हरीपूरच्या जत्रेत फिरवून आणणार आहे.  सांगली पासून साधारण ३ - ४ किमी अंतरावर असणारे हे हरिपूर गाव. कृष्णा -वारणेचा पवित्र *संगम*  इथे आहे . म्हणूनच की काय  इथल्या शंकराच्या  मंदिराला *संगमेश्वराचे मंदिर* म्हणले जाते. इथे श्रावण महिन्यात  दर सोमवारी मोठी जत्रा भरते. हे  मंदिर  हेमाडपंथी आहे.
*प्रभू श्रीराम* सीतामाईंच्या शोधात जाताना इथे आले होते आणि त्यांनी   शंकराची पूजा केली असा उल्लेख आढळतो . *मार्कंडेय ऋषी* ही इथे आले होते आणि ८० च्या दशका नंतर   शेवटच्या श्रावणी सोमवारी न चुकता अर्धी शाळा सुटल्यावर  *मी* पण अनेक सांगलीकर,  मित्र परिवार, नातेवाईक, सगे -सोयरे  यांच्या बरोबर इथे येत होतो.☺  जे सांगलीत आहेत  ते अजूनही येतात.

अनेक जण सांगली पासून हरिपूर पर्यंत चालतच जाणे पसंत करतात.  रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी  झाडी, हिरवागार निसर्ग आणि सोबत मित्र  मग ३-४ फर्लांग लांब जायला किती वेळ लागणार? 
वाटेत लागणा-या  बागेतल्या *गणपतीचे दर्शन* हा या मार्गातला पहिला थांबा. त्यांनतर थोड्याच अंतरावर लागणारी  वेशीवरची कमान तुम्ही हरिपूरला आलात याची जाणीव करून देते .

जत्रेच्या काळात खरं लक्ष लागलेलं असायचं ते वेशीपासूनच लागणाऱ्या  जत्रेतील दुकानांकडे. कुठे काय आहे, कुठली नवीन खेळणी आली आहेत हे बघतच  संगमेश्वराच्या मंदिरात पोहोचायचे.
महादेवाचे दर्शन घेऊन   झाल्यावर सभा मंडपात असणारा एक जादूचा फोटो हे पण एक आकर्षण असायचे कारण त्या फोटोच्या समोरून ,थोडं डाव्या बाजूने आणि उजव्या बाजूने पाहिल्यास तीन वेगळ्या  देवतांचे  दर्शन घडायचे.
मंदिरातून बाहेर पडल्यावर असायची फुल धमाल.  संगमावर नावेतून फेरी, उंच पाळण्यात बसणे, मग भेळ, साखरेची चित्रे, आईस्क्रीम  खादाडी आणी मग *पिटपिट*, चश्मे, धनुष्य बाण, शिट्या सह एखाद नवीन खेळणे हे घेऊन परतीचा प्रवास सुरु करायचा.
लहानपणी जत्रेत घेतलेली ही खेळणी कालांतराने जुनी झाली पण त्यातील एक खेळणे जे आजही उपयोगी ठरते ते म्हणजे *मुखवटा*.  प्रसंगानरुप वेगवगेळा, जीवन जगण्यासाठी आवश्यक ठरणारा.
हा मुखवटा update,  reniew वगैरे करण्यासाठी तरी अधूनमधून ' जत्रा ' अनुभवावी म्हणतो.

*हळदीची पेवे, देवलांचा पार*
*कृष्णा वारणेचा संगम भारी*
*आठवण येते हरिपूरची*
*श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी*

Thursday, August 10, 2017

शाळा चांदोबा गुरुजींची


शाळा चांदोबा गुरुजींची 🌝📝



या वा-याच्या बसुनी विमानी🚀
सहल करुया गगनाची
चला मुलांनो आज पाहूया
शाळा चांदोबा गुरूजींची

स्थळ: तारांगण शिक्षण संस्थेचे,  आकाशगंगा ९१हायस्कूल 🛰

आज पौर्णिमा जमले तारे
 आकाशाच्या वर्गात
चांदोबा गुरुजी तर दिसती 
कुठल्या मोठ्या मौजात
हसुनी चांदण्या करीती किलबील 
अपुल्या इवल्या डोळ्यांची

पण प्रत्यक्षात गुरुजी जरा चिंतेतच होते
आज चांदोबा गुरुजी नेहमी पेक्षा जरा जास्तच उशिरा आले. कारण ही तसेच होते म्हणा, मोबाईलवरचे ' *खंडग्रास चंद्रग्रहणाचे*' मेसेजेस डिलीट करण्यातच त्यांचा बरासचा वेळ गेला होता
गुरुजी ढगांचा दरवाजा लोटून वर्गात शिरताच
विद्यार्थी:- एक साथ नमस्ते🙏🏼
गुरुजी,
बसा, बसा . .कसे आहात सगळे?
अरे काय हे नागपंचमी होऊन गेली तरी अजूनही तुम्ही *काल स्पर्श योगातच* बसलाय?
चला बर या आपापल्या ठिकाणी.
*रवि - मंगळ* ,  तुम्ही आता *कर्क* बाकावर या.
सध्या दोघांची *युती* आहे. जास्त दंगा नकोय वर्गात तुमचा.
आणी हो मंगळ , शनी पासून तू  जरा लांबच रहा. एकवेळ रवी बरोबरची तुझी युती परवडली पण शनी बरोबर एका बाकावर किंवा अगदी सरळ रेषेत जरी आलास आले तरी किती हाहाकार उडवता तुम्ही  कल्पना आहे ना?
आणखी एक लक्षात ठेव मंगळा, वर्गात पहिला, चवथा, सातवा, बाराव्या बाकावर जास्त वेळ तू बसायचं नाहीस कळलं? उगाच वर्गाला ' मंगळ' लागतो मग. हे ऐकून
*कुणी तेजाचे ओठ हलवूनी मंगळास वेडावित असे*
*रागाने मग मंगळ वेडा गोरामोरा होत असे*
*बघुनी सारे हसता हसता उडते चंगळ तार्‍यांची*
वर्गातील कळीचा नारद कुठाय? असे चांदोबा गुरुजी म्हणताच सर्वानी
' बुध'  ग्रहाकडे बघितले. त्याने ही  - हजर ' सिंह' रास बाक असे ओरडून सांगितले.
गुरुजींनी  त्याला सांगितले एकटा असतोस तेंव्हा ठिक आहेस रे पण *राहू* बरोबर, *शनी*बरोबर, *वक्री*होऊन   द्वितीय बाकावर आलास की कस त त प प करतोस, *दातखिळी बसते*तुझी. तेंव्हा काळजी घे.
*गुरु*कसा आहेस रे बाबा? असे म्हणताच वर्ग सेक्रेटरी गुरु खुलला. म्हणाला गुरुजी ' *कन्यागत पर्व*' संपून लवकरच आता मी *तुळ* राशीत जाईन. तिथेच बसून मी जे ग्रह कुंभ, मेष, मिथुन बाकावर बसतील त्याच्या कडे मी चांगल्या दृष्टीने पाहिन.
हरकत नाही हरकत नाही असे म्हणत गुरूजींनी आपला मोर्चा शुक्राकडे वळवला.

शुक्र हा तसा इतरांपेक्षा सुखवस्तू घरातून आलेला, बंगला, गाडी आणी इतर चैनीच्या वस्तूची कमतरता नसणारा असा समाधानी विद्यार्थी. अधूनमधून फाँरेनला ( दुस-या आकाशगंगेत) जाऊन आलेला वर्गातील गुरुजींचा लाडका विद्यार्थी.     गुरुजींकडे तो *खाजगी शिकवणीला* ही जायचा त्यामुळे तो मर्जीतला होता
तरीही त्यालाही चांदोबा गुरूजींनी ' *कृतिका नक्षत्रात*' सातव्या बाकावर असताना काळजी घ्यावयास सांगितले.
शनी बद्दल स्वत: गुरुजींना साडेसातीची भिती वाटत असल्याने ते फारसे त्याच्या नादाला लागत नसत*.
राहू, केतू चांदोबा गुरुजींच्या  वर्गात कधीच उपस्थित रहात नसत.
नंतर गुरूजींनी नक्षत्रांच्या  बाकांकडे एक नजर टाकली. तेंव्हा त्यांच्या लक्षात आले की *चित्रा, स्वाती,विशाखा, अनुराधा , जेष्ठा* या सगळ्याजणी गैरहजर आहेत.  लगेच त्यांना माहिती देण्यात आली की रोहिणीने वृश्चिकेत  मंगळागौरीला म्हणायच्या गाण्याचा/  खेळांचा एका दिवसाचा *विशेष अभ्यासक्रम* ठेवला आहे आणी म्हणून त्या आलेल्या नाहीत

द्वितीयेपासून रोजची येती गुरुजी उशीरा शाळेत
*मुले चांदणी फुलती आणिक सगळी अपुल्या गमतीत*
*कधी वर्गातून पळते उल्का ओढ लागुनी पृथ्वीची*
हजेरी झाल्यावर गुरुजी अभ्यासाकडे वळले. आज कुणी किती *गतीने धावायचे*, *शनी उलटा ( वक्री) किती धावेल*,  आजचा *राहू काल*, होरा कोष्टक,  तिथी, पळ, घटिका,  नवमांश, *अष्टकवर्ग सारिणी*ई विषयाची उजळणी केली.
शेवटी  गुरुजींनी मुलांना सांगितले येत्या *पोर्णीमेला* मी *मकर* रस्ताच्या २४ व्या गल्लीतून जाताना मला  *केतू*कुंभ राशीच्या अडोशाने माझ्यावर *ग्रहण* घालणार आहेत तेंव्हा  सोमवारी शाळेला *सुट्टी*
असे गुरूजींनी जाहीर करताच मुलांनी टाळ्या वाजवून या घोषणेचे स्वागत केल
*कधी वेळेवर केव्हा उशीरा, अवसेला तर पूर्ण रजा*
*राग कधी ना या गुरुजींना, कधी कुणा करीती ना सजा*
*असे मिळाया गुरुजी आम्हां करू प्रार्थना देवाची*
आणी  शाळा संपून आजचा *तारांकित* दिवस कारणी लागला

Tuesday, August 8, 2017

वाचू टुकारी मौज हीच वाटे भारी


( चाल : अबीर गुलाल उधळीत रंग)
अमीर आजार दाखवितो रंग।
त्यांच्या घरी नाचे डास सखी माशीसंग । १...

जेनेटिक कैसे घेऊ?  आम्ही डेंग्यू हीन ।
रुप माझे कैसे पाहूं ? झालो   आम्ही दीन ।
स्वाईनशी फ्ल्यू दंग पाहुनी दभंग.।२..।

दवाखान्यात जाऊ आम्ही अँडमिट होऊ..।
सलाईनचे पाण्याने पोटभरुन घेऊ.।
सिस्टरचे नाम घेऊ होउनी नि:संग.॥३..।

सकाळी - दुपारी मित्रजन येती।
वेटींग रुमच्या बाकड्या भोवती सर्व गोळा होती।
बिल घेऊन डाँक्टर येता पळण्यात दंग.॥४... ।
📝 ९/८/१७

वाचू टुकारी मौज हीच वाटे भारी

Tuesday, August 1, 2017

सोsनू संगतीनं माझ्या तू येशील काय?


या सोनूच्या गाण्याची गोम काही कळेना. काल विधानभवनात जयंत पाटील यांनी गायले, अगदी सरहद्द पलीकडे ही हे गाणे पोचले. मग आम्ही ही सोनूपाशी पोहोचलो आणी एक विनंती केली 📝

सोsनू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझी टुकारी गाणी तू गाशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
तुझ्या टुकारी गाण्यावर भरवसा नाय

गं तुझं सुप्पर गाणं, लावलं खड्ड्यात जालं
माझं स्टेटस भोलं, त्यात अळीच झालं
माझ्या कडव्याचा तुटलाय भाव सारा सारा
रं नगं दावूस विडंबन तोरा, गा रं  चालीत साळसूद पोरा
तुझ्या नजरेच्या विसंगतीला, अशी मी भुलणार नाय

रं माझा खड्या जाईना, तुझ्या ओळींची दैना
मी हायवेची मैना, तुझा टुकारी बाणा
खुळा लेखक रं, यमकामंदी फसला फसला
गं तुला शब्दांच्या पालखीत घालीन
गं तुला सर्विस रोड नं नेईन
तुझ्या फसव्या या काव्याला, अशी मी गावनार नाय

सोsनू संगतीनं, माझ्या तू येशील काय?
---------------------
(सोsनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय 😁 )


Related Posts Plugin for WordPress, Blogger...