नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, September 30, 2014

मोठा भाऊ


पडीक जागेच्या  वादावरून 
भलतेच  झाले युध्द
आता वाटते कुणालाच 
नव्हती तेंव्हा शुध्द 

इलेक्शन झाली की सगळ्यांना 
आठवेल मोठा भाऊ 
जो तो लागेल मागे मग 
मी येऊ ? मी येऊ ?

Monday, September 29, 2014

हेतू


दुस-यांच्या युतीबद्दल 
विचारायचा हेतू ..

आणि गोदेच्या काठी  
माझ्यामागे ये तू 

अमोल केळकर
 सप्टेंबर २९, २०१४



Sunday, September 28, 2014

रंबबिरंगी दुनियाही सारी



Friday, September 26, 2014

राजकीय चित्र


विरोधकांना जवळ करून 
दूर लोटले मित्र 
महाराष्ट्रात सगळीकडे 
हेच आहे चित्र 

अमोल केळकर 

सप्टेंबर २७, २०१४

Thursday, September 25, 2014

ढोकळा फाफडा V झुणका भाकर


आम्हाला नको , ढोकळा फाफडा 
बरी आमची  झुणका भाकर 
तिखट लागली फारच तर 
तोंडीला घेऊ गोड गोड  साखर 

अमोल केळकर 
सप्टेंबर २६, २०१४

Tuesday, September 23, 2014

मार्स ऑर्बिटर मिशन (MOM)


यशस्वी झाली  मॉम 
'क्‍युरिऑसिटी ने केले अभिनंदन 
भारतीय  शास्त्रज्ञानो 
तुम्हास आमचे सादर वंदन 

amol kelkar
sep 25, 2014

चटक मटक




सत्तेच्या खुर्चीची 
इतकी लागली चटक 
की विसरले गेले 
आजूबाजूचे घटक 

अमोल केळकर 
सप्टेंबर २३, २०१४

Monday, September 22, 2014

स्वतंत्र जागा



चार ओळींच्या  मेळाव्यात 
शब्दांनी मागितल्या स्वतंत्र जागा 

सर्वांना मग एकत्र गुंफून 
तयार झाला सुंदर धागा 


अमोल केळकर 
सप्टेंबर २३, २०१४

मऊ


युती होण्यासाठी 
व्हा थोडे मऊ 
तरच दोघे मिळून 
विधानसभेत जाऊ 

त्यासाठी तुम्ही 
व्हा थोडे उदार 
तरच तुम्हाला उघडेल
 मंत्रालयाचे दार 

सप्टेंबर २२, २०१४
अमोल केळकर 


Sunday, September 21, 2014

लाट


लाट मिळाली आहे  
           धुळीला !!
हेच कळत नाही आहे 
    कमलाबाई खुळीला  !!

( स्वतंत्र संघटना )  अमोल केळकर 
सप्टेंबर २०१४, २२

Saturday, September 20, 2014

' पोरखेळ'



' यु' म्हणाला ' ती ' ला 
चल  पाहू सिनेमा  ' पोरखेळ' 

निदान यानिमित्याने का होईना 
सत्कारणी लागेल आपला वेळ 

अमोल केळकर 
सप्टेंबर २०, २०१४ 

Friday, September 19, 2014

प्रस्ताव


दरवेळेला पाठवायचे  
नव नवीन प्रस्ताव 
मीच मोठा भाऊ म्हणत 
आणायचा उसना आव 

अमोल केळकर 
सप्टेंबर १९,२०१४

Thursday, September 18, 2014

स्वबळ


अंबाबाईच्या दर्शनाला 
नेत्यांचा आला पूर 
प्रत्येक कार्यकर्ता म्हणतो 
आमचेच नेते 'शूर'

प्रचाराचा नारळ फोडून 
स्वबाळाची  सुरु भाषा 
आम्हीच येणार जिंकून 
सगळ्यांना वेडी आशा 

Wednesday, September 17, 2014

रामदास


निवडणूक आली की 
आठवतात ' राम, दास '
बाकी सर्व काळ  
आवळायचा फक्त फास 

अमोल केळकर 
सप्टेंबर १८, २०१४

निवडणूक


युती आघाडी बनवताना 
नेत्यांचा चाललाय तोल 
आहे त्या जागा घेऊन येतोस 
का स्वबळ आजमवायचे बोल 

अमोल केळकर 
१७ सप्टेंबर २०१४

Monday, September 15, 2014

२८८ चे गणित


इतिहासाचा तास ( त्रास ) सुरु झाला . लिमये मास्तर  वर्गात आले.  त्यांच्या हातातील बीजगणीताचे  पुस्तक पाहून वर्गातील पोरांना जरा आश्चर्यच वाटले  .  अर्थात दोन्ही विषय लिमये मास्तरच शिकवत असल्याने तसा काही प्रश्ण नव्हता.
आल्या आल्या मास्तरांनी पोरांना सांगितले , मला कल्पना आहे  इतिहासाचा तास आहे पण मी तुम्हाला आत्ता एक गणित घालणार आहे. 

लिहून घ्या गणित 

एका  टोपलीत २८८ आंबे  आहेत .  यातील ' अ '  ग्रुपला १३५ आंबे  पाहिजे आहेत, ' ब ' ला  किमान १५०  आंबे  पाहिजे आहेत . ' क ' ग्रुपने सांगितले आहे की  आम्हाला दोन अंकी  आंबे  पाहिजेतच नाहीतर आम्ही  वेगळा विचार करू  , ' ड ' चे असे म्हणणे  आहे की त्यांनी स्वतंत्र पणे आंबे वेचायचे ठरवले तर त्यांच्या वाट्याला ५ तरी नक्की येतील , ' ई ' आम्हाला जर का मना सारखे आंबे मिळाले नाहीत तर आम्ही ही पिकणार नाही इतरांनाही  नासवू 

मुलांनो  तर सांगा  ' अ , ब, क, ड, ई   ला किती आंबे मिळतील 

गणित सोडवतानाची  गृहीतके : - 

१) या आंब्याचा एकत्र आमरस करून वाटून घ्यावा असे फालतू उत्तर नको  

२) या टोपलीत असलेले आंबे  कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र  , मराठवाडा , विदर्भ येथून आणून  एकत्र मुंबईत  भरलेले आहेत , वाटणी करताना  या सर्व आब्यांचा विभागवार विचार केला नाही तरी चालेल 

३) यात सर्व जातीचे (  हापूस, पायरी, रावळ , तोतापुरी ) आंबे आहेत. वाटणी करताना याचाही वेगळा विचार करायची आवश्यकता नाही 

४) नासके आंबे  टोपलीतून  बाद ठरवू नयेत 

याचे उत्तर तुम्ही मला पुढील गणिताच्या तासापर्यंत द्यायचे आहे . हे उत्तर तुम्ही स्वत: , किंवा २-४ जणांच्या ग्रुपने मिळून दिलेत  तरी चालेल. जो कोणी अचूक उत्तर देईल त्याला किंवा त्या ग्रुपमधील एकाला  मी वर्ग सेक्रेटरी करणार आहे. 
चला बरं  लागा कामाला… 

लिमये सरांचा हुकूम सुटताच  चिंटू , बंड्या, गोट्या लगेच कामाला लागले. यावेळेला तरी वर्गाचे सेक्रेटरीपद मिळायला पाहिजे यावर ते ठाम होते.   वर्गातल्या त्यातल्या त्यात  हुषार राजू ने ' एकाला ' चलो ची भूमिका घेऊन उत्तर शोधून ठेवायचे आणि वेळ्प्रसंगी इतर ग्रुपला मदत करून निदान उपसेक्रेटरी  पदतरी मिळवायचे  असा विचार केला. एका ' विनोदी ' स्वभावाच्या मुलाने  आपला मोर्चा सरळ हुशार मुलींकडे वळवला आणि  यावेळचे सेक्रेटरीपद मुलींमधूनच  असं ठणकावून सांगितलं . 
वर्गातील एका ' दादा' विद्यार्थाने डायरेक्ट त्याच्याहून ५ वर्ष  मोठ्या असलेल्या  भावाला ' विचारायचे ठरवले कारण त्याला पक्की खात्री होती की ५ वर्शापुर्वी लिमये सरांनी हाच प्रश्ण 'मोठ्या भावाच्या'  वर्गातही विचारला असणार . 
 
अशारीतीने सर्वजण आपापल्या पध्दतीने  उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले 

लक्ष फक्त एकाच होतं 

वर्गाचा  सेक्रेटरी बनणे . 

( क्रमश :  )

संकल्पना :  अमोल केळकर 

Friday, September 12, 2014

निवडणूक


कुणाचं वाजेल दिवाळं ,
कुणाची होईल दिवाळी 
लोकसभेनंतर आता 
विधानसभेची पाळी 




Related Posts Plugin for WordPress, Blogger...