नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, September 15, 2014

२८८ चे गणित


इतिहासाचा तास ( त्रास ) सुरु झाला . लिमये मास्तर  वर्गात आले.  त्यांच्या हातातील बीजगणीताचे  पुस्तक पाहून वर्गातील पोरांना जरा आश्चर्यच वाटले  .  अर्थात दोन्ही विषय लिमये मास्तरच शिकवत असल्याने तसा काही प्रश्ण नव्हता.
आल्या आल्या मास्तरांनी पोरांना सांगितले , मला कल्पना आहे  इतिहासाचा तास आहे पण मी तुम्हाला आत्ता एक गणित घालणार आहे. 

लिहून घ्या गणित 

एका  टोपलीत २८८ आंबे  आहेत .  यातील ' अ '  ग्रुपला १३५ आंबे  पाहिजे आहेत, ' ब ' ला  किमान १५०  आंबे  पाहिजे आहेत . ' क ' ग्रुपने सांगितले आहे की  आम्हाला दोन अंकी  आंबे  पाहिजेतच नाहीतर आम्ही  वेगळा विचार करू  , ' ड ' चे असे म्हणणे  आहे की त्यांनी स्वतंत्र पणे आंबे वेचायचे ठरवले तर त्यांच्या वाट्याला ५ तरी नक्की येतील , ' ई ' आम्हाला जर का मना सारखे आंबे मिळाले नाहीत तर आम्ही ही पिकणार नाही इतरांनाही  नासवू 

मुलांनो  तर सांगा  ' अ , ब, क, ड, ई   ला किती आंबे मिळतील 

गणित सोडवतानाची  गृहीतके : - 

१) या आंब्याचा एकत्र आमरस करून वाटून घ्यावा असे फालतू उत्तर नको  

२) या टोपलीत असलेले आंबे  कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र  , मराठवाडा , विदर्भ येथून आणून  एकत्र मुंबईत  भरलेले आहेत , वाटणी करताना  या सर्व आब्यांचा विभागवार विचार केला नाही तरी चालेल 

३) यात सर्व जातीचे (  हापूस, पायरी, रावळ , तोतापुरी ) आंबे आहेत. वाटणी करताना याचाही वेगळा विचार करायची आवश्यकता नाही 

४) नासके आंबे  टोपलीतून  बाद ठरवू नयेत 

याचे उत्तर तुम्ही मला पुढील गणिताच्या तासापर्यंत द्यायचे आहे . हे उत्तर तुम्ही स्वत: , किंवा २-४ जणांच्या ग्रुपने मिळून दिलेत  तरी चालेल. जो कोणी अचूक उत्तर देईल त्याला किंवा त्या ग्रुपमधील एकाला  मी वर्ग सेक्रेटरी करणार आहे. 
चला बरं  लागा कामाला… 

लिमये सरांचा हुकूम सुटताच  चिंटू , बंड्या, गोट्या लगेच कामाला लागले. यावेळेला तरी वर्गाचे सेक्रेटरीपद मिळायला पाहिजे यावर ते ठाम होते.   वर्गातल्या त्यातल्या त्यात  हुषार राजू ने ' एकाला ' चलो ची भूमिका घेऊन उत्तर शोधून ठेवायचे आणि वेळ्प्रसंगी इतर ग्रुपला मदत करून निदान उपसेक्रेटरी  पदतरी मिळवायचे  असा विचार केला. एका ' विनोदी ' स्वभावाच्या मुलाने  आपला मोर्चा सरळ हुशार मुलींकडे वळवला आणि  यावेळचे सेक्रेटरीपद मुलींमधूनच  असं ठणकावून सांगितलं . 
वर्गातील एका ' दादा' विद्यार्थाने डायरेक्ट त्याच्याहून ५ वर्ष  मोठ्या असलेल्या  भावाला ' विचारायचे ठरवले कारण त्याला पक्की खात्री होती की ५ वर्शापुर्वी लिमये सरांनी हाच प्रश्ण 'मोठ्या भावाच्या'  वर्गातही विचारला असणार . 
 
अशारीतीने सर्वजण आपापल्या पध्दतीने  उत्तर शोधण्याचा प्रयत्न करू लागले 

लक्ष फक्त एकाच होतं 

वर्गाचा  सेक्रेटरी बनणे . 

( क्रमश :  )

संकल्पना :  अमोल केळकर 
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...