नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Saturday, September 28, 2019

राजी - नामा गीत


*राजकारणात खरंच लळा, जिव्हाळा शब्दच खोटे*

गीत " राजी-नामा"यण 📝

' राजी- नामा' नाटक खोटे
माका - तुका होई.

कुणी कुणाचे नाही 'दादा'
कुणी कुणाचे नाही

ईडी येथे सूड साधते, तेथे नाही माया
कोण कुणाची बहिण भाऊ पती पुत्र वा जाया
सांगायाची नाती नुसती जो तो आपुले पाही

कुणी कुणाचे नाही 'दादा'
कुणी कुणाचे नाही

📝२८/९/१९
सर्वपित्री अमावस्या
Poetrymazi.blogspot.in

Wednesday, September 25, 2019

हुस्टन' आवडी प्रेमभाव


खास राजकीय भक्तांसाठी 🌷
अर्थात नेहमीचीच टिप: मनोरंजन हा हेतू
( चाल: विठ्ठल आवडी प्रेमभाव)

'हुस्टन' आवडी प्रेमभाव
"हाऊडी' नामाचा रे टाहो..
प्रेम भाव

मिटला हा संदेहो
जिंकण्यास 'तात्यांचा'
हाऊडी' नामाचा रे टाहो..
प्रेम भाव..

महान ट्रम्पतात्या उच्चार
दहशतवादी धर..
हाऊडी' नामाचा रे टाहो..
प्रेम भाव..

हेची 'नमो' आम्हा खरं
देश चालवावया योग्य भाव
प्रेम भाव..
हाऊडी' नामाचा रे टाहो..
प्रेम भाव

टुका(र) म्हणे लिहुन पाही
"हाऊडी हाऊडी महन्ताची
प्रेमभाव

हुस्टन' आवडी प्रेमभाव
"हाऊडी' नामाचा रे टाहो..
प्रेम भाव

 📝 २५/९/१९
poetrymazi.blogspot.in✔
अमोल

Sunday, September 22, 2019

आ s रे रे


🌳🌲  🚝🚝🚝🚝 🌲🌳

याद कुछ आता नही यह हुवा कबसे
हो गया मुश्किल छुपाना "राज़ "यह सबसे
तुम कहो तो माँग लू मैं आज कुछ रब से

आरे s s रे , आरे ये क्या हुआ कोई ना पहचाना
आs s रे, आरे बनता है तो बन जाए अफ़साना

'हात' मेरा थाम लो साथी जब तक हो
🌷🏹
बात कुछ होती रहे 'युती' जब तक हो
"सामना" 📰 बाटे  रहो तुम रात जब तक हो

आरे s s रे , आ रे ये क्या हुआ, मैं ने न ये जाना
🌷🤷🏼‍♀

📝२२/९/१९
poetrymazi.blogspot.in

Friday, September 20, 2019

तू जारं गड्या तुला कशाला भिती खड्डयांची


वैभव मांगले जी,
#खड्डयांची माळफुले अजुनी हमरस्त्यावर 👌🏻
🤣😝
अशी कलाकृती सादर करुन आपण विडंबनाचे जणू ' कंकू' लावलेत. खरं म्हणजे तुमच्यातील 'चेटकिणीला' हे कुंकू शोभून दिसले यात शंकाच नाही.
त्यापासून स्फूर्ती घेऊन आमच्यातील विडंबनाचा राक्षस जागा झाला आणि मग आम्ही पण हळूच
 ' सांगलीची हळद ' पेरली 😉

( सिनेमा : कुंकू
मुळ गाणे: मन सुध्दं तुझ गोस्त हाये पृथ्वी मोलाची)

मन 'घट्ट' तुझं गोस्त हाये 'लाख' मोलाची
*तू जारं गड्या तुला कशाला भीती  "खड्डयांची"*

झेंडा भल्या कामाचा 'खोदुनी' निघाला
'साटलोट' वाटेमधी बोचति त्याला
टेंडर चुकलं, तरि बि हंसल, शाबास त्याची
*तू जारं गड्या तुला कशाला भीती  "खड्डयांची"*

जो ओळखितसे 'खड्डा' म्हंजी मोठी कमाई
अन 'मलिष्काचे' फुलावानी घाव बी खाई
गळ्या 'मंदी' पडेल त्याच्या, माळ वैभवाची 😁
*तू जारं गड्या तुला कशाला भीती  "खड्डयांची"*

📝२१/९/१९
अमोल केळकर
poetrymazi.blogspot.in

#भारतीय विडंबन पार्टीत आपले हार्दिक स्वागत 💐🤝🏻😁

Thursday, September 19, 2019

आज पक्षात कुणी राहीना


काही वर्षांपूर्वीचे झी मराठी वरील  एका मालिकेचे  गीत : " आज खुलता कळी  खुलेना "  थोड्या वेगळ्या शब्दात

" *आज पक्षात कुणी राहीना* " ( एक खंत )

मी पहावे , तू पळावे
कारणे या मनाला पटेना
अंतरीची भांडणे ही
का तरीही सारी मिटेना

हीच निष्ठा, झाली खोटी
सूर दोघातले ही जुळेना
हेच कोडे ' राजे ' थोडे
सोडवावे तरीही सुटेना

आस नुसत्या सत्तेचीही 
"आज पक्षात कुणी राहीना"
वेळ चुकली  या घडीची 🕰
"आज पक्षात कुणी राहीना "

📝अमोल
१९/०९/१९

https://youtu.be/1Kw7dempsFU

Wednesday, September 18, 2019

राश्यांतर


🎭 जिवनातील रंगमंचावरील 'राश्यांतर' 🎭
⚡✨🌟⭐💫🌞🌝

मंडळी ,सध्याच्या या पक्षांतराच्या वावटळीने अनेक खास विषय सुचू लागलेत. काल आपण 'वर्गांतर' पाहिलं आज असाच एक आमच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ग्रहांचा राशीप्रवेश अर्थातच "राश्यांतर "

नेते मंडळींचे निवडणूकीच्या मागे - पुढे स्वत:च्या स्वार्थासाठी होणारे ' पक्षांतर ' आणि ग्रहांचे  'राश्यांतर ' यात खुप फरक आहे बरं का !
सध्या या पक्ष बदलू नेत्यांसाठी 'निसटावंत' हा शब्दप्रयोग रुढ झालेला तुम्ही वाचला असेलच

पण हे ग्रह मात्र ख-या अर्थाने 'निष्ठावंत'. कालचक्राने नेमुन दिलेल्या वेळेनुसारच राशी बदल करणारे. यातही रवि आणि चंद्र 'सुपर निष्ठावंत ' कधीच वक्री नाहीत.( याऊलट राहू, केतू कधीच सरळ नाहीत कायम वक्री. *पण मैत्री इतकी दांडगी की राशी बदल ही समोरासमोर अगदी एकाच वेळेला करतील*✔)  चंद्र २-१/२ दिवसात राश्यांतर करणार म्हणजे करणार. रवि दर महिन्याच्या १५-१६ तारखेला राशी बदल करणार म्हणजे करणार.
त्याखालोखाल बुध, शुक्र. कधी वक्री होतील पण रवि पासून मैत्री तोडून फार लांब जाणार नाहीत ( काही मुद्यांवर वैचारिक मतभेद फक्त ☺) राश्यांतर ही साधारण महिन्याभरात. काही जणांना चांगली बातमी देणारे.

पण मंगळाचे बुध, शुक्रासारखे नाही. रविच्या कितीही पुढे जाणार. राहू, केतू , हर्षल च्या सानिध्यात आला आणि त्याचवेळी स्वत: जरी वक्री झाला की एकदम स्फोटच 🙂. एक घाव दोन तुकडे, मुद्यावर ठाम.  राशीबदल सदा सर्वदा कल्याण करणारा असेलच असं नाही. पण हा ही राशीबदल कालचक्राने ठरवून दिलेल्या शिस्तीत.

"गुरु" बदल मात्र अनेक दृष्टीने 'पर्व काल' घेऊन येणारा. धार्मिक महत्वाचा तसेच विवाह/ मुंज इतर कार्यासाठी आवश्यक ठरणारा. गुरुबल 💪🏻दाखवणारा.
'गुरु विन कोण दाखविल वाट' असा हा गुरु नियमीत वर्षाने राशीबदल करणारा.

शेवटचे 'शनी महाराज' 🙏🏻.
 अडीच वर्ष एका राशीत राहून राश्यांतर करणारे. "साडेसाती" नामक अस्त्राद्वारे भल्याभल्यांना सरळ करणारे, त्यांची मस्ती उतरवणारे.

अशी ही वेगवेगळ्या ग्रहांची राश्यांतरे. प्रत्येकाच्या पत्रिकेनुसार, दशेनुसार  *नियती मग "रावाचा रंक आणि रंकाचाही राव " करण्यास मागे पुढे बघत नाही. आणि हे कुणालाच चुकत नाही बरं का*

*" पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा " हे ही नकळत ही नियती या ग्रहांच्या राश्यांतरातून शिकवून जाते*.

*तरीपण* तुमच्या पत्रिकेतील १२ ग्रह - १२ राशीतून - २७ नक्षत्रातून - त्यातील १०८ चरणातून भ्रमण करताना तुमचे  "कल्याण" करुन कुणाच्याही आयुष्यात  "खड्डा " पडू देऊ नयेत या शुभेच्छा 💐

श्री गुरुदेव दत्त 🙏🏻🌺

📝१९/०९/१९
poetrymazi.blogspot.in

*रात्रंदिन आम्हा, लेखनाचा आनंद*
*नकोच उपाधी, लेखक कविची ती*

वर्गांतर


वर्गांतर 🚶🏻👬

आमच्या सिटी हायस्कूल,  सांगली या  शाळेत अ, ब,क,ड अशा मुख्यत्वे तुकड्या हुशारी नुसार होत्या. यात अधिक सविस्तर जायला नको. सगळ्यांच्या लक्षात आले असेल. आपापल्या तुकड्या पण डोळ्यासमोरुन गेल्या असतील

नवीन वर्षे सुरू झालं की साधारण ८-१५ दिवसात 'वर्गांतर' नावाचा 'वर्ग प्रवेशाचा'  जंगी कार्यक्रम आमच्या शाळेत व्हायचा. त्यावर्षीच्या मार्कानुसारच वर्गांतर व्हायचे.
जरा हुशार असणारा 'ब ' तून 'अ' मधे जायचा. तिकडे हुशारीत कमी पडलेला इकडे यायचा. असे याचे मोघम स्वरुप असायचे आणि हे प्रत्येक पक्षात आपलं प्रत्येक वर्गात व्हायचे.

अशा या 'वर्गांतरीत' विद्यार्थ्याचे ऋणानुबंध मात्र जुन्या - नव्या ठिकाणी सगळीकडे रहायचे.

 मागच्या वर्षी आपल्या बरोबर 'बसणारा' मित्र  यावर्षी आपल्या बरोबर नसला तरी मधल्यासुट्टीत किंवा बाहेर इतरत्र कुठे भेटला की बरे वाटायचे.'
केला तो दंगा राहिली ती शांती ( गेले ते दिवस राहिल्या त्या आठवणी असे होऊन जायचे)

अशीच काही परीस्थिती/ मनस्थिती  सध्याच्या 'पक्षांतरीत' उमेदवाराची असण्याची शक्यता मला वाटते.
इथे मात्र 'स्व:खुशाली' ही हुशारी पेक्षा थोडी महत्वाची ठरु लागलीय.

शाळेत असताना मनात नसले तरी 'वर्गांतर' करावे लागायचे.
'पक्षांतराबाबत'  सर्वच शक्यता गृहीत धरता येतील.

*जे वर्षानुवर्षे एकाच वर्गात/ पक्षात राहिले त्यांना यातील मजा अजिबात कळणार नाही*. 😆

चला यानिमित्ताने आठवा ५वी  ते १० की कोण कोण बसायचे आपल्याजवळ. ( कारण सांगा म्हणल की इथे कुणी सांगणार नाही. निदान आठवा तरी)

अनुभवी "वर्गांतरीत" विद्यार्थी 📝
सिटी हायस्कूल,  सांगली
१८/९/१९

Tuesday, September 17, 2019

आजि मोदकाचा दिनु




" नैवेद्यम समर्पयामि 🙏🏻
( अंगारकी निमित्य श्री बुध्दी देवतेस सादर 🙏🏻)

आजि मोदकाचा दिनु
हर्षे उकडीचा बनु  !१!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे
नेवैद्यदाखवुनी, अवघी भरा रे शिदोरी! २!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे
आजि मोदकाचा दिनु

विघ्न नसे तिथे मुळी
ओतू या तुपाची पळी !३!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे

भरवा घास गौरी-गणु
संतोषला आत्मारामु !४!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे

कृपासिंधु 'मोरया'स्मरु ' 🙏🏻
रिध्दी सिध्दीदेवी वरु 🙏🏻 !५!

तोचि पाहिला रे, तोचि पाहिला रे

आजि मोदकाचा दिनु
हर्षे उकडीचा बनु  😋

📝 अंगारकी संकष्टी
kelkaramol.blogspot.in
१७/०९/१९

Sunday, September 15, 2019

अभियंता दिन


आमचे केमिकल इंजिनियरींग  💐

H2 पासून O पर्यंत
सगळ्यावरच पडलं पाणी
'केमीकल इंजीनिअर' बनून
आज सहज लिहितोय गाणी

'वारणेचा वाघ' बनलो
बुधगावचा ही झालो 'राजा'
केमीकल प्रोसेस ठरली
केवळ आमच्यासाठी मजा

किर्लोस्कर वाडीचा "कोरोकोट"
प्रोजेक्ट गाईड म्हणून ' कोलते '
आठवतही नाही चार वर्षे
आपल्याबरोबर कोण कोण होते?

स्कोप आहे खूप म्हणून
नोकरीला लागलो 'पेट्रो केसर'
लवकरच सोडली कंपनी जेंव्हा
पुढचा मार्ग दिसला धुसर 😁

बडबडणारा 'हर्षा भोगले'
आमचा आदर्श नेहमीच ठरला
केमीकल अभियंता नावाला
इतर गोष्टीतच जीव रमला.

तरीपण  "अभियंता दिनाच्या  सर्व केमीकल इंजिनियरना शुभेच्छा " 💐

📝१५/९/१९

Saturday, September 14, 2019

जीवलगा कधी रे येशील तू



सुवासिनी सिनेमातलील, केदार रागातील हे मुळ गाणे

हेच गाणे  कमळाबाई 🌷 आपल्या लाडक्या बाणाला 🏹कशी म्हणेल बघा..
( निव्वळ काल्पनिक, साधर्म्य आढळल्यास योगायोग समजावा)
---------------------------------------------
आचारसंहिता येऊ लागली,
 चल लवकर भेटू
'जिवलगा' कधी रे येशील तू...🌷🏹

'शरद' शोभा आता गेली
'वंचित'गंधा फुलली सुकली
'चंद्रकांते'सह वाढवून ठेविले अंतरिचे हेतू

'जिवलगा' कधी रे येशील तू 🌷🏹

'घड्याळी' या नुरली हिरवळ
फकीर 'हात' हा अवघा दुर्बळ
पुन्हा 'युतीचा' दिसू लागला 'सत्तांकित' सेतू

'जिवलगा' कधी रे येधील तू 🌷🏹

पुनरपि 'इले -क्षण' आलेली
'विधान-सभा' पुनरपि आली
पुनश्च 'वर्षा' लावी आकडे 'मातोश्रीवर' ओतू (२८८)

'भांडखोरा' कधी रे येशील तू 😛

📝१५/९/१९
poetrymazi.blogspot.in

# तुझं माझं जमेना परि तुझ्याशिवाय करमेना  🤪

Thursday, September 12, 2019

बाप्पा पोहोचले घरी


🔴 महत्वाची बातमी( ब्रेकिंग न्यूज)  🔴

नमस्कार भक्त परिवार 🙏🏻 याक्षणाची सगळ्यात मोठी बातमी  तुम्ही 'देवा तुझ्या द्वारी आलो' या वृत्तवाहिनी वर पहात आहात. 'दोन पाऊल पुढे' ठेऊनच मी 'तपस्वीनी' सगळ्यात आधी  तुम्हाला सांगत आहे. कृपया "उघडा डोळे , बघा निट "
 इथे कोपऱ्यात तुम्ही याक्षणाची सर्व चलचित्रे पाहू शकाल.सर्वप्रथम आपल्याच वाहिनीवर.

जे उशीराने इथे आले आहेत त्यांच्यासाठी,  या क्षणाची मोठी बातमी  सर्वप्रथम 'देवा तुझ्या द्वारी आलो ' वाहिनीवर

पृथ्वीवरुन आपल्या लाडक्या श्री गणेशाचे 
स्वर्ग - लोकी आगमन झाले आहे.
अत्यंत महत्वाची बातमी.  तब्बल १२ तास उशीराने गणेशाचे  स्वर्ग लोकी आगमन

आमचे प्रतिनिधी श्री नारद आत्ता तिथे आहेत. आपण सरळ त्यांच्याशी बोलू
नारद, कसं वातावरण आहे? आणि श्री गणेश आणि त्यांचा ताफा सध्या कुठे पोहोचलाय?

तपस्विनी, अतीशय आनंदाचे वातावरण आहे. तू इथे पाहू शकतेस की तब्बल १० दिवसांनी श्री गणेश परत आले आहेत. प्रथेप्रमाणे त्यांचा ताफा स्वर्गातील 'गणेश-लोकात ' आला आहे. रिध्दी-सिध्दी आणि इतरांनी त्यांचे औक्षण करुन त्यांचे स्वागत केले आहे. थोडी विश्रांती घेऊन ते तडक कैलासावर माता पार्वती , पिता महादेव यांच्या दर्शनास जातील.
तपस्विनी

धन्यवाद नारद या माहितीबद्दल. तू आमच्या भक्तांना काय अधिक माहिती सांगू शकशील. म्हणजे त्यांना यायला का उशीर झाला, येतानाचे त्यांचे सर्व नियोजीत कार्यक्रम पार पडले का?

तपस्वीनी, या ठिकाणी श्री गणेशाच्या ताफ्यातले मूषक मामा इथे आहेत. आपण त्यांच्याशी बोलू
मामा, नमस्कार 🙏🏻

नमस्कार. 🙏🏻

कसा झाला दौरा ? काही विशेष आठवण?

दौरा नेहमीप्रमाणे उत्त्तम.  विशेष म्हणजे भक्त जेंव्हा जयघोष करायचे, ' उंदीर मामा की जय, खाण्या-पिण्याची सोय ' तेंव्हा छान वाटायचं

मामा, दरवर्षी प्रमाणे परतीचे प्रयोजन तुमचे चुकते असं नाही वाटत?
मान्य आहे १२-१४ तास उशीर होतोय. खरं म्हणजे यावेळेसही पार्वती मातेने बजावलेले उशीर झाला तर सरळ 'महादेव समिती ' समोर उभे करीन. म्हणून आम्ही एक उपाय केला होता. पण अपयश आले.

कुठला उपाय, मामा?

वरुण ला आम्ही सांगितलेले की चतुर्दशीला येऊन ऐनवेळी जोरदार पड. तो आला पण भक्तांच्या उत्साहात तो ही इतका सामील झाला की लवकर जायचे आहे विसरून गेला आणि नेहमीप्रमाणे उशीर झाला.

आता मग चौकशी?

हा १-२ दिवसात आम्ही इंद्रदेवाना   अभ्यासासाठी अहवाल पाठवू त्यावरुन ते नवरात्रातील आचारसंहिता सांगतील.

मामा, येताना तुम्ही चंद्रावर  जाऊन 'विक्रम'ला ठिक करुन येणार होता अशी एक बातमी..

नारद, थोडं थांबवतेय मी तूला, आपण मामांशी नंतर बोलू.  आत्ताच कैलासावरुन एक बातमी येतीय. आपण थेट आपले प्रतिनिधी ' नंदी '  कडे जाऊ.

नंदी काय बातमी आहे?

तपस्वीनी ,आत्ताच कैलासावरुन एक निवेदन प्रसिद्ध झाले आहे आणि त्यात असं म्हणलं आहे की श्री गणेशाच्या ताफ्यातील सर्व मुषकांना 'गणेश' रत्न पुरस्कार देण्यात येणार आहे.  त्या निवेदनात कवी असलेल्या पार्वती मातेने चार ओळी लिहिल्यात, त्यातील चौथ्या ओळीतील शेवटचा शब्द त्यांनी सोडलाय. तो शब्द अचूक ओळखणाऱ्यास खास बक्षीस देण्यात येणार आहे
तपस्विनी.

नंदी हे कोडे काय आहे हे तू सांगशीलच पण या सोहळ्याचे कुणाकुणाला निमंत्रण आहे.

या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे श्रीविष्णू हेच असणार आहेत सोबत इंद्रदेव आणि इतर देवगण ही असणार आहेत.
तर माता पार्वतीने मूषकांचे कौतुक करताना म्हणले आहे
छान झालं .

त्याला सरळ आणलतं
गणेश लोकातील कक्षात
नाहीतर त्याला ही नेले असते
त्यांनी त्यांच्या  x x x 🌷

नंदी,  नंदी,  तूला माझा आवाज येतोय का?
बहुतेक आपला 'मंदी' शी संपर्क तुटलाय.

मालक , झोप झाली असेल तर उठा, कामाला लागा. मंदी, मंदी करुन मंदी जायची नाही.
बाकी #देवाक काळजी

मोरया 🙏🏻🌺

📝 अमोल
www.kelkaramol.blogspot.in

Sunday, September 8, 2019

मिठी


आज जर कुसुमाग्रज असते तर त्यांनी ' कणा' लिहिला तसं ' मिठी'ला ही अजरामर केले असते.

          :-   मिठी - : 📝

( संदर्भ : कुसुमाग्रजांची 'कणा' कविता)

पाहिलंत का सर आत्ता,तिथेच बोलला कोणी
कपडे होते अगदी साधे, डोळ्यामधे पाणी

क्षणभर बसला,नंतर रुसला बोलला वरती पाहून
चांद्रयानाचा संपर्क शेवटी थोडक्यात गेला राहून

 कार्यालयात 'इस्रो'च्या सर्वानी कष्ट केले
२२ जूलैला मग चंद्रयान आकाशात गेले

आॅर्बीट पकडले,फे-या मारल्या ठरल्याप्रमाणे जमले
'चंद्राच्या' ओढीने 'विक्रम' हळू हळू गेले.

शास्रज्ञांना बरोबर घेऊन, सर आता लढतो आहे.
संपर्क, चित्र  घेण्याचा प्रयत्न खूप करतो आहे.

मिठी मारुन सरांना, नव्या जाणीवेने उठला.
पाठिंबा दिलात तुम्ही,तरी एकटेपणा वाटला

तुटला जरी संपर्क तरी , मोडला नाही कणा
पाठीवरती हात ठेऊन फक्त लढ म्हणा.

🙏🏻🚀🌝

📝८/९/१९
अमोल
poetrymazi.blogspot.in

#चांद्रयान २
#के.सिवन
#इस्रो

Tuesday, September 3, 2019

कुर्यात सदा मंगलम्


कुर्यात सदा मंगलम् 🚀

( टिप: माझ्या लेखनात interest नसलेल्यानी कृपया आपापल्या जबाबदारी वर पुढे वाचावे. काही वेगळे विचार मिळाल्यास/ नाही मिळाल्यास  लेखक जबाबदार नाही)

हुश: खुप दिवसांपासू आपण ही भाऊंसारखे खणखणीत लिहावे असा विचार मनात आला. तुर्त वरची टिप जरा जमलीय असं वाटतयं,  हळूहळू जमेल ही लेखन 😬

म्हणतात ना "अपयश ही यशाची पहिली पायरी असते" . पण पुढे यशाच्या दुस-या, नाही तिस-या नाही पण निदान दहावी पायरी ते शिखर पर्यतचा मार्ग सहसा बघायला मिळत नाही.
असा एक मार्ग मी नुकताच बघितलाय सांगतो. थांबा.

त्याआधी आणखी एक

शाळेतील एका मैत्रिणीचा काल रात्री वय्यक्तिक निरोप आला तो गौरी आणायच्या मुहूर्ता संबंधी. तिला मी योग्य ते उत्तर पाठवेनच पण त्याक्षणी मला आठवली शास्त्रज्ञ 'तारा' ( हो विद्या बालनच). आणि अर्थातच सिनेमा " मिशन मंगळ "

तदेव लग्नं सुदिनं तदेव *तारा* बलं चंद्रबलं तदेव ।
*विद्या* बलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते तेंघ्रियुगं स्मरामि।।

कुर्यात सदा मंगलम् !!

सिनेमाची नाईका  'विद्या बालन' आणि सिनेमातील नाव 'तारा' कसं एकत्र छान गुंफल गेलय ना वरील श्लोकात?  इतर ही अनेक तारका समुहांनी ( अगदी मंगळाच्या मेष राशीतील कृत्तिका नक्षत्राचे नाव असलेली एक सदस्य)  'मिशन मंगळ'  आधीच्या अपयशाचा संदर्भ असताना कसा यशस्वी केला याचे नयनरम्य चित्रण म्हणजेच 'मिशन मंगळ'

तर या शास्त्रज्ञ ताराबाई  धार्मिक. म्हणजे घरातील पुजा अर्चा ते क्षेपणास्त्र उड्डाणाच्या वेळेला भटजी बोलवून ' प्रार्थना करण्या पर्यंतचा प्रवास ' हा श्रध्दे पासून श्रध्देपर्यंतच्या प्रवासातही मधे शास्त्र ( सायन्स) लागतं हे सांगणारा, पहाण्यासारखा. इथेच आम्हाला आमची वरील मैत्रीण ही आठवली.

या ताराबाईं सिनेमाच्या शेवटी एका प्रसंगात त्यांच्या मुलाला सांगतात.
Pray for power,  not for picture.

याठिकाणी माझ्या डोळ्यासमोर उभे राहिले ते क्षेपणास्त्र. 

"करकटावरी ठेऊनिया, सुंदर ते ध्यान " जणू साक्षात माऊली 🙏🏻
( पाॅवर पण आणि पिक्चर पण)

मग हीच माऊली क्षेपणास्त्राशी पूर्ण संपर्क सुटल्यावर योग्य वेळी 'स्विच आॅन आॅफ'  करायची प्रेरणा देते ( अनुभव कामास येतो) . अगदी क्लायमॅक्स मधे हीच ' माऊली ' आता हाती केवळ अपयश येणार असं वाटत असतानाच त्या यानाला मंगळाच्या भ्रमणमार्गात ' दत्त ' म्हणून हजर करते.  कोटी किमी दूर असणा-या शास्त्रज्ञांना ' कोटी कोटी रुपे ' या माऊलीच्या रुपात दिसतात आणी शेवटी गोंडस लाल मंगळ , जणू सांगतोय

अमंगलाचा खेळ चालला या धरतीवरती !
 होऊनी मंगल  यावे प्रभू हो या अवनीवरती !

अशुभची सारे जावो देवा , इतुकी  आस मना !
गजानना श्री गजानाना तुम्ही पावा  भक्त जना !!

🙏🏻🌺

पुढचे लेखन अती अवांतर,  फारच वेळ असेल तर वाचा

वय्यक्तिक मरगळ, सामुहिक मरगळ ( किंवा Whatsapp समुहातही मरगळ) आली असेल तर मोटिव्हेशन मिळण्यासाठी हा सिनेमा बघाच.
प्रामुख्याने महिला सदस्य असलेला ग्रुप एकदा active झाला की काय होऊ शकतं हे पहायला मिळतं
अगदी या आपल्या समूहासाठी ही हे लागू पडेल 👆🏻🙃

मोहिम यशस्वी झाल्यावर राकेश ( अक्षय कुमार) कायम त्याला विरोध करणा-या मोठ्या साहेबांचे आभार मानतो. समजलं काही. हेच मी म्हणतो ते उत्प्रेरक ( catalyst)  म्हणून टिकाकार हे चांगलेच,  आपल्याला फायदाच होतो.

आता अगदी शेवटच टुकार.
या सिनेमात मला 'अय्यंगार' नावाचं पात्र खुप आवडलं. त्याना पाहिल्याक्षणी मला वाटते गदिमा किंवा पु.ल तसे दिसत असावेत.
शास्त्रज्ञ होण्याचे स्वप्न तुम्ही कधी पाहिले हे आठवा असं जेंव्हा ताराबाई सगळ्या सदस्यांना म्हणतात तेंव्हा हे बालपणीचे अय्यंगार, आपल्या खेळण्याची गाडी घेऊन एका वेळी ५-६ राॅकेट कसे उडवतात हे दाखविले आहे. अप्रतिम
यापासून स्फूर्ती घेऊन हेच लिखाण मी ५-१० ग्रुप, फेसबुक, अनुदिनी,  रविवारची पुरवणी ( ट्विटर वाचलं,  एवढं लिहिता येत नाही त्यावर)
यावर असं च फेकणार आहे. लेखन न आवडणा-यांनी हेल्मेट घाला. चुकून लागायचे 😜

चला गौरी आणायचा मुहूर्त काढायचा आहे. दोन मंगळाच्या पत्रिकेचे गुण मिलन करायचे आहे

भेटू परत


📝 अमोल केळकर
४/९/१९
poetrymazi.blogspot.in
Related Posts Plugin for WordPress, Blogger...