नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, December 31, 2019

स्वागत २०२०


संध्याकाळी दिवेलागणी झाल्यावर "शुभंकरोती कल्याणम्" वगैरे स्तोत्र म्हणून झाल्यावर,
 हं , ' कुठं चाललात ' ?
 म्हणा पाठे !
निदान २० पर्यत तरी म्हणा असा आदेश वडीलधाऱ्यांकडून निघायचा .

मग २ ते ११ पर्यत फास्ट ट्रॅक वरुन सुटलेली पाढ्यांची गाडी, १२ ते १९ पर्यत स्लो ट्रॅकवर कशी यायची ते कळायची नाही.

२० चा पाढा मात्र परत सुसाट मेगा हायवेसारखा.

तो पाढा म्हणतानाची सहजता, आनंद आणि उत्साह तुम्हाला या आगामी २०२० वर्षात पुन्हा एकदा भरपूर मिळो या नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला सर्वांना

प्रेमळ शुभेच्छा 🙂
🙏🏻🙏🏻:💐💐


📝अमोल✌🏻
३१/१२/१९

Saturday, December 28, 2019


'गणित' या विषयात ज्यांना
" लळा, जिव्हाळा " आहे त्यांना दंडवत 🙏🏻.
आमच्या साठी हा विषय म्हणजे

वजा ➖ बेरीज ➕
रहस्य मोठे 🙄
फुल्या ✖ फुल्या ✖
येई
' गणित'  आमचे नाही राजा
'गणित ' आमुचे नाही

तरीपण :-

सर्व आंतराष्ट्रीय  'कवी ' मंडळीना ' गणिती'  दिवसाच्या शुभेच्छा💐

'आकडे' मांडून 'गणीत' सोडवणे जसे अवघड तसेच योग्य 'मात्रेत' 'अक्षरांचे ' गणित मांडून त्यावर 'अलंकारिक' वृत्ताचा साज चढवून सोपे जिवनाचे गणित अधिक अवघड भासवणारी 'कवी' मंडळी ही आजच्या दिनी कौतुकास पात्र आहेत 😉💐

याकाही ओळी त्यांच्यासाठी

'१३' मेरा '७' असो
' १७६० ' वेळा
पण काहीही असो तुम्ही
'४' ओळीतच खेळा

#'आंतराष्ट्रीय गणिती दिवसाच्या ' शुभेच्छा 💐

0⃣ ▶↔🔢
➕➖➗✖💲💱

📝 ७ वीत एकदाच शंभरपैकी शंबर मिळवणारा गणिती तज्ञ🤪

२२/१२/१९
poetrymazi.blogspot.in

शाळच्या मितरांची 'पार्टीत' भेट झाली


२०१९ ची शेवटची ' रविवारची टूकारगिरी '📝
 (  यावर्षीचे हे शेवटचे विडंबन आता २०२० मधे  "मी परत येईन" ✌🏻  )

मूळ गाणे : भन्नाट रानवारा मस्तीत शीळ घाली , रानच्या पाखरांची रानात भेट झाली

भरला ग्लास सारा, बाटली बाजू केली
शाळच्या मितरांची 'पार्टीत' भेट झाली 🥳

एकाच वर्गामंदी वाढलो एका ठायी
पुरान्या वळखिला पिण्याची नवलाई
खाण्याला 'शेव डाळ', चकली(ही) साथ आली
शाळच्या मितरांची 'पार्टीत' भेट झाली  🍾🍺

पुढ्यात रम व्हिस्की,वेटर घेऊन आला
बारच्या हॉलमध्ये  खमंग  वास भरला
काहूर आठवणींचे, 'प्रिती'ही आठवली 
शाळच्या मितरांची 'पार्टीत' भेट झाली 🍷🍻

बेवड्यांची  खूप गर्दी , काळोख दाट  झाला
उत्साह फेसाळला, विचार तेजाळला
सुचते तशातही " गाण्याच्या टुकार ओळी "
शाळच्या मितरांची 'पार्टीत' भेट झाली  🥂🥃

📝 अमोल ✌🏻
poetrymazi.blogspot.in

मूळ गाणे : -
भन्‍नाट रानवारा मस्तीत शीळ घाली
रानंच्या पाखरांची रानात भेट झाली

येकाच रानामंदी वाढलो येका ठायी
पुराण्या वळखीला ज्वानीची नवलाई
मनींची खूणगाठ लगीन गाठ झाली

रानाचा हिरवा शालू आकाश नीळा शेला
हवेच्या कुपीमंदी मातीचा वास ओला
बाशिंग डहाळीचं, वेलींच्या मुंडावळी

पानांची गच्च जाळी काळोख दाट झाला
काळोख गंधाळला काळोख तेजाळला
झुलती काळोखात गाण्याच्या दोन ओळी

Thursday, December 26, 2019

स्टेटस अच्छे होते है


" स्टेटस " अच्छे होते है ✌🏻

एव्हान सोशल मिडियाने ब-याच जणांना आपल्या मगरमिठीत घेतलेले आहे. डिपी, टँग, ट्विट यासारखे शब्द/ क्रिया आपल्या आता परिचयाच्या झाल्या आहेत. मध्यंतरी सुरु झालेला 'स्टेटस' ठेवणे/ लावणे हा प्रकार एक अनोखी गोष्ट ( क्रिएटिव्हिटी) असं मी मानेन. फेसबुक, व्हाटस अप वर आपण आजकाल सतत ते करत ही आलोय. किंबहूना समुहात एखाद्या मेसेजला प्रतिक्रिया न मिळता त्याच मेसेजला स्टेटस मधून रिप्लाय मिळण्याचे प्रमाण वाढतयं. कुणी कुणी अगदी किती वाजता आपलं स्टेटस पाहिलं हे कळतयं.

'स्टेटस'. समाज मनात असलेली ( की आपण करुन घेतलेली)   आपल्या बद्दलची प्रतिमा. खरं म्हणजे आपल ' स्टेटस ' काय हे इतरांनी ठरवायचे.
पण आजच्या या सोशल मिडियाद्वारे आपण आपली प्रतिमा/ इमेज/ विचार पुढे करुन आपले "स्टेटस" आपणच प्रोजेक्ट करायचे ही एक प्रकारे चांगली? / कौतुकास्पद  प्रक्रिया.

किती वेळ राहतो / दिसतो हा स्टेटस ? फक्त ३० सेकंद. किती लावायचे? कितीही
पण या 'स्टेटसचा' आपल्या सोबत रहायचा कालावधी फक्त २४ तास

म्हणजे तुमचे " स्टेटस" ही किती *क्षणभंगूर* आहे हेच तर सुचवायचे नसेल?  📝

दुस-या अर्थाने २४ तासात तुम्हाला बदलायची, आणखी चांगले व्यक्त होण्याची, चुकांची दुरूस्ती करण्याची संधी असंही बघता येईल

पूर्वी 'रिन' का 'सर्फ ' पावडरची जहिरात असायची 'डाग' अच्छे होते है

 आजचे माझे स्टेटस थोडेसे असेच
' स्टेटस' अच्छे होते है

समुहात व्यक्त न होता आपल्या वेगवेगळ्या "स्टेटसद्वारे" विचार करण्यास प्रवृत्त करणाऱ्या सर्व प्रभुतींना सादर समर्पित 🙏🏻

📝२७/१२/१९
 अमोल
poetrymazi.blogspot.in

Wednesday, December 25, 2019

बाॅक्सिंग डे, सूर्यग्रहण


बाॅक्सिंग डे 👊🏻👊🏻

नाताळ नंतर चा दुसरा दिवस म्हणजे
 "बाॅक्सिंग डे ". या दिवसाच्या अदल्या रात्रीच मोठा भाऊ 'राडा' करुन घरी आलाय.  आईला आधीच याचे वेध लागल्याने ती त्याची वाटच बघतीय. तो सकाळी घरी आल्याआल्या दोघांच्यात धडपकड सुरु झालीय.

अशा वेळी छोटी बहिण भावाला वाचवण्यासाठी मधे पडलीय आणि तिच्या मागे लपून (सावलीत) भाऊ आई पासून वाचण्याचा प्रयत्न करतोय

हं,  कवी कल्पना आहे 🤗
काहींना टुकार वाटेल

पण

 आकाशात बघा आज ८ ते ११. हेच दिसेल


हॅपी ' बाॅक्सिंग डे ' 👊🏻


आकाशाशी जडले नाते
ग्रह ता-यांचे
सूर्यग्रहण पहा कवीचे
लक्ष तिकडेच सा-यांचे

जोतिषाने सहज पाहिले पंचांग आsजचे
एक जाहले रविचंद्रकेतू धनू राशीsचे
उभे ठाकले ग्रह सावळे समोर दुहीतेचे

सूर्यग्रहण पहा कवीचे
लक्ष तिकडेच सा-यांचे

लुब्ध जनता दुरुन न्याहळी ग्रह 'धनू'र्धारी
चषम्या मध्ये एकटवुनिया निजशक्ती सारी 😎
सुरू जाहले मंत्र हळू हळू  'कृष्ण हरीचे '

सूर्यग्रहण पहा कवीचे
लक्ष तिकडेच सा-यांचे

उंचावुनिया पहा पापण्या पाहत ती राही
तडिताघातापरी भयंकर नाद तोची होई
ढगांनीमग केले वाटोळे आज ग्रहणाचे ☁☁

सूर्यग्रहण पहा कवीचे
लक्ष तिकडेच सा-यांचे
             
🌞(🌚)     🌝            🌏


📝अमोल
poetrymazi.blogspot.in
२६/१२/१९
#💍ग्रहण
#दे दान ( प्रतिक्रिया)सुटे गि-हाण
#बाॅक्सिंग डे 👊🏻👊🏻
#घाला शेण तोंडात 🥴आम्ही प्रसाद समजू 😋

Wednesday, December 18, 2019

हा ' टॅग ' गाडीला लावीतसे


विडंबन असे  ' फास्ट  टॅग '   केले की छान वाटते 🚧🚥🚘😬

हा ' टॅग ' गाडीला लावीतसे
( मुळ  गाणे : हा छंद जिवाला लावि पिसे ! )

तिथे टोल सखे भरपूर दिसे
खिशात ' मनी ' सर ले भलते 
दिनरात तुझा रे ध्यास जडे
हा ' टॅग ' गाडीला लावीतसे 

ती रांग  तुझ्या नजरेमधली
गाडी आपली नेहमीच बळी
'टॅगात ' असेल जादुखरी
गेलो ओलांडुनी  'फास्ट' कसे

आरशाच्या मागे चिकटव वरी
हा स्कँन होतसे लईभारी
तो मार्ग मग घायाळ करी
वेगात पळाली कार दिसे

📝अमोल
१८/१२/१९
poetrymazi.blogspot.in

मुळ गाणे :
तुझे रूप सखे गुलजार असे
काहूर मनी उठले भलते
दिनरात तुझा ग ध्यास जडे
हा छंद जिवाला लावि पिसें!

ती वीज तुझ्या नजरेमधली
गालीं खुलते रंगेल खळी
ओठांत रसेली जादुगिरी
उरिं हसति गुलाबी गेंद कसे!

नखर्यांत तुझ्या ग मदनपरी
ही धून शराबी दर्दभरी
हा झोक तुझा घायाळ करी
कैफांत बुडाले भान असे!

Monday, December 16, 2019

अधिक महिमा ➕


अधिक महिमा ➕

मंडळी नमस्कार 🙏🏻

इंग्रजी  कालनिर्णयानुसारचे सन २०१९  वर्षातील शेवटचे काही दिवस शिल्लक आहेत . नवीन वर्ष २०२० च्या दिनदर्शिकांची खरेदी ही एव्हांन अनेकजणांची झाली असेलच . आजकाल मोबाईल मध्ये पुढील ५० वर्षांपर्यत ( किंवा त्याहून जास्त ) च्या दिनदर्शिका जरी मिळत असल्या  तरी  दरवर्षी भिंतीवरील दिनदर्शिका घेऊन नवीन वर्षात सुट्ट्या केव्हा आहेत हे पहाण्याची मजा अजूनही मी घेतो. सर्वात पहिल्यांदा नवीन वर्षात आपला वाढदिवस कोणत्या वारी आहे , रविवारला लागून कुठल्या सुट्ट्या आल्यात , गणपती केव्हा आहेत ? इ इ .

 एखादा जोतिषी  असेल तर वर्षात होणारे ग्रहांचे राशीबदल , ग्रहणे  इ गोष्टी त्याच्यासाठी आपुलकीच्या असू शकतील. धार्मिक कार्य करणा-यांसाठी  विवाह - वास्तू - व्रतबंधन  मुहूर्त आपुलकीचे होऊ शकतात .

 तर मंडळी  यंदाच्या २०२० साल हे समस्त जावई  मंडळींसाठी ही विशेष आहे कारण सप्टें / ऑक्टोंबर मध्ये येणारा अधिक महिना ( अधिक अश्विन).
 अधिक महिना का असतो, त्याचे महत्व वगैरे ही माहिती आत्ता तरी आपल्याला घ्यायची नाही आहे  पण या  " अधिक  ( + )"  शब्दाशी आपण कसे परिचित आहोत हे पाहण्याचा केलेला हा एक ( टुकार ) प्रयत्न.

लहानपणी गणित शिकताना  अधिक  ( + )  हा शब्द  पहिल्यादा आपण शिकतो/ आपल्याला समजतो.  माझ्याबाबतीत बरीचशी बेरीज ( अधिक + ) असलेली गणिते वजाबाकी असलेल्या गणितापेक्षा जास्त बरोबर आली आहेत किंवा वजाबाकीच्या गणितां पेक्षा बेरीज असलेली गणिते मला जास्त आवडायची . थोडे मोठे होत गेल्यावर परीक्षेत अगदी  इतर विषयाच्या पेपरात  ' अधिक + पुरवण्या ' लावण्या एवढी मजल मात्र मी मारू शकलो नाही . 

अधिक / जास्त / अजून  या गोष्टीशी आपले नाते मानवी स्वभावानुसार  अगदी नैसर्गीक  आहे कारण जन्माला आल्यापासून आपले 'शारीरिक वय ' हे  वाढतच असते ( अधिक + ) , उणे कधीच होत नाही. ' मार्केटींग स्कीम ' मध्ये या  ' अधिक + ' गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसतो.  २ गोष्टींवर एक गोष्ट  फ्री ( अधिक ) , अमुक एक गोष्ट अमुक कालावधीत घेतली तर तिसरी एखादी गोष्ट अधिक मिळेल , एखादी  पॉलिसी/ ट्रॅव्हल प्लॅन / एखाद्या क्लबची मेंबरशीप घ्या आणि ही ( अधिक + ) बक्षिसे मिळवा इ इ इ.
दिवाळी/ होळी साठी  कोकणात सोडण्यात येणा-या जादा ( अधिक ) रेल्वे , पंढरपूर यात्रेसाठीच्या अधिक बसेस, दिवाळीत काही नशीबवान कर्मचा-यांना  मिळणारा बोनस ( अधिक )  एखाद्या उत्तम कलाकाराने सादर केलेली कलाकृती याला मिळालेला ' वन्स मोर ' ( अधिक + ) , शनिवार/ रविवार काही  मालिकांचा सादर होणारा एक तासांचा  विशेष ( अधिक + ) भाग , कुठल्याही मॉल मध्ये सिनेमाच्या तिकिटाबरोबरच खादाडी करण्यासाठी घेतलेला ( अधिक + ) कॉम्बो पॅक , मराठीतील काही म्हणी जशा ' आधीच  उल्हास त्यात फाल्गुनमास ' किंवा 'दुष्काळात तेरावा महिना' या सगळ्या गोष्टींचा  कुठे ना कुठेतरी  " अधिक + " शी संबध येतो असे वाटते . अगदी आजारी पडलो , अपघात  झाला  तर आयुष्यमान  वाढण्यासाठी जिथे आपण पोचतो त्या जागेचे चिन्ह ही '  लाल रंगात +  ' हेच असते.

 आणि शेवटी ते म्हणतात ना
 ' नॉट बट लिस्ट '  का काय ते .

 राजकारण ?  होय राजकारण या प्रकारातही आपण अनेकदा ' बेरजेचे राजकारण ' ऐकतो / पहातो की + ✌🏻

तर असा हा " अधिक + महिमा" आपणास आवडला असेल. तर सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीही १ दिवस अधिक घेऊन आला आहे. आधी लिहिल्याप्रमाणे सर्व जावयांसाठी ' अधिक मास ' पर्वणी आहेच . पण कधी तरी वाटत  ही  'अजून अजून / अधिक अधिक'  ची हाव  मर्यादित हवी . एकंदर मिळणा-या गोष्टीत समाधान आहे/ बास आता अजून अधिक नको . किती पळायचे त्या अधिक/अधिक च्या मागे? असे वाटणे ही महत्वाचे .

 लेखनाचा शेवट ' धीर ' धरी  असा मोलाचा सल्ला देऊन

होसी का भयकंपित धरसी का शंका
गाजतसे वाजतसे तयाचाच डंका 
'जय गोविद' 'जय मुकूंद'  'जय सुखकारी'

धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी

📝अमोल
१७/१२/१९
poetrymazi.blogspot.in

# ' अधिक ' (  + ) चांगलं लिहायला पाहिजे अजून असं सतत वाटून सतत लिहिते राहणा-या समस्त लेखक लेखिका/ कवी, कवयित्रींना समर्पित 🙏🏻

Thursday, December 12, 2019

हीच वेळ 'फजितीची'


सध्याच्या 'स्थगिती सरकार ' प्रती 📝

( चाल: एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात, शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात)
⏱🏹✋🏻

हीच वेळ 'फजितीची', सामील त्याला हात
शेवटची 'प्रगती' होती 🌷,तुझ्या प्राक्तनात

पदासाठी भांडून बसलो
मंत्रा -लया साठी अडलो
कधी युती मध्ये सडलो, आता आघाडीत

आरे, बुलेट, जा(ना)णार नाई
काही यांचा नेमच नाही
'समृध्दी'  शिवाय नाही, काहीच मनात

मुका बावरा तू भोळा?
दिसेल का तुझीया डोळा?
*संपेल का स्थगिती आता, तुझ्या निर्णयात*

हीच वेळ 'फजितीची', सामील त्याला हात
शेवटची 'प्रगती' होती 🌷,तुझ्या प्राक्तनात

📝१२/१२/१९
अमोल
poetrymazi.blogspot.in

Monday, December 9, 2019

तिन तिगाडा काम बिघाडा


तिन तिगाडा काम बिघाडा

काही काही गोष्टींचा आपल्या मनावर एवढा पगडा असतो की तशी वेळ आली की आपोआप मनात विचार येतातच. उदा. तीन जण एका विशिष्ठ कामासाठी एकत्र आले तर आता  या कामात काहीतरी 'बिघाड' होणारच किंवा एखादी गोष्ट सलग दोनदा झाल्यावर आता 'इजा,बिजा,तिजा ' होणारच यावर आपण ठाम असतो. अर्थात असे मत बनण्यात ब-याच दा अनुभवाचा ही वाटा असतो

पण याच ३ अंकाशी आपले फार ऋणानुबंध आहेत. अगदी आपला भूतलावरचा अवतार 'जन्म, जीवन , मृत्यू ' या तीन प्रमुख घटनांशी संबंधित आहे. जीवनप्रवाहात पुढे जात असताना 'भूतकाळ, वर्तमानकाळ, भविष्यकाळ' या तीन खिडक्यातून आपण सतत डोकावत असतो. वेगळ्या पद्धतीने सांगायचे झाल्यास बाल्य, तरुण,  वृध्दत्व या ३ अवस्था सर्वसाधारणपणे आपल्याला चुकलेल्या नाहीत. अगदी पत्रिका बघतानाही ज्योतिषी 'लग्न कुंडली',  'राशी कुंडली' आणि 'नवमांश कुंडली' अशा ३ पत्रिका बघतात

सृष्टीचे चे जे चक्र अव्याहतपणे सुरु आहे त्यातही हवामाना प्रमाणे आपण मुख्यत्वे ३ ऋतू येतात:- 'उन्हाळा, पावसाळा, हिवाळा'

लेख थोडासा धार्मिक अंगाने न्यायचा झाल्यास आपण प्रामुख्याने ३ लोक ( स्वर्ग, पृथ्वी, नरक) मानतो. देव धर्म,  पूजा अर्चा, देवदर्शन करतानाही तीनाचे महत्व दिसून येते. साधारण कुठल्याही देवळात देव दर्शन झाल्यावर किमान ३ प्रदक्षिणा आपण मारतो ( किंवा माराव्यात). पूजेच्या वेळी आचमन करताना 'केशवाय नम:, नारायणाय नम:, माधवाय नम: असे तीन वेळा आचमन करुन गोविंदाय नम: असे म्हणून उदक सोडतो.

आपल्या देशाचा राष्ट्रध्वज 'तिरंगा' म्हणून ओळखला जातो तर शत्रूच्या उरात धडकी भरवणारी तीन सेना दले आपल्याकडे आहेत. २६ जाने,  १५ आँगस्ट ला  राष्ट्रगीत म्हणल्यावर 'भारत माता की जय' चे नारे साधारण पणे ३ वेळा देतो

मंडळी म्हणूनच प्रत्येक वेळी एकत्र आलेल्या ३ गोष्टी वाईट नसतात. उद्याचा दिवस तर या दृष्टीने किती महत्वाचा आहे हे वेगळे सांगायला नको. ब्रह्मा,  विष्णू,  महेश या तीन बालकांचा 'अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त' रुपी जन्म झाला तो मार्गशीर्ष पोर्णीमेला. बाकी यामागील गोष्ट सगळ्यानाच माहिती असेल.

तेंव्हा जेंव्हा जेंव्हा ' तिन तिगाडा काम बिगाडा ' असं वाटेल तेंव्हा तेंव्हा एकच गोष्ट आठवायची

ब्रह्मा विष्णू आणि महेश्वर सामोरी बसले
मला ही दत्तगुरु दिसले. 🙏🏻🌺

असा बदल आपल्यातच झाला की जणू
 ' तिन्ही लोक आनंदाने,  भरुन गाऊ दे ' अशी भावना व्हावी

'तिन्ही सांजा सखे,  मिळाल्या,
देई वचन तुला.

 देणार वचन?   लागायच कामाला परत?
चला,
१, २, साडे माडे , तीन

📝१०/१२/१९
अमोल
poetrymazi.blogspot.in

Sunday, December 8, 2019

कांदे (अश्रू ) पूरम


आमच्या काही आवडीच्या मिसळी मग ती ठाण्याची 'मामलेदार' असो, शिवसेना भवन जवळची 'आस्वाद' असो किंवा थेट पनवेल जवळची 'दत्त स्नॅक' ची असो. बिचाऱ्या 

ऐका त्यांचे कांदे(अश्रू) पुरम् 🙁
( चाल: मेंदीच्या पानावर मन अजून झुलते गं)

कांद्याच्या दरावरुन वाट आमची लागली गं
शेव, फरसाणाचेही मन अजून झुलते गं

चिरचिरतो स्वयंपाकात तोच गार मूळा गं
हिरमुसतो मिसळीचा अजून 'कट' सारा गं

अजून तुझे क्विंटलचे दर कसे चढते गं
अजून आमच्या डोळ्यातील अश्रूपण कवळे गं

कांद्याच्या दरावरुन वाट आमची लागली गं
शेव, फरसाणाचेही मन अजून झुलते गं

📝८/१२/१९
poetrymazi.blogspot.in

Friday, December 6, 2019

स्क्रिन शाॅट


# स्क्रीन शॉट

 तुम्ही जो संगणक , लॅपटॉप , स्मार्टफोन  वापरता/ बघता  त्याच्या स्क्रीन / दृश्य भागाचा हुबेहूब फोटो काही  युक्ती वापरून घेणे  म्हणजे "स्क्रीन शॉट" घेणे.
जे  स्मार्ट फोनसारखी आधुनिक उपकरण वापरत आहेत त्यांना हे काही नविन नाही.

 आता तर अनेक फोन मध्ये "स्क्रिन शाॅट"  घेण्यासाठी  विशेष सोय  असते .संगणकात ही " प्रिंट स्क्रीन"  म्हणून पहिल्या पासून एक आॅप्शन आहे.

 पूर्वीच्या म्हणजे साधारण ५-६ वर्षांपूर्वीच्या स्मार्ट फोन मध्ये मला अजून आठवतंय "स्क्रीन शॉट " घेणं हे खायचं काम नसायचं .  ते व्हॉल्यूम आणि  मोबाईल चालू बंद  करायचं बटन एकाचवेळी दाबून चित्र पकडावं लागायचं. मला हे जमायला खूप वेळ लागला होता. ब-याच वेळा मोबाईल बंद व्हायचा. व्हॉल्यूम कमी जास्त व्हायचा  पण शंभर प्रयत्नात एकदाच तो फोटो मिळायचाच.

 त्यामानाने आता काम खूप सोपं झालाय. एका टिचकीसरशी स्क्रीन शॉट निघू शकतो.

तुम्ही म्हणाल हे काय हे लिहितोय आज ?
 मंडळी  आपल्याला सुचला विषय की आपण लिहितो. बरेच लेखन हे आपण त्या अनुभवातून गेल्यावरचे ही असते. आजचे लेखन ही जरा असेच हटके म्हणा हवं तर

थोडासा वेगळा विषय.
लहानपणी आपण अनेकदा भाडणं केलीत  मग ती  भावंडांच्यात असोत किंवा मित्रांच्यात असोत . परिस्थिती नुसार  ती  भांडणे वडिलधा-यांकडे , शाळेतील शिक्षकांकडे  जायची , मग असा काही संवाद व्हायचा

हा बोलं काय झालं

सर, असं असं झालं

का रे तू  असं बोललास ?

नाही सर , हाच असं म्हणला  वाटल्यास  तमक्याला  विचारा

कोण आहे रे तिकडे , बोलव तमक्याला

हा सांग रे तू  आता सगळं खरं

सर तो अमका आहे ना त्यानेच सगळं केलय

तुम्हाला सगळ्यांना शेवटची सूचना देतोय , परत असं होता कामा नये .
 संवाद समाप्त

हे लहानपणीचे सगळे अमके , तमके आता मोठे झाल्यावर   कुणी नक्की काय म्हणले , काय चर्चा केली हे आता "स्क्रीन शॉट" काढून  पुरावे द्यायला लागेलत

"स्क्रीन शॉटची टिचकी , गोत्यास काळ " 😬

तर असा हा "स्क्रिन शाॅटचा" महिमा

आपल्याकडे 'आरसा ' हा आपलं बाह्यस्वरूप पाहण्यासाठी वापरली जाणारी वस्तू. पण अशी ही एक गोष्ट  असायला पाहिजे होती की मारली टिचकी आणि आपल्या मनात काय चाललंय  याचा "स्क्रीन शॉट" मिळेल.

बरं का मंडळी,  आता मनात काय चाललंय हे "स्क्रीन शॉट" शिवाय ही  कळलं असत की, पण  आपलं ना "कळतंय पण वळत नाही " असं झालय. आधूनिक प्रणाली हाताशी असली कीच  ते खरं वाटत .

नामस्मरण, प्राणायाम या सगळ्या गोष्टीतून चिंतन, मनन हे सगळं विसरून आपण भलत्याच गोष्टीच्या आज मागे लागलो आहोत आणि बाह्य गोष्टीवरच जास्त अवलंबून रहायला लागलो आहोत हे आपले दुर्देव . थोडंस आपल्या आत आपणच डोकावून, आपण आपलाच "स्क्रिन शाॅट " घ्यायला काय हरकत आहे?

देव करो अन अस गाणं म्हणायची वेळ आपल्यावर येऊ नये:-

भांडणात शिरताना माझा का केलास घात ?
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

शिक्षकांच्या खोलीतून
आलो  मी एकटाच
दूर तिथे ' कळ ' लावे
हसले मागे कधीच
ह्या इथल्या वेदना या  सारे जण  जाणतात
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

सांग आता तुझ्याविन
भांडू  कसा भरपूर
तुझे शब्द छळवादी
अन हे मित्र फितूर

स्पर्श  तुझा जोरदार , मार होता जबराट
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

भांडणात शिरताना माझा का केलास घात ?
सख्या रे आवर तो , सावर तो "स्क्रीन शॉट "

📝 ©अमोल केळकर 🧐

Monday, December 2, 2019

महाग महाग महाग किती


टिप: ज्यांचा मंगळवारचा उपवास असतो त्यांनी इथूनच मागे जाण्यास हरकत नाही 🙏🏻🌺

अस्सल मटणप्रेमी पण वाढलेल्या दराने भडकलेल्या कोल्हापूरकरांना समर्पित 😋

( चाल : कठिण कठिण कठिण किती)

महाग महाग महाग किती
मटण दर हा बाई
बाजाराप्रती निघता अंत कळत नाही

पाहुनी बावड्यात मटण ,
मधुर दिसती
तरिही हसत उभारुनी खिसा चाचपती

रस्स्याचा सुंदरसा वास गुंफिती
किलो किलो भर परि शेवटी
घेऊन घरात जाई

महाग महाग महाग किती
मटण दर हा बाई
बाजाराप्रती निघता अंत कळत नाही

📝३/१२/१९
poetrymazi.blogspot.in 😋

आमचं ठरलंय, विडंबन जमलयं ✌🏻
Related Posts Plugin for WordPress, Blogger...