या सोनूच्या गाण्याची गोम काही कळेना. काल विधानभवनात जयंत पाटील यांनी गायले, अगदी सरहद्द पलीकडे ही हे गाणे पोचले. मग आम्ही ही सोनूपाशी पोहोचलो आणी एक विनंती केली 
सोsनू संगतीनं माझ्या तू येशील काय?
माझी टुकारी गाणी तू गाशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
माझी टुकारी गाणी तू गाशील काय?
आरं संगतीनं तुझ्या मी येणार नाय
तुझ्या टुकारी गाण्यावर भरवसा नाय
गं तुझं सुप्पर गाणं, लावलं खड्ड्यात जालं
माझं स्टेटस भोलं, त्यात अळीच झालं
माझ्या कडव्याचा तुटलाय भाव सारा सारा
रं नगं दावूस विडंबन तोरा, गा रं चालीत साळसूद पोरा
तुझ्या नजरेच्या विसंगतीला, अशी मी भुलणार नाय
माझं स्टेटस भोलं, त्यात अळीच झालं
माझ्या कडव्याचा तुटलाय भाव सारा सारा
रं नगं दावूस विडंबन तोरा, गा रं चालीत साळसूद पोरा
तुझ्या नजरेच्या विसंगतीला, अशी मी भुलणार नाय
रं माझा खड्या जाईना, तुझ्या ओळींची दैना
मी हायवेची मैना, तुझा टुकारी बाणा
खुळा लेखक रं, यमकामंदी फसला फसला
गं तुला शब्दांच्या पालखीत घालीन
गं तुला सर्विस रोड नं नेईन
मी हायवेची मैना, तुझा टुकारी बाणा
खुळा लेखक रं, यमकामंदी फसला फसला
गं तुला शब्दांच्या पालखीत घालीन
गं तुला सर्विस रोड नं नेईन
तुझ्या फसव्या या काव्याला, अशी मी गावनार नाय
सोsनू संगतीनं, माझ्या तू येशील काय?
---------------------
(सोsनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय
)
---------------------
(सोsनू तुझा माझ्यावर भरोसा नाही काय
1 comment:
फारच मस्त!
Post a Comment