'खुलता कळी खुलेना ' यात सुरेश भटांची ही गझल काय ऐकली आणी हे सुचलं
( भटांची माफी मागून
🏼)
( भटांची माफी मागून
हे तुझे सांजवेळी पियणे बरे नाही.
आणि गाडी हायवेला लावणे बरे नाही
आणि गाडी हायवेला लावणे बरे नाही
जे मागे दिले होते तेच पेय दे मला
मागचे जुने बिल टाळणे बरे नाही
मागचे जुने बिल टाळणे बरे नाही
ऐक तू जरा माझे.. सोड मोह पिण्याचा
आजकाल एवढे पियणे बरे नाही
आजकाल एवढे पियणे बरे नाही
पाहिली न कोणि आपुली जोडगोळी?
आपलीच बाटली फोडणे बरे नाही
आपलीच बाटली फोडणे बरे नाही
कालचा तुझा माझा ब्रँन्ड वेगळा होता
हे आज ग्लासातूनी सांडणे बरे नाही
हे आज ग्लासातूनी सांडणे बरे नाही
विडंबनाने या माझ्या शुध्द आज का आली ?
हाय हे टुकारलेखन वाचणे बरे नाही
हाय हे टुकारलेखन वाचणे बरे नाही
अमोल
No comments:
Post a Comment