नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, October 31, 2012

रि - अलायन्स




कुणाचे अलायन्स  कुणाशी
अन कधी  करायचे रिपीट
यावरच कळून येते तुमचे
राजकारणाचे  स्पिरीट

केसही यांचा वा़कडा
करता येणार नाही कुणाला
मग पत्रकार परिषदेत
प्रश्णांचा भडिमार कशाला ?













अमोल केळकर
३१ ऑक्टोंबर २०१२

Wednesday, October 24, 2012

फटकारे


कुणाची  होती हिंमत
म्हणायची का रे ?
जेंव्हा तुम्ही दिलेत
फटकारे
म्हणूनच महाराष्ट्रात दुमदुमते नाव
फक्त बाळासाहेब ठाकरे !!

Monday, October 22, 2012

( दिस चार झाले विज... हो... गायब होऊन )


दिस चार झाले विज... हो... गायब होऊन
घरा घरात आणि....
घरा घरात आणि वाडी रस्त्यातून
दिस चार झाले विज... हो... गायब होऊन

न कळत रिमोट कडे हात वळले
न कळत रिमोट कडे हात वळले
सासू सून मालेकेचे गित न दिसले
भारनियमाची  बातमी  रकाने भरुन
दिस चार झाले विज... हो... गायब होऊन

  -   निवृत्ती  -

चार दिशांनी आल्या ओळी
विसरले गेले वृत्त
तरी सगळे सांगत होते
हो 'अमल्या' निवृत्त

जमत नाही कविता
पण आहे मोठी धमक
म्हणून पडती आरोळ्या
जुळवून खालचे यमक

अमोल केळकर

Friday, October 19, 2012

चिल्लरशाही


लोकहीत करतानाच
साधले जाते स्वहीत
सध्याच्या नेत्यांची
हीच आहे  खरी रीत

स्वतःवरचे आरोप
मग
चिल्लर भासू लागतात
जेंव्हा विरोधी पक्षाचे नेते
पाठराखण करतात

अमोल केळकर
ऑक्टोंबर २०, २०१२


' बस डे '


पुणे  ' बस डे '  ( १ नोव्हेंबर ) ला हार्दीक शुभेच्छा ........

सकाळी सकाळी  बस स्थानकावर
  पुरेशी '  बस दे'    देवा   ! 
 असे झाले तर  कशाला
  ' बस डे '   हवा  !!

सकाळी वेळेत बस नसेल

 तर दिवस जातो वेस्ट !
पैसे जास्त घेतले तरी
मुंबईतील बस बेस्ट !!


( मुंबईकर ) अमोल केळकर


Wednesday, October 17, 2012

दर्शनाची रांग


देवीच्या दर्शनास
व्हिआयपी रांग
कशी फेडू पापे
माते तूच सांग

देवाच्या दर्शनास
लागेल सेवा कर
कलियुगातील भक्तांना
परमेश्वरा माफ कर

अमोल केळकर
१८ ऑक्टोंबर २०१२


' मेंबर ऑफ ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया '


ज्यांना याने लोळवले
त्यांनीच काढली ऑर्डर
आता कशी दिसेल
त्याला निवृत्तीची बॉर्डर 


या गोष्टीने  झालाय
तिथेही मोठा  वाद
अंतीम निर्णयासाठी 
मागू

तिस-या  पंचाकडे दाद

अमोल केळकर
ऑक्टोंबर १७, २०१२




Tuesday, October 16, 2012

बॉलीवूडची राणी


अय्या इश्श  करतंच
मराठीत आली राणी
पाहून तिची अदा
मागावे लागले पाणी

अमोल केळकर
१७ ऑक्टोंबर २०१२


Sunday, October 14, 2012

दर - वाढ



दरवेळेला दर - वाढीची
भोगतो आम्ही शिक्षा !
खिसा तपासून मगच
उभी करायची रिक्षा !!


सातच्या आत घरी !
पाचच्या आत पंपावर !
ह्या सगळ्यांपेक्षा  !
जावे आपणच संपावर !!
 


अमोल केळकर
१५ ऑक्टोंबर २०१२


' हिरॉईन ' चे लग्न


'करिना' का लग्न
आपली हिरॉईन...

होणार  आहे का आता
नवा सिनेमा साईन ?



अमोल केळकर
२२ सप्टेंबर २०१२



Saturday, October 13, 2012

६ का ९ ?


आमचे राज्य असेल तर
मिळतील नऊ सिलेंडर
जावयास सांगितले आहे
काढायला याचेच टेंडर

दुसरा कुणी येईल  तर
देईल सिलेंडर सहा

आल्या गेलेल्यांना  मग
कसा पाजणार  चहा ?


अमोल केळकर
९ ऑक्टोंबर. २०१२



आवाज कितीचा ?



आवाज कुणाचा ? विसरा आता 
आवाज कितीचा ? प्रश्न आहे .
वाघाच्या डरकाळीला ही आता
डेसिबलचे बंधन आहे .



Friday, October 12, 2012

मै आम आदमी हूं !!!


भारताच्या राजकारणात
उदयास येतोय नवा पक्ष
एकदाचा लावून टाकू
लोकपालचा सोक्ष मोक्ष  !

आम आदमीलाच सगळे
घालू शकतात मस्त टोपी
यानेच तर बनत जाते
राजकारणातील वाट सोपी !!

अमोल केळकर
ऑक्टोंबर ३, २०१२


Thursday, October 11, 2012

विधान सौध



समिती राहिली एकाकी
सारे नेते झाले मवाळ
सिमावासीयांच्या मनात
येतोय हाच खयाल

निषेधाचे खलिते
धाडले गेले गावोगावी
तरीही उभे दिमाखात
विधानसौध बेळगावी

अमोल केळकर
१२ ऑक्टोंबर , २०१२




Friday, October 5, 2012

* जावई माझा भला *


  'जावई माझा भला '
  रिलीज झालयं नाटक
  सुरवातीच्या खेळाचा
  रेट असेल माफक

 पक्ष कार्यालयातच
 रांग लागलीय तिकीटाची
 कार्यकर्त्यांमधे चढाओढ
 पहिला शो बघण्याची
 

अमोल केळकर
ऑक्टोंबर ६, २०१२

Thursday, October 4, 2012

मध्यावधी निवडणूक


नेत्यांची  भविष्यावाणी
निवडणूक येणार जवळ
दिसू लागेल उमेदवारांची
जनते बद्दल  तळमळ

मध्यावधी निवडणूकीचे
वारे लागतील वाहू
यानिमित्याने आपणही
व्यस्त नेते पाहू

अमोल केळकर
१३ ऑक्टोंबर , २०१२



Wednesday, October 3, 2012

रन - अवे - थेट


जरी केले होते सगळे सेट
पण जमला नाही रन रेट
मग कृपा करून शेजा-यांवर
परतलो आम्ही घरी थेट

अमोल केळकर

४ ऑक्टोंबर २०१२


Related Posts Plugin for WordPress, Blogger...