क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, May 24, 2016
Tuesday, May 17, 2016
नीट
प्रिय राजकारणी नेत्यांनो,
पुढील निवडणूकीत
हव्या असतील ' सिट'
तर वेळीच चर्चा करुन
गुंता सोडवा ' निट '
अमोल
१८/५/१६
पुढील निवडणूकीत
हव्या असतील ' सिट'
तर वेळीच चर्चा करुन
गुंता सोडवा ' निट '
अमोल
१८/५/१६
Tuesday, May 3, 2016
एक झिंगाट विडंबन -आज सैराट मेसेज आला
एक झिंगाट विडंबन
( चाल : आज आनंदी आनंद झाला )
आज सैराट मेसेज आला
जात मोडू चला, वर्ण उधळू चला
आला आला र पर्शा आला
झिंगाट गाणे ग सगळ्यांच्या ओठी शब्दही भरकटले
पोर पोरी रांगेत, झाली मग तर्राट, थेटर थरथरले
पर्शा दिसतो उठून, आर्ची आली नटून
नव्या सिनिमाचा भंगार केला
वय अशी कोवळी ग, खांद्यावरी ओढणी , संगास हो कुसंगती
कुणी म्हणे बालक , कुणी म्हणे पालक, मंजुळ नावे किती
रोज वेळ पाहून , थेटरात जमून
सांजसकाळी कल्लोळ केला
खेळ मग रंगला ग, लिहिणारा दमला, मेसेजवर मेसेज पडे
लपुन छपुन नेटकरी , मारतो ग पिचकारी, लेखांचे पडती सडे
होई पुरता हसा , आता नको फसा
टाईमपासाचा अतिरेक झाला
अमोल ४/५/१६
---------------------------------------------------------------------------------------
मुळ गाणे :
किती सांगू मी सांगू कुणाला
आज आनंदीआनंद झाला
रास खेळू चला, रंग उधळू चला
आला आला ग कान्हा आला
अष्टमिच्या राती ग यमुनेच्या काठी गोकुळ अवतरले
गोड हसू गालांत, नाचू गाऊ तालात, पैंजण थरथरले
कान्हा दिसतो उठून, गोपी आल्या नटून
नव्या नवतीचा शृंगार केला
मूर्ति अशी साजिरी ग, ओठांवरी बासरी, भुलले सुरांसंगती
कुणी म्हणा गोविंद, कुणी म्हणा गोपाळ, कान्हाला नावे किती
रोज खोड्या करुन, गोपबाळे जमून
सांजसकाळी गोपाळकाला
खेळ असा रंगला ग, खेळणारा दंगला, टिपरीवर टिपरी पडे
लपुन छपुन गिरिधारी, मारतो ग पिचकारी, रंगांचे पडती सडे
फेर धरती दिशा, धुंद झाली निशा
रास रंगांच्या धारांत न्हाला
Subscribe to:
Posts (Atom)