क्रिएटिवीटी रोज एक , भले असो टुकार अन फेक ; a.kelkar9@gmail.com, ९८१९८३०७७० (अपराध माझे कोट्यानुकोटी , तरीही करितो अजून एक कोटी ) ...संकल्पना : अमोल केळकर
नक्की ऐका
मी विडंबनकार कसा झालो
नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा आज दि. १६ सायं. ७ वा. l भाग २८९ l कथावाचन l लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, December 8, 2023
Saturday, November 25, 2023
Monday, November 6, 2023
Monday, October 30, 2023
ही घडी अशीच राहू दे
नोकरीच्या ठिकाणी सरासरी तुम्ही कितीही काम करत असला तरी,एखाद्या दिवशी
अर्धा दिवस लवकर निघून, वानखेडेवर क्रकेट सामना बघायला जाणे
डाँट आँफीस सुटण्याच्या वेळेवर निघून एखाद्या दिवशी बायकोबरोबर 'आई कुठे काय करते' मालिका बघणे
'आज जरा तब्येत ठिक नाही, येईन असं वाटत नाही' असा मेसेज सायबाला पाठवून गावाहून आलेल्या मित्रासंग मुंबई दर्शन करणे.
रात्रीचे उशीरा संपलेले नाटक/ मैफिलीच्या धुंदीत दुस-यादिवशी जरा १-२ तास उशीरा जाणे.
पावसाळ्यात अमुक ठिकाणी पाणी साठलंय/ लोकल बंद झालीय/ वेधशाळेचा इशारा,यावर सिझनला एकदा तरी 'बेनिफिट आँफ डाऊट' घेऊन संपुर्ण आँफीस लवकर सोडायला लावणे.
खंडेनवमीला दुपार नंतर काम-बंद आंदोलन उत्स्फूर्त करणे.
एखाद्या सहका-याचा संध्याकाळी असणाऱ्या निरोप समारंभ कार्यक्रमाच्या तयारीसाठी दिवसभर बाहेर राहून, आपली ही काही कामे करुन घेणे.
दोन सुट्यां मधे आलेल्या भाकड दिवशी मात्र अगदी वेळेवर उपस्थित राहून आपण किती महान हे मॅनेजमेंटला दाखवणे.
मात्र आज महिन्याच्या शेवटच्या दिवशी बारा वाजले तरी चालेल टार्गेट पूर्ण करूनच जाणार ( भले यासाठी टवाळखोरी सकाळी उरकावी लागली तरी चालेल) याची तयारी ठेवणे.
याला #जीवन_ऐसे_नाव
दोन घडीचा डाव
देवा, नारायणा !
' कार्यालयात ही घडी अशीच राहू दे
सत्तर तासावरी , उसंत लाभू दे '
( अमोल)
#नारायण_नारायण
#माझी_टवाळखोरी 📝
३१/१०/२३
Saturday, October 28, 2023
Saturday, October 14, 2023
हार्दिक पंड्या आणि मी
काल हार्दिक पंड्याने विकेट घ्यायच्या आधी काय मंत्र म्हणला, नमस्कार केला ( काळी जादू केली असंही कुणी म्हणतय) ,नक्की काय केलं हे त्यालाच माहीत पण तो चेंडू टाकण्याआधी तीव्र इच्छाशक्ती त्याच्या एकंदर कृतीतून एकवटलेली आणि त्यानंतरचं फळ सा-यांनी पाहिले.
हे काल पाहिल्यावर मला लहानपणी आम्ही ५-३-२ किंवा ७-८ पत्यांचा डाव आठवला. पुढचा डाव सुरु करण्या आधी मागच्या डावाचे 'हात' कुणी कुणाचे १-२ ओढले असतील ( आम्ही हे असंच म्हणायचो) तर ते सेटल व्हायचे. ब-याच दा आमचेच ओढले जायचे, क्वचित आम्हाला ओढायचा चान्स मिळायचा. अशावेळी आम्ही मनाला येईल तो पत्ता मागायचो जसे वरुन तिसरा, खालून चौथा, मधला. अशावेळी जे कार्ड यायचे तो त्याच्याकडचा चोथा असायचा आणि आम्हाला फारसं हाती काही लागायचं नाही.
याउलट आमचा एक मित्र असं काही कार्ड ओढायचा की एक्का, राजा, किंवा हुकुमाचा पत्ता काहीतरी महत्वाचं कार्डच यायचं.
आत्ता आठवतंय तो ही हार्दिक सारखं काहीतरी करायचा, सारखी आपल्या हातातली पाने बघायचा, आकडेमोड करायचा आणि समोरच्याचा खेळ खल्लास.
मी ब-याच दा त्याला विचारायचो अरे आम्हाला पण सांग काय करतोस?
एकदा त्याने तो मंत्र सांगितला.आम्हीही दुस-याचा पत्ता खेचण्याआधी फूल इच्छा व्यक्त करुन, आकडेमोड वगैरे करून पाने मागायला लागलो
अर्थात त्याने सांगूनही त्याच्यारखी पाने खेचायला आम्हाला जमली नाहीत.
खूप वर्षाच्या गॅपनंतर अचानक परवा तो मित्र भेटला. मला म्हणाला, अरे लहानपणी खेचायची ट्रिक सांगितलेली जमलीय की तुला, गुरूदक्षिणा केंव्हा देतोयस? मला काही कळेना. म्हणलं अरे ५-३-२ वगैरे मी केंव्हाच सोडलंय.
तो म्हणाला ते नाही रे, आजकाल तुझी टवाळखोरी वाचतो
चांगलचं खेचायला शिकलायस की
अजूनी मी दिलेला मंत्र काम करतोय म्हण की
अशारितीने आम्हाला जे काही यश मिळालंय त्याचे बीज लहानपणीच्या पत्यांच्या खेळातील इच्छाशक्ती चे आहे हे आत्ता कळाले.
या देवी सर्वभूतेषु, इच्छा रुपेण संस्थिता !
आपल्या सर्व इच्छा लवकरात लवकर पूर्ण होवोत, या सदिच्छा 🙏💐
#माझी_टवाळखोरी 📝
१५/१०/२३
poetrymazi.blogspot.com
Saturday, September 30, 2023
स्वच्छांजली
स्वच्छांजली:- 📝
१/१०/२३
मुख्य पक्षाच्या कार्यालयाबाहेर मोठा कार्यक्रम ठरला होता. पक्षाचे सर्व नेते ते सामान्य कार्यकर्ते यांना निरोप गेले.
कमळाच्या आकाराचा मोठ्ठा हौद बांधला होता. वाॅशिंग पावडर 'कमळा' ची गाणी होती, ठिक ठिकाणी जहिराती होत्या.
कार्यक्रमाची सुरवात प्रार्थनेने झाली. इतर पक्षातून नुकत्याच योग्य टायमवार आलेल्या एका समूहाने प्रार्थना म्हणली
*दे दी हमे आझादी, सारा बचाके काला माल*
*स्वच्छता के विश्वगुरु कर दिया कमाल*
असं म्हणून ते सारे हौदा कडे डुबकी मारायला जायला लागले त्याचवेळी एक उद््घोषणा झाली.
मित्रो, हा हौद नव्या आलेल्या लोकांसाठी नाही. त्यांना तर आम्ही आधीच डुबवले आहे.
आज पक्षांतील सर्व जुन्या नेत्यां पासून ते सामान्य कार्यकर्त्यापर्यंत डुबकी मारुन स्वत:ला स्वयंसिद्ध करायचे आहे
डुबकी मारलेल्या सर्वांना
'स्वच्छांजली ' प्रमाणपत्र घरपोच पोचवण्याची जबाबदारी इतर अराजकीय स्वयंसेवकांवर सोपवली आहे. ते तुमच्या घरी योग्य प्रकारे पोचतीलच
असे म्हणून तो आवाज 'डुबूक ' आवाज काढण्यासाठी हौदाकडे गेला आणि मागे समर्थकांची रांग लागली
🌷🌷🌷🌷🌷🌷
#स्वच्छांजली
poetrymazi.blogspot.com
Sunday, September 24, 2023
Wednesday, September 20, 2023
आमचे पप्पांनी विकास आणला
"आमचे पप्पांनी गणपती आणला" हे यंदाचे गणेशोत्सवातील प्रसिद्ध झालेले गाणे.
या पासून स्फूर्ती घेऊन
आमचे टवाळखोर _गाणे भक्तांच्या शब्दात 😎 *
( निव्वळ मनोरंजन हा हेतू *)
आमचे पप्पांनी विकास आणला
आमचे पप्पांनी विकास आणला
मुंबईची कराया शांघाई
डोस्कावर बसली महागाई
वटारून बघतोय चांगल
आमचे पप्पांनी विकास आणला
आमचे पप्पांनी विकास आणला
गळ्याला त्याच्या पक्ष लागला
इडीने पप्पांना इशारा केला
भ्रष्ट आचा-याला अभय दिला
आमचे पप्पांनी विकास आणला
आमचे पप्पांनी विकास आणला
ईश्वगुरुंना कामाचा व्याप
भुंगे आले बाप रे बाप
भिती कशाची कमळाला
आमचे पप्पांनी विकास आणला
आमचे पप्पांनी विकास आणला
( लाडका भक्त) 📝
२०/०९/२०२३
#ऋषीपंचमी
#माझी_टवाळखोरी 📝
https://youtu.be/trTaytD1eW4?si=CLFfZwqilihCfvWc
Tuesday, September 19, 2023
गणेश चतुर्थी
आज भाद्रपद शु चतुर्थी दिवशी 'चंद्र ' बघू नये यावर ठाम असणाऱ्यांसाठी मोलाचा सल्ला :*-
ढगाळ हवामान आहे चंद्र दिसणं शक्यच नाही म्हणून बिंधास्त राहू नका कारण
घरगुती किंवा सार्वजनिक मंडळात अनेकांनी चंद्रयानाचा देखावा केला आहे. नेमकं तिथे दर्शन व्हायचे चंद्राचे.
त्यापेक्षा घरीच रहा 😬
मोरया 🙏🌺
#माझी_टवाळखोरी📝
१९/०९/२३
( टिप: लेखनाचा उद्देश चंद्र दर्शन न करण्याबाबत आठवण करून देणे आहे भले काही ठिकाणी ढगांचे आच्छादन नसेल ही )
Sunday, September 17, 2023
नावात आणि नंबरात काय नाही
संभाजी नगर मधे बछड्यांची नावे ठेवताना पहिल्या चिठ्ठीत 'विक्रम' नाव आले. दुसरे नाव कदाचित 'वेताळ' अपेक्षित असताना नेमकी 'आदित्य' नावाची चिठ्ठी आल्याने राज्यकर्त्यांचा घोळ झाला बहुतेक
परत एकदा आमच्या राज्यकर्त्यांनी शेकस्पिअरला खोटे पाडले.
ता.क : केवळ नावच नव्हे तर नंबराॅलाॅजीत ही ( न्यूमराॅलाॅजी कदाचित बरोबर शब्द असेल पण आम्ही भारतीय आहोत,इंडियन नाही त्यामुळे आमच्यासाठी नंबरालाॅजीच लाॅजिकल शब्द आहे) आम्ही भारतीय मागे नाहीत
आजचंच बघा ना, आज ७३ नंबरचा दिवस होता यात शंका नाही
आज अंतीम सामन्यात तळपलेला गोलंदाज सिराज याच्या शर्टामागे नंबर होता ७३ आणि आजच आमच्या सन्मानीय पंतप्रधानांचा ७३ वा वाढदिवस होता
म्हणूनच आज आम्ही सहज विजय प्राप्त केला, अध्यक्ष महोदय !
#कोण_म्हणतं_नावात_काय_नाही?
#कोण_म्हणतं_नंबरात_काय_नाही?
#माझी_टवाळखोरी 📝
१७/०९/२३
www.poetrymazi.blogspot.com
Friday, September 15, 2023
संपता श्रावण
संपत्या श्रावणावर आलेल्या शुक्रवारी म्हणजे काल अनेक मैफिली रंगल्या असे कळते. एके ठिकाणी तर नेहमीची आवर्तने झाल्यावर सगळे जायच्या तयारीत असताना एकजण म्हणाला कुठं चाललाय, बसा अजून
झालेली आवर्तने अधिक श्रावणाची होती.
निज श्रावणाची आता सुरु करु
डोळे पाणावले भावाच्या बोलण्याने सगळ्यांचे
१६/०९/२३
माझी_टवाळखोरी 📝
poetrymazi.blogspot.com
Thursday, September 14, 2023
लिहून मोकळं व्हायचं
केमिकल इंजिनियरींग ला असताना प्रॅक्टिकल परीक्षेनंतर जी व्हायव्हा ( तोंडी परिक्षा ) असायची त्यावेळी आमचा ग्रुप जाम टेंशन मधे असायचा.
त्यावेळी मित्रांचे टेंशन कमी करण्यासाठी आम्हीही हेच सांगायचो जे काही दिवसांपूर्वी मा.मुख्यमंत्री बोलले
"आपण बोलून मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं " 🏃🏻♂️🏃🏻♂️🚶🏻♂️
मित्र ही , " हो, यस्स म्हणून दुजोरा द्यायचे "
हा प्रसंग घडला त्यावेळी शेजारी ' एक्स्टर्नल परीक्षक' ऐकत होता हे आम्हाला कळले नाही आणि जेंव्हा हे लक्षात आले तेंव्हा ही फारशी चिंता वाटली नाही कारण
साक्षात 'एचोडेश्वर'( HOD) आमचे प्रोजेक्ट गाईड होते.
त्यामुळे मतांवर आपलं मार्कांवर जास्त परिणाम होणार नव्हता याची खात्री होती ( आणि तसंच झालं)
हीच थेरी/ केमिस्ट्री / सूत्र पुढे आमच्या अनेक मित्रांनी नोकरी करताना साहेबाच्या केबिनमध्ये ही वापरून यश संपादन केले. अनेक जण आज ( आमच्यासह) चांगल्या पदावर आहेत ते याचमुळे
असो. यानिमित्याने मी परत एकदा तमाम मित्र मंडळीना ही थेरी प्रत्येक क्षेत्रात ( उदा. सोशल मिडियावर व्यक्त होताना वगैरे) उपयोगी आहे हे आवर्जून सांगेन.
विशेष टिप: या थेरीचा उपयोग स्वतःच्या घरात, स्वत:च्या बायकोसमोर मात्र आपापल्या जबाबदारी वर करावा. ' सूत्र ' फेल गेल्यास 'सूत्रधार जबाबादार नाही,
'भिंतीला ही माईक' असतात याची नोंद घ्यावी 😊
इंजिनियरींग दिनाच्या शुभेच्छा 🙏💐
( अमोल) 🧪
१५/०९/२३
#लिहून_मोकळं_व्हायचं
#इंजिनिअर्स_डे
#माझी_टवाळखोरी 📝
poetrymazi.blogspot.com
Wednesday, September 13, 2023
अराजकीय गोष्ट
( अराजकीय 📝)
पहिला मित्र:
आपण पिऊन मोकळं व्हायचं फक्त आणि निघून जायचं.
दुसरा : हो,Yes
आम्ही :- निर्लज्यांनो मी ऐकतोय मागे उभारून तुमच्या.
दरवेळेला काही झालं की बिल माझ्या नावावर 😠
#श्रावण_संपतोय
#माझी_टवाळखोरी
१३/०९/२३
poetrymazi.blogspot.com
Friday, September 8, 2023
Thursday, September 7, 2023
नावात काय आहे
अखंड हिंदू राष्ट्राचे स्वप्न पाहणारे आज 'भारत' नावावर ठाम आहेत.
बदलायचं तर 'हिंदुस्थानच' करा की
( मुंबईत ९ डब्याच्या लोकल १२ डब्याच्या करताना १५ डब्याच्या कराव्यात हे लक्षात न आल्याने आता परत १२ च्या १५ करायचा खर्च करावा लागतोय 😊 ,असो)
भावा शेक्सपिअरा,
म्हणून गेलास तू
'व्हाट इस देअर इन नेम '
इकडं असतास तू तर
झालाच असता तुझा गेम
अजिबात मान्य नाही म्हणलेले
नावात आहे काय?
नावात आणि नावे ठेवण्यात
असतं बर का खूप काय
०८/०९/२३ 📝
poetrymazi.blogspot.com
( आमच्या कडे जन्म तारखेवरुन नावाचे अद्याक्षर देण्यात येईल 😌 )
Tuesday, August 22, 2023
Sunday, August 13, 2023
गदर Vs गद्दार
एकदा ठरवलं की 'महाराष्ट्रातील राजकारणी' अगदी 'बाॅलीवूडला' पण टक्कर चांगल्या प्रकारे देऊ शकतो.
विश्वास नाही बसत?
हे बघा
'गदर ' नंतर 'गदर २ 'यायला किती वर्ष लागली बाॅलीवूडला??
पण आमच्याकडे
'गद्दार १ ' नंतर लगेचच 'गद्दार २ ' आला 😬
#उडजा_काले_कव्वा_तेरे
#उडाले_ते_कावळे_राहिले_ते
#माझी_टवाळखोरी 📝
१२/०८/२३
Thursday, August 10, 2023
मंगळागौर गाणी Updated Version
भोंडला/ मंगळागौरीची ( आधुनिक) गाणी
Updated version ....
किस बाई किस
"फ्लाईंग किस"
टोमँटोची फोड,लागतीय कडू
नको बाई असल्या
भानगडीत तू पडू
किस बाई किस
"फ्लाईंग किस"
माझ्याने टोमॅटो घेवईना 🍅
गंपूला सत्ता गवसेना !!
किस बाई किस
//////////////////////
खजिन्याची पेटी धनुष्यापाशी 🏹
त्याच्या किल्या घड्याळापाशी ⏰
कमळीच्या बिंदल्या झाल्या की नाही? 🌷
करीन म्हणते दिल्लीच्या वा-या, सोनारबाई, सोनारदादा ।
//////////////////////
मध्यान रातीच्या भालू गो ।
आमदार किती फोडू गो ।
रेशन घातले 'खोके'भर ।
पावणे झाले 'पक्ष'भर ।
नेते आमचे नाराजले ।
पावणे आमचे सुखावले ।
//////////////////////
आड बाई अडाणी
आडाचे प्रोजेक्ट सारवणी ।
आडांत होता गणोबा ।
गणोबा आमचा सत्याचा ।
पाऊस पडला मोत्यांचा ।
आड बाई अडाणी
आडाचे प्रोजेक्ट सारवणी ।
"ईडीत" अडकला शिंपला ।
त्याचा कारभार संपला
#माझी_टवाळखोरी 📝
//////////////////////
इतर गाण्यांसह जुना लेख इथे वाचता येईल.
http://poetrymazi.blogspot.com/2017/08/blog-post_16.html
Monday, July 31, 2023
दगडुशेठच्या भेटी
( काल्पनिक / प्रासंगिक * )
विंदांची माफी मागून
दगडुशेठच्या भेटी,विश्वगुरु आला
तो जाहला सोहळा,(पुण्य) नगरीत
जाहली दोघांची, मंदिरात भेट
मन की बात , दोघांमध्ये
बाप्पा म्हणे,गुरु तुझे कर्म थोर
अवघेची पुरस्कार घेणे केले
विश्वगुरु म्हणे , एक ते राहिले
"स्व"राज्य न जाहले, महा-राष्ट्रावरी
बाप्पा म्हणे, बाबा ते ना बरे केले
त्याने तडे गेले पक्षा पक्षात
अंकल अट्टल, त्याची रीत न्यारी
बळकावुनी खाती, येऊनिया
विश्वगुरु म्हणे, तुझ्या आशीर्वादाने
तरून जाईल, भक्त माझा
बाप्पा म्हणे, गड्या वृथा शब्दपीट
प्रतेकाची वाट , वेगळाली
वेगळीये वाटे, वेगळाले काटे
काट्यासंगे भेटे,पुन्हा तोच
ऐक ऐक वाजे
घंटा ही मंदिरी
असंतोषाचे जनक ,वाट पाहे
गुरु निघोनिया, गेले एक दिशा
कवतुक सदा-शिवी,आवरेना ! !
अमोल 📝
०१/०८/२३
Saturday, July 29, 2023
You are no longer admin
You are no longer admin
सध्या आमच्या शाळेच्या व्हाटसप ग्रुप मधे आमचा एक मित्र हा खेळ खेळतोय. वयाच्या पन्नाशीला आलेला आमचा समूह.
असं म्हणतात की' ( हे मीच म्हणतोय, "असं म्हणतात की वगैरे लिहिलं की जरा जोर येतो)
तर असं म्हणतात की, ५० नंतरचा प्रवास ६०,७०,८० असा वयाने होत असला तरी मनाने आपण ४०,३०,२० करावा. आता आमचा मित्र एकदम वयाच्या १० व्या वर्षा पर्यत पोहोचलाय एकदम फास्ट.
सुरवातीला त्याला कर्माची, संस्काराची,मैत्रीची, मानसिक स्थितीची भीती दाखवून झाली पण तरी काही उपयोग नाही झाला
( हा लेख हा आता शेवटचा उपाय 😝, बघू)
नंतर एकानं लक्षात आणून दिलं तो देवेंद्रजींचा अट्टल फँन आहे. मी परत येईन, मी परत येईन म्हणून ही ते अजूनही मुख्य Admin होईनात त्याचा राग तो आमच्या काहीजणांवर काढतोय. देवा भाऊना जे फिलींग येतंय तेच फिलींग तो आम्हाला You are no longer admin मधून देतोय.
बाबा रे!, उद्या देवाभाऊंच इकडं काय जमलं नाही तर दिल्लीला जातील रे,तेंव्हा डायरेक्ट समुहातून काढून वगैरे नको टाकूस
एकवेळ सतरंजीवर बसू पण आमच्यासाठी शेवटपर्यत हीच गल्ली आहे
#रविवारची_टवाळखोरी 📝
३०/०७/२३
poetrymazi.blogspot.com
Sunday, July 23, 2023
बार्बी
बार्बी/ BAR- B
काल पोरांना हा सिनेमा दाखवायला थेटर वर सोडायला गेलेलो. सिनेमा बघायला आलेले सगळेचजण 'गुलाबी' ड्रेसमधे आलेले ( मुलंही याला अपवाद नव्हती)
मजा वाटली या जनरेशनची. पिक्चरच्या थिमला साजेसा पेहराव.
(काही महिन्यांपूर्वी आलेल्या "बाईपण भारी देवा" या सिनेमालाही बायकांचा ग्रुप साधारपणे सिनेमातील व्यक्तीरेखेच्या अनुषंगाने नटून जाताना बघितला)
नाही तर आम्ही. अनेक सिनेमे तर शाळेच्या खाकी चड्डी,पांढरा शर्टवर पाहिलेत.
त्यावेळेला असं काही नव्हतं नशीब नाहीतर 'शहेनशहा' बघायला हाताला प्लॅस्टर घालून जावं लागलं असतं अन 'टारझन' च्या वेळी पानं लावून.
बार्बीचं गाणं तसं ऐकिवात आहे. त्यातील एकही इंग्रजी शब्द कळत नाही. आज सहज गुगल वर त्याचे लिरिक्स वाचले. त्यातील एका कडव्यातील शेवटचे वाक्य 👇🏻
I'm a Barbie girl, in the Barbie world
.......
...........
*Imagination, life is your creation*
आता या ओळीत जीवन जगण्याचे सार वगैरे दडलेले असेलही पण
#माझी_टवाळखोरीच मर्म तरी दुसरं काय आहे?
(माझ्या जवळच्या मित्रांना माहित आहे ती जास्त रंगते जेंव्हा आम्ही A पेक्षा B साईडला बसतो.
शाळेत ही 'ब' तुकडी भारी देवा असं उगाच नाही म्हणायचो आम्ही☺️)
२४/०७/२३
poetrymazi.blogspot.com 📝
Tuesday, July 18, 2023
कोण म्हणतं Lokशाहीस मान नाही?
*कोण म्हणतं बेवड्यास मान नाही*
नावाचं एक गाणं सोशल मिडियावर मध्यंतरी तुफान व्हायरलं झालेलं . श्री संदीप नावाच्या कोकणी माणसाने ते सादर ही तितकचं छान केलंलं
( इच्छुकांना ते युट्यूब वर बघायला मिळेल)
हे आठवायचं कारण म्हणजे घाटकोपरच्या एका समाजसेवकामुळे अशीच एक गोष्ट निदर्शनास आली. वरच्याच शब्दात सांगायची झाली तर
*कोण म्हणतं Lokशाहीस मान नाही?*
उगाच लोकं बोंब मारत होते, सगळीकडे हिटलरशाही आहे, हिटलरशाही आहे म्हणून
Lokशाही आहे, आता तर त्याचा T.R.P ही वाढला आहे.
( असो, याबाबत यूट्युबवर काहीही सर्च करु नये आम्ही सांगतोय ना Lokशाही अजून जिवंत आहे.झालं तर मग)
#माझी_टवाळखोरी 📝
#कोण_म्हणतं_लोकशाहीस_मान_नाही
१८/०७/२३
www.poetrymazi.blogspot. com
Monday, July 17, 2023
अधिकमासस्य प्रथम दिवसे!
मेघदूत बनला जावई
अधिकमासस्य प्रथम दिवसे!
हिंदमातेने मग केले वाण
पटवून अंधेरी सब - वे ला
कसे बसे ☔!!
#मुंबईचा_जावई
#जावई_माझा_भला
#अधिक_मास
#माझी_टवाळखोरी 📝
अधिक श्रावण प्रतिपदा
१८/०७/२०२३
Thursday, July 13, 2023
Sunday, July 9, 2023
दो दिवाने शहर में
दो दिवाने शहर में
मंडळी सध्या सोशल मिडियावर एका आजी-अजोबांचा 'रिम- झीम गिरे सावन ' या गाण्यावरचा एक व्हिडीओ बराच व्हायरल झाला आहे ( तो इतका प्रसिध्द झाला आहे की यू ट्यूबवर हे गाणे सर्च केले असता मुळ गाण्याच्या आधी हा व्हिडिओ येतोय )
अफलातून क्रिएटीव्हिटी यांची. गाण्यातील हिरो - हिराॅईन तसेच हे आजी- अजोबा.मुळ गाण्यातील ठिकाणे, अभिनय , बॅकग्राउंडला येणा-या टँक्सी, बेस्ट बसेस जसंच्या तसं घेण्याचा चांगला प्रयत्न केलाय. छान वाटतं बघून. हे सगळं शूट करणाऱ्या टिमला आमच्याकडून पैकीच्या पैकी गुण.
या रिलची मोहिनी अनेकांना पडली आहे असे काल आमच्या लक्षात आले. खारघरला गोल्फ कोर्स च्या बाजूच्या डोंगरलाईन मधून रस्त्यावरून पडणाऱ्या धबधब्यांसह अनेक अमिताभ आणि स्मिता रस्त्यावर पडून 'आज रपट जाये तो हमें ना उ.ठा.ओ' म्हणत पोरांकडून रिल्स बनवून घेत होते. त्याचवेळी एका कपलने माझ्या कडून छत्री घेऊन, दुस-या एका कपलची मुलं उसनी घेऊन राज- नर्गीस स्टाईलने "फिर भी रहेगी निशानीयाँ" यावर रिटेक वर रिटेक घेत रिल बनवणे चालू ठेवले होते.
हे सगळं पाहून आपण का मागं रहायचं? आपण पण असं काहीतरी मुंबईत जाऊन करु म्हणून आमच्या राणी ला बोललो.
अर्थात तत्काळ नकार देत म्हणाली तुम्हाला सांगितलयं ना मी की जुलै महिन्यात मी मुंबईत जाणार नाही. केंव्हा कुठे अडकू सांगता येणार नाही.
शेवटचा उपाय म्हणून मी विचारलं?
"आती क्या खंडाळा?"
सध्या ती राणी मुखर्जी सारखं हसण्याचा सराव करतीय आणि मी काड्यापेटीचा बाॅक्स आणलाय
चेतावणी: या रिल्सच्या शूटिंगमुळे येत्या शनि/ रविवारी लोणावळा/खंडाळ्यात ट्रॅफिक जाम होण्याची शक्यता आहे. आपापल्या जबाबदारीवर येणे
#अरे_घुमेंगे_फिरेंगे_नाचेंगे_गाऐंगे
#ऐश_करेंगे_और_क्या?
( आणि अशारीतीने आम्हाला त्यापुढील आठवड्यात मुंबईत होणाऱ्या शाळेतील मित्रांच्या गेट- टू -गेदरला घरून परवानगी मिळाली ☺️)
#माझी_(मान्सून)_टवाळखोरी 📝☔
Friday, July 7, 2023
बाहुलीचं( दुसरं) लगीन,
*एक फुल 🌷, दो माळी*
( प्रासंगिक विडंबन,मनोरंजन हा हेतू)
बाहुलीचं( दुसरं) लगीन, झोक्यात लागलं
(पहिल्या) नवरोबानं,भांडण काढलं
बाहुलीबाई नटून मंडपात थांबली
'बाणेकरी ' येताच बोलणं ते वाढलं
आम्हा नाही स्पेस म्हणे पुढे येऊन सासरा
आम्ही तुमच्या 'घड्याळजींना' देऊ कसा आसरा
गोवा- गुवाहटीचा देऊ का हो दाखला
असं म्हणून मंडपात सगळ्यांना तो चावला
बाहुलीचं( दुसरं) लगीन, झोक्यात लागलं 🌷🪆
(पहिल्या) नवरोबानं,भांडण काढलं
इडीबिडी पदार्थ त्याच्या तोंडामधे कोंबले
स्वाहाकाराचे मुद्दे त्याल मग झोंबले
'त त त त तो-यात ' सेक्रेटरी धावला
कानानधे अध्यक्षांच्या काहीतरी बोलला
बाहुलीचं( दुसरं) लगीन, झोक्यात लागलं 🌷🪆
(पहिल्या) नवरोबानं,भांडण काढलं
थोडासा रूसवा, दिल्लीचा फतवा
मंडळी हसू लागली
गुरुजी आणून ,शपथा घेऊन
लग्न लावू लागली
थोरं आली, चिन्ह आणली
पक्षसारी दुभंगली
बाहुलीचं लगीन झोकात लागलं
व-हाड सुखावलं
#माझी_टवाळखोरी 📝
Thursday, July 6, 2023
काहीपण देगा देवा
" काहीपण देगा देवा '
ज्योतिष शास्त्रासंबंधीत ' व्यवसाय जातक' नावाचे एक पुस्तक वाचनात आहे. यात 'सुखवस्तू' लोकांचे ग्रहयोग दिले आहेत. थोडक्यात खूप काही Ambitious नसलेले , आहे त्यात समाधानी, फारशी रिस्क न घेणारे, परंपरेने आलेला व्यवसाय चालवणारे, मुळ गाव न सोडणारे इ इ लोक्स या वर्गीकरणात येतात. यांच्या पत्रिकेतील ग्रहांचे नाते एकमेकांशी गुण्या- गोविंदाचे असते. उगाच कोण वक्री नसतो, एकमेकांशी स्फोटक केमिस्ट्री नसते , शुभ ग्रह खूप चांगले नसतात, पापग्रह खूप त्रास देत नाहीत.दशा ही फारशा वाईट नसतात. जन्म, शिक्षण, नोकरी/व्यवसाय, लग्न, संतती, निवृत्ती, वृधत्व हे चक्र व्यवस्थित पार पडते.
अँडजेस्मेंट,फ्लेक्झिबलपणा त्यांच्या रक्तात असतो. पत्रिकेतील बहुसंख्य ग्रह द्विस्वभाव राशीं संबंधित असतात.
त्यामुळे त्यांचा विशेष काही आग्रह नसतो
थोडक्यात जातकाला आणि ज्योतिषांनाही फारसा ताप न देणारी यांची पत्रिका असते.
" काहीपण " चालेल हे यांच्या जीवनाचे सूत्र.
आज नाष्टयाला काय करायचे असे घरी विचारले गेले(च) तर - "काहीपण" हेच उत्तर ब-याचदा त्यांच्याकडून येते
फिरायला कुठे जायचे - कुठेही, सिनेमा कुठला बघायचा - कुठलाही हीच वृत्ती ते कायम ठेवतात.
उद्या हे मंत्री झाले आणि खातेवाटपाच्या वेळीही फारशी किरकिर न करता 'काहीपण' चालेल (पण द्या )ही भूमिका ठेवतील.
अशा व्यक्तींसाठी तुकोबांची रचना वेगळ्या शब्दात
काहीपण देगा देवा
पोहे,मॅगी ,उपमा!
जया अंगी 'काही'पण
तया यातना कठीण !
महापूरे झाडेजाती
तेथे 'काहीपण' वाचती!
#काहीपण_देगा_देवा
#माझी_टवाळखोरी 📝
०७/०७/२३
Tuesday, July 4, 2023
पहाटे नंतर आज पाहिली
वसंत बापटांची माफी मागून
( * मनोरंजन हा हेतू)
मुळ गाणे: शतकानंतर आज पाहिली पहिली रम्य पहाट
पहाटे नंतर आज पाहिली दुपारची विल्हे-वाट
पक्ष फुटले , सदन गहिवरले
सत्तेसाठी नव गणित जमविले
'देवगिरीत' जे जाऊनि जमले,मंत्रीपद फटक्यात
आजवरीच्या अंधारात
अनंत झाले उल्कापात
एकवटोनी तेज फुटीचे तिमिर सरे घनदाट
फकिरांनी शत यज्ञ मांडिले
ईडीमध्ये तेच दाखले
त्या शक्तीची राष्ट्रावर ये 'अजीत' 'एक'च लाट
दीप पेटवूनी कार्यालयाचे
पूजन केले स्वातंत्र्याचे
त्या राड्याची ठेच लागुनी झाले आज विराट
पुरेत अश्रू दुबळे क्रंदन
भावपूर्ण करु विनम्र वंदन
नव समिकरणाचे होऊ आम्ही 'सिल्व्हर शाही' भाट
पहाटे नंतर आज पाहिली दुपारची विल्हे-वाट
* माझी_टवाळखोरी 📝
५/०७/२३
www.poetrymazi.blogspot.com
Sunday, July 2, 2023
सावधान
#सावधान
आज डोंबिवलीत एका वधू-वर मेळाव्यास उपस्थित राहिलो. लेटेस्ट ट्रेन्ड काय चालला आहे हे बघायला मिळाले. पूर्वी वेस्टनच्या मुली सेंट्रल चा मुलगा पसंत करीत नसत.
आज या विचाराचे अँप अपग्रेड झालेले बघितले
चक्क डोंबिवली (पूर्व) च्या मुली डोंबिवली (पश्चिम) ला जात नाहीत असं एका मुलाची आई खेदाने सांगत होती.
नशीब हा ट्रेन्ड आत्ता सुरु झाला. आमच्याकाळात सांगलीत असा काही विचार नव्हता. असता तर, 'नाही हं ! मला साखर कारखान्यावरचा मुलगा अजिबात नको,गुलमोहर काँलनीतलाच पाहिजे फारतर विश्रामबाग परिसरातील चालेल असं सांगून आमची केस त्याचवेळी रिजेक्ट झाली असती.
एक गोष्ट जाणवली ती म्हणजे मंगळ, एक- नाड, सगोत्र या गोष्टी आता इतिहासजमा होत आहेत किंवा तसा विचार सुरु झालाय
असो.
मेळाव्याचे आयोजक माझे साडूच होते. त्यांच्यामुळे माझ्या कार्याची म्हणजे पत्रिका बघणे वगैरेची अनायसे जहिरात झाली.
आता त्यांचा पुढचा मेळावा १६ जुलैला पुण्यात आहे तर पुण्यातील ज्या मुलींना कोथरूड/बावधनहून सहकारनगरला जायचे नाही, विमाननगरहून पाषाणला यायचे नाही त्यांच्यासाठी एक सुवर्णसंधी पुण्यात आहे एवढेच सांगतो.😬
शेवटी तमाम लग्नाळू वधू -वरांचे २,७ ( आणि साडू-साडूंचे ११वे स्थान) अँक्टीवेट होऊन, "शुभ_मंगल" होवो याच यानिमित्याने शुभेच्छा
💐💐
#स्वप्नपुर्ती_विवाह_मंडळ_पुणे
#माझी_टवाळखोरी 📝
२/०७/२३
Sunday, June 18, 2023
आषाढस्य प्रथमदिवसे
आषाढस्य प्रथमदिवसे
ऊन पडलं लख्ख....।
सूर्याला ही बघायचा होता
महाकवींचा 'मेघ-दूत' चक्क 🌤️ !!
नाराज झाली धरणी, वर्षा
नाराज झाल्या सर्व सरिता ।
आता तरी पडू दे पाऊस
वाचून ही टूकार कविता !!
आषाढ शु प्रतिपदा
१९/०६/२३
माझी_टवाळखोरी 📝
Thursday, June 15, 2023
मान्सून_पूर्व_कविता
'बेडकाच्या' सतत ओरडण्याने 🗣️
'हत्ती' ला झाली कानदुखी 🙀
मेंढा, गाढव, कोल्हा, म्हैस
शोधून दमले कुणाची चुकी
गंमत पाहून सगळ्यांची
पावसाला आवरेना हसू..
आपण तर साधी माणसं
सांगा, विकेंडला कुठं, बसू ? 😝
#मान्सून_पूर्व_कविता
#अराजकीय
#पावसाळी_वाहन
#माझी_टवाळखोरी 📝
Tuesday, June 13, 2023
जहिरातीतील मर्म
कवी नारायण सुर्वे यांची क्षमा मागून ( परत एकदा)
*मनोरंजन हा हेतू
--------------------------------------------------
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
हिशोब करतो आहे आता, किती पैसे भुरर्कन उडाले
शेकडो वेळा फोन आला, इमेल आले, बोलणी सुरु झाली
जहिरातीतील मर्म शोधण्यात जिंदगी बर्बाद झाली
कालच्या जहिरातीतील माझे टक्के , जनतेकडेच गहाण राहिले
भाकरी सारखं आज जहिरातीलाही फिरवून पाहिले
दरवेळी बंडखोर वळविले असे नाही; पण असेही क्षण आले
तेव्हा शत्रूच मित्र होऊन साहाय्यास धावून आले
भोळ्या जनतेचा विचार हरघडी केला, अन नेता झालो
पडणारी सीट , कशी जिंकून द्यावी , याच जहिरातीत शिकलो
न्याय-आयोगाने चिन्हाचे धनुष्य छान पेलले
दोन दिवस मुंबईत गेले, दोन दिल्लीत गेले
अमोल
जेष्ठ कृ एकादशी
१४/०६/२३
------------------------------
माझी_टवाळखोरी 📝 *
Thursday, May 25, 2023
आज मैदानात डाँट खेळला जरी
"एक 'डाँट' चेंडू, ५०० झाडं खड्डयात" हा नवीन नियम ऐकल्यार आजच्या सामन्यासाठी रोहितला सल्ला 📝
आज मैदानात डाँट खेळला जरी
रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏
तो चतुर विकेटखोर बाँल टाकतो
हात उंचावूनी जोरात अपील करतो
DSR घेऊनी खुशाल फासा टाकतो
याॅर्कर जरा येऊनी, तुझ्या पदो-पडी
रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏
सांग सुर्य-कुमारास काय जाहलें
रन काढल्याविना कुणा न सोडले
ज्यास त्याच चौ-कार, षट-कार काढले
एकटाच वाचशील काय तू तरी
रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏
त्या तिथे चिअर्सगर्लचा डान्स रंगला
शेठ- मालका सवे प्रेक्षक दंगला
तो पहा गुजराथला मृदुंग वाजला
*हाय! भाजली फिरून तीच भाकरी*😷
रोहित्या, खड्डा जपून कर तुझ्या घरी 🌳🏏
#माझी_टवाळखोरी 📝
२६/०५/२३
Friday, May 19, 2023
ती आली तेंव्हाही
२००० च्या नोटेला समर्पित
( कवी ग्रेस यांची माफी मागून)
ती आली तेंव्हाही, खिसा असाच मोकळा होता
जमा खर्चाचा ताळेबंद हा कवी सोडवत होता
तिथे 'चिप' होती म्हणूनी, सावधतेने मी वावरलो
त्यावेळी जो तो चावट, 'अच्छी नोट' म्हणत होता
बँकेत समजले मजला,संपला बॅलेन्स माझा
खिडकीवर कॅशियर तेंव्हा,गालात हसत होता
ती आज जातानाही, मज गहिवर नाही
वस्ताद रूपया तो,तसाच वाकडा होता
www.poetrymazi.blogspot.com
Tuesday, April 18, 2023
दादा बोलंना
कमळीचे मनोगत 🪷
( * मनोरंजन हा हेतू)
दादा बोलंना, दादा चालंना,
दादा खंत करी ,( परी) काही केल्या गावंना s s s
दादा बोलंना ..
गेलो प्रभातीच्या वेळी
घेतली शपथ एक काळी
आम्ही 'हातात - हात' घालून रे
चल ये रे ये रे गड्या, नाचु उडू घालू फुगड्या
खेळू विका- कास घरी ,थीम् धरी थीम्
दादा बोलंना ..
महा- राष्ट्राचे आंगण, आम्हा दिले आहे आंदण
'उन्हे' पळवू आपण दोघेजण
जन विषयाचे किडे,ज्यांचीधाव इडिकडे
आपण करु सगळ्यांना 'शुध्द' रे
दादा मुळी न आला फुलून
न्यूज वाले गेले आटून
कोण हा दादा! त्यांचा एकच 'वादा' रे !
#माझी_टवाळखोरी 📝
www.poetrymazi.blogspot.com
१९/०४/२३
Tuesday, April 4, 2023
फडतूस' आणि 'काडतूस' *
'फडतूस' आणि 'काडतूस' *
( * प्रासंगिक मनोरंजन हा हेतू)
राजकारणी लोकांनी या दोन शब्दांना वलय प्राप्त करुन दिले असले तरी लहानपणापासून सांगली सारख्या गावात या शब्दांचा मुक्त वापर आम्ही मित्र-मंडळी करायचो
आजच्या सारखे भरमसाट सिनेमे नसताना आणि त्याचे रिव्ह्यू / रेटींग नसताना एखादा सिनेमा बघून आलोय हे कळल्यावर दुस-या दिवशी शाळेत जाताना चर्चा व्हायची,
'कसा आहे रे सिनेमा ' ?
( तो सिनेमा चांगला/ बरा असला तरी ठरलेले उत्तर )
फडतूस रे, एकदम फडतूस.
अजिबात बघू नकोस.
थर्ड क्लास हा शब्द आम्ही मित्र वापरतच नसू कारण याचा कुठेतरी संबंध डिग्रीशी ( पोलिसी/ शैक्शणीक योग्य वाटेल तसे घेणे ) येत होता, आणि आपलं पितळं उघडं पडेल याची तेंव्हा भिती मनात वाटायची
त्यामुळे फडतूस हा शब्दच फिट्ट होता
फडतूस सिनेमातील दृश्यांचे वर्णन ऐकत / ऐकवत जेंव्हा आमचा घोळका शाळेजवळ यायचा तेंव्हा तिथले जनता जनरल स्टोअर्स बघून अचानक एका मित्राची ट्यूब पेटायची आणि म्हणायचा,
अरं, काल मी मसाला गोळ्या घ्यायला पैसे दिलेले की लेका तुला,
आता 'फडतूस' सिनेमा ठेव बाजूला,मसाल्याच्या गोळ्या खिशातून ' काडतूस' का नाहीस सांग
किती त्या फडतूस शिनेमावर चर्चा करायलाय ☺️
#माझी_टवाळखोरी 📝
०५/०४/२३
poetrymazi.blogspot.com
Thursday, March 30, 2023
संपता इयर हे
सर्व सेल्समन ना समर्पित :-
(मुळ पद ; गुंतता हृदय हे )
संपता इयर हे
संपता इयर s s s हे,आजच्या दिवसा पाशी
हा सेल्समन अडखळे तुझ्या दाराशी
संपता इयर हे
हा इथे जाहला संगम नफा तोट्याचा
प्राक्तनी आपुल्या योग तो फिरण्याचा
अद्वैत आपुले जुळते सेल्स टार्गेटशी
हा सेल्समन अडखळे तुझ्या दाराशी
संपता s s इयर हे
सुदैवी आपण , सुखावलो या क्षेत्री
सहवास वाढता, झळाळले ऋण तेही
स्मर एकच तेंव्हा 'ग्राहक' निज हृदयाशी
संपता इयर हे ,आजच्या दिवसा पाशी
हा सेल्समन अडखळे तुझ्या दाराशी
( एक सेल्समन 📝)
३१/०३/२३
www.poetrymazi.blogspot.com
Saturday, March 4, 2023
कुणी माझ्या मतात लपलयं रे
ज्या निकालाची तीस देशांनी नोंद घेतली त्यावर आजची #रविवारची_टवाळखोरी
दादांनो, ताईंनो, काकांनो, काकूंनो
तेरी भी चूप, मेरी भी चूप
कुणाला काही सांगू नका
कबूल?
"कसबा राजा" ऐट दावतो
गुपित जपलंय रे..
कुणी माझ्या मतात लपलयं रे
कुणी माझ्या मतात लपलयं रे
ते दिसले, अन आम्ही पाहिले
पाहिले परि ते सा-यांने
डोळ्यात इशारे हसले
हसले ते मोठ्या तो-याने
हे कसे न त्याला कळले
कळले आता नि-कालाने
'मत' न पडले, मन न जुळले
थोडं ( ? ) चुकलं रे
कुणी माझ्या मतात लपलयं रे
कुणी माझ्या मतात लपलयं रे
तो भाव 'मताचा ' दिसला
दिसला मग 'संशय' कसला?
हा नखरा का मग फसला
फसला हा अल्लड चाळा
पेठेत बहाणा असला?
बसला उमेदवार तो भोळा
प्रीत अशी परी रीत अशी का?
कोडं सुटलयं रे
कुणी माझ्या मनात लपलयं रे
कुणी माझ्या मनात लपलयं रे
#माझी_टवाळखोरी 📝
०५/०३/२०२३
poetrymazi.blogspot.com
Thursday, February 23, 2023
सखी बंद झाल्या मालिका
#प्रासंगिक
प्राईम टाईम मालिका प्रेमी "हॅलो सखीस,
सखी बंद झाल्या मालिका
आता तरी बोलशील का?
जहिरात जास्त देखणी
नाही आज पाहिली कुणी
हा प्रहर जालीम जाहला
री- मोट तू ठेवशील का
ताटात आहे अन्न पण
लक्षात आहे गीतही
ते भान-गडी छेडणारे
"ए-पी सोड" तू सोडशील का?
जे जे नको ते जीवनी
ते सर्व आहे दाखविले
तरीही उरे काही उणे
तू पूर्णता: थांबशील का?
सखी बंद झाल्या वाहिन्या
( प्रासंगिक) अमोल
१९/०२/२३
#माझी_टवाळखोरी 📝
Friday, February 3, 2023
माझी विडेंनबर्ग_गिरी
प्रासंगिक ( विडेंनबर्गीरी) 📝
अदानीच्या शेअर्सनी,लाल लाल तक्त्यांनी
'लाॅस-रेट' माझा मीच काढीला
ब्रेक आता लागलाय मार्केट वाढीला
'शाॅर्ट- सेलिंग' टेक्निक लाख-मोलाची
आली आता वेळ 'फेल होण्याची
गुंतवले पैसे-मोर, रुपे-मोर जोडीला
ब्रेक आता लागलाय मार्केट वाढीला
जात होता वाटेनं तो तो-यात
अवचित आला शनी कुंभेत
तुमच्या आता गर्वाचा फुगा कसा फुटला
ब्रेक आता लागलाय मार्केट वाढीला
चीड आता पहा इन्व्हेस्टरची
इज्ज्त थोडी ठेवा आपल्या ग्रुपची
काय आता म्हणावे, 'हिंडेनबर्गच्या' खोडीला 😉
ब्रेक नका लाऊ मार्केट वाढीला
अमोल
#माझी_टवाळखोरी 📝
poetrymazi.blogspot.com
०४/०२/२३
Thursday, February 2, 2023
बजेट २०२३: कोणता पर्याय घेऊ हाती
२०२३ च्या बजेट नंतर आम्हाला सुचलेले गाणे *
' *निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* '
( मुळ गाणे: विठ्ठला, कोणता झेंडा घेऊ हाती )
नोकरीच्या पैशाचा भरावा टॅक्स, भरण्याच्या पर्यायाचे धुके घनदाट
आपली मेहनत,आपलीच खाती, ख-या इंन्कमची आपणास भिती
' *निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* '
आजवर ज्यांची केली मी पावती, भलताच त्याचा अर्थ होता
पुरे झाली आता उगा माथेफोडी, पैशात माझा जीव होता
वाचवाया टॅक्स म्हणुनीया किती चाकरमानी खाती माती
'स्किम' कोणती आहे? वेळ कोणा आहे?
*निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* '
सेव्हिंग्जदाखवण्यातच व्यर्थ हे जगणं,उभ्या उभ्या संपून जाई
पासबुक माझं रितं बघुनी उमगलं ,कुंपन हितं शेण खाई
भक्ताच्या कपाळी फाँर्म सोळा तरी, लाख वेगळे, वेगळे कोटी
टॅक्सेबल रिती, टॅक्स हीच भिती
*निर्मला ,कोणता पर्याय घेऊ हाती* '
माझी_( टॅक्सेबल)_टवाळखोरी 📝
०३/०२/२२
( टिप: * मनोरंजन हा हेतू)
Monday, January 16, 2023
Sunday, January 15, 2023
चढाओढीने भांडत होते
आज खास #क्रिंकांत निमित्याने ( मुळ गाणे: बाई मी पतंग उडवीत होते )
चढाओढीनं भांडत होते, ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते
चित्रा ताईंचा चढला पारा
ट्विट केले हो अकरा बारा
एकमेकांना अडवितं होते
ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते.
काटाकाटीचा बेशरम रंग
जो तो युध्दात आमच्या दंग
दैव हारजीत घडवीत होते
ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते
माझ्या धनुष्याचा तुटला दोरा
पोलिस ठाण्यात मारल्या चकरा
गुंता सोडवायला मामा-मामी होते
ग बाई मी प्रसिध्दी मिळवीत होते
अमोल
१६/०१/२३
#किंक्रांत
#माझी_टवाळखोरी
poetrymazi.blogspot.com
Tuesday, January 3, 2023
उर्फी ' साजूक 'चित्रातली'
- नववर्षात आलेली पहिली ऊर्मी 😷 ( प्रासंगिक)
पहिल्या तारखेचा प्रेमानं सल्ला
सोशली सगळं हे बाद
ही ' उर्फी ' साजूक 'चित्रातली'
तिचा 'वाघानं' घातली साद
'इन्स्टा' वरुन करु नको इशारा
भिडू दे आता डोळ्याला डोळा
इथं बी 'मेटा' तिथं बी 'कुटी'
जोसानं ट्विटू दे आग
( ही ' उर्फी ' साजूक 'चित्रातली'
तिचा 'वाघानं' घातली साद )
वरुन जरी हा सेट(ल)मेट झाला
खबर लागली 'अंधार'वाडीला
लागलाय आता तोल सुटाया
वादाची उठलीया लाट
( ही ' उर्फी ' साजूक 'चित्रातली'
तिचा 'वाघानं' घातली साद )
अमोल 📝
०३/०१/२०२२
#साजूक_वाद
poetrymazi.blogspot.com