या विश्वात अगणित आकाशगंगा आहेत. त्यात आपली आकाशगंगा, मग पृथ्वी, भारत आणि मग आपले गावं त्यात आपणं म्हणजे आपण किती लहान आहोत वगैरे आध्यात्मिक प्रवचन ब-याचदा ऐकले आहे
पण त्याचं एक छोटं माॅडेल काल मरीन लाईन्सला प्रत्यक्ष अनुभवलं.
गर्दी मुंबईकरांना नवी नाही
लोकल रद्द/ उशीरा आल्याने होणारी गर्दी, गणेशोत्सव, दहीहंडी, राजकीय सभा, जयंत्या, अंगारकी, नवरात्रोत्सव, आणि कुठलाही शनिवार-रविवार गर्दी असणार हे गृहीत असतेच
पण कालचा गर्दीचा महापूर मात्र अचंबीत करणारा होता आणि याची चुणूक दादर स्टेशनलाच आली
काल पहिल्यांदाच कदाचित असं झालं असेल की संध्याकाळच्या वेळेला बोरिवली -विरार कडे जाणा-या लोकल पेक्षाही चर्चगेट कडे जाणाऱ्या लोकल मधे जास्त गर्दी होती
चर्चगेट स्टेशनवरून बाहेर पडायलाच ५ मिनिटे लागली. स्टेशन समोरच्या एका छोट्या गल्लीतून मजल-दलमजल करीत कसंबसं मुख्य रस्त्यापर्यंत येता आलं.
५ ते ६ रोड शो ची वेळ असताना, साधारण पावणे सहा वाजताही चँम्पीअन्स ना आणणारी बस उजवीकडे वानखेडेच्या बाजूने, ट्रायडंट कडे मुंगीच्या गतीने जाण्याचा' ट्राय ' करत होती. ही G पासींगची बस तिकडे पोहोचणार मग खेळाडूंना घेणार आणि परत येईपर्यंत आमच्या 'निलांबरीने ( आपली डबलडेकर) सहज २ - ४ फे-या केल्या असत्या हा विचार मनात येऊन गेला 🤪
*या अथांग जनसमुदायाचा भाग बनताना वय्यक्तिक तुम्ही अगदीच 'शून्य' आहात याची जाणीव वेळोवेळी मोबाईल नेटवर्क देत होते*
अगदी हाकेच्या अंतरावर परिजन आहेत पण तुमच्या संपर्क क्षेत्राच्या बाहेर ( किंवा तुमच्या अवती भवती आहेत तेच सध्या तुमचे परिजन) या वेगळ्या अलिप्तपणाची जाणीव झाली
या सगळ्यात आकाशातील ड्रोन मात्र सुदैवी होते. ही एकमेव गोष्ट पूर्ण मरिन-लाईन्सवर इकडे तिकडे ( वर-खाली ) सहज करु शकत होती 😛
"येतोस का? आम्ही असू तिकडे" असा सकाळी ९:३० ला पुण्याच्या मित्राला दिलेला मेसेज आणि ३:१५ ला त्याचे आणखी एका मित्रासह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स वर झालेले आगमन,(पण शक्य न झालेली भेट )
#लाडके_मित्र _योजने अंतर्गत, जे असे लाखो फाॅर्वर्ड्स काल दिवसभर ढकलले गेले त्याने
'न _भूतो_न_भविष्यति!' अशीही परिस्थिती काल मुंबईच्या मरिन लाईन्स वर उद्भवली,
आणि म्हणून
#लाडके_मित्र_योजना अंमलात आणणा-यांवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी , अध्यक्ष महोदय !
#मरीन_लाईन्सचा_महापूर
अमोल
०५/०७/२०२४
माझी_टवाळखोरी 📝