नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, July 1, 2025

शाळा सक्ती


 " मुलांना शाळेची सक्ती केलीत तर खबरदार! "


 असा दम देणारा पक्ष आमच्या शालेय जीवनात पाहिजे होता 


कायमचा पाठिंबा दिला असता ☺️



असो, एक अवांतर गोष्ट


खुप खुप वर्षांपुर्वी आपल्या मुंबापुरीतील एका लाकूडतोड्याची  'मराठी कु-हाड' वाशी खाडीत पडते.

.

( पुढे काय घडले हे मी सांगायला नको पण लेखन वाढवण्यासाठी देत आहे)


त्रिभाषिक सुत्राचे  सर्वोसर्वे उदास लाकूडतोड्याला पाहून प्रकटतात आणि त्याची कु-हाड त्याला देतात


तो म्हणतो ही इंग्रजीची आहे माझी नाही


मग सर्वोसर्वे दुसरी कु-हाड देतात, ती हिंदीची निघते


शेवटी मराठीची कु-हाड आणून सर्वोसर्वे लाकूडतोड्याच्या प्रामाणिक पणावर खुश होऊन तिन्ही भाषिक कु-हाडी लाकूडतोड्याला देतात


आणि म्हणून..

आमच्या मुंबापुरीच्या माथी इंग्रजी, हिंदीची पण कु-हाड कायमस्वरूपी आहे.

कुठली कुठल्या वेळी चालवायची हे मात्र तोच ठरवू शकतो


अवांतर संपलं


(पहिल्या ३ ओळींतर पुढे) 

पण शाळेत गेलो नसतो तर यापेक्षा बेकार सुचलं असतं 😁 


माझी_फुसकुंडी 📝

०२/०७/२५

Monday, June 2, 2025

जागतिक सायकल दिन



 " अमुक तमुक जागतिक दिनाच्या " वर्गीकरणात आज ३ जून ला 

जागतिक सायकल दिन 🚴🏽🚴🏻‍♀️🚴‍♂️

साजरा होतो


एक जमाना होता ब-याच जणांना 'माय'कल

माहित नव्हता, ( हेच मराठीत :अभ्यासात तुझा 'कल' कुठे आहे?  या प्रश्णाचे उत्तर ही नसायचे ) पण 'सायकल' ही गोष्ट मात्र जीवाभावाची असायची


बालपणी तीन चाकी सायकल पासूनचा सुरु झालेला आणि आज चार चाकी गाडीला मागे सायकल लावून पिकनिकला जायचे इथेपर्यंतचा अनेकांचा प्रवास थक्क करणारा वाटतो.

'सायकल' हा मराठी सिनेमा आणि 'सायकल' स्पर्धा यावर आधारित 'जो जिता वही सिकंदर' हा हिंदी सिनेमा मनात कायम स्वरूपी स्टॅन्ड ( घर करून)  लावून आहे.


यानिमित्याने आमच्या तमाम सायकल प्रेमी मित्र- मंडळीना आजच्या दिनाच्या अनेक शुभेच्छा 🏆🥇💐💐


चलाते रहो  ! 


( वडाप प्रेमी)  अमोल 📝

अवांतर: जागतिक वडाप ( वडा-पाव नव्हे ) दिन केंव्हा असतो रे भौ!


#माझी_फुसकुंडी 

#जागतिक_सायकल_दिन

०३/०६/२०२५

Sunday, June 1, 2025

दख्खनची राणी वाढदिवस


 वाढदीवस @ मुंबई ०१.०६.२०२५


वाढदिवसाला










कुणाला बोलावले जात नाही. जो तो हौसेने ,प्रेमाखातर येतो.उपस्थित रहायचा खर्च किमान १० रु

सकाळचा वाढदिवस जोरात होतो. सजावट दणक्यात असते. केक ही कापला जातो

संध्याकाळी त्यामानाने फारच थोडा अवधी असतो. दहा मिनीटे मिळतात फक्त, तरीही जमेल तसे सेलिब्रेशन होते


आज अनायसे रविवार असल्याने संध्याकाळच्या पार्टीत जाता आले. १०० व्या वेळी एकत्रच प्रवास करायचा मानस आहे, बघू

#deccanqueen 

#दख्खनची_राणी 

#नाबाद९६


Monday, May 26, 2025

प्रती दक्षिणद्वार सोहळा


 आमच्या नरसोबावाडीला कृष्णेचे पाणी मंदिरातील पादुकांवरुन दक्षिण दरवाजातून बाहेर पडले की 'दक्षिणद्वार सोहळा' संपन्न होतो


याच प्रमाणे " प्रती दक्षिणद्वार सोहळा " दरवर्षी आमच्या मुंबईत साजरा करायला हरकत नाही


सिद्धीविनायक मेट्रो स्टेशनवर पाणी घुसून, आचार्य अत्रे मेट्रो स्टेशनला दक्षिण दरवाजातून पाणी बाहेर आले की

" अँक्वा दक्षिण द्वार सोहळा" संपन्न झाला असे समजायचे


#माझी_फुसकुंडी 📝

२७/०५/२५


Friday, April 18, 2025

बंबईया हिंदी


 'संपर्कासाठी भाषा' हा उद्देश ठेऊन जर तिसरी भाषा शिकवायची असॆल तर २३ वी राज्यभाषा म्हणून तत्काळ

' बंबईया' हिंदी ला मान्यता देऊन तिचा अभ्यासक्रमात समावेश व्हावा ही विनंती, अध्यक्ष महोदय !


शिकण्यास, आत्मसात करण्यास सोपी.

घरातून निघाल्या पासून रिक्षा,बस,रेल्वे स्टेशन, लोकल,मेट्रो मुंबईतील प्रेक्षणीय ठिकाण,शाळा, कार्यालये  ते परतीचा प्रवास , सगळीकडे कायम बोलली जाणारी ही भाषा पहिली पासून मुलांना ( किमान MMRDA क्षेत्रातील ) शिकवली तर ते त्यांना पुढील आयुष्यात फायद्याचे ठरेल. 


मातृभाषेची  'मुळं'

बंबईया हिंदीची खोडं'

आणि awesome हिंग्लीश ने भरलेली 'पानं फुलं '


असा हा भाषेचा वटवृक्ष, त्री-भाषा सूत्राचा कल्पवृक्षच जणू


परीक्षेतील काही प्रश्ण

१) वडा-पाव कसा मागाल?

उत्तर: भाऊ, दो- वडा पाव 'पार्सल',

        ' चटणी' मत लगाना

२) पब्लिक ट्राॅस्पोर्ट मधील संवादाची उदाहरणे द्या.

उत्तर: अ) कंडक्टर : सुट्टा देना,सुट्टा देना. मेरे पास मोड नही है!

  ब) गर्दीच्या लोकल मधे- ए भैया, सरक बाजूला, बिच मे काय को खडा है बे !

३) मित्र/ मैत्रीणींमधील संवाद

उत्तर : out of सिलॅबस,  हे शिक्षण १ ते ४ थी अभ्यासक्रमात सध्या तरी नाही


आणि म्हणून

या भाषेची लागवड पहिली पासूनच करावी ही परत एकदा सभागृहाला विनंती


( बंबईका सब से बडा स्ट्रगलर)  अमोल 📝


#माझी_फुसकुंडी

१९/०४/२५

poetrymazi.blogspot.com

Saturday, March 15, 2025

आका' करुणा- करा,


 आज तुकाराम बीज. त्यांचीच एक रचना सध्याच्या घडामोडींवर


'आका' करुणा- करा, करितसे धावा

या मज सोडवा लवकरी


ऐकोनिया माझी, 'अंजनीची' वचने

घ्यावे 'दमायणे' वाचावीळ


मागे - पुढे अवघा असे बीड ठाव

मारुनी पायी भाव, खोकी घ्यावे


उशीर तो आता न पाहिजे केला

अहो जी ' देवेंद्रा ' वायदे-बाप।


उरले ते एक हेचि मज आता

अवघे विचारीता 'पद' गेले


तुका म्हणे आता करी कृपा दान

'कायदे ' समान दावी जना


#माझी_फुसकुंडी 📝

#तुकाराम_बीज २०२५

Tuesday, March 11, 2025

(अ)स्वच्छ गंगे भागीरथी


 विद्याधर गोखलेंची माफी मागून.

( प्रासंगिक)*


(अ)स्वच्छ गंगे भागीरथी

'हड' म्हणती टिकारथी *


चिदानंद-शव- करोनाची वाहवत नेली ही किर्ती !

आणिक घेऊनि तुला शिरावर गाई भक्त तव महती!


(अ)स्वच्छ गंगे भागीरथी !


निर्माल्यधारा तव जलधारा अमृतस्नानी अंगावर्ती

पवित्र पवित्र ! जय तीर्थ कुंभ-कर

लहरी जनता निनादती !


(अ)स्वच्छ गंगे भागीरथी !


#माझी_फुसकुंडी 📝

फाल्गुन शुक्ल त्रयोदशी

१२/०३/२०२५

Thursday, March 6, 2025

भय इथले संपत नाही


 कवी ग्रेस यांची माफी मागून


'भय्य' इथले संपत नाही,मज मराठी आठवण येते

मी संध्याकाळी येतो,तू मला'केम छो' म्हणते


ते डोसे खाऊगल्लीचे,ती घाटकोपरची माया

जोश्यांना ऐकले आपण, जोशात पुन्हा उगवाया..


तो बोल मंद फसवसा,हृदयास तोडूनी गेला

भाषेच्या वनवासाने अजून आघात झेलला


फाफड्यात जिलबी अवघी, ऐकते दु:ख पोह्यांचे

हे सरता संपत नाही,मरण राजभाषेचे


#माझी_फुसकुंडी 📝

०७/०३/२५


तळटीप: सुबह का भैय्या ( जी)

संध्याकाळी मुळ घाट-कोपरावर (पदावर ) आला की त्याला भैय्या नाही 'भाऊ' म्हणायचं 😉

Wednesday, February 26, 2025

मराठी भाषा दिन


 मराठी भाषा दिन/ कवी कुसुमाग्रज जयंती निमित्य शुभेच्छा 💐💐


कुसुमाग्रजांना भेटायला मराठी भाषा आली आणि पुढे..


ओळखलंत का सर? स्वर्गात आलं कोणी

शब्द होते कोमजलेले , समजत नव्हती वाणी


क्षणभर बसली,नंतर हसली, बोलली वरती पाहून

'परकी भाषा' पाहुणी आली,गेली कायमची राहून


थँक्यू, हॅपी , सॅड म्हणत चार समुहात नाचली

कशी बशी माय मराठी ' RIP' तून वाचली


काॅपी केली, पेस्ट झाले, स्वत:चे स्वाहा झाले

आशय,वृत,छंदाचे  तीन तेरा वाजले


'अभिजात' ला घेऊन संगे, सर आता लढते आहे

पडकी बाजू बांधते आहे,चिखल द्वेष गाडते आहे


'शब्दकोशा'कडे नजर जाताच,हसत हसत बोलली

शब्द नकोत सर, पण काळजी जरा वाटली


मोडून पडली भाषा, पण मोडला नाही कणा

पाठीवरती हात ठेऊन, Go ahead म्हणा


#माझी_फुसकुंडी 📝

२७/०२/२५

अमोल

Monday, February 24, 2025

मर्सी डे ज


 मला अजूनही आठवतंय, आमच्या शाळेत स्नेहसंमेलनाच्या वेळेला विद्यार्थी/ विद्यार्थीनी प्रतिनिधी हे पद असायचे. विद्यार्थी प्रतिनिधी हा १० वी चा ( १० वी पर्यंतची शाळा होती), साधारण 'क' किंवा 'ड' तुकडीचा, १-२ वर्ष १० वी तच राहिलेला, असा तगडा उमेदवार  या पदासाठी इच्छूक असायचा.

५ वी ते १० वी तील प्रत्येक तुकडीतील विद्यार्थी प्रतिनिधी, मुख्य प्रतिनिधीची  निवड करायचे


मग हा आमचा इच्छुक, प्रत्येक प्रतिनिधीला २ चाॅकलेट देऊन स्वतःसाठी स्नेहसंमेलन विद्यार्थी प्रतिनिधी हे पद सहज मिळवायचा.


*'पद' मिळवायला २ चाॅकलेट मधे काम व्हायचे असे  'मर्सी  डे' ज  होते शाळेतले.*


#माझी_फुसकुंडी 📝

#सिटी_हायस्कूल_सांगली

२४/०२/२५

Saturday, January 25, 2025

माझी फुसकुंडी


 


Wednesday, January 22, 2025

माझी_फुसकुंडी


 कलियुगातील कुंभमेळ्यात

भक्तांना गावली मोनालिसा

सेल्फी काढून घेण्यासाठी

खाली करतायत स्वतःचा खिसा 😁




#माझी_फुसकुंडी📝 

२३/०१/२५

Thursday, January 16, 2025

माझी फुसकुंडी


 


Tuesday, January 14, 2025

गोड बोलायाचे आहे पण.



 मकर संक्रांत स्पेशल ( कुसुमाग्रजांची माफी मागून)


'गोड'  बोलायाचे आहे पण बोलणार नाही

समोरच्या ताटातले 'लाडू' मोजणार नाही


माझ्या अंंतरात गंध 'गुळपोळीचा' दाटे

पण जिभेला तुपाची सवय सुटणार नाही


वाटीतल्या 'तीळ-गूळाचे' मला गवसले गुज

परि 'हलव्याचे काटे' मला टोचणार नाही


वडी तिळाची एकटी, दिसे तिथेच कडेला

होणे गायब कोणाला तिचे कळणार नाही


दूर पूर्वेकडे दिसे एक गाव पुणेरी

त्याचा दोष बोलण्याचा,कधी लाभणार नाही 


माझ्या फुसकुंडीने झालो टवाळखोर जनी

त्याच्या गोडव्याचा कधी, रसभंग होणार नाही


'तीळगूळ घ्या गोड बोला'


#माझी_फुसकुंडी

#माझी_टवाळखोरी 

#मकर_संक्रांत

१४/०१/२५ 📝

Saturday, January 11, 2025

माझी फुसकुंडी


 


Sunday, January 5, 2025

नववर्षाची_सुगंधीसंध्या


#नववर्षाची_सुगंधीसंध्या 🎼🎤

( आमची नववर्षातील पहिली फुसकुंडी)



काल पनवेलला वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महेश काळेंच्या या कार्यक्रमाला जायचा योग आला. जुने पनवेल इथे हे नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात पोहोचल्यावर,विष्णुदास भावे नाट्यगृह आणि सांगली आठवली. जुने पनवेलचे वातावरण, परिसर ,रसिक प्रेक्षक अशा अनेक गोष्टीत साम्य वाटलं.

वर्षातील पहिल्याच विकेंडला शास्त्रीय +उपशास्त्रीय मैफिली साठी भरलेले नाट्यगृह पाहून काळे बुवा ही खुष झाले आणि उपस्थितांचे अभिनंदन करुन 'बंदिश' सुरु केली.

गाणे सादर करता करता बुवा प्रेक्षकांशी संवाद साधत होते. असंच बोलताना ते म्हणाले की हा जो मागे तंबो-यावर मला साथ देत आहे तो तुमच्या पनवेलचा आहे बरं! दहावी पासून सुरु केलाय रियाज आणि आज तो केमिकल इंजिनिअरींगच्या दुस-या वर्षाला आहे. हे ऐकून क्षणभर अंगावर रोमांच आले.

हर्षा भोगले पासून अमोल केळकर पर्यंत वाया गेलेल्या केमिकल इंजिनिअर्स मधे दोन वर्षांनी अजून एकाची भर पडणार असा विचार मनात आला. कदाचित हा विचार बरोबर नसेल माझा पण काळे बुवांना साथ देणारा गायक नंतर लोटे-परशुराम मधील एका केमिकल कंपनीत कन्ट्रोल रुम मधे बसून कुलींग टाॅवरचा व्हाॅल चालू-बंद करतोय, प्रेशर व्हेसल मधील तापमान सेट करतोय वगैरे विचार त्याक्षणी तरी मला एकदम चुकीचे वाटले.

मनातली ही रिअँक्शन इतकी पुढे गेली की बुवांच्या मागे जो मोठ्ठा फलक लावला होता ( वरच्या चित्रात बघू शकाल) त्यातील. 'पांढरे ढग' हे केमिकल कंपनीतून बाहेर पडणारे विषारी वायू वाटू लागले आणि तंबोऱ्याची सावली ही चेंबूरच्या RCF कंपनीतील युरिया टाँवर वाटू लागला ( बघा परत एकदा चित्र)

अर्थात सुदैवाने काळे बुवांमुळे वेळीच ही रिअँक्शन थांबली जेंव्हा त्यांनी तंबो-याला " नादब्रह्म " हा शब्द सांगितला.  ( इतके दिवस नादब्रह्न म्हणजे इडली हेच आम्ही समजत होतो) आणि पुढच्या इतर बंदिशींची, नाट्यसंगीत,सुगम,भावगीतांच्या कँटेलिस्टने आम्ही वेळीच 'नाद'ब्रह्माच्या केमिस्ट्रीत तल्लीन झालो.

दोन - अडीच तासाची मैफिल संपली आणि पडदा पडत असताना प्रेक्षकां मधून आवाज आला ' कानडा राजा पंढरीचा '

प्रेक्षकांच्या विनंतीला मान देऊन कार्यक्रम संपल्या नंतर परत ७ मिनीटे जे काळे बुवा गायले तिथेच आमचे पैसे वसूल झाले.

काळेंनी मैफिलीत जे एक गाणे ऐकवले तेच जरा वेगळ्या शब्दात


'जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य केले

गोड गाणे ऐकले, महेशाचे


( संगीत प्रेमी)  अमोल

६/०१/२५


ता.क : ज्यांची आयुष्यात गाणं शिकायची इच्छा अपूर्ण राहिली असेल त्यांनी महेश काळेंच्या कार्यक्रमाला जावे, निम्मा वेळ ते प्रेक्षकांना गाणे शिकवण्यात घालवतात. आयोजकांनाही विनंती की त्यांनीही बुकिंग साईट वर उल्लेख करावा की एवढे जास्त तिकीट हे गाणे ऐकणे+ शिकणे याचे आहे.


म्हणजे आमच्या सारख्या फक्त गाणे ऐकायला इच्छुक असणाऱ्या रसिकांचा भ्रमनिरास होणार नाही 😉

Related Posts Plugin for WordPress, Blogger...