नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Monday, October 27, 2025

ही वाट वाट लावे


 दिवाळी सुट्टी संपवून सुट्टीच्या शेवटच्या रविवारी आपल्या गावाकडून, कामाच्या ठिकाणच्या गावाकडे येतानाचा अनुभव

( *गाव सोडून जायची हुरहुर आता मागे पडून,  ट्रॅफिक जाम ची भिती ही सध्या वरचढ ठरतीय*) 


शांता शेळके यांची माफी मागून 🙏



ही वाट 'वाट' लावे, पुण्याबाहेरच्या गावा

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट 'वाट' लावे,


जिथे तिथे घुसाया, वाहन आसुलेले

नाक्यावरती टोलच्या, मडगाड ठोकलेले.

इथे मोठ्या खड्ड्यांनी, टायर फुस्स व्हावा

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट 'वाट' लावे,


घे वाहन कडेला, थांबून ढाब्यापाशी

लागून भूक भारी मग खा वडा पावाशी

एकदाच  'जी - पे'  चा, पासवर्ड विसरावा

माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट 'वाट' लावे,


स्वप्नामधील गावा, पुण्यातून न जावे

स्वप्नामधील रस्त्याला, स्पिड ब्रेक न यावे

स्वप्नातल्या सुखाचा ,'टुकार' वेध घ्यावा


माझ्या मनातला का, तेथे रस्ता नसावा?

ही वाट 'वाट' लावे,


#माझी_फुसकुंडी 📝

२७/१०/२०२५

Saturday, October 18, 2025

्दिवाळॊ पहाट


 दिवाळी पहाट 🎇



मंडळी, नमस्कार 🙏


आज शनिवार. दिवाळी तर सुरू झालीय. कदाचित उद्यापासून ब-याच ठिकाणी पुढील काही दिवस 'दिवाळी पहाट' चे आयोजन असेल. आजपर्यंत टीव्हीवर लाईव्ह/ किंवा यू ट्यूब्जवर  पाहिलेल्या कार्यक्रमातून एक गोष्ट लक्षात आली ती अशी'-

भक्ती गीते / अभंग हा दिवाळी पहाट कार्यक्रमाचा प्रमुख गाभा असतो. आता कुठलाही अभंग घ्या

उदा. ' अवघा रंग एक झाला'

आता हे गाणे रेडिओ, टीव्ही किंवा कुठल्याही कार्यक्रमात गायक/ गायिका सादर करताना पहिल्या ओळीपासून ( धृ)  म्हणजे ' अवघा रंग एक झाला ' पासून गायला सुरवात करताय


पण, जिथे गायक / गायिका


 'रंगी रंगला श्रीरंग ' पासून सुरवात करुन, मुळ २-४ आलाप असताना वेगवेगळ्या ५-६ आलाप घेऊन ३ मिनीटाचे गाणे १० मिनिटांनी संपवतात तो कार्यक्रम म्हणजे

" दिवाळी पहाट "

( निवेदन चालू असताना ना तिकडे गायक - वादकांचे लक्ष असते ना रसिकांचे, हा वेगळाच मुद्दा)


अशी अनेक उदाहरणे पुढील काही दिवसात ऐकायला/ पहायला मिळतील.


असो  तुमची दिवाळी खूप मस्त जावो याच

  ✨💫 #माझी_टवाळखोरी📝✨🌟

अनुदिनीच्या सर्व वाचक, स्नेही, मित्र परिवार यांना शुभेच्छा 🙏


अमोल केळकर

poetrymazi.blogspot.com

Related Posts Plugin for WordPress, Blogger...