नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Thursday, June 28, 2012

नोंद


तूझ्या प्रतेक गोष्टीची नोंद
ठेवली होती त्याकाळी
हेच तर काम होतं मला
रोज उठल्यावर सकाळी

अमोल केळकर
जून २८,२०१२

Wednesday, June 27, 2012

पाऊस


ढगांची झाली गर्दी
हवामान खाते जागे झाले
पडणा-या
प्रत्येक सरीने
आडाखे यांचे बदलू लागले

 चोवीस तासाचा अंदाज
 काही तासात बदलतो
 सूर्यदेवही  या खेळात
 आपला डाव घेऊन जातो.

Tuesday, June 26, 2012

आठवण


  दररोज तुझ्या आठवणीत
  मन माझं रमतं
 चार ओळींनाही लगेचच
 आयतं काम मिळतं

अमोल केळकर

जून २७, २०१२

Monday, June 25, 2012

चूर्ण


तूझ्या शिवाय माझी चारोळी
कधीच होत नाही पूर्ण

.
.
.
.
.
.
.
.
पचत नसेल ज्यांना हे त्यांनी
रोज घ्यावे धौती योग चूर्ण

Sunday, June 24, 2012

वेळेचे गणीत



परत येणार असतानाही
मागे वळून  बघतेस जाताना
मग उगाचच दमछाक होते माझी
वेळेचे गणीत मांडताना

अमोल केळकर

जून २५, २०१२

Friday, June 22, 2012

धग


ढग होते साक्षीला
बाबांनी जेंव्हा पकडले
आठवत नाही त्यावेळी
कोण जास्त बरसले

अमोल केळकर
२३ जून २०१२

बॅकप


मनातल्या फाईलीत
सेव्ह कर शब्दांना
त्यानेच बनव चारोळी
विकली बॅकप घेताना

Thursday, June 21, 2012

आग


 'जातीने ' लक्ष  घालून !
 आग अटोक्यात आणली !
 जातीच्या राजकारणासाठी !
 हळूच जपून ठेवली !!!


नार्को टेस्ट



मला अजिबात आवडत नाही
तुझ्याशी खोटं बोलायला
.
.
.
.
.
.
.
.
.



पैसे ही आज काल फार घेतात
 नार्को टेस्ट  करायला

Wednesday, June 20, 2012

मान - अपमान


मान्य करतो एक गोष्ट
तेवढी उंची आमची नाही
म्हणून काय कधीच आम्ही
चारोळी करायची नाही ????


मान्यता मिळाली नाही तरी
मान आम्ही नेहमीच राखतो
मानापमानाच्या नाटकात
बळीचा बकरा आमचाच जातो.

चारोळी


चारोळी करायचे
चार ओळींनी ठरवले
ऒंजळभरुन शब्द लगेच
मदतीला धावले.

Tuesday, June 19, 2012

वेळ


 तू येणार असलीस की
मी कुणालाही थांबवत नाही
वेळ मात्र अशावेळीही
जायचे नाव घेत  नाही 


अमोल केळकर
२० जून २०१२

निवडणूक


संचारलीय सगळ्यांच्यात 
राष्ट्रपतीची निवडणूक
थांबणार आहे का त्याने
जनतेची  पिळवणूक ??

अमोल केळकर

१९ जून २०१२

Tuesday, June 12, 2012

टोल - धाड के - बोल



प्रत्येक रस्त्यावर प्रत्येक नाक्यावर !
वसुली साठी लावलाय टोल !
खिसा मोकळा करता करता !
जनतेचाच  सुटलाय तोल.!

अमोल केळकर

१३/६/१२

Tuesday, June 5, 2012

शुक्र - भ्रमण



 दृष्ट नको  लागू दे
 आकाशातील मैत्रीला
 ढगांनीच घेतले अच्छादून
 आमच्या वाईट नजरेला

आकाशगंगेच्या साईटवर

सुविधा द्या चॅटिंगची
मग काळजी नाही ग्रहांनाही
सरळ रेषेत येण्याची

अमोल केळकर

६/६/१२




Monday, June 4, 2012

वेध - शाळा


येणार येणार म्हणतोस पण
कधीच येत नाहीस वेळेवर !
.
.
.
हल्ला मात्र केला जातो
बिचा-या आमच्या वेध-शाळेवर !!

अमोल केळकर
४/६/१२

Sunday, June 3, 2012

सत्यवान - सावित्री



सकाळी सकाळी सत्यवानाने
सावित्रीली उठवले
वटपोर्णिमेच्या पुजेसाठी
घराबाहेत पिटाळले

वडाभोवती फिरताना

शंकेची पाल चुकचुकली
नवा जन्म कसा मिळेल
जर गर्भातच मला मारली ? 





Related Posts Plugin for WordPress, Blogger...