' रात्रीस खेळ चाले' या मूर्ख मालिकांचा
जाईल ना कसा मग हा वेळ शाहण्यांचा
रिमोट ना स्वयंभू हातात लागतो हा
जाहिरात लागताच बदलत राहतो हा
भेटीस राही साक्षी हा दूत माणसांचा
संपेल ना तरीही हा वेळ शाहण्यांचा
लागाताच ब्रेक इथे, गिळतो मी एक घास
पिताच घोट पाणी टीव्हीत दिसते सास
'भांडतात सौख्यभरे ' ना दोष 'अस्मितेचा '
संपेल ना तरीही हा वेळ शाहण्यांचा
या रोजच्या मालिकाना का बसलो मी झेलीत
या रोजच्या मालिकाना का बसलो मी झेलीत
आठवून सर्व घटना झोपलो मी त्या खोलीत
विसरलो सूर आपुल्या त्या धुंद जीवनाचा
संपेल ना तरीही हा वेळ शाहण्यांचा।
अमोल
----------------------------------------------
मुळ गाणे :
रात्रीस खेळ चाले या गूढ चांदण्याचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
संपेल ना कधीही हा खेळ सावल्यांचा
हा चंद्र ना स्वयंभू रवितेज वाहतो हा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा
ग्रहणात सावल्यांचा अभिशाप भोगतो हा
प्रीतीस होय साक्षी हा दूत चांदण्यांचा
आभास सावली हा असतो खरा प्रकाश
जे सत्य भासती ते असती नितांत भास
हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा
हसतात सावलीला हा दोष आंधळ्यांचा
या साजिर्या क्षणाला का आसवें दिठीत
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा
मिटतील सर्व शंका उबदार या मिठीत
गवसेल सूर आपुल्या या धुंद जीवनाचा
1 comment:
chan
Post a Comment