नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, April 6, 2016

ग्रुप सोडू नको


WHATSAPP   वरचे अनेक ग्रुप , त्यात होणारी
भांडणे  आणि त्यातूनच घडणारे   left  आणि  right  चे प्रकार  याना समर्पित 
लेफ्ट होऊन  सोडून जाऊ नको
ग्रुप सोडू नको …. 
( चाल : डाव मांडून भांडून मोडू नको
डाव मोडू नको )
-------------------------------------------------------------------
लेफ्ट होऊन  सोडून जाऊ नको 
ग्रुप सोडू नको …. 

वाचिले  मी तुझे सर्व, मीही पहिले 
सर्व काही  मनातले ते मी  जाणले 
तरी  तुझे  दु:ख  आता वाहू  नको 
ग्रुप सोडू नको …. 
'ग्रुपचा 'एडमीन  तूच केले मला 
स्वागताचा मला हार तूच घातला 
हार   तोडून  मोडून जाऊ  नको 
ग्रुप सोडू नको …. 


पाहिले मी तुझे फोटो , तू जे  टाकिले 
आणि तेच मी  तसे पुढेच धाडले 
तेच पाहून , लाजून , फाडू  नको 
ग्रुप सोडू नको …. 
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...