नेटकरी - ही एक नवीन जात सध्या सर्वत्र धुमाकूळ घालत आहे. या नेटक-यांना समर्पित
( आदरणीय साने गुरूजींची माफी मागून 🙏)
आता करुनी डेटा आँन,
नको राहू दे कुठले भान
नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण
मिडीया चॅनेल उठतील
बातम्या सा-या पेरतील
'मेटा-कुटीला' सारे येऊन पेटवूया हे रान 😷
कोण आम्हा अडवील
कोण आम्हा रडवील
अडवणूक करणाऱ्यांची उडवू दाणादाण
नेटक-यांची फौज निघे
'पुढे ढकलणे ' चोहीकडे
विनोदी टोमणे, मिम्स हीच आमची जान
पडून ना राहू आता
मारुया शाब्दिक लाथा
'नेटकरीच' कामकरी, भांडणावर ठाम
आता करुनी डेटा आँन,
नको राहू दे कुठले भान
नेटक-यांनो मज्जेसाठी लाऊ पणाला प्राण
( नेटकरी) अमोल 📝
कार्तिक शु चतुर्दशी
१८/११/२१
No comments:
Post a Comment