सोशल मिडियावरच कुठं तरी वाचलेलं की नंबर १ पटकावलेला लक्षात राहतो, नंबर २ वर कोण आहे हे कोणी लक्षात ठेवत नाही.
आपल्याकडे ही म्हणतात
'जो जिता वही सिकंदर ' वगैरे वगैरे.
मंडळी, चित्रातील या टर्किश अर्जुनाने आपल्या 'अँटिट्यूड' ने ( मराठी शब्द रोखठोक वागणूक? ? ) वरती जे लिहिले आहे ते अगदी खोटं पाडलं आहे. पॅरिस आँलिम्पिक मधे त्याने पदक जिंकलेल्या प्रकारात नंबर १ वर कोण आहे या पेक्षा सध्या सोशल मिडीयावर नंबर २ वर आलेल्या याचीच जास्त चर्चा आहे.
साला ,भाव खावा तर असा !
मला वाटतं तो हिंदी सिनेमांचा भक्त असावा आणि मिथूनदा, रजनीकांत यांचे सिनेमे पाहूनच त्याने एवढी 'सहजता' मिळवली असणार आहे अशा पध्दतीने गोळ्या मारण्यात
एखाद्या समुहाची मैफिल जमलीयं, गाणं म्हणणा-या मित्र - मैत्रिणीला गाण्याची फर्माइश झाल्यावर कुठल्याही वाद्यांची साथ, माईक , नोटेशन वगैरे नसताना 'प्रोफेशनल सिंगरला' लाजवेल असं गाणं त्याच्या/ तिच्याकडून सादर होणं अगदी असंच हे घडलयं
अशीच काहीजण व्हाट्सप ग्रुप / फेसबुकवर वर असतात, कधीतरी एकदाच येऊन अखादीच गोळी योग्य ठिकाणी मारून जातात आणि लाईक, कमेंटचा ढिग पडतो.
" एरवी उगाच रोजचं AK47 घेऊन ठो,ठो,ठो ठो करणा-यांकडे कुणाचं लक्षही नसतं फारसं "
असो, थोडक्यात सांगायचे झाले तर
'हार कर भी जीत ने वाले को बाजीगर कहते है' हा संवाद ' जो जिता वही सिकंदर' पेक्षा सध्या तरी भारी ठरलाय 🎯
#माझी_टवाळखोरी 📝
०३/०८/२४
आषाढ कृ. चतुर्दशी
poetrymazi.blogspot.com
No comments:
Post a Comment