आज सकाळी रवी ने दर्शन दिले अन लगेच आमच्यातला कवी जागा झाला . आणि लख्ख प्रकाश पडला .
( चाल : उगवला चंद्र पुनवेचा)
----------------------------------------
उघडला पाऊस जुलैचा
नदी भरुनी थांबविला मारा पाण्याचा
दाही दिशा गाड्या उरल्या
डावीकडे खड्ड्यात शिरल्या
नवीन गाड्या घरातच राहिल्या
ट्रॅफीकजाम हा चहुंकडे दिसला हायवेचा
-------------------------------------------
मूळ गाणे : -
उगवला चंद्र पुनवेचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा
मम हृदयी दरिया उसळला प्रीतिचा
दाहि दिशा कशा खुलल्या
वनिवनी कुमुदिनी फुलल्या
नववधु अधिर मनी जाहल्या
प्रणयरस हा चहुंकडे वितळला स्वर्गिचा
गीत | - | प्रल्हाद केशव अत्रे |
संगीत | - | श्रीनिवास खळे |
स्वर | - | बकुळ पंडित |
नाटक | - | पाणिग्रहण |
No comments:
Post a Comment