मध्यंतरी आमच्या ' टुकार कवितेवर ' काही प्रतिक्रिया आल्या होत्या . फालतूपणा, वेळ जात नाही बहुतेक ' रिकामा सुतार ' इ .इ .
दुर्दैवाने या सगळ्या प्रतिक्रिया आमच्या बायकोने वाचलया आणि .. मग हाय होणार
परत एक टुकार विडंबन
( चाल : आज मी रुसूनी आहे )
आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना
राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना !
केरसुणी मी धरावी, नुसतेच तू बघावे !
मी काम करताना , रोजचेच तू नटावे !
ते काम का करावे, समजूनही कळे ना
दमलो अती श्रमाने, की पाय चालवेना !
ना घेतली विश्रांती, कामात व्यस्त आहे
घरातला नेहमी चा नोकर दूर राहे?
धुणे अटीतटीचे, घासता भांडी संपेना
चुकवीन बायकोला, ऐसी युक्ति मिळे ना !
की सूड घेई काळ, भलता च हा तुरुंग
देण्यास खोल घाव, छळण्यात गुढरंग ?
फसलो असा कसा हा, ते आजला कळेना ?
आज मी बसून आहे, बायको जेवू घाले ना
राहिले तसेच काम, की भाकरी फुगे ना !
---------------------------------------
क्रिएटिवीटी रोज एक
जरी असेल टुकार अन फेक ---------------------------------------------
मुळ गाणे -
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मुळ गाणे -
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना
मिटले तसेच ओठ, की पाकळी हले ना !
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
समजूत मी करावी, म्हणुनीच तू रुसावे
मी हास सांगताच, रडताहि तू हसावे
ते आज का नसावे, समजावणी पटे ना
धरिला असा अबोला, की बोल बोलवेना !
का भावली मिठाची, अश्रूंत होत आहे
विरणार सागरी ह्या जाणून दूर राहे ?
चाले अटीतटीने, सुटता अढी सुटेना
मिटवील अंतराला, ऐसी मिठि जुटे ना !
की गूढ काहि डाव, वरचा न हा तरंग
घेण्यास खोल ठाव, बघण्यास अंतरंग ?
रुसवा असा कसा हा, ज्या आपले कळेना ?
अजुनी रुसून आहे, खुलता कळी खुले ना !
2 comments:
छान मजेशीर आहे
Thanks a lot
Post a Comment