२६ जानेवारी २०१७ ला तुला राशीची साडेसाती संपेल आणि मकर राशीची साडेसाती सुरु होईल .
वृश्चिक ची शेवटची अडीच आणि धनु ची ५ एक वर्ष शिल्लक राहतील .कुठलाही ग्रह बदल ( विशेषतः शनी बदल ) ही जोतिषासाठी विशेष पर्वणी. या कालावधीत साडेसाती संबधी सगळ्यात जास्त विचारणा होते / उपाय विचारले जातात . अशा या पर्वणीच्या कालावधीत संदीप खरेंच ' आता पुन्हा पाऊस येणार ' हे गाणं आठवत पण ते दुस-या रूपात
=====================
आता पुन्हा साडेसाती येणार
आता मकर वाले घाबरणार
परत जोतिषांना कंठ फुटणार
सगळ्यांनाच तुझी आठवण येणार
काय रे शनी देवा ....
मग ती आठवण कुणाला दाखवता नाही येणार,
मग तो ती लपवणार,
मग लपवुनही ती कुणाला तरी कळावसं वाटणार,
मग ते कोणीतरी ओळखणार,
मग मित्र असतील तर ओरडणार,
नातेवाईक असतील तर चिडणार,
मग नसतंच कळलं तर बरं, असं वाटणार...
आणि ह्या सगळ्याशी तुला काहीच देण घेण नसणार...
काय रे शनी देवा...
मग त्याच वेळी तिथे टीव्ही चालू असणार,
त्यात एखादा जोतिषी उपाय सांगत असणार
ज्याना साडेसाती नाही ते तावातावाने भाडंत असणार
निवेदिका प्रष्णांवर प्रश्न विचारणार
मकर वाले ते उपाय लिहीत असणार
धनु वाल्याना सर्व उपाय पाठ झाले असणार
वृश्चिक वाले तर आता थोडेच राहिले म्हणणार
बाकीच्यांना ना घेण ना देण पण फुकाचे कंदील लावणार...
काय रे शनी देवा...
साडेसाती येणार
मग हवा टाईट होणार
झालेल्या गर्वाची जाणीव होणार
मनातल्या मनात झालेल्या चुकांची उजळणी होणार
मग शनी महाराज आठवणार
पाय जमिनीला लागणार
अधिक नुकसान टाळण्यासाठी तेलाभिषेक होणार
मग शनी महात्म्याचे नित्य वाचन करावेसे वाटणार
कर्माचा हिशोब आलेल्या साडेसातीत अचूक लागणार
काय रे शनी देवा...
साडेसाती आधीही होती
साडेसाती आत्ताही आहे
साडेसाती नंतर ही असेल ..
नमो शनी देवा...
🏻
संकल्पना : अमोल 