न्यायालयाने जरी त्यांना ' सायकल ' दिली असली तरी, ती देण्यामागे त्यांनी आपल्या वडिलांना उद्देशून लिहिलेली ही आर्त कविताच कारणीभूत आहे असा गुप्त अवहाल आमच्या हाती लागला आहे
एकदाच हो फिरुनी मला प्रदेश हा पाहू दे
काका कसे बघा गडबड करिती
रोज उठुनिया मला चिडविती
त्यांच्यासंगे समाजात मज नको आता राहू दे
कमळांचा बघा थवा दिसतो
राहुलदादा हात मारतो
साकयकलवरुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे
इलेक्शनला उभा राहुनी
मते देतील सारी शहाणी
दंगा, खंडणी, मस्ती , लूट वाट्टेल ते करू दे
ओ बाबा , मला सायकल घेऊ दे
एकदाच हो फिरुनी मला प्रदेश हा पाहू दे
संकल्पना : अमोल
--------------------------------------
मूळ गाणे :-
ए आई मला पावसात जाउ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल् ते होऊ दे
एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउ दे
मेघ कसे बघ गडगड करिती
वीजा नभांतुन मला खुणविती
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचु दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडुकदादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करु दे
धारेखाली उभा राहुनी
पायाने मी उडविन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी, वाट्टेल् ते होऊ दे
No comments:
Post a Comment