नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, March 24, 2017

तू आता मात्र रिटायर होच , देवा


देवा, तू ही जा आता संपावर
अगदी बेमुदत. कधीच परत न येण्यासाठी
एक बर होईल
तुझ्यासाठी कुणी हाय कोर्टात जाणार नाही
विधान सभेत गदारोळ नाही
नास्तिकांचा प्रश्णच नाही,
श्रध्दा, भावना वगैरे सावरतील काही दिवसांनी
अन आस्तिक
त्यांना ही सवय होईल न भिण्याची कुणी पाठी नसताना
डाँ श्रीरामांचा आदर्श ठेऊन आम्ही कौसल्येच्या रामाला रिटायर करु
मग कशाला हवाय सामंजसपणा मंदिरासाठी,
मदिराही पुरेशी ठरेल दु:ख सारे विसरण्यासाठी
ओस पडू देत गाभारे,  होऊ देत संस्थान खालसा सारी
हा तुझ्या प्रकट दिनाच्या सुट्ट्या
करुन घेऊ अँडजेस्ट
काही इतर दोन चार संघटनेला संप करायला लावून
आणि मोदक, पुरणपोळीचे काय घेऊन बसलास
ते तर आता आम्हाला १२ महिने मिळू शकतात
कुठल्याही माँल मधे किंवा अगदी घरपोच सेवा
तुझ्या साठी लागणारा बंदोबस्त आम्ही इतर संघटनेला, नेत्यांना पुरवू
पण नको तू नकोसच आता
शेवटी राम राम म्हणलं तरी मरा यचे आहेच
काहीजण सहज, काही जण औषधाने आणी काहीजण औषध मिळाले नाही म्हणून
आणि त्यातून ही अडीअडचणीत तुझी आठवण आली तर घेऊ एक इंजक्शन मानसिक बळ वाढवायचे आणी हाच एक ठरेल संजीवनी मंत्र जगण्याचा
पण बस तू  आता मात्र रिटायर होच , देवा 🙏🏼
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...