नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, November 9, 2018

डाॅ काशिनाथ घाणेकर पर्व


📝 आणि. आणि...आणि  काशिनाथ घाणेकर

मी प्रभाकर पणशीकर स्वत:
 आणि माझी नाट्यसंस्था
 काशिनाथ घाणेकरांच्या पाठीशी
 खंबीरपणे उभी असेल

      ते -

काश्या,   काय करतोय तू 😡

 हा जीवन पट म्हणजे *आणि डाॅ...*

 साधारण १९६०- ते १९८६. चा  कालावधी
 ' रायगडाला जेंव्हा जाग येतेचा' १०० वा भाग चालू असतो.
नाटक संपतं,  वडील म्हणतात,  कानेटकरांने चांगलं लिहिलय नाटक,
 आणखी भाग होणार आहेत का?
'होय बाबा'
'म्हणजे दवाखान्यावर तुळशीपत्रच ठेवायचे ठरवलेले दिसते'
 मी चिपळूण ला जातोय इति वडील.
हा पालकांशी झालेला शेवटचा संवाद आणि काशिनाथ घाणेकर पर्वाची सुरवात. मस्त जमलीय.

सुलोचना दिदीं, संभाजी ला घेऊन कोल्हापूरला भालजी पेंढारकर  यांच्यकडे येतात आणि शिवाजीची भूमिका द्या असे सांगतात. अर्थात भालजी नकार देताना म्हणतात संभाजी,  शिवाजी दोन्ही भूमिका एकच कलाकार करु शकणार नाही.
( त्यांची काहीच चूक नाही यात कारण त्यावेळेला डाँ अमोल कोल्हे त्यांनी पाहिले नव्हते 😉)

तर सिनेमातील अनेक प्रसंग उदा. मुघले आझम सिनेमा पहायला गेल्यावर सौ घाणेकर,  कांचनला सिनेमाची कथा सांगताना आणि इतर अनेक प्रसंगात 'तुला पाहते रे' ची आठवण येतेच.
कितीही प्रयत्न केले तरी डाॅ घाणेकर - कांचन यांची विक्रम सरंजामे- इशाशी तुलना सिनेमाभर होत राहते.

"अश्रूंची झाली फुले "चा लाल्या  मस्त जमलाय हाच सिनेमाचा प्राण म्हणता येईल.

एकंदर कलाकार मंडळींच्या निवडीत सुलोचना( सोनाली), डाॅ लागू ( राघवन) ही पात्रे शोभून दिसली नाहीत .

 कानेटकर, पणशीकर, भालजी मात्र एकदम परफेक्ट

लेखक - निर्माता- कलाकार यांच्यातील द्वंद्व
तसेच
लागू- घाणेकर जुगलबंदी रंगत आणते.

सुरवातीला ६० च्या दशकात 'ही' थेटरात वडा मिळायचा.
शिवाजी मंदीर च्या मागे मुंबईत गिरण्यांचे भोंगे दिसायचे हे पहायला मिळाले.
आणि पुढे सगळं सिनेमात बघण्यासारखं .।

तरीपण काही आवडलेलं
बायकोच्या क्लिनिक मधे आलेल्या पेशंट कडून घाणेकरांना ' तुम्हाला कुठे तरी बघितलंय ' ही मिळालेली पहिली प्रशंसा ते मराठी नाट्यक्षेत्रात पहिली शिट्टी मिळालेला, एन्ट्रीला टाळी घेतललेला मराठी सुपरस्टार हिरो
आणि नामावलीत *आणि* कसं आल हा इतिहास एकदा नक्कीच पाहण्यासारखा.

कलाकाराला मिळालेली पहिली टाळी हा सरस्वतीचा मिळालेला शाप असतो.👏🏻
 यशाच्या शिखरावर असताना विद्यार्थ्यांनी विचारलेले
'  तुमचे नाव काय? ' हा प्रश्ण यशाचा ' यू' टर्न कसा ठरतो हे उत्तम दाखवलयं

*बाकी २-३ वर्षापूर्वी  दिवाळीला भावेंची " कट्यार जशी काळजात घुसली " तसा यंदाचा "घाणेकर पेग "म्हणावा तसा क.ड.क झाला नाही*

समाधान म्हणजे आमच्या सांगलीच्या अनेक कलाकारांना सिनेमात पाहिले.  त्यांचासोबत बसून सांगलीत सिनेमा पहायचा योग आला हे आमचे भाग्यच.😊

सुबोध साहेब , आता भावेंसाठी अभिमान वाटेल असा ' विष्णुदास भावेंचा' प्रोजेक्ट घ्या. यासाठी शुभेच्छा 💐

📝९/११/१८
अमोल
poetrymazi.blogspot.in

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...