नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Tuesday, April 16, 2019

आपुलकीची जेथ प्रचीती, तेथ पाय माझे वळती


*

मंडळी नमस्कार. 🙏🏻

आठवड्याच्या सुरवातीला एक वेगळा विषय मांडतोय. वेळ १७ मिनिट. जुईनगरला लोकल मधे बसलोय ऐरोलीत उतरेपर्यत जेवढे लिहिता येईल तेवढेच लिहितोय.

साधारण १५ एप्रिल आली की वेध लागतात मे महिन्यात गावी जायचे. सुट्टीचे प्लँनींग सुरू होते. त्याचवेळेला गावी कोणकोण नातेवाईक येणार याची विचारणा सुरू होते. तशीच एक उत्सुकता असते आपल्या शाळेतले गाव सोडून गेलेले  कोण कोण मित्र भेटणार?  ते आपण येणार आहोत त्याच वेळी येणार का?

सोशल मिडियामुळे आजकाल एकमेकांशी संपर्क रहात असला तरी प्रत्यक्ष भेटण्यातली मजा काही वेगळीच. पण आता झालंय काय की मित्राला विचारले आणि त्यांनी सांगितले की अरे यार, तू जेंव्हा गावी येणार आहेस त्याच्या पुढल्या आठवड्यात मी येणार आहे आहे रे. यावेळेला तरी आपली भेट शक्य नाही.

खरं म्हणजे नाॅर्मली इथे विषय संपतो. पण या वेळच्या गावच्या भेटीत आपण वेगळं करू या.

मित्र / मैत्रीण येणार नसतील तर काय झालं.? आपण गावाला गेलो की निदान त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या आई-बाबांना भेटून, लहानपणीच्या आठवणी जागून,  त्यांची विचारपूस करुन त्यांचा हातचा खाऊ परत खाऊन आलो तर? थकलेल्या त्या काका- काकूंना नक्कीच बरं वाटेल.

माझा मित्र दुबईला राहतो. तो जाता- येता मुंबईत भेटतो. पण पूर्वी ज्या हक्काने मी तिन्ही त्रिकाळ त्याच्या घरी रमायचो, आज किती वर्ष झाली गेलोच नाही आहे.
यंदा मी ठरवलयं जाऊन यायंच. वयाने आपलेे पालक वृध्द झालेत खरे पण आपली एक भेट त्यांना या उन्हाच्या तडाख्यात  गारवा देऊन जाईल.
तेंव्हा मी नसतानाही आमच्या गावच्या घरी तुमचे स्वागत 🙏🏻

ऐरोली आलं. उतरायला पाहिजे

*ओढ लागली अशी जिवाला गावाकडची माती*

📝 अमोल केळकर
a.kelkar9@gmail.com
Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...