उद्यापासून आमचे लाडके फेसबुक बंद होणार असे ऐकतोय. हे जर खरं असेल तर
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून देऊ वाॅल
एकच लाइक, देऊन भावा, फेसबुक सोडून धाव
अखेरचा हा तुला दंडवत
तुझे प्रोफाइल पाहिले वाचले, सारे बर्थ-डे सोपे झाले
आता हे परि सारे सरले, उरलं माग नाव
अखेरचा हा तुला दंडवत
का तू सोडूनी जातो झुक्या, कुठे शोधू मी मेमरी आता
कुणी न उरला वाली आता ,काँपी पेस्ट न ठाव
अखेरचा हा तुला दंडवत, सोडून देऊ वाॅल
एकच लाइक, देऊन भावा, फेसबुक सोडून धाव
( फेस-बुक कवी) अमोल 📝
२५/०५/२१
No comments:
Post a Comment