नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Friday, November 4, 2016

तव्यावर केलेली मी बुर्जी बहाल


दिवाळीची सुट्टी संपायच्या ( म्हणजे बायको माहेरून  परत यायच्या ) आधीची 
आमची  नवीन रेसिपी   .... 

( चाल : तुम्हावर केली मी मर्जी बहाल  , नका सोडून जाऊ  रंगमहाल ) 

तव्यावर केली मी बुर्जी बहाल,  
बघा आलाय लाल रंगजहाल 

कांद्याच्या पाती सोलून जागेवरती 
मी  चिरून घेतली लाल मिरची हाती 
मीठ घ्यावं, मोजून घालावं, अंड्याना फोडाव खुशाल 
तव्यावर केली मी बुर्जी बहाल, बघा आलाय लाल रंगजहाल 

चुरचुर करीत तेल  तव्यावर सोड 
त्या तवंग्यावर जिरंही घाल थोड  
वास तो सुटता  शेजारीही  होई हलाल 
तव्यावर केली मी बुर्जी बहाल, बघा आलाय लाल रंगजहाल 

भर भर  सगळी बुर्जी खायची घाई 
ठसका लागता लगेच आठवे आई 
अशीच व्हावी सुट्टी साजरी, नको तो आता फराळ 
तव्यावर केली मी बुर्जी बहाल, बघा आलाय लाल रंगजहाल 

संकल्पना : अमोल 

मूळ गाणे :



तुम्हांवर केलि मि मर्जि बहाल
नका सोडुन जाऊ, रंगमहाल

पापण्यांचि तोरणं बांधुन डोळ्यांवरती
ही नजर उधळिते काळजातली पिर्ती
जवळी यावं, मला पुसावं, गुपीत माझं खुशाल

हुरहुर म्हणु की ओढ म्हणू ही गोड
या बसा मंचकी, सुटंल गुलाबी कोडं
विरह जाळिता मला, रात ही पसरी मायाजाल

लाडे-लाडे अदबिनं तुम्हा विनविते बाई
पिरतिचा उघडला पिंजरा तुमच्या पायी
अशीच र्‍हावी रात साजणा, कधी न व्हावी सकाळ

Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...