मुबईकरांना रांग काही नावीन नाही. पण आजची ही रांग जरा वेगळीच वाटली
आणि उभ्या उभ्याच हे सुचलं
( चाल : वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना )
--------------------------------------------------------
रांग संपता संपेना, कुणी पुढेच जाईना
नव्या नोटा कशा घेऊ कुणी काहीच सांगेना
रांग संपता संपेना .........
लांब लांब खुप रांग ,झाली मधेच वाकडी
दूरदूर कोप-यात होती मोकळी बाकडी
माणसे येती मधे जाती, कुणी काहीच ऐकेना
जरा वेळाने अंधूक, दिसे नोटांचे बंडल
तीन चार तासा मधे वाटे गांठींन मंझील
उभा राहून पाय दुखे , तरी काहीच होईना
रांग संपता संपेना .........
Wish you all happy exchange
==========================
मूळ गाणे
वाट संपता संपेना कुणी वाटेत भेटेना
कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना
लांब लांब उंच घाट, वाट वाकडी-तोकडी
दूरदूर अंधारात एक दिसते झोपडी
सूर येती, अंधारती, कुणी गीतही म्हणेना
दिसे प्रकाश अंधूक, नभी तार्यांचा कंदील
अंतर दोन मैलांचे आता गाठीन मंझील
आकाशात रात्र फुले, चंद्र काहीच ऐकेना
कुठे आलो असा कसा कुणी काहीच सांगेना
लांब लांब उंच घाट, वाट वाकडी-तोकडी
दूरदूर अंधारात एक दिसते झोपडी
सूर येती, अंधारती, कुणी गीतही म्हणेना
दिसे प्रकाश अंधूक, नभी तार्यांचा कंदील
अंतर दोन मैलांचे आता गाठीन मंझील
आकाशात रात्र फुले, चंद्र काहीच ऐकेना
गीत | - | देवकीनंदन सारस्वत |
संगीत | - | दत्ता डावजेकर |
स्वर | - | जयवंत कुलकर्णी |
No comments:
Post a Comment