जे टोल मजला लागले, कायमचे बंद होतील का
माझ्या मनीची ही कथा, राजे तुम्हा कळेल का?
माझ्या मनीची ही कथा, राजे तुम्हा कळेल का?
मी पाहतो रस्त्या तुला, मी पाहतो जागाखुली
जे मी स्वप्नात पाहतो, प्रत्यक्ष ते होईल का?
जे मी स्वप्नात पाहतो, प्रत्यक्ष ते होईल का?
हा वेळ घटकेचा असा, पायात ब्रेक मारलो
जे झोपले होते मागे, जागे तरी होतील का?
जे झोपले होते मागे, जागे तरी होतील का?
माझे मनोगत मी तुला, केले निवेदन आज हे
इलेक्शन चे मत दिले, तुजला कधी समजेल का?
इलेक्शन चे मत दिले, तुजला कधी समजेल का?
संकल्पना : अमोल 
No comments:
Post a Comment