नक्की ऐका

मी विडंबनकार कसा झालो

 नाट्य परिषद सांगली, आयोजित #नाट्यपंढरी_वाचनकट्टा  आज दि. १६  सायं. ७ वा. l  भाग २८९ l कथावाचन l  लेखक : प्रल्हाद केशव अत्रे l वाचक : श्री. ...

Wednesday, February 15, 2017

..युतीत क्लिष्टता मोठी


ऋणानुबंधाच्या पिचून पडल्या गाठी...भेटीत धृष्टता मोठी

ढींग टांग  फेम  ब्रिटीश नंदी नी ही एक ओळ सुचवली  मग काय,  थोडा बदल करून गाणे पूर्ण करायला कितीसा वेळ 
------------------------------------------------------------------
ऋणानुबंधाच्या पिचून सुटल्या  गाठी...युतीत क्लिष्टता मोठी

त्या भाषणवेळा कोसळती  बोल जहरी 
त्या जहिराती आठवती  जनता प्रहरी  
कितीदा भांडलो, गेलो, रुसलो 
सत्तेवाचुनी  परस्परांच्या आजच  कळल्या गोष्टी 
....   ..युतीत क्लिष्टता मोठी


कधी नेते उसनेच  आणणे 
हरतील कसे ते बघणे  
कमळ ते उमलून  फुलणे  
बघणे, फसणे , सुडाने हसणे 
 पडल्यावरती उठण्यासाठी मोदभावना   पाठी 
          .   ..युतीत क्लिष्टता मोठी

आधी जवळ वाघाच्या बसलो 
सत्तेत टक्याला मुकलो 
मग धुसफुसलो , अन बिथरलो 
मराठीच्या आठवणीनी  हवेत मारल्या रेघा 

सत्तेसाठी  खूप लढलो , सत्तेसाठी जमेल ही गट्टी 
   .   ..युतीत क्लिष्टता मोठी



Please Share it! :)

No comments:

Related Posts Plugin for WordPress, Blogger...