आमच्या
' अरूणा मावशी ' साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा आणि
' नयनतारा जी ' ✨उद्घाटक
( * बहुतेक असाव्यात) अशा ९२ व्या मराठी साहित्य संमेलनाला आमच्या अगावू शुभेच्छा 💐
क्षण भर उघड 'नयन' देवा
करावया ही 'साहित्य ' पूजा
साहित्यनगरी जाऊन आता
' निमंत्रणाचा' हा नजराणा स्वीकारून घ्यावा 😉
क्षण भर उघड 'नयन' देवा
निरोप जातो न येण्याचा
निषेध पसरला बहिष्काराचा
' माफी पत्र' जालावर ठेवीले, प्रभू माझा यावा
क्षण भर उघड 'नयन' देवा
भांडण नाही , नाही शिवी
'यवतमाळ' ना, कुणाच्या गावी
लेखणीतले शब्द ही करिती, अखेरचा धावा.
क्षण भर उघड 'नयन' देवा
साहित्य संमेलनाला शुभेच्छा 💐
📝 टुकार साहित्यिक
८/१/१९
poetrymazi.blogspot.in
#साहित्य संमेलन
No comments:
Post a Comment